मदत हवी - अशास्त्रीय मेडिकल उपाय सांगणाऱ्या लोकांपासून कुटुंबातील व्यक्तींना कसे परावृत्त करावे? (प्राणिक हीलिंग)

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
30 Apr 2017 - 12:30 pm
गाभा: 

आमच्या जवळची एक व्यक्ती आहे.

कालच तिने मला सांगितले कि ती पुण्यात "प्राणिक हीलिंग" (pranic healing) च्या वर्कशॉप ला गेली आहे. त्या वर्कशॉप मधे शरीराच्या व्याधी दूर करण्याची काही एक टेक्निक ते शिकवतात. पुस्तक-बिस्तक देतात. वर्कशॉप ची फीस रु. ४५००.

हे ऐकून माझे डोके सनकले. एक तर माझा असल्या उपचारांवर काहीही विश्वास नाही, परत अशा टेक्निक शिकवण्यासाठी हे लोक लोकांना लुबाडतात! ४५०० ही काही छोटी रक्कम नाही. मी रागाच्या भरात त्या व्यक्तीशी बोललो - पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने मला त्यांचे पुस्तक वाचावयास सांगितले आणि युट्युब व्हिडीओ बघायला सांगितले. आणि ती सांगत होती कि तिथे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले होते आणि त्यात कोणी एक बाई डॉक्टर पण होती. हे ऐकून मला समजले कि ती सध्या तरी तिथले वातावरण बघून प्रभावित झाली आहे आणि आपण कितीही आकांडतांडव केला तरी त्याचा परिणाम होणार नाही.

अशा व्यक्तीशी संवाद कसा साधावा आणि हे सगळे "नॉन मेडिकल" उपाय लोकांना फसवण्याचा उद्योग आहेत, हे तिला समजावून कसे सांगावे?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

30 Apr 2017 - 12:47 pm | अर्धवटराव

तुम्हाला स्वतः तो अनुभव घ्यावा लागेल. इफ इट वर्क्स, त्यामागची शास्त्रीय बाजु समजुन घ्यायला लागेल आणि त्यातला सो कॉल्ड चमत्कार उघडा पाडावा लागेल. जर ते काम नाहि करत तर ते देखील समजुन घ्यायला लागेल. शेवटी हे सर्व कार्य-कारण भावाचं गिमीक आहे. थेरपीचा परिणाम होण्या/न होण्यामागची कारणं तुम्हाला स्पष्ट कळली तरच इतरांना पटवुन देता येतील. पण तरिही लोकं ऐकतीलच याची गॅरंटी नाहि.

अत्रे's picture

30 Apr 2017 - 1:11 pm | अत्रे

तुम्हाला स्वतः तो अनुभव घ्यावा लागेल.

यावर विचार करतो. या सर्व संशोधनात खूप वेळ जाईल.

पण त्या व्यक्तीने तेव्हाच मला थेरपी चालेल कि नाही याचे डिस्क्लेमर दिलेत.

१. उपचार ज्या व्यक्तीवर होत आहे तिचा या थेरपी वर विश्वास हवा. विश्वास नसेल तर थेरपीचा उपयोग होणार नाही.

असा डिस्क्लेमर लावल्यावर मी स्वत: जरी ती थेरपी ट्राय केली आणि (उदाहरणार्थ) म्हटले कि याने माझी पाठदुखी थांबली नाही - कि लगेच त्यांचे उत्तर तयार असेल - तुझा विश्वासच नव्हता म्हणून थेरपी उपयोगी नाही आली.

या लॉजिक च्या चक्रव्यूहातून कसे बाहेर यावे?

अत्रे's picture

30 Apr 2017 - 1:14 pm | अत्रे

अजून एक - हि "थेरपी" शिकवणाऱ्यांनी असे सांगितले कि नेहमीची औषधे सुरु ठेवावीत आणि साइड बाय साइड ही थेरपी करावी. अशा केस मध्ये थेरपी काम करते की नाही हे सिद्ध होऊ शकत नाही, हे त्यांना कसे समजावून सांगावे..

