को ह ण ह क ह र

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
7 Jun 2017 - 1:44 pm
गाभा: 

डिस्केमर : खालील लेखातील मते, ही माझी वैक्तिक आहेत.मिपाच्या संपादकांचा किंवा इतर सद्स्यांचा ह्यात सहभाग नाही.

-----------------------------------------------------------

विसाव्या शतकातल्या नव्व्दाव्या दशकात, ईंटरनेटचा उदय झाला आणि मराठी पाऊल पडते पुढे, ह्या उक्तीनुसार, मराठी मंडळींनी पण ह्या क्षेत्रात बर्‍यापैकी यश मिळवले.याहू, ऑर्कूट ह्या सारखी सामाजीक संकेत स्थळे पण चालू झाली.काही मराठी माणसांनी, मराठी माणसांसाठी आणि बर्‍याच अंशी मराठीतच लिहील्या जाणारी काही संकेत-स्थळे बनवली.

मायबोली, मी-मराठी, मनोगत, मिसळपाव आणि ऐसी अक्षरे ही त्यापैकीच.(माझ्या अंदाजानुसार सध्या तरी मिपा, माबो आणि ऐअ, ही ३च संकेतस्थळे आंतरजालावर टिकून आहेत. )

माणसाचा मूळचा स्वभाव आपापला कंपू जमवायचा, मग हा स्वभाव पण आंतरजालावर उमटणारच.त्यामुळे मराठी संकेत-स्थळात पण विविध कंपू तयार झाले.त्यामुळे मी आंतरजालावरील मराठी संकेत-स्थळाचा सदस्य आहे, इतकेच सांगून भागत नाही, तर "नक्की कुठल्या?" हे पण सांगावे लागते.

म्हणजे तुम्ही "को ह ण ह क ह र?" असा प्रश्र्न कुणी विचारला तर, लगेच तुम्ही माबोकर की मिपाकर की ऐअकर, असे उत्तर द्यावे लागते.

शाळेत जसे विद्यार्थ्याचे ४ स्तर असतात तसेच इथे पण आहेत.चष्मा लावणारी आणि अभ्यासात हुषार असलेली मुले. ही जास्त करून कंपूबाज असतात आणि आपल्या कंपूत उगाच कुणाला घेत नाहीत."अहं ब्रह्मास्मी " हा जप ही मंडळी सतत जपत असतात.

थोडे टवाळ आणि थोडी अभ्यासू मंडळी, दुसर्‍या स्तरात मोडतात.ही मंडळी फार उच्च स्तरावर असतातहस, पण हे मग साधारण पणे साम्यवाद स्वीकारतात.इथे कंपूबाजी नसते पण टवाळगिरी फार अतिही करत नाहीत.(अर्थात हे सरसकटीकरण नाही. )

मस्ती-खोर आणि आपापल्या क्षेत्रात नांव कमावलेली कलाकर मंडळी तिसर्‍या क्षेत्रात मोडतात.ही मंडळी नांव पण कमावतात आणि जोडीला प्रचंड दंगेखोर पण असतात.तसा ह्यांचा पण कंपू असतो पण एकमेकात मतभेद पण असतातच.पण मतभेदांचा परीणाम ह्या<च्या मैत्रीवर होत नाही.

तर समाजाशी फटकून वागणारी मंड्ळी . ह्या तिन्ही वर्गा पासून दूर राहतात. ही मंडळी सामान्यतः स्वतःचे ब्लॉग काढतात.उडदा-माजी-काळे-गोरे, ह्या उक्ती प्रमाणे काही जण स्वतःच्या ब्लॉग व्यतीरिक्त इतर संकेत-स्थळांवर पण लिहीत असतात.हे सर्व संकेतस्थळांवर असतात आणि जमेल तसे आपापल्या ब्लॉगची जाहीरात पण करत असतात.(हे सरसकटीकरण नाही.)

=================

तर आता तुम्ही जर अभ्यासात हुषार आणि एक नंबरचे कंपूबाज असाल तर, तुमच्यासाठी सर्वात उत्तम संकेत-स्थळ म्हणजे "मायबोली."त्यातूनही तुम्ही जर आम्रिका-वासी असाल (माबोच्या भाषेत "उसगाव") तर फार उत्तम.म्हण्जे तुम्ही जरी नविन असाल तरी, तुम्हाला तुमचा कंपू बनवायला उत्तम.

