आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी

सागर's picture
सागर in काथ्याकूट
5 Jun 2017 - 2:03 pm
गाभा: 

इंग्रजीत ज्याला Soul Touching Songs म्हणतात. मराठीत आपण त्याला आत्म्याला झंकारुन टाकणारी गाणी म्हणूयात.
तर तुम्हाला खूपच आवडलेली व अगदी आत्म्याला वा मनाला खूपच टच करणारी तुमच्या आवडीची गाणी येथे शेअर करावीत यासाठी ही पोस्ट.

मी सुरुवात करतो:

अलिकडेच मी मिले हो तुम हमको बड़े नसीबों से हे नेहा कक्कर ने गायलेले गाणे ऐकले आणि हे गाणे मला खूप आवडले.
सुरुवात अशी झाली की माझ्या एका नातेवाईकाने सारेगमा शो मध्ये सत्यजित जेना या मुलाने अप्रतिमपणे गायलेले मिले हो तुम हमको हे गाणे ऐकले. ते मला खूपच आवडले. त्यामुळे वरिजनल ऐकू म्हणून तुनळीवर शोधले. फिवर या चित्रपटातले हे गाणे पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही सोलो मध्ये आहे. टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांच्या आवाजातले. पण त्यानंतर मी या गाण्याचे रिप्राईज वर्जन ऐकले. ते जास्त आवडले.

माझ्यामते सोल टचिंग गाणे तेच असू शकते ज्याचे शब्द...संगीत आणि आवाज एकत्रितरित्या आपल्या डोळ्यांतून पाणी आणते. अर्थात ही व्याख्या प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकते. अशी गाणी अनेक आहेत. पण सध्या हे मला खूपच आवडलेले गाणे आहे. तुम्ही ऐका व तुम्हाला आवडलेली अशी सुंदर गाणी इथे शेअर करावीत ही अपेक्षा.

टीपः मिपा च्या नियमावलीत ही पोस्ट बसते की नाही याची मला कल्पना नाही. कारण मी खूप वर्षांनी मिपावर लिहितो आहे.

संपूर्ण गाणे :
मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से x २

तेरी मोहब्बत से सांसें मिली हैं
सदा रहना दिल में करीब होके
मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से x २
तेरी चाहतों में कितना तड़पे हैं
सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं
ज़िन्दगी है मेरी सारी जो भी कमी थी
तेरे आ जाने से अब नहीं रही
सदा ही रहना तुम, मेरे करीब होके
चुराया है मैंने, किस्मत की लकीरों से
बाहों में तेरी अब यारा जन्नत है
मांगी खुद से तू वह मन्नत है
तेरी वफ़ा का सहारा मिला है
तेरी ही वजह से अब मैं ज़िंदा हूँ
तेरी मोहब्बत से ज़रा अमीर होक
चुराया है मैंने किस्मत की लकीरों से
मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से
तेरी मोहब्बत से सांसें मिली हैं
सदा रहना दिल में करीब होके

Movie : Fever (But Reprise version sung by Neha Kakkar is the best version according to me)
Actors : Rajeev Khandelwal,Gauhar Khan
Lyricist : Tony Kakkar
Singers : Tony Kakkar and Neha Kakkar
Language : Hindi
Title : Mile Ho Tum Humko

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

5 Jun 2017 - 2:24 pm | गॅरी ट्रुमन

माझ्यासाठी या लीस्टमध्ये पुढील दोन गाण्यांचे स्थान अगदीच अढळ आहे:

१. गुलाम अलींची चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला ही गझल.

यातील विशेषतः पुढील ओळी खरोखरच हृदयाला भिडतात.

मेरे मालिक, मेरा दिल क्यूँ तड़पता है, सुलगता है
तेरी मर्ज़ी, तेरी मर्ज़ी पे किसका ज़ोर चलता है
किसी को गुल, किसी को तूने अंगारा बना डाला

२. गुमराह चित्रपटातील महेन्द्र कपूर यांनी गायलेले 'चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो' हे अजरामर गाणे. यातील शेवटचे कडवे हृदयाला प्रचंड भिडते---

तारूफ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोडना अच्छा
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना हो मुनकिन
उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अछा

सागर's picture

5 Jun 2017 - 3:10 pm | सागर

अप्रतिमच निवड आहे ही दोन्ही...

गुलाम अली जरी चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है साठी जास्त प्रसिद्ध असला तरी मलाही चमकते चांद हीच गझल जास्त आवडते. मला वाटते आवारगी या अनिल कपूरच्या चित्रपटात ही गझल आहे.

पण चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा च्या तोडीची जबरदस्त गझल मी आजपर्यंत ऐकली नाही. खास करुन या गझलेतले शब्द सामर्थ्य अगदी टच करते.

मराठी_माणूस's picture

5 Jun 2017 - 3:36 pm | मराठी_माणूस

चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा

ही तर कव्वाली आहे ना ?

गाण्यांची तुलना करण्याच्या नादात विसरलो. घाई घाईत विसर पडला या गोष्टीचा व चूक झाली.
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

गझल आणि कव्वाली यात थोडा सलगतेचा फरक आहे. तज्ज्ञ अधिक प्रकाश टाकू शकतील. पण कव्वाली व गझल हा केवळ गायन प्रकारातला फरक असू शकेल. शेर दोन्हीत वापरले जातात. असो.. अवांतर होईल. विषय गाण्यांपुरता मर्यादित ठेवतो.