प्लासीबो इफेक्ट आणि रेग्युलर औषधांमुळे आजार बरा झाल्यास तुम्ही इतर काहि सिद्ध करु शकत नाहि. आजार बरा झाल्यानंतर, रोगी नॉर्मल विचार करण्याच्या मानसीकतेत आल्यावर त्याला खरं काय ते समजुत देता येईल, व नेक्स्ट टाईम प्रिकॉशन घेता येईल. सध्या या इतर थेरपी काहि नुकसान तर करत नाहित हेच बघणं महत्वाचं.

अत्रे's picture

1 May 2017 - 11:24 am | अत्रे

धन्यवाद.

सध्या या इतर थेरपी काहि नुकसान तर करत नाहित हेच बघणं महत्वाचं.

ही माहिती शोधत आहे. (नेट वर या वेबसाइटवर बघितले तर त्यात प्राणिक हीलिंग वर सेक्शन नव्हते http://whatstheharm.net/)

नन्तर हा युट्युब video बघून तरी आपल्याकडे दृष्ट काढतात तसा काही प्रकार दिसत आहे. पेशंट ला हात न लावता - त्याला कोणतेही द्रव्य खायला न देता "उपचार" सुरु आहेत - म्हणजे प्रथमदर्शनी तरी काही फिझिकल हार्म नसावा असे वाटते. अजून माहिती शोधत आहे.

बाकी फिझिकल हार्म नसला तरी मेंटल आणि फायनान्शियल हार्म आहेच. पण ते नंतर बघू.

चित्रगुप्त's picture

30 Apr 2017 - 2:05 pm | चित्रगुप्त

आमच्या जवळची एक व्यक्ती आहे.

सरजी, एवढे सर्व सांगितलेत पण हे नाही सांगितले की त्या व्यक्तिशी तुमचे नाते काय आहे ?
४५०० रुपये जर तुमच्या खिशातून जात नसतील तर करेना का कुणी काहीही, तुम्ही मनस्ताप का करून घेता?
जर ती म्हणजे तुमची 'ही' असेल, तर ४५०० च्या साड्या, ४५००० चा दागिना असे घडतच असेल ना ? समजा हे वर्कशॉप फुकट असते तर ते तुम्हाला चालले असते का?
विपश्यनेतून माझी पाठदुखी कायमची बरी झाल्याचा माझा स्वानुभव आहे, आणि रसाहारातून मूळव्याध पण. आजचे 'शास्त्रीय मेडिकल' उपचार हेच जगातील एकमेव उपचार नाहीत. दुसर्‍या शक्यतांचा अभ्यास/प्रयोग पण जरूर करावा. अर्थात 'सावधपण सर्वविषयी' तर हवेच. आपण घाईने अश्या एकाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याआधी पूर्वी ज्यांनी ते केलेले आहे, त्यांचेशी संपर्क करून माहिती घेणे योग्य.
हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्ही ते ज्ञान इतरांना शिकवायला एकादी पेड साईट उघडून आपले पैसे वसूल करून घ्या. हाकानाका.
श्रीहरि श्रीहरि.
.

एवढे सर्व सांगितलेत पण हे नाही सांगितले की त्या व्यक्तिशी तुमचे नाते काय आहे ?

रक्ताचे नाते आहे एवढेच सांगू इच्छितो. पैसे शेवटी आमच्या घरातूनच जातात म्हणून मनस्ताप होतो.

वर्कशॉप फुकट असते तर कदाचित एवढा राग मला नसता आला (पण पुण्यापर्यंत जाणे-येणे खर्च झालाच कि!)

आणि एकदा लोक अशा नॉन मेडिकल उपाय सांगणाऱ्यांच्या कचाट्यात सापडले कि उद्या कोणी पण येऊन त्यांना फसवू शकेल ही भीती वाटते. त्यामुळे अशा गोष्टींना सुरुवातीलाच थांबवलेले योग्य असे मला वाटते.

वरती मी काही प्रश्न विचारले आहेत (http://www.misalpav.com/comment/936304#comment-936304) - तुम्हाला त्यांची उत्तरे देता येत असतील तर कृपया द्या.

बादवे तुम्ही खाली ते चित्र का लावले आहे?

