बिन्दियाजी कट्ट्यावर

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
9 Jun 2017 - 9:29 pm
गाभा: 

नमस्कार ,
आज आपल्या कट्ट्यावर बॉलीवूड मधील प्रसिद्ध स्टार बिंदिया आलेल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘जावा कि जवानी’ हा मुव्ही झुमृतालैया येथून रिलीज झाला आहे. लवकरच तो अकलूज , गुंटूर , तिनसुखिया सह संपूर्ण इंडियात रिलीज होणार आहे. मी पूनम बिन्दियाजींचे काट्यावर स्वागत करते. आणि सांगायचे राहून गेले बिन्दियाजींचे ‘बाळंतपण’ कोळसेवाडीत झाले आहे त्यामुळेच कि काय त्या फार उच्च मराठी बोलतात.
पूनम – बिन्दियाजी , थ्यांक्यू सो मच फॉर कमिंग ऑन कट्टा हं !
बिंदिया – माय प्रेशर !
पूनम – असे वाटते आहे कट्यावर ?
बिंदिया – मस्त , मला न कट्यावर खूप मज्जा येथे. कसेही बोला , राग नाय येत कट्यावर कोणाला पण , येतो राग ? no formalities.
पूनम – नाही हो , कित्ती मोकळ्या आणि मोठ्या मनाच्या आहात हो तुम्ही !
बिंदिया – ते सगळे नेचरलच हे (आहे) (काय बोलून गेलो? जीभ चावते )
पूनम – ( न समजून) हो न , तुमचा स्वभाव म्हणजे अगदी , खी खी खी
बिंदिया – खी खी खी ( दोघीही हसतात)
पूनम – कसा होता ‘jkj,जवानी’ चा अनुभव.
बिंदिया – सुपर , काय ताकदीचा आहे प्रणवकुमार. शॉट मागून शॉट लावतो. दिवस रात्र शुटींग , तरुण हे पण बेशिस्तपणा चालते नाय अजिबात. त्याला असम सरकारचे पण नॉमिनेशन आहे. जाम मेहनत करतो. काय बायसेप सांगू त्याचे. आणि स्क्रीनप्ले पण स्वतःच्या स्वतः बनवतो. पण छान अनुभव होता jkj चा.
पूनम – तुझा रोल काय आहे jkj मध्ये , जावा चा कि जवानीचा ?
बिंदिया – माझा न हेरोइनचा रोल आहे. प्रणबकुमारची ती ड्रीमगर्ल आहे तोच आहे माझा रोल. एकदम वेगळीच आहे कॅस्ट. म्हणजे त्याचे खूप कनफ्युजन होते कोणाला घ्यायची त्याचात. पहिली मलाच घेतली मग. खर सांगते god promise , तो न दीपिकाला घेणार होता पण त्याला मीच आवडले. माझ्या स्क्रीन टेस्ट ला त्याने मला outdoor शूट केले आणि रशेश पाहून मलाच परत घेतले. दीपिकाला नाय म्हणजे नाय. जेन्युईन आहे , फसवत नाही प्रणवकुमार.
पूनम – पण तुझा रोल काय आहे jkj मध्ये ?( वैतागून) जरा डिटेल सांग न आमच्या प्रेक्षकांना.
बिंदिया – सगळे सांगायचे तर टाइम नाही पुरणार. किती आणि कुठे कुठे शूट केले. एक एक वर्जिन लोकेशन आहेत. फुल म्हणजे फुल काम. पण ही इस अल्सो कुल हं सांगते तुला.
पूनम (त्रासिक आवाजात) – पण तुझा रोल काय आहे jkj मध्ये ?
बिंदिया ( चिडून हसत) – बोल्ली न मी ग – हिरोईनचाच रोल आहे.
पूनम – ही जावा कोण आहे ?
बिंदिया – खी , खी खी – जावा कोणी protagonist नाही अग ते एक कॉम्पुटर चा पार्ट आहे. आणि मी त्या पार्ट च्या प्रोग्रामिंग ची टीम लीड असते.
पूनम – ओह आय सी ! म्हणजे oracle ची जावा , जावा लेन्ग्वेज. यु मीन