आता समजा, तुम्ही ह्या वरील कॅटॅगरीत बसत नसाल तरी हरकत नाही.अशावेळी आपण आपलेच डू-आय-डी बनवायचे आणि स्वतःचा कंपू तयार करायचा.अर्थात ह्याला फार चिकाटी लागते.वर्षानुवर्षे सदस्य होवून चालत नाही, तर त्यासाठी माबोच्या पावसाळी सहलीला पण जावे लागते.अर्थात त्या सहलीचा खर्च सामान्यांच्या हाताबाहेरच असतो. त्यामुळे साहजिकच उच्च आर्थिक स्तर असलेलेच त्या सहलीला जावू शकतात.

आता एकदा का तुम्ही कंपूत सामील झाला की, मग पुढचा गड, म्हणजे स्वतःचा आणि आपल्या कंपूतल्या इतर सभासदांचे लेख, सतत पहिल्या पानावर कसे राहतील? ह्याची काळजी घेणे.ह्यासाठी थोडा अभ्यास करायला लागतो.

साधारण १-२ महिन्यात कोण कुठल्या कंपूत आहे, ह्याचा अंदाज घ्यायचा.आणि जो कुणी कुठल्याच कंपूत नसेल, असा आय.डी. शोधून काढायचा.माबोवरच न्हवे तर इतर संकेत-स्थळांवर पण असे "एकटे सदाशिव" बरेच असतात.कंपूतल्या सभासदांच्या लेखावर ताशेरे ओढण्यापेक्षा, ह्या अशा एकट्या सदस्यांवर हल्ला-बोल करणे सोपे जाते.आणि त्यातही असे एकट्या आय.डी.ने हल्ला-बोल करण्यापेक्षा आपले असंख्य डू-आय-डी पण ह्या कामाला जुंपायचे. आपले प्रतिसाद प्रकाशित व्हायला लागतात आणि स्वसंपादनाची सोय असल्याने, प्रकरण जास्त अंगाशी यायला लागले की, स्वसंपादनाचा फायदा पण घेता येतो.

एकदा का येन केन प्रकारेण आपली प्रसिद्धी व्हायला लागली, की मग आपल्या नादी कोण लागत नाही.त्यातूनही, कधी आपला आय.डी. नामशेष झाला तरी आपले इतर आय.डी. असल्याने आपण परत माबोवर मुक्त संचार करायला मोकळे होतो.

मोबोवर प्रतिसाद लिहितांना एक काळजी मात्र घ्यायची, तिथे सभासदांच्या नावापुढे "जी" लावायचा. म्हणजे मुवि न म्हणता, "मुविजी" असे म्हणायचे.कारण असे तुम्ही लिहिलेत तर "तुम्ही एक इतरांना आदर देणारी व्यक्ती आहात." असा भ्रम इतर सभासदांमध्ये पसरायला मदत होते.असा माझा अंदाज.खरे खोटे माबोकर जाणे.

अर्थात एकट्या दुकट्या सभासदांच्या प्रतिसादांना मात्र अनावश्यक प्रतिसाद देतांना त्यांच्या नावापुढे "जी" लावायची गरज नसते.हा प्रघात साधारण पणे डू-आय-डी पाळतात.त्यामुळे तुमचे जर माबो मध्ये डू-आय-डी नसतील तर "जी"चा वापर जास्तीत जास्त करा, असा सल्ला.

=================

आता तुम्हाला "ऐअ" कर व्हायचे असेल तर, एक गोष्ट मात्र पाळा.इथे फार प्रतिसाद येत नाहीत.तसे इथे वावरणे फार म्हणजे फारच सोपे.एक तर इथे डू-आय-डीचा त्रास फार कमी.एक्द दुसरा असला तरी इतर सभासद पण त्यांच्या प्रतिसादाकडॅ जास्त लक्ष देत नाहीत.आपसूकच त्यांचा (डू-आय-डींचा) तोरा मावळतो.

ऐअ बद्दल जास्त न लिहिता, एका वाक्यात सांगायचे तर, तुमचे लेख उत्तमच हवेत.जास्त करून विचार पुर्वक लिहिलेले.

