मध्यमवर्गिय मनोव्रुत्ति

स्वामि's picture
स्वामि in काथ्याकूट
16 Oct 2008 - 10:10 pm
गाभा: 

काहि काहि गोश्टि आपण मध्यम्वर्गिय टाळु शकत नाहि.आपण १ लाख रुपयाचे घड्याळ का नाहि घालत? आपण गळ्यात सोन्याच्या साखळ्या का नाहि घालुन फिरत?आपण कला केन्द्र अथवा डान्स बार वर पयसे का नाहि उधळत?(हा मुद्दा सन्सकाराचा जरि असला तरि याचा सम्बन्ध "पयसे उधळण्याशि" लावता येउ शकतो). आपले वाडवडिल आपल्याला कधि ना कधि थोडया प्रमाणात का होइना "दारिद्र्याचा चटका" का देतात ?(कळु दे त्याला पण !) जेन्व्हा आपण लाखालाखाचे व्यवहार करतो तेन्व्हा आपण स्वत: ला श्रिमन्त का समजतो? कोणाहि अधिकार्याने काहिहि आदेश दिला कि आपण प्रतिक्शिप्त क्रियेने त्याचि अम्मलबजावणि कशि करता येइल याचा विचार का करतो ? समजा आपल्याडे एखादा पुरावा नसेल तर आपल्याला ति आपलिच चुक का वाटते ?पएसे मागताना आपण का ओशाळतो ? ह्या आणि अशा अनेक गोश्टी. करा थोडा काथ्याकुट!

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

17 Oct 2008 - 2:00 am | संदीप चित्रे

घोडा का अडला, भाकरी का करपली आणि अजून एक असाच प्रश्न ज्या तिन्हीचे एकच उत्तर बिरबलाने दिले -- 'फिरवले नाही म्हणून'.
तुमचे सगळे प्रश्न वाचल्यावर एकच उत्तर सुचले -- 'पैसे नसतात म्हणून' :)

केवळ_विशेष's picture

17 Oct 2008 - 2:25 pm | केवळ_विशेष

>आपण १ लाख रुपयाचे घड्याळ का नाहि घालत

बरोबर वेळ बघायची असेल तर १ ला. घड्याळंच का हवं?

हेच काम काही हजारात होतंना!

>आपण गळ्यात सोन्याच्या साखळ्या का नाहि घालुन फिरत

आजकाल आपल्या गां** एवढा दम आहे का की आपण त्याच रक्षण करू शकू? जे लोकं घालतात त्यांचं सराउंडिंग तुम्ही पाह्यलंय का?
आपल्या खिशातून चिल्लर जरी पडली तरी आपण कावरे-बावरे होतो...सोन्याचं सोडा हो!

>आपण कला केन्द्र अथवा डान्स बार वर पयसे का नाहि उधळत?(हा मुद्दा सन्सकाराचा जरि असला तरि याचा सम्बन्ध "पयसे उधळण्याशि" लावता येउ शकतो).

बायाचं भोगायच्या असतील तर यापेक्षा कमी मधे काम होतं की...मग ४ लोकांत तमाशा का?

>आपले वाडवडिल आपल्याला कधि ना कधि थोडया प्रमाणात का होइना "दारिद्र्याचा चटका" का देतात ?(कळु दे त्याला पण !)
कष्टाची किंमत कळायलाच हवी हो मालक...
(अवांतर- इतरांचं शुद्धलेखनयुक्त ले़ख वाचतांना मजा येते ना...कारण ते सुविधा वापरतात कष्ट उपसून लिहितात...पण आपला लेख बघा.. नुसताच भावना पोहोचण्याशीच सगळा संबंध संपत नाही हो!) ह. घ्या :)

>जेन्व्हा आपण लाखालाखाचे व्यवहार करतो तेन्व्हा आपण स्वत: ला श्रिमन्त का समजतो?

कारण त्यावेळी आपण १ ला. चं घड्याळ घालू लागलेलो असतो...जे पहिल्यांदा घालता येत नव्हतं...:)

आपलाच (पापभिरू )
मध्यमवर्गीय!

भडकमकर मास्तर's picture

20 Oct 2008 - 5:10 pm | भडकमकर मास्तर

प्रश्न योग्य आहेत....
पण अट्टाहासाने वेगळं वागायचा प्रयत्न करण्यातही अर्थ नाही... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/