बिंदिया – ओह्ह नो ! (हसत) – movie is not in Java language ही ही ही , हिंदी सिनेमा आहे ग , रिजनल नाहीये.
पूनम – मग जावा काय आहे?
बिंदिया – तुला जावा नाही माहित न – नो प्रोब्लम. सांगते. कॉल सेंटर माहिती आहे. असे चौकोन चौकोन करून स्टाफ बसतो आणि आणि त्यांचा एक स्मार्ट बॉस असतो. तो बॉस इज प्रणबकुमार. ही इज सच अ नाईस – रोज बारा सूर्यनमस्कार करणारच. ते पण सक्काळी. आम्ही शॉवर पण – नाय म्हणजे तो शॉवर पण चुकवणार पण सूर्यनमस्कार करणारच – बारा वेळा.
पूनम – ते जावा ss
बिंदिया – तू बीच बीच मध्ये बोलतेस ग , सांगते न जावा ची प्रोग्रामिंग. माझा एक कसिन आहे – एक्स्पर्ट इन जावा – u.s. मध्ये आहे तो. आता पुढच्या प्रोजेक्टला प्रणबकुमार पण u.s. मध्ये शॉट करणार आहे. सीक्वल आहे , ते जावा चे पुढचे वर्जन angular जावा म्हणाला प्रणबकुमार , खी खी खी.
पूनम - पण तुझा रोल काय आहे जावा मध्ये ?
बिंदिया – ( कपाळावर हात मारत ) इतका वेळा , अमुक अन तमुक जावा सगळे सांगितले तरी नाय म्हणजे नाय , तुला काय समजले नाय. जावा एक object ओरीएंट पार्ट आहे. आपल्या सिनेमात कसा सीक्व्ल असतो , तसा जावात पण सिक्वेल असतो आणि कधी मधी ते सिक्वेल इंजेकशन पण असते. जावा इस not इसी असे किती वेळा बोलतो प्रणबकुमार आणि मग मांडीवर हात फिरवत बोलतो , take it easy baby.( गांगरून) तो हात लावतो इथे तिथे पण मनात काय नसते त्याच्या. किती जवान मुली कॉल सेंटर मध्ये असतात ना? पण he is such a loyal.
पूनम- अच्छा , तर तू कॉल सेंटर ची जवानी आहेस तर ? फटाकडी अं ( खोटे हसून )
बिंदिया – आता तूला लास्ट ला सांगते कि मी जावा कि जवानी ची हिर्रोईन आहे. कॉलसेंटर तर एक प्लॉट आहे – २ songs आहेत आणि इंटरवल आधी तिथेच तर माझ्यावर रेप होतो.
पूनम – ( किंचाळून) काय ?
बिंदिया – येस , एकदम फेमिनाईन रोल आहे – स्त्रीवादी. बलात्कार होतो माझ्यावर पण मी कंपनी साठी एसकलेशन नाय होऊ देत , आणि देशासाठीपण ! शेवटी न आपण all Indians. एक मी एसकलेशन केले तर कॉलसेंटर बंद नाय होणार? कॉलसेंटर वर किती लोकांचे लाइफ आहे यु नो. तो रेप सीन काय सिम्बोलिक घेतलाय पी के ने आय मीन प्रणबकुमारने. तू सिनेमा पहा.
पूनम – ( कसनुसे होवून) छान . मग ह्या अत्याचाराचा बदला असेलच ना? तर प्रेकष्कहो sss
बिंदिया – हे s त्यात तू अपसेट नाय होयला पायजे. रेप इस just प्लॉट. एल्स प्रणबकुमार इस सो गुड, human रीलेशन , स्त्री ला काय हवे नको .....
पूनम – क्षमा करा प्रेक्षकहो , आपली वेळ संपत ली आहे. बिंदियाजी येथे येवून जावा ची जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे.
बिंदिया – लर्न जावा आणि पाहायला पण विसरू नका!

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Jun 2017 - 9:46 pm | मुक्त विहारि

एकदम खूसखूशीत लेख..