दुकानाचा गाळा विकत घेणे - कायदेशीर बाबी
नमस्कार,
दुकानाचा गाळा विकत घ्यायचा असेल तर कोणकोणत्या कायदेशीर बाबी तपासून पाहाव्या लागतात याबद्दल माहिती हवी आहे.
सहसा घर खरेदी करताना टोकन अमाउंट देणे, अॅग्रीमेंट करणे, सोसायटीचे एनोसी घेणे, इंडेक्स टू आणि कंप्लीशन सर्टिफिकेट घेणे अशी प्रक्रिया असते.
दुकान खरेदी करतानादेखील हीच प्रक्रिया असते का. कोणकोणती कागदपत्रे तपासून पाहावीत.
रिसेलचे दुकान घेताना आणि बिल्डरकडून दुकान घेताना डॉक्युमेंटेशन मधे काय फरक असतो.
जमीन बळकावली जाते तसे भाड्याने दिलेले दुकान भाडेकरु कडून बळकावले जाऊ शकते का, दुकान भाड्याने देताना घर भाड्याने देण्यापेक्षा वेगळे काय करावे लागते इत्यादी माहिती मिळवायची आहे.
मध्यंतरी एकदा अभ्या यांनी दुकान भाडेपट्टा करार कायद्यात कसलासा बदल होणार असे काही लिहिले होते.
त्याबद्दल वाचायला आवडेल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते क्याब व्यवसायाचं क्यांसल
जर काही ठरवले असेल तर कॅन्सल
>>दुकान खरेदी करतानादेखील हीच
(No subject)
मला ह्या कायद्याची काही
भाडेकरार नोंदणीकृत
दुकान खरेदी करताय खालील बाबी तपासून पहा