शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
26 Apr 2017 - 7:30 pm
गाभा: 

शाळेत शिकवलेला इतिहास फारसा आठवत नव्हता. नुकतेच मी Quora या वेबसाइट वर

What is the actual reason of Chatrapati Shivaji Maharaj's death?

या प्रश्नाची उत्तरे वाचली. त्यात वेगवेगळी कारणे वाचली -
१. "गूढघी" रोग
२. विषमज्वर
३. विषप्रयोग (सोयराबाई कडून)
४. विषप्रयोग (मंत्र्यांकडून )

तिथे सर्वाधिक लोकप्रिय उत्तर चौथ्या क्रमांकाचे कारण सांगते. पण त्यात नीट संदर्भ दिलेले नाहीत.

विकिपीडिया वर मला खालील माहिती मिळाली.

https://en.wikipedia.org/wiki/Shivaji#Death_and_succession

In late March 1680, Shivaji fell ill with fever and dysentery, dying around 3–5 April 1680 at the age of 52, on the eve of Hanuman Jayanti. Rumours followed Shivaji's death, ..some Marathas whispering that Soyarabai, the youngest of the three wives who survived him,[75] had poisoned him so that his crown might pass to her 10-year-old son Rajaram. After Shivaji's death, Soyarabai made plans with various ministers of the administration to crown her son Rajaram rather than her prodigal stepson Sambhaji. On 21 April 1680, ten-year-old Rajaram was installed on the throne. However, Sambhaji took possession of the Raigad Fort after killing the commander, and on 18 June acquired control of Raigad, and formally ascended the throne on 20 July. Rajaram, his wife Janki Bai, and mother Soyrabai were imprisoned, and Soyrabai executed on charges of conspiracy that October

वरील परिच्छेद वाचून माझा असा समाज झाला कि सोयराबाईना शिवाजी महाराजांना विष दिले म्हणून शिक्षा दिली पण सोयराबाईवरचा विकी लेख वाचून असे दिसते कि त्यांना शिक्षा संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला म्हणून झाली.

https://en.wikipedia.org/wiki/Soyarabai

Soyarabai's henchmen tried to poison Sambhaji in August 1681, but he survived. When he learnt about the plot, he had Soyarabai poisoned to death. Many plotters including Soyarabai's relatives of the Mohite family were also slaughtered or trampled by the elephants.

माझे प्रश्न -

१. सोयराबाईंनी महाराजांना मारण्याचा कट केला या बद्दल विकिपीडिया वर काही पुस्तके संदर्भ म्हणून दिली आहेत
अ. Jadunath Sarkar (1992). Shivaji and his times
ब. Jaswant Lal Mehta. Advanced study in the history of modern India 1707-1813

ही पुस्तके ज्यांच्याकडे असतील ते कृपया त्यातलया संबंधित पानांचे स्कॅन इथे टाकू शकतील का? नेमकी कोणती वाक्ये या दोन पुस्तकात वापरली आहेत?

२. सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला? त्यासाठी संदर्भ कोणते?

३. महाराजांच्या (ब्राम्हण) मंत्र्यांनी विषप्रयोग केला - हि अफवा / असा समज कधी पासून समाजात आहे? जे लोक असे समजतात त्यासाठी कोणते ऐतिहासिक संदर्भ ते वापरतात?

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

26 Apr 2017 - 9:26 pm | जयंत कुलकर्णी

श्री. मेहेंदळे यांचे शिवचरित्र वाचल्यावर कुठल्याही संदर्भाची गरज उरत नाही हे मी स्वनुभवातून सांगू शकतो....

माहितीसाठी धन्यवाद! तुम्ही या पुस्तकाचा उल्लेख करत आहात असे वाटते.

http://www.amazon.in/Shivaji-Times-Gajanan-Bhaskar-Mehendale/dp/9380875177

फारच महाग आहे हे पुस्तक! तुमच्याकडे असल्यास त्यात महाराजांच्या मृत्यू बद्दल काय लिहिले आहे हे सांगू शकाल का?

धागा वादग्रस्त होण्या अगोदर उडणार आहे मिपावरून .... घट कंचुकीचा उडाला तसा...

खटपट्या's picture

27 Apr 2017 - 6:11 pm | खटपट्या

हा धागा उडेल असे का वाटते तुम्हाला? जी काही साधक बाधक चर्चा होइल ती झाली तर बरेच आहे.