माझी स्वतःची क्रॉनिक पाठदुखी आणि मानेचं दुखणं या थेरेपीने एका सेशनमध्ये बंद झालं आहे. शिवाय प्राणिक हीलिंगचा उपचार उपयोगी ठरण्यासाठी "विश्वास हवा" हे टॉनिक अनावश्यक आहे. आपल्यावर प्राणिक हीलिंगने उपचार होत आहेत हे अजिबात माहीत नसूनही बरा होत असलेला एक पेशंट मला माहीत आहे. प्राणिक हीलिंगनेच तो बरा होतोय हे कशावरून? तर ज्या मानसिक आजारासाठी हीलिंग सुरू आहे, त्यासाठी अन्य कोणतंही औषध न घेता, आणि आजाराच्या कारणात कोणताही बदल न होता दिसून येत असलेली सुधारणा. ही एकच केस मी पाहिलीय. त्यामुळे विदा वगैरे हातात नाही.

ही केस पाहण्यापूर्वी आणि स्वतः अनुभव घेण्याआधी मलाही हे सगळं ब्ला ब्ला च वाटत होतं, हेही तितकंचं खरं. आणि याही केसमध्ये ''शेवटचा उपाय'' म्हणून चार महिन्यांपूर्वी प्राणिक हीलिंग सुरू केलं होतं. अजूनही त्या पेशंट ला यातलं काही ठाऊक नाही. त्यामुळे प्लासिबो इफेक्ट का काय त्याचा संबंध नाही.

मी हा कोर्स केलाय का? तर अजून नाही. मात्र फक्त हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ जमली की पुढच्या काही महिन्यात करण्याचा प्लॅन आहे. असं आहे की, आपल्याला माहीत नसलेल्या लै गोष्टी असतात, आणि त्या खऱ्या बी असतात. त्यासाठी शास्त्रीय असणं ही एकच कसोटी असू नये. त्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन मत निश्चित करा हे बरं. इथले हीलर्स रेग्युलर हीलिंग साठी ३००/- आणि सेल्युलर हीलिंग साठी १०००/- एका सेशनचे असे पैसे घेतात. तुम्हाला शिकायचं नसेल तर ४५००/- या आकड्यावर चिडायचं कारण उरणार नाही.

स्वगत - शिकल्यानंतर तुमच्या रागासाठी डिस्टंट हीलिंग करावे काय! ;)

दशानन's picture

30 Apr 2017 - 7:17 pm | दशानन

हा प्रकार नेमका आहे काय?
जरा सविस्तर सांगेल का कोणी?

-एक व्याधी त्रस्त

विटेकर's picture

2 May 2017 - 12:55 pm | विटेकर

biology of belief
या पुस्तकात तुम्हाला हवा आहे तो विदा दिलेला आहे.
शरिराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो !
माझ्या डयबेटिस रिवर्सल मध्ये याचा फार फार उपयोग झाला. प्राणिक हिलिन्ग नव्हे पण पोझितिव्ह थिन्गिन्ग्चा !
गेल्या दिड्वर्षापासून गोळ्या बंद आहेत मालक ... कसलेही औषध घेत नाही !
प्रत्यक्श अनुभव घेत आहे !

विटेकर's picture

2 May 2017 - 1:00 pm | विटेकर

हे पहा आणि हे ही पहा
https://www.slideshare.net/guest0dbc82/the-biology-of-belief?next_slides...

विनटूविन's picture

3 May 2017 - 12:12 pm | विनटूविन

विश्वास आणि अविश्वास यांमधील सीमारेषा कायम तरंगती आणि दोलायमान आहे.

डॉक्टरकडे जाताना देखील बरे होण्याचे कारण विश्वास अधिक आहे असे म्हणतातच ना.
दोन्ही बाजूंची मते आणखी वाचायला खुप आवडतील

अत्रन्गि पाउस's picture

3 May 2017 - 12:43 pm | अत्रन्गि पाउस

कारण विषय जिव्हाळ्याचा आहे ...

देशपांडे विनायक's picture

4 May 2017 - 1:02 pm | देशपांडे विनायक

आधी तुम्ही समजावून घ्या
त्या साठी खालील पुस्तकाची मदत होईल असे वाटते
'' HEALING AND THE MIND '' BY BILL MOYERS
[ नेट वर सापडेल ]

अत्रे's picture

4 May 2017 - 1:40 pm | अत्रे

'' HEALING AND THE MIND '' BY BILL MOYERS

हे पुस्तक मिळवून वाचत आहे. पण हे फार जुने आहे (१९९३) आणि त्यात प्राणिक हीलिंग चा उल्लेख केलेला नाही. तुम्हाला यातला कोणता स्पेसिफिक चॅप्टर रेफर करायचा होता का?