दुर्गविहारी's picture

5 Jun 2017 - 8:19 pm | दुर्गविहारी

एकच शंका विचारतो. व्हिडीओ कसे अपलोड करायचे. मला माझ्या धाग्यात जमले नव्हते. बाकी गुमराह मधील गाणे मलाही आवडते.

गॅरी ट्रुमन's picture

5 Jun 2017 - 9:31 pm | गॅरी ट्रुमन

व्हिडीओ कसे अपलोड करायचे.

युट्यूब व्हिडिओच्या खाली ते गाणे कुठच्या चॅनेलने अपलोड केले आहे त्याचे नाव आणि त्याच्या खाली 'सबस्क्राईब' म्हणून लाल अक्षरात लिहिलेले असते.त्याच्याच खाली 'शेअर' म्हणून एक टॅब असतो. त्यावर क्लिक केल्यावर 'शेअर','एम्बेड' आणि 'ई-मेल' असे तीन स्वतंत्र टॅब येतात. त्यातील 'एम्बेड' वर क्लिक करा. एका खिडकीमध्ये एम्बेडचा हटमल कोड येतो. तो कोड जसाच्या तसा कॉपी करून मिपाच्या प्रतिसादात पेस्ट करा. म्हणजे तो व्हिडिओ इथे 'एम्बेड' होईल.

प्रभू-प्रसाद's picture

7 Jun 2017 - 12:34 pm | प्रभू-प्रसाद

आपल्या माहिती मुळे व्हिडीयो डकवता आला.

हृदयस्थ आत्मा आणि हाटेलातला आत्मू यात कंन्फ्युजन झाले.

-सूड फर्टाडो.. :))

आत्मू सध्या अंगाई गीतांनी झंकारतो असे कळते

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2017 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा

आं Sssssssss =)) दुत्त दुत्त! ल्लूल्लूल्लूल्लू :p

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Jun 2017 - 7:54 pm | माम्लेदारचा पन्खा

गुर्जींना आता वेगवेगळ्या प्रकारचे शांतीपाठ म्हणायला लागत असणार रोज . . . . . .

गामा पैलवान's picture

5 Jun 2017 - 11:57 pm | गामा पैलवान

आपुनका पसंद इदर हय :

पिच्चरबिच्चर मालूम नाही हमकू. खाली गाना बहोत अच्छा लगा. स्साला क्या शबद लिखा हय. और मूझीकबी बिलकूल खतरी. लताजीके आवाजका तो कूचबी बोलनेकाच नाही. पूरा डरावना माहौल साफसाफ खडा रैता हय आखोंके सामने.

-गा.पै.

आनन्दा's picture

6 Jun 2017 - 12:39 am | आनन्दा

हे पण एक बघून घ्या

आणि मराठीत "दमलेल्या बाबाची कहाणी".

आणि हे पण..

बाकी याला मराठीत "हृदयस्पर्शी भावगीते" वगैरे काहीतरी म्हणता येईल.. अगदी वर्ड टू वर्ड करायला नको.

श्रीनिवास टिळक's picture

6 Jun 2017 - 7:23 am | श्रीनिवास टिळक

माझ्या आवडीचे ह्रदयस्पर्शी गीत कलंकशोभा या चित्रपटात आहे

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्‍नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे !

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते करी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले तुझ्यामुळे !

करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले तुझ्यामुळे !

हृदयमंदिरी होती मूर्ति
तिमिर परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे !

गीत - शान्‍ता शेळके
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले , सुधीर फडके

भुमन्यु's picture

6 Jun 2017 - 4:33 pm | भुमन्यु

बुड्ढा ईन ट्रॅफिक जाम मधली फैझ अहमद फैझ ह्यांची गझल.

गीताचे बोल आणि अर्थः दुवा
पल्लवी जोशी च्या आवाजात ऐकण्यासाठी: दुवा

तसंच, तरुण आहे रात्र अजुनी हे पण कायम आवडणारं.

चिगो's picture

6 Jun 2017 - 4:35 pm | चिगो

जुनी गाणी लै आहेत, पण नव्यातली 'तु किसी रेल सी गुजरती हैं' (मसान) हा चित्रपट माझ्या ऑल टाईम फेवरेट्स मध्ये जाऊन बसलाय. ह्या गाण्याचे शब्द आणि संगीतच नव्हे, तर चित्रीकरणही लाजवाब आहे..

इक कुडी ( उडता पंजाब )

बाकी बरीच आहेत..
जगजितच्या गझला, 'एक जखम सुगंधी' मधल्या सगळ्याच गझला, 'उमराव जान'मधलं 'जिंदगी जब भी तेरी बज़्म पें', इंग्रजीत एल्विसचं ' I can't help falling in love with you', ब्रायन अ‍ॅडम्सची गाणी..

कुमार१'s picture

7 Jun 2017 - 11:23 am | कुमार१

चांगला धागा.
आता माझे एकच गाणे सांगतो :
'तोरा मन दर्पण कहलाये......
ते हजारो वेळा ऐकून सुद्धा मी अतृप्तच आहे !

प्रभू-प्रसाद's picture

7 Jun 2017 - 12:30 pm | प्रभू-प्रसाद