चर्चा करण्याबद्दल काहीच दुमत नाही.
घटकंचुकी धाग्यावर घटकंचुकी राहिले बाजूला घसरगुंडी चालू झाली, नंतर बघितलं तर धागा उडालेला होता.

म्हणून शंका वाटली की धागा टिकेल का म्हणून. कृपया गैरसमज नसावा.

इस्पिक राजा's picture

29 Apr 2017 - 6:43 pm | इस्पिक राजा

घटकंचुकी धाग्यावर घटकंचुकी राहिले बाजूला घसरगुंडी चालू झाली

धाग्याची पण विषयासारखी घसरगुंडी झाली म्हणायची की. घसरगुंडी फारच मजेदार ब्वॉ

खासकरून सामाजिक राजकीय विवाद्य विषयांवर चर्चा करताना विकिपीडियाचे संदर्भ उधृत करताना आपण कोणत्या भाषेतील विकिपीडियाचा संदर्भ देत आहोत हे तसेच आपण संबंधीत लेख नेमका किती वाजून किती मिनीटांनी पाहीला हे सुद्धा उधृत करण्याचे पथ्य पाळलेले बरे असू शकते.

प्रत्येक भाषी विकिपीडियाच्या मर्यादांची चर्चा स्वतंत्रपणे व्हावयास हवीच पण त्या आधी समस्त मराठी महाराष्ट्रीय मर्यादांचीही चर्चा करावयास हवी त्यात इतिहासाची प्रमाण साधने म्हणजे काय या बद्दलचे विपुल अज्ञान, दुसरे प्रमाणसाधने प्रमाण पद्धतीने पडताळण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध नसणे, प्रमाण साधनांवर काम करणारे बहुतांश इतिहास संशोधक अजूनही संगणक मराठी-आंतरजाल युनिकोड यापासून कोसो दूर आहेत, क्वचित काहीजण लिहितात ते ब्लॉग च्या अथवा फेसबुकटाईप सोशल माध्यमातून लिहितात तेव्हा ब्लॉग्सची विश्वासार्हत कशी पडताळावी असा प्रश्न असतो सोबतच हि यातली अभ्यासू मंडळी सुद्धा वाक्यापरत संदर्भ देत आणि प्रमाण साधने नमुद करत लेखन करत नाहीत आम्हाला पहा आणि फुले वहा असा हिशेब असतो. ब्लॉग्सवरील लेखनाची मिपा मायबोली सारख्या संस्थळावरून अभ्यासपूर्ण तटस्थ समिक्षण व्हावे ही अपेक्षाही खरे इतिहास तज्ञ आंतरजालापासून दूर असण्यामुळे होत नाही.

इंग्रजी विकिपीडियावर केवळ इंग्रजी भाषेतील प्रमाण ग्रंथच संदर्भासाठी वापरण्याचा आग्रह असतो, एखादा संदर्भ मराठीतून ऊपलब्ध असेल तरी अनुवाद करून इतरांनी अनुमोदन दिल्या शिवाय शक्य नसते, एक उदाहरण द्यावयाचे झाले तर इंग्रजी विकिपीडियावरील बाबासाहेब आंबेडकारांच्या लेख चर्चापानावर मी 'चांगदेव भवानराव खैरमोडे' यांच्या पुस्तकातील संदर्भ देईन म्हणालो तर इंरजीत सर्व माहिती असताना मराठी पुस्ताकातील संदर्भ कशाला असा प्रतिप्रश्न करणार्‍यास 'चांगदेव भवानराव खैरमोडे' व्यक्ति कोण होती हे माहीत असेलच असे नाही.

मराठी विकिपीडियावर लिहिताना लिहिणारा मराठी व्यक्ति कोणतीही असो प्रत्येक व्यक्ति व्यक्तिपुजेस पात्र असतेच शिवाय वर म्हटले तसे प्रमाण साधने म्हणजे काय तर्कसुसंगततेची गरज संदर्भ नमुद करण्याची गरज कशाचे काही सोयरसुतक मुळ मराठी संस्कृतीस नसल्यामुळे मराठी विकिपीडियावरही अद्यापतरी नाही. असो.

विकिपीडियाचे नाव आले म्हणून मर्यादाही सांगितल्या, बाकी चर्चा चालू द्या

इंग्रजी विकिपीडियाच्या इतर मर्यादाही माहित असलेल्या बर्‍या जसे कि

माहितगार's picture

26 Apr 2017 - 10:44 pm | माहितगार

इंग्रजी विकिपीडियाच्या इतर मर्यादाही माहित असलेल्या बर्‍या जसे कि

हे वाक्य अपूर्ण राहीलय पण विस्तारभयास्तव पुन्हा कधीतरी.