देशपांडे विनायक's picture

4 May 2017 - 5:46 pm | देशपांडे विनायक

हे पुस्तक शोधलेत तर आता वाचूनही बघा !
मी स्वतः दहा वर्षे प्राणायाम , ध्यान आणि न शिजवलेले अन्न यावर आधारित एका कोर्सचा शिक्षक म्हणून काम केले .
हा कोर्स केला असता मधुमेह असणाऱ्यांचा फार फायदा होतो हे मी पाहिले .
परंतु या निरीक्षणाला माझ्यावर विश्वास असल्या खेरीज महत्व प्राप्त होत नाही कारण या बाबतीत बोलण्याचा
अधिकार आपण डॉक्टर लोकांना दिलेला आहे .
मी स्वतः ही डॉक्टरांना विचारूनच औषधे घेतो पण हा कोर्स मधुमेह असणाऱ्याने करावा हे सांगताना माझा अनुभव
बोलतो हे लक्षात घ्या
या पुस्तक वाचनाने '' तुमचा विश्वास असणाऱ्या उपचार पद्धतीची मर्यादा समजण्यास मदत होईल आणि इतरही
उपचार पद्धती बद्दल चा आपला आकस कमी होईल ''
आणि पुढील वाक्यातला तुमचा ठामपणा कमी होऊन संवाद सहज साधेल
1] एक तर माझा असल्या उपचारांवर काहीही विश्वास नाही
2] अशा व्यक्तीशी संवाद कसा साधावा आणि हे सगळे "नॉन मेडिकल" उपाय लोकांना फसवण्याचा उद्योग आहेत

पैसा's picture

4 May 2017 - 4:06 pm | पैसा

ही कोणती उपचार पद्धत आहे? तिला सरकारची मान्यता आहे का? असावी असे दिसते नाहीतर असे कोर्सेस वगैरे झाले नसते.

असावी असे दिसते नाहीतर असे कोर्सेस वगैरे झाले नसते.

कोर्सेस करायला सरकारची मान्यता लागते हे माहित नव्हते. तुम्ही शुअर आहेत का?

पैसा's picture

4 May 2017 - 4:44 pm | पैसा

तुम्ही शुअर आहात का म्हणजे काय? कोणती पद्धत हे मला माहीत नाही हे आधीच सांगितलंय. सरकारी मान्यता असल्याशिवाय उपचार पद्धतींचे कोर्स कसे असतील हा माझा प्रश्न आहे. उद्या कोणीही उठून नवी उपचार पद्धत काढील.

मला असे म्हणायचे होते की "नवीन उपचारपद्धतीवर वर्कशॉप करायला सरकारी परवानगी लागते" याबद्दल शुअर आहात का.

मला तरी नेट वर "india permission for medical workshop" असे सर्च केल्यावर नेमकी माहिती नाही सापडली.

इथे अजून कोणाला याबद्दल माहित असेल तर ऐकायला आवडेल.

प्रसाद गोडबोले's picture

4 May 2017 - 6:10 pm | प्रसाद गोडबोले

असा काही प्राणिक बॉडीबिल्डींग चा कोर्स आहे काय ? ;)

स्थितप्रज्ञ's picture

6 May 2017 - 9:44 am | स्थितप्रज्ञ

घशात प्राण आणून वजन उचलायचे :P

स्थितप्रज्ञ's picture

6 May 2017 - 9:39 am | स्थितप्रज्ञ

प्राणिक हीलिंग थोतांड की शास्त्र या विषयाला हात न लावता सांगतो.

कुठलेही फॅड जर घरातील एखादी व्यक्ती करण्याचा हट्ट धरत असेल आणि आपल्याला ते अशास्त्रीय वाटत असेल तर आपण आधी त्यावर संशोधन करावे. यातून depending on what it actually is and how unbiased you are, तीन गोष्टी होऊ शकतात.
१. जो आपल्याला थोतांड वाटत आहे तो actually खरंच शास्त्रोक्त पाद्धतीचा उपाय असू शकतो.
२. उपाय बरोबर आहे पण त्याचा गैरवापर करून काही संस्था पैसे उकळण्याचा कार्यक्रम राबवतात (उदा. आयुर्वेदाचा वापर करून आयुर्वादाचे कुठलेही सूत्र न अवलंबता विविध products काढून काही स्वदेशी कंपन्या MNCज् ना टक्कर देऊ लागल्यात)
३. तो उपाय(?) खरंच थोतांड आहे याचा आपल्याला पक्का पुरावा मिळू शकतो.