=================

आता तुम्हाला "मिपाकर" व्हायचे असेल तर, मात्र थोडा विचार करा.कारण इथे "अहं ब्रह्मास्मी" ह्याला अर्थ नाही.अहं गुंडाळून जर तुम्ही जगू शकत असाल तर आणि तरच "मिपाकर" व्हा.

इथे कुणीही कुणाला "जी" वगैरे म्हणत नाही.ताई, दादा. काका अशा कौटुंबिक बिरुदावलींनीच शक्यतो प्रतिसाद दिल्या जातात.इथे शक्यतो मामू (मारून मुटकून) नौकरी करणारे आणि योग्य वेळ आली की स्वतः साठी जगणारे बर्‍यापैकी.जाणून बुजुन नौकरी करणारे असलेच तर तेही उच्च व्यावसायिक पदासाठी झटणारे.

शाळेतील हा दुसर्‍या किंवा तिसर्‍या स्तरातील मंडळी.त्यामुळे ह्यांना कंपूची गरज नसते.तुम्ही आलात तरी उत्तम आणि नाही आलात तरी उत्तम.

"मिपावर" तुम्ही वाट्टेल ती लिहू शकता पण थोडे तारतम्य मात्र बाळगायला लागते.

उदा.

लेखामध्ये आपल्या बायकोचे थोडे दोष दाखवले तरी येथील महिलावर्ग त्याकडे कानाडोळा करतात पण असा लेख तुम्ही माबो वर टाकलात तर मात्र तेथील महिलावर्ग तुमच्या पाठीशी हात न धूता लागतो.

तस्मात थोडी थट्टा-मस्करी मिपावर केलीत तरी चालते.

पब फालतू धागे मात्र मिपावर अजिबात चालत नाहीत.

उदा. गाण्यांच्या भेंड्या किंवा एखाद्या मालिकेवरील लेख. हे असे लेख माबो वर बर्‍यापैकी टिकतात.पण मिपावर मात्र असा प्रयत्न चुकुनही करू नका.

==========================

तसा आमचा ह्या तिन्ही संकेतस्थळांबाबत सुरुच आहे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Jun 2017 - 1:56 pm | कपिलमुनी

ऐअ वर विचारवंत (खासकरून डावे) असल्याचा आव आणून लिहावे !
आणि "विदा " देत मागत सुटावे

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2017 - 5:37 pm | टवाळ कार्टा

ऐसीवर इथल्यापेक्शा मोकळे वातावरण आहे

तुला ओसाड म्हणायचं आहे का?

इरसाल कार्टं's picture

8 Jun 2017 - 4:35 pm | इरसाल कार्टं

:D

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2017 - 5:54 pm | चौथा कोनाडा

:-)
कश्या दृष्टीने मोकळे? म्हणजे ते पॉर्न ओके प्लिझ सारखं ?

गॅरी ट्रुमन's picture

7 Jun 2017 - 5:46 pm | गॅरी ट्रुमन

माबोवर नुसते सदस्यखाते आहे पण तिथे कधीही काहीही लिहिलेले नाही. जेव्हा माबो बघितली होती तेव्हा ती वेबसाईट म्हणजे थोडासा भुलभुलैय्या वाटला होता. त्यानंतर तिथे फिरकलेलो नाही.

ऐसीवर पूर्वीच्या काळी थोडेफार लिहिले होते. पण ऐसी कधीच आवडले नाही. तसेच डाव्या, अतिविज्ञानवादी, पुरोगामी इत्यादी लोकांपासून मी जरा दूरच असतो. त्यामुळे आपोआप ऐसीपासून दुरावलो.

मिपासारखा आपलेपणा कुठेच मिळणे कदापि शक्य नाही हे लक्षात घेऊन २०१३ मध्येच इतर सर्व संकेतस्थळांवरून निवृत्ती स्विकारली. आणि इतर कुठे काही लिहायचा इरादाही नाही. माझ्यासाठी आपले मिपाच सर्वोत्तम.

