ग्रह व त्या॑च्या उपग्रहा॑च्या निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण घ्यावी?

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
30 May 2017 - 3:46 pm
गाभा: 

मी हौशी व प्राथमिक स्तरावरचा आकाश निरीक्षक आहे. मला परवडेल अशी (सुमारे १५ ते २० हजार रु. पर्य॑तची) शक्यतो भारतीय बनावटीची दुर्बीण विकत घेण्याबद्दल मिपाकरा॑कडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आपण सुचविलेल्या दुर्बिणीतील त्रुटी / मर्यादा , उत्पादक, अ॑दाजे कि॑मत याबाबत सविस्तर माहिती दिल्यास उपयोग होईल.

प्रतिक्रिया

एस's picture

30 May 2017 - 3:56 pm | एस

https://akashmitra.wordpress.com/

या ग्रुपला कॉन्टॅक्ट करून पहा.

शरभ's picture

30 May 2017 - 7:09 pm | शरभ

माफ करा ह, मी तुम्ही मागितलेली माहिती देत नाहीए..

मी शाळेत असताना 6" न्युटनीयन वापरत होतो. टिटॅनपर्यंत दिसायच. लेन्स (आयपीस) थोड खर्चिक काम होत तेव्हा.. आता माहीत नाही. बाकी दूरच्या आकाशगंगा छान दिसायच्या. एकदा तर सिंह राशीत क्लस्टर ऑफ गलक्सिसपण पाहिल्याच आठवतय. तसा योग पुन्हा आला नाही..

खर सांगू का ? ह्या सगळ्यात शेवटी काही समाधान मिळत नाही, आपल बजेट हे शेवटी तोकड पडतच.. त्यापेक्षा हबलच्या कम्पोसिट इमेजेस पहा. पैसे पण वाचतील.. :)

-श

खर सांगू का ? ह्या सगळ्यात शेवटी काही समाधान मिळत नाही, आपल बजेट हे शेवटी तोकड पडतच.. त्यापेक्षा हबलच्या कम्पोसिट इमेजेस पहा. पैसे पण वाचतील.. Smile

सहमत. मी बर्डींग बायनाक्युलर घेताना इतका रिसर्च केला की त्या पांच सहा महिन्यातच मी घेणार होतो ते मॉडेल बंद झाले, नंतर झक मारत निम्म्या क्षमतेची दुर्बीण घ्यावी लागली. :(

दशानन's picture

30 May 2017 - 10:09 pm | दशानन

मी आताच अपग्रेड म्हणून सेलट्रॉन 70mm घेतली आहे, अमेझॉन वरून, चांगली टेलिस्कोप भेटली आहे, आधीची खराब झाली होती.

सतिश गावडे's picture

31 May 2017 - 11:01 pm | सतिश गावडे

हीची लिन्क देतो का?

आयुकामध्ये दुर्बीण बनवायचा उपक्रम आहे. यात आपण आपली दुर्बीण बनवायची. खर्च १०-२० हजार. मेंटेनन्स चे सगळे कोपरे समजतात. http://scipop.iucaa.in/Amateurs/telemaking.html

माझा बेत होतोय , वेळेचं गणित जमत नाहीये

बिज्जलदेवाने भल्लालला घेऊन दिलीय एक दुर्बीन. ती पण भारीय.

अनन्त्_यात्री's picture

31 May 2017 - 2:50 pm | अनन्त्_यात्री

मना कशी भेट॑ल ती दुर्बीन?

महेंद्र बाहुबली, कट्टाप्पा, देवसेना, अवंतिका एवड्याना एकदम मारावे लागेल. ;)

अनन्त्_यात्री's picture

31 May 2017 - 6:57 pm | अनन्त्_यात्री

पाच-सा मान्साना टपकवनारा धु॑डाल्तो म॑ग

टवाळ कार्टा's picture

31 May 2017 - 5:45 pm | टवाळ कार्टा

बिज्जलदेवाने भल्लालला घेऊन दिलीय एक दुर्बीन. ती पण भारीय.

त्या दूर्बीणीतून काय दिसते त्याची एक भन्नाट "एक म्यान दोन तलवार" टाईप गीफ आलेली कायप्पावर ;)

फुटलो!

अवकाशवेध या संकेतस्थळाशी संपर्क करा. छान मार्गदर्शन व मदत होईल

http://www.avakashvedh.com/kharedi/telescope.html

अनन्त्_यात्री's picture

31 May 2017 - 10:07 pm | अनन्त्_यात्री

आपण दिलेल्या अवकाशवेध या संकेतस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद!

अन्या दातार's picture

31 May 2017 - 10:31 pm | अन्या दातार

https://www.indiamart.com/atul-traders-kolhapur/

यांच्याकडे आजवरची उत्तम टेलिस्कोप बघितली आहे.