पहिल्या पर्यायात घरच्या व्यक्तीला खुशाल पुढे जाऊ द्यावे.
दुसऱ्या पर्यायात भरवशाची संस्था शोधावी.
तिसऱ्या पर्यायात ते सबळ पुरावे त्या व्यक्तीपुढे सादर करावेत आणि फायनल डिसिजन त्या व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवावा कारण आपण कितीही सांगितले तरी त्या व्यक्तीने ते करायचेच असे ठरवले असेल तर आपण काही करू शकत नाही (अपवाद: जीवावर बेतणारे उपाय उदा. ऑपरेशन करून चरबी घटवणे, भयानक पद्धतीचे क्रॅश डाएटिंग, इत्यादी. यावेळी आपण पहाडासारखे मध्ये उभे राहावे.).

संशोधन कसे कराल?
१. सर्वप्रथम गूगलबाबाला विचारणारा "What is xxx?" (xxx म्हणजे तो अशास्त्रीय उपाय). यातून बरेच उलट सुलट लेख वाचायला मिळतील पण आपल्या बुद्धीला जे बरोबर आहे ते पटते. यावर Quora.com या संकेतस्थळावर बरेच छान discussions मिळतात. एक नवीन पर्याय म्हणून quora चा विचार करायला हरकत नाही कारण उत्तर देणारे आपल्यासारखेच "आम आदमी" (दिल्लीवाले नाही बरका) असतात (काही त्या विषयात कमर्शियल इंटरेस्ट असलेले सुद्धा असतात पण त्यांची उत्तरे लगेच समजतात) त्यामुळे paid research study असण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
२. नंतर परत गूगलबाबालाच "Benefits of xxx" आणि नंतर "Side effects of xxx" असे विचारून बघा. एखादा विडिओ मिळाला तर उत्तम.
३. कोणी ती गोष्ट किंवा उपाय केल्याचा review कुठे उपलब्ध आहे का बघा.

वरील सगळी तयारी झाली की घरच्या व्यक्तीला सबळ पुराव्यासकट समजवा. शिवाय कोण्या एजंट कडून (जो आपलाच नातेवाईकही असू शकतो) हा पर्याय आला असेल तर त्यात त्याचा कसा स्वार्थ असू शकतो याची जाणीव करून द्या. ५०शी-६०ठी तल्या व्यक्तींना हल्लीचे जग किती धादांत खोटे बोलते यावर विश्वास बसत नाही (कारण त्यांच्या लहानपणी आणि तरुणपणीही इतका खोटेपणा माजला नव्हता). एखादी मोठा बॅनर लावलेली, पेपरमधली किंवा दूरदर्शन वरील जाहिरात पहिली की हे खरेच असणार यावर त्यांचा ठाम विश्वास बसतो. अशा व्यक्तींना समजावताना हा मुद्दा विशेष लक्षात ठेवावा म्हणजे आपली चीड-चीड होत नाही.

एकूणच असे करताना नाकी नऊ येते कारण ती व्यक्ती अगदी ठाम असते पण प्रयत्न केला आणि ती व्यक्ती थोडी जरी कन्फ्युजन मध्ये असेल तर बहुतेक वेळा आपला निर्णय बदलते.

त. टी.: वरील संशोधन करताना आपण पूर्णपणे unbiased असणे गरजेचे. या प्रोसेसमध्ये कदाचित आपलाही निर्णय बदलू शकतो.

अत्रे's picture

7 May 2017 - 7:26 am | अत्रे

धन्यवाद!

दादा कोंडके's picture

6 May 2017 - 11:33 am | दादा कोंडके

माझ्या मित्राचे वडील सत्तरीत आहेत आणि त्याला त्यांची बायपास करायची नाही. अगदी रेग्युलर चेकअप करून आणि अगदी इकोटेस्ट नोर्मल असूनही परवा हार्टअ‍ॅटॅक येउन गेला. त्यांच्यासाठी डॉ. विक्रांत लाटे यांचं सुविश होलिस्टीक सेंटरमध्ये चौकशी करून आलो. कुणाला याच्याबद्दल अनुभव आहे का?