मुक्त विहारि's picture

7 Jun 2017 - 6:17 pm | मुक्त विहारि

+ १

दीपक११७७'s picture

8 Jun 2017 - 11:57 am | दीपक११७७

सहमत +१११११११

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 1:42 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

इरसाल कार्टं's picture

8 Jun 2017 - 4:37 pm | इरसाल कार्टं

मिपासारखा आपलेपणा कुठेच मिळणे कदापि शक्य नाही हे लक्षात घेऊन २०१३ मध्येच इतर सर्व संकेतस्थळांवरून निवृत्ती स्विकारली. आणि इतर कुठे काही लिहायचा इरादाही नाही. माझ्यासाठी आपले मिपाच सर्वोत्तम.

मिपाव्यतिरिक्त कुठे भटकण्याची(भरकटण्याची म्हणा हवं तर) गरजच वाटत नाही.

मुविकाका सध्या लैच फॉर्मात आहेत :)

मुक्त विहारि's picture

7 Jun 2017 - 6:13 pm | मुक्त विहारि

काही लेख लिहिणे बाकी होते.

सध्या वेळ आहे तर लिहितो.

आणि तसेही मिपावर लिखाण स्वातंत्र्य असल्याने, मला तरी इथले वातावरण आवडते.

प्रचेतस's picture

7 Jun 2017 - 6:15 pm | प्रचेतस

पिंपरीत कधी येताय?
कट्टा करु मस्तपैकी.

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 11:11 am | मुक्त विहारि

पिंपरी पेक्षा, वेरूलची ट्रिप ठरवू या.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2017 - 6:41 pm | टवाळ कार्टा

धा वेळा कन्फर्म करून जा हो....त्यांना काही जागांची भीती वाटते =))
आणि सोनेरी पाणी असेल तर ते हमखास येत नाहीत

वेरूळची तिकिटे आणि हॉटेलचे आरक्षण करायचे. आणि तसा निरोप युआंना पाठवायचा.

वल्ली बोहल्यावरून पण वेरूळला येतीलच येतील ह्याची खात्री.

स्वगत : ह्या टकाला कोणाला कुठे बोलवायचे हे पण आजकाल समजत नाही की काय? अरे बाबा वल्ली जर रस्ता चुकले तरी वेरूळलाच जाणार आणि मी मठात.

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2017 - 1:45 pm | टवाळ कार्टा

=))

मिपाची हीच गोष्ट आवडते ना!! काही विशिष्ट विचारजंवंत सोडल्यास ताई, दादा, काका, आजी लोक सहज चालवून घेतात.
पूर्वी ज्यांचं लेखन वाचून आयडी घेतला होता, ते लोक आताशा लिहीत नाही इतकंच!!

गॅरी ट्रुमन's picture

7 Jun 2017 - 8:28 pm | गॅरी ट्रुमन

म्हणजे तुम्ही "को ह ण ह क ह र?" असा प्रश्र्न कुणी विचारला तर, लगेच तुम्ही माबोकर की मिपाकर की ऐअकर, असे उत्तर द्यावे लागते.

"को ह ण ह क ह र" म्हणजे काय?

रामपुरी's picture

7 Jun 2017 - 10:17 pm | रामपुरी

मंजे बावज्या धना बो हो रि हि क ह र.

सिरुसेरि's picture

8 Jun 2017 - 6:12 pm | सिरुसेरि

जॉबर जाहाला

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 9:54 am | मुक्त विहारि

पु.ल. देशपांडे ह्यांच्या "हसवणूक" नावाच्या पुस्तकातील "माझे पौष्टिक जीवन" ह्या लेखातील एक वाक्य आहे.

https://www.youtube.com/watch?v=N3av4qID134

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2017 - 10:15 am | गॅरी ट्रुमन

पु.ल. देशपांडे ह्यांच्या "हसवणूक" नावाच्या पुस्तकातील "माझे पौष्टिक जीवन" ह्या लेखातील एक वाक्य आहे.

हो. राघवरावांनी 'बोहोरीकर" चा संदर्भ दिल्यावर लक्षात आले :)

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2017 - 11:40 am | गॅरी ट्रुमन

राघवरावांनी 'बोहोरीकर" चा संदर्भ दिल्यावर लक्षात आले

राघवरावांनी नाही तर रामपुरींनी तो संदर्भ दिला.