इंग्रजी विकी च्या मर्यादा सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मराठी विकीवर (https://mr.m.wikipedia.org/wiki/शिवाजी_महाराज)
महाराजांचा मृत्यू या महत्वाच्या घटनेवर सेक्शनच नाही आहे, हे दुर्दैवच आहे.

अजून एक मराठी विकीवरची अवांतर पण रोचक गोष्ट म्हणजे त्यात खालील सेक्शन्स आहेत.

शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके

शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय

आता एखाद्याच्या विकी लेखावर कोणी त्यांची स्तुती केली, कोणी त्यांच्यावर टीका केली - ही माहिती काय करायची हा प्रश्न मला पडला. (त्यात सोयराबाई विषप्रयोग घटनेचा संदर्भ "महारांजवर टीका" सेक्शन खाली दिला आहे. ही अजूनच विनोदी गोष्ट आहे!)

बादवे, वरती मी ज्या विकी लिंक्स दिल्या त्यांची वेळ कालची आहे.

माहितगार's picture

27 Apr 2017 - 7:36 am | माहितगार

बादवे, वरती मी ज्या विकी लिंक्स दिल्या त्यांची वेळ कालची आहे.

वेबसाईट बद्दलचे संदर्भ देणारा लेखक सहसा लिहितानाच्या वेळी वेबसाईटचा मजकुर जसा दिसला तसे लिहिल हे ओघाने येते. पण वेबसाईट्सवरील मजकुर बदलला जाऊ शकतो खासकरून विकिपीडियावरील मजकुर अगदी प्रत्येक सेकंदाला बदलले असू शकतो . तारीख आणि वेळ संदर्भात नमुद न केली गेल्यास विकिमजकुर मिस रिप्रेझेंट करण्यासारखे गॅप निर्माण होऊ शकतात म्हणून खास करून सामाजिक राजकीय विवाद्य मुद्यांवर चर्चा करताना विकि आवृत्ती तारीख आणि वेळ नमुद करावी. हे सोपे जावे म्हणून डाव्या मेनुपट्टीत संदर्भ तयार करून देणारी सुविधा हि असते जी विकिलेखाची आवृत्ती तारीख वेळ दुवा सर्व एकत्र उपलब्ध करते. असो.

हे सोपे जावे म्हणून डाव्या मेनुपट्टीत संदर्भ तयार करून देणारी सुविधा हि असते जी विकिलेखाची आवृत्ती तारीख वेळ दुवा सर्व एकत्र उपलब्ध करते

माहिती साठी धन्यवाद. डाव्या मेनू मध्ये गेल्यावर खालील सायटेशन दिसले

Shivaji. (2017, April 23). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 02:30, April 27, 2017, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Shivaji&oldid=776809072

माहितगार's picture

27 Apr 2017 - 7:15 pm | माहितगार

हं हे अशा पद्धतीने सायटेशन नमुद केलेले चांगले.

धन्यवाद आणि पुढील चर्चेसाठी शुभेच्छा.

माहितगार's picture

27 Apr 2017 - 7:40 am | माहितगार

एकुणच मराठी संस्कृतीतला विस्कळीतपणा आणि निष्काळजीपणा मराठी विकिपीडियावरही प्रतिबिंबीत होतो. :)

तुम्ही ज्याला निष्काळजीपणा म्हणताय त्याला मी अनास्था म्हणतो.. हे विधान थोडे सरसकटीकरण वाटते.

माहितगार's picture

27 Apr 2017 - 12:10 pm | माहितगार

हम्म.. अनास्था शब्द कदाचित अधिक बरोबर असेल.

सूड's picture

27 Apr 2017 - 7:42 pm | सूड

अनास्था

+१
बोलीभाषांबद्दलच्या पेजेस च्या बाबतीत आलेल्या अनुभवावरुन एकंदरीतच लोक निरस असल्याचं जाणवलं.