सुबोध खरे's picture

7 May 2017 - 11:34 pm | सुबोध खरे

दादासाहेब
आपल्या मित्राच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला आहे याचा अर्थ त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहेत हे नक्की.
त्याना बायपास ची गरज आहे कि नाही हे अँजिओग्राफी शिवाय समजणार नाही.
त्यांचे अडथळे हे जर गंभीर असतील तर त्याला बायपास शिवाय पर्याय नसतो.
अशा गंभीर अडथळ्याच्या रुग्णांनी बायपास केला नाही तर ९० % लोकांना पाच वर्षे पर्यंत परत हृदयविकाराचा झटका येईलच असे नाही. असे रुग्ण मग इतर उपचारांकडे वळतात आणि असे उपचार करणारे छातीठोकपणे सांगत फिरतात कि अमुक तमुक माणसाला बायपास सांगितला होता पण तो माझ्या औषधाने व्यवस्थित झाला.
परंतु उरलेल्या १० % लोकांमध्ये असा झटका आला तर तो रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही आणि मग आपल्याला त्यांचा भिंतीवर फोटो टांगलेला दिसतो. भिंतीवर फोटो टांगलेला माणूस अशा इतर उपचार करणाऱ्याला जाब कसा विचारणार?
दुर्दैवाने कोणताही रुग्ण त्या ९० टक्क्यात आहे कि १० टक्क्यात आहे हे कोणताही डॉक्टर खात्रीने सांगु शकत नाही. फार तर एखादा चांगला ज्योतिषी पत्रिका पाहून मृत्युयोग आहे काय आणि केंव्हा आहे ते सांगू शकेल. त्यानुसार मग इतर उपचार पद्धतीकडे (आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर) जाण्यास हरकत नाही.

ता. क. -- मी स्वतः एशियन हार्ट इन्स्टिटयूट मध्ये २ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम केले आहे आणि ३००० बायपासचा रुग्ण आणि त्याच्या दुप्पट अँजियो प्लास्टीचे रुग्ण पाहिलेले आहेत. यातील बहुसंख्य लोक इतर उपचाराचा उपयोग न झाल्याने आलेले होते.
(बायपास सारखी मोठी शल्यक्रिया करण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यामुळे ती टाळण्यासाठी माणूस जमेल ते करत असतो हे नैसर्गिक आहे)

दादा कोंडके's picture

9 May 2017 - 8:08 pm | दादा कोंडके

धन्यवाद डॉक्टर.
माझ्या मित्राला लगेचच फोन करून हा प्रतिसाद समजावला (तो मराठी भाषिक नाही). पुढच्या आठवड्यात त्याचा पुण्याला कन्सलटेशनसाठी यायचा विचार होता. बोलणं झाल्यावर तो बेत रहीत केला. केलं तर बायपासच करावं असं आता ठरलंय. तुमचं मत काय आहे हो डॉक्टर?
त्याच्या वडिलांचं वय चौर्‍याहत्तर आहे पण फिट आहेत. स्कूटी वगैरे चालवतात. आणि बायपास करायची झाली तर कुठे करावी? काय काळजी घ्यावी? किती खर्च येइल?

ता.क.: ही चर्चा थोडी वैयक्तीक आहे पण कदाचीत कुणालातरी उपयोग होईल म्हणून इथेच चालू ठेवतोय.

शल्यक्रिया करायची कि नाही यात वय हा घटक तितकासा महत्त्वाचा नाही. माझ्या सख्ख्या काकांच्या(वडिलांचे मोठे भाऊ) हृदयाच्या झडपेची आताच दोन महिन्यांपूर्वी शल्यक्रिया झाली. वय ८३ इतके असले तरीही सर्व दृष्टीने ते निरोगी आहेत. चढ चढताना दम लागल्यासारखे होते म्हणून मला सांगत होते. बाकी तक्रार काहीही नाही. तेंव्हा त्यांची तपासणी करून घेतली. त्यांच्या हृदयाची झडप निकामी झाली. त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली आणि ती झडप बदलून दुसरी बसवली. (खर्च सहा लाख रुपये) आता ते व्यवस्थित पुण्यात आपल्या घरी चालते फिरते आहेत.
त्यांच्या बाबतीत मी चुलत भावाला एकच सांगितले. अशा स्थितीत हृदय विखराचा झटका आला तर तो फार तीव्र असेल शक्यता १० % आहे पण तो धोका पत्करणे श्रेयस्कर नाही. लोकांच्या दृष्टीने चांगले चालते फिरते होते मग शल्यक्रियेची गरज काय होती?
मुद्दा एकच -- तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा अगोदर बेगमी करून ठेवलेली बरी.