मित्रहो's picture

8 Jun 2017 - 9:33 am | मित्रहो

म्हणजे काय तसेच
बो हो रि हि क ह र
म्हणजे काय

माबोवर धागे वर काढण्याचा उद्याोग असतो हे खरे आहे. चार चार वर्षे जुने धागे सुद्धा नेहमी वर असतात आणि नवीन धागे खाली जातात. दोन संकेत स्थळे बस झाले म्हणून ऐअ फार कधी वाचले नाही. तसेही त्यात आधी पहील्या पानावर धाग्यांच्या लिंक सोडून बरेच काही असायचे, माबोचेही तेच. पहील्या पानावर लोक जे वाचायला येतात ते नसेल तर ते पहिले पान कसले. आज हा लेख वाचल्यानंतर जवळ जवळ वर्षानंतर ऐअ बघितले. बरेच बदलले दिसते.

मितान's picture

8 Jun 2017 - 11:22 am | मितान

वा वा ! किती तो अभ्यास ! ( व्यासंग शब्द वापरायचा होता पण जाऊदे !!)

मिपाबद्दल अजून दिलखुलास लिहा की !

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 3:29 pm | मुक्त विहारि

मिपाबद्दल काय? लिहावे तितके कमी.

भटकंती असो किंवा पाकृ.
कविता असोत किंवा लेख.
काथ्याकूट असो किंवा कलादालन

सगळ्या ठिकाणी उत्तम साहित्य मिळते.

मी पहिला असा माणूस असेन की ज्याला मराठी आंजाची ओळखच ऐसी अक्षरेमुळे झाली. सुमारे ३ वर्षे मी ऐसी अक्षरे वाचत होतो, मग मिपाचा परिचय झाला. ऐसीचे सदस्यत्व घ्यावेसे वाटले नाही तेव्हा मात्र मिपावर पहिल्याच दिवशी सद्स्यत्वासाठी अर्ज केला. इथले मोकळे, घरगुती, अभिनिवेशहीन वातावरण आवडते खुप. नविन असलो तरी लोक दुर्लक्ष करत नाहीत, निदान प्रतिसाद देतात तरी. ऐसीचे तसे नाही. एक तर तिथे लोक कमी आहेत तसेच लेख येतात देखिल कमी. मात्र लिहिणारे अत्यंत अभ्यासू आहेत. कित्येकदा प्रतिसादांतुन इतकी मौलिक(हा शब्द ) माहिती मिळते. डाव्या विचारांना सांभाळून घेतले जाते तिथेपुरोगामी, पुरोगामी लोकांचा दांभिकपणा दाखवला की ष्रेणीहल्ला होतो. तीच तीच माणसे त्याच त्याच विषयावर महिनोनमहिने काथा कुटत असतात. मात्र अशातसुद्धा कधीकधी इतके चांगले वाचायला मिळते की सार्थ होते तिथे गेल्याचे. विशेषतः गवि, अजो, बॅटमॅन, कोल्हटकर, आदूबाळ, राघा, गब्बरसिंग, राही, चार्वी, नंदन, नितीन थत्ते, आणि मेन म्हणजे अनु राव यांच्या प्रतिसादांतुन कित्येकदा मला नवा दृष्टीकोन मिळालाय.
बाकी मायबोली म्हणजे माझ्यासाठी फक्त 'अन्नं वै प्राणा:'. ही एकमेव लेखमालिका वाचण्यासाट्।ई वारंवार तिथे जात असतो.

+ १

म्हणूनच मी लेहिले की , "ऐअ बद्दल जास्त न लिहिता, एका वाक्यात सांगायचे तर, तुमचे लेख उत्तमच हवेत.जास्त करून विचार पुर्वक लिहिलेले."

माझ्या सर्व प्रकारच्या काड्या करून झाल्या आहेत, अगदी संस्थळ उभे करून पार 3-4 वर्ष चालवून पण झाले आहे.. पण मिपा मिपा आहे बाकी काही बोलायची लिहायची गरज नाही.

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 5:01 pm | मुक्त विहारि

आपल्या संकेतस्थळाचा सदस्य होतो.

तिथे पण मजा यायची.

तुम्ही स्वतः होवूनच विषय काढलात ते उत्तम.