अमोल खरे's picture

27 Apr 2017 - 8:57 pm | अमोल खरे

थोडी वर्षे थांबा. पुढील विधानसभेच्या निवडणुकी आधी महाराजांना ब्राम्हणांनी मारले म्हणुन बोंबाबोंब सुरु होईल. कोण करेल ते सर्वांना माहिती असल्याने त्या संघटनेचे नाव लिहिण्यात अर्थ नाही. माझा अंदाज चुकीचा ठरला तर सर्वात जास्त आनंद मला होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Apr 2017 - 6:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

१. सोयराबाईंनी महाराजांना मारण्याचा कट केला या बद्दल विकिपीडिया वर काही पुस्तके संदर्भ म्हणून दिली आहेत

आणि

३. महाराजांच्या (ब्राम्हण) मंत्र्यांनी विषप्रयोग केला - हि अफवा / असा समज कधी पासून समाजात आहे? जे लोक असे समजतात त्यासाठी कोणते ऐतिहासिक संदर्भ ते वापरतात?

का हो खालच्या वाक्यात ब्राह्मण (ब्राम्हण नव्हे ब्राह्मण) हा जातीवाचक शब्दं वापरलात. मग वरच्या वाक्याबद्दल असा भेदभाव का? नै म्हणजे एकतर दोन्हीकडे वापरु नका किंवा मग दोन्हीकडे वापरा. शक्यतो पहिला पर्याय वापरायचं बघा कसं?

(संपादित)

जातीवाचक शब्द यासाठी वापरला कारण मी जी Quora लिंक दिली आहे त्यात तसे म्हटले आहे. वरती पण टाकायला हवे होते पण लिहिताना ध्यानात नाही आले.

सॉरी वरती म्हणजे तुम्हाला सोयराबाईंच्या जातीबद्दल म्हणायचे होते का? ते आवश्यक नाही वाटले कारण तो संदर्भ विकीवरून आला आहे - आणि विकीवर जातीवाचक शब्द नाही वापरला.

खालच्या वाक्यात ब्राम्हण (तुमच्यासारखे लिहिता करता नाही आले, स्पेलिंग काय वापरले?) हा शब्द वापरला कारण त्याचा उल्लेख Quora लिंक मध्ये आहे.

अद्द्या's picture

28 Apr 2017 - 11:07 am | अद्द्या

ब्राह्मण braahman

असं असतं ते .

बाकी .. " काही संघटना म्हणता ते रस्त्यावर ३ रुपयाच्या ४० पानी पुस्तकातून मराठ्यांचा ( जात म्हणून नाही .. मराठी राजे म्हणून मराठे ) इतिहास सांगतात.. त्यामुळे असोच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2017 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

३ रुपयाला? हल्ली महाग केली काय? म्हणजे पुर्वी म्हणे १.५० रुपयाला ३ विकायचे. बरी असायची काय पोराबाळांची शी-शु पुसायला?

महागाई वाढली बाबा .. आणि त्या अच्छे दिन वाल्यानी नोटा सगळं बदलल्यानी ..
तेवढीच आपली नुकसान भरपाई

एमी's picture

29 Apr 2017 - 12:01 pm | एमी

(संपादित) >> just a query who is editing pratisad now a days? i remember all mipa editors had mass resigned some time back and only nilkant n prashant were managing everything. after that i dont remember any new anouncement for new editors. so who is editing it now?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Apr 2017 - 12:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिसाद संपादित झाल्यासारखा वाटत नाहीये. पण खाली संपादित असं कोणी तत्परपणे लिहिलयं ते पहायला हवं.

मिपावरील या विषयावरच्या तज्ञ/अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे.

मला काल फेसबुकवर यासंबंधी "संदर्भासहित" माहिती मिळाली. ती इथे शेअर करत आहे. त्यातून फक्त माझ्या पहिल्या प्रश्नाचे (बहुतकरून) उत्तर मिळते - पण खालचे दोन प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

२. सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला? त्यासाठी संदर्भ कोणते?

३. महाराजांच्या (ब्राह्मण) मंत्र्यांनी विषप्रयोग केला - हि अफवा / असा समज कधी पासून समाजात आहे? जे लोक असे समजतात त्यासाठी कोणते ऐतिहासिक संदर्भ ते वापरतात? असा समज गेल्या दहा-वीस वर्षात निर्माण झाला आहे कि त्याला यापेक्षाही जुना इतिहास आहे?

फेबु लिंक - https://www.facebook.com/pradip.patil.14203/posts/1016077535159594
अर्काइव्ह - http://archive.is/Ko9Eq

त्यात फक्त मी संदर्भांना आकडे दिले आहेत.