सुबोध खरे's picture

10 May 2017 - 9:53 am | सुबोध खरे

आजकाल डॉक्टर लुटतात. नको असताना सर्जरी सांगतात.त्यात त्यांचे साटेलोटे असतात इ. सर्व तर्हेचे प्रवाद सदासर्वकाळ ऐकू येतात. ते पसरवण्यामागे पर्यायी उपचार पध्दतीवाल्यांचा मोठा हातभार आहे. त्याला उत्तर देण्यात मी वेळ घालवत नाही. ज्याला जे पचेल ते त्याने खावे आणि रुचेल ते बोलावे.
माझ्या भावाच्या दोन मित्राना असाच बायपास करायला सांगितला होता ती कथा मिपावर मी कुठेतरी लिहिली आहे. जिज्ञासूंनी खोदकाम करून पहा.
इथे सख्खे काका होते आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त प्रश्न पैशाचा होता.हि शल्यक्रिया छोट्या रुग्णालयात शक्य नाही. तेवढा सोडवला आणि कार्य सिद्धीस नेले.

दादा कोंडके's picture

10 May 2017 - 9:15 pm | दादा कोंडके

धन्यवाद डॉक्टर.

मार्मिक गोडसे's picture

9 May 2017 - 9:10 pm | मार्मिक गोडसे

डॉ. खरेंचा प्रतिसाद आवडला.

प्रसाद भागवत's picture

11 May 2017 - 1:19 pm | प्रसाद भागवत

डॉ.साहेब,, योगायोगाने FB वरील एका समुहात हृदययविकारासंबंधाने झालेली चर्चा वाचनांत आली, त्यात एकाने अशा रुग्णांनी (वा एकुणातच प्रत्येकाने) घरी हृदयविकारावरील आकस्मिक, तातडीचा प्रथमोपचार म्हणुन ईकोस्प्रिन 350mg ची गोळी ठेवावी अस सुचविले..चर्चेंत याच कारणाने Sorbitrate चा उल्लेख झाला तेंव्हा सॉर्बिट्रेट ऐवजी ॲस्पिरिन अधिक प्रभावी असल्याने हल्ली ईकोस्प्रिन वापरतात असे सांगितले..आपला अनुभव काय सांगतो ??

मला हे प्राणिक हीलिन्ग , रेकी म्हणजे निव्वळ फेकफेकी वाटते. एका रेकी वाल्याने अमेरिकेत असताना भारतातील एका माणसाची मूळव्याध रेकी वापरून बरी केल्याचे सान्गितले होते , तेव्हा पासुन ह्या रेकी फेकी वरील विश्वास उडाला.

पुण्यात कोण चांगले विश्वासू प्राणिक हीलिंग करेल ? डिप्रेशन मनोविकारांवर किती प्रभावी आहे ?

अमर विश्वास's picture

11 May 2017 - 1:48 pm | अमर विश्वास

सन्घमित्राजी

माझा मावसभाऊ (जो स्वात: डॉक्टर आहे) या Alternative therapies चा अभ्यास करतो आहे (अक्युपंक्चर / मॅग्नेटस / प्राणिक हिलिंग)
मला स्वात:ला अक्युपंक्चरचा उत्तम उपयोग झाला होता (पाय बरा होण्यासाठी)
पण प्राणिक हीलिंग बद्दल मी खात्रीने काहीही सांगू शकत नाही ... तरीहि तुमची इच्छा असेल तर मला थोडक्यात केस व्यनि करा .. मी भावाला विचारून सांगू शकतो की पुण्यात हे कोण करू शकेल

सन्घमित्रा's picture

11 May 2017 - 8:14 pm | सन्घमित्रा

धन्यवाद

सन्घमित्रा's picture

5 Jun 2017 - 7:11 pm | सन्घमित्रा

प्राणिक हीलिंग चा अनुभव घेऊन आलोय इट वर्क्स !