पण तुमचे संकेत स्थळ कधी बंद तर कधी सुरु, असे होत असल्याने, संलग्नता मिळत न्हवती. (तुमचे मन चुकून दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.)

नाही, मन इत्यादी काही दुखत नाही, फक्त काही लोकांना माझ्यामुळे त्रास झाला त्याबद्दल वाईट वाटते कधी कधी.
आणि तो एक प्रयोग होता, चालला असता तर उत्तम पण न चालून पण खूप काही शिकायला मिळाले. हे महत्वाचे :)

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 5:14 pm | मुक्त विहारि

"चालला असता तर उत्तम पण न चालून पण खूप काही शिकायला मिळाले. हे महत्वाचे."

+ १

निष्क्रिय असन्यापेक्षा प्रयोगशील असणे उत्तम.

तुम्ही पुन्हा जर संकेत स्थळ सुरु करणार असाल तर नक्की व्यनि करा.

सदस्य नक्कीच होईन.

नक्कीच, पण सध्या एकच गोष्ट हातात नाही ती म्हणजे वेळ :)
कधी साध्य होईल माहिती नाही व तेवढा उत्साह देखील आता नाही आहे. नाही म्हणायला आज ही वेबसाईट्सच तयार करतो पण फक्त क्लाइंटसाठी :D

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 5:39 pm | मुक्त विहारि

एक तर कुठलेही सामाजिक सम्केतस्थळ सुरु करायचे म्हणजे, डोक्याला त्रासच जास्त.

कारण आंतरजालावर प्रकाशित झालेले साहित्य पुसले जात नाही. शिवाय कोण कसा लिहिल? किंवा व्यक्त होईल ते काही सांगता येत नाही.

कुणीतरी कुठला तरी थेंब उडवणार आणि त्या थेंबाचा झालेला समुद्र आपल्यालाच अगस्ती प्रमाणे गिळावा लागणार.

काही अनुभवांती मी पण सध्या तरी, कुठलेही काम करीन पण समाजासाठी घंटा काही करणार नाही, असे ठरवले आहे. आपलेच जोडे आपल्याच गळ्यात येतात आणि येतांना इतर जण आपापले जोडे त्यात गुंतवतात.

असो,

पैसा's picture

9 Jun 2017 - 10:22 pm | पैसा

:) मला मायबोली आवडते. मिपा खूप जास्त आवडते. राजेचं मिमराठी पण आवडत होतं.

इतर गोष्टींबद्दल नो कॉमेंट्स. व्यक्ती तितक्या प्रकृती.

मार्मिक गोडसे's picture

12 Jun 2017 - 6:57 pm | मार्मिक गोडसे

ऐसीचे तसे नाही. एक तर तिथे लोक कमी आहेत तसेच लेख येतात देखिल कमी. मात्र लिहिणारे अत्यंत अभ्यासू आहेत.

त्याचबरोबर तेथील बॅनरही संतुलित असतात. २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये पदक विजेत्यांबरोबर दीपा कर्मार व दत्तु भोकनळ ह्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांनाही बॅनरवर स्थान दिले होते. हीच गोष्ट २०१६ च्या पॅरालिम्पिकच्या वेळीही आढळली. भारतीय विजेत्यांना बॅनरवर झळकावले होते. असे चित्र मला दुसर्‍या कोणत्याही संकेत-स्थळावर बघितल्याचे आठवत नाही.

संविधान दिनाला ऐसी अक्षरेच्या निबच्या मधोमध निळे अशोकचक्र दाखवले होते. ती कल्पना मला फार आवडली होती.

वरुण मोहिते's picture

13 Jun 2017 - 9:30 pm | वरुण मोहिते

ला कमी समजू नका . फार ब्रिलियंट लोकं आहेत तिकडे . माझं सदस्यत्व आहे पण वेळच नसतो आणि तात्विक चर्चा करायला बोर होते . मायबोली विशेष नाही आवडत तिथे बरीच लोकं वेगळा मुखवटा घालून वावरतात असे वाटते . मिपा ऑल टाइम हिट आहे . उपक्रम छान होते . पण आपुलकीची भावना मिपा वरच येते . मनोगत किंवा मी मराठी वर वाचताना पण ती भावना कधी आली नाही .

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 10:50 pm | मुक्त विहारि

तुझी आठवण येते ....