#शिवाजी_महाराज_मृत्यू_व_गैरसमज
•संदर्भातुन मांडणी-
गेल्या काही दिवसापासुन शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कसा झाला यावर विसंगती व विपर्यास असणार लेखन वाचणात आल.तेव्हापासून इतिहास प्रेमींनी सातत्याने मला लेख देण्याविषयी मागणी केली. शिवाजी महाराजांचा खून कि आजाराने मृत्यू याबद्दल ब-याच वाचकांच्या मनात आजही संभ्रमाच वातवरण करणारे काही लेख सोशल मिडियावर प्रकाशित झाले म्हणून हा लेखनी प्रपंच.

•काही निवडक संदर्भ-
समकालीन व उत्तरकालीन साधनांची मत आपण पाहूया..

[1] सभासद बखर
राजास ज्वराची व्यथा -
काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची जाहली.( पान - १२७ )
समकालीन साधनात विश्वसनिय साधन मानलं जाणारी हि बखर आहे राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहली गेली.

[2] जेधे शकावली
चैत्र शुद्ध १५ पौर्णिमा शनिवारी दोन प्रहरा दिवसा रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेवला. अचूक मित्या नोंदवणार विश्वसनिय साधन होय. ( शिचप्र पान-३० )

[3] चिटणीस बखर
शिवाजीस ज्वराची व्यथा -
शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा उत्तरायण दोन प्रहारी देह त्याग करून अवतार समाप्त श्रीराम म्हणून एेसा केला. हि बखर उत्तर कालीन आहे. इतिहासात गैरसमज निर्माण करणारी म्हणून हिची ओळख आहे. ( चिटणीस बखर पान नं २४९ )

[4] मराठ्यांची बखर
शिवाजी रायगडी असता त्याला गुडघी हा तो प्रतिदिवशी वृद्धींगत होत चालला मग त्यांच्या योगे करून मोठा ज्वर झाला.ज्वर आल्या पासुन तो सतराव्या दिवशी तो मृत्यू पावला. ५ एप्रिल तारीख डफने दिली आहे. चूक आहे तारिख ( मराठ्यांची बखर पृष्ठ क्र - ८६ )

[5] शिवदिग्विजय बखर
सोयराबाईने विषप्रयोग केला अशी हि बखर सांगते. ( सविस्तर पहा- पृष्ठ ३१६ ते ३२४ )

[6] परकिय पत्रव्यवहार-
राजापुरकर - सुरतकरांना ( ११ जाने १६७६ )
नाना त-हेच्या बातम्या येतात शिवाजी मेला असे कित्तेक बोलतात.फार अाजारी आहे असे दुसरे बोलतात. ( शि.प.सा.सं. पृष्ठ क्र-५३७ )
•राजापुरकर - सुरत ( १३ मार्च १६७६ )
शिवाजी सुखरूप आहे ( शि.प.सा.सं खंड -२ पृष्ठ ५४४ )
•मुंबई - सुरत ( २८ एप्रिल १६८० )
शिवाजी राजा मेला अशी खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली आहे.१२ दिवस आजारी पडून रक्तासारीने मेला असे म्हणतात.त्याला मरूण आज तेवीस दिवस झाले. ( शि.प.सा.सं. खंड २ पृष्ठ क्र- ६८९ )

[7] डाग रजिस्टर-
१३ आॅक्टोबर १६८०
गोवळकोंड्याहून असे लिहून आले कि शिवाजीराजाला त्यांच्या दुस-या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा.
( शि.प.सा.सं. खंड- २ पृष्ठ ६९८ )

वरिल साधननांवर विवेचन

पहिली गोष्ट शिवाजी महाराज युगपुरुष होते हे आपण विसरतां कामा नये. शिवरायांना ज्वराची व्यथा झाली हे सभासद बखर , चिटणीस बखर , ग्रॅन्ट डफ , इत्यांदी साधनातून माहिती मिळते. सभासद हि समकालीन मानली जाते.यातील ब-याच गोष्टीनी शिवचरित्रातील विसंगत लिखानाला न्याय मिळाला आहे. चिटणीस व डफ पण ज्वर झाला सांगतो.पण डफ अधिक माहिती गुडघी आजाराबद्दल देतो.

जेधे शकावली हि अचूक मित्या नोंदवणारी म्हणून आहे.तीच्यातून काल निश्चितीची अचूक माहिती मिळते.

विषप्रयोगाची माहिती देऊन सोईराबाईंना बदनाम करणार माहिती शिवदिग्विजय बखर देते पण त्याला दुजोरा देणार समकालीन एकही अस्सल साधन नाही. डाग रजिस्टर मध्ये आपण जर पाहिलं तर काय म्हणते ते पाहूया ( गोवळकोंड्याहून असे लिहून आले कि शिवाजीराजाला त्यांच्या दुस-या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा. )

विषप्रयोग झाला असावा अस अनिश्चित वाक्य दर्शवल गेल आहे. म्हणजे राजवाडेंच्या मताप्रमाणे एकाद अस्सल चिटोरे बखरीच्या मताला हाणून पाडू शकत. तस वरील अस्सल साधने पाहता शिवदिग्विजय बखर निराधार राहते. शिवाय शिवदिग्विजय विसंगती व विपर्यास तसेच कल्पित माहित घुसडल्याचे दिसते. शिवाय सोयराबांईंच्या वरचा अरोप खोटा आहे सभासद, चिटणीस व ग्रॅन्ट डफ व मंबईकरांच पत्र रक्तसारीने मृत्यू झाला हे साधन सोयराबाईंवरचा आरोप खोटा आहे यास दुजोरा देतात.

या संपूर्ण साधनात कुठेही खून झाल्याच सिद्ध होत नाही.याउलट ज्वराने झाला असलेल्याचे समकालीन व उत्तर कालीन साधनातून पुढे येते. याउलट मला डफच मत महत्वाच वाटत. शिवाजी रायगडी असता त्याला गुडघी हा तो प्रतिदिवशी वृद्धींगत होत चालला मग त्यांच्या योगे करून मोठा ज्वर झाला.
ज्वर बळावला कशाने हे नविनच माहिती देणार डफच मत विचारात घ्यावयास हव.

ज्वराने मृत्यू झाला याला दुजोरा मिळतोच पण काहींच मत वेगळ असू शकत. पण कागदपत्रांच्या आधारे असाव उगाच खूनासारख्या भाकड कथा सांगू नये. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात औरंगजेब, अफजल खान, शाहिस्तेखान, कारतलब खान, अशा लोकांना महाराजांनी मृत्यूच आव्हान समोर उभ केल होत. राजकारणातले डावपेच राजनिति व राजाच्या मर्यादा, राजाची सुरक्षितता यांचा परिपुर्ण अभ्यास असणार एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे महाराज होय. इतिहासात पुरावे बोलतात निराधार चिकित्सा हि संशोधनाच्या गाभ्यापर्यत कधीच पोहचू शकत नाही. जुन्या काळात तत्कालीन कागदपत्रात विसंगती, विपर्यास जाणवतो त्याच्यावर संशोधन करून पुर्नलेखन करण म्हणजे ते इतिहासाच्या पुर्नमांडनीला पात्र राहिल. नाहीतर शिवाजी महाराजांचा खून झाला याला एकही पुरावा नसताना इतिहासाचं होत चाललेल विकृतीकरण आपण थांबवल पाहिजे.

शिवाजी महाराजांचा जातिद्वेश पसरवण्यासाठी वापर करण कितपत योग्य आहे. ब्राम्हण मंत्र्यांनी खून केला का नाही हे वर सिद्ध झाल आहे. निश्चित पणाने नंतरच्या काळात संभाजीराजे व मंत्री यांच्यात मत भेद होते.पण त्या मतभेदाचा अर्थ इतिहासात पाहिजे तसा वळवून घेणं कितपत योग्य आहे. शिवाजी महाराजांबद्दलच्या विसंगत इतिहास लेखनातील गैरसमज आपण दुर करायचे सोडून अजून किती नव्याने निर्माण करणार आहोत. हे विचार करण्याची वेळ आहे.

मी कोणत्याही जातीचा पुरुस्कृता नाही.
•संदर्भ-
•कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवछत्रपतींचे चरित्र.
संपादक- र.वि हेरवाडकर
•शिवचरित्र प्रदीप-
द.वि आपटे.स.म.दिवेकर.
•मल्हार रामराव चिटनिस विरचित शककर्ते शिवछत्रपती महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
•history of Maratha ( translated into Marathi ) original English work captain Grant duff
Captain d.capon
•शिवदिग्विजय बखर-
संपादक - रा.चि.ढेरे.
•शिवकालीन पत्र सार संग्रह खंड - २
( एकेरी नावाने महाराजांना बोलण्याचा हेतु नव्हता पण संदर्भ तसेच्या तसे द्यावे लागले.)
लेखन - प्रदीप पाटील

इथून पुढचा प्रतिसाद नंतर लिहीत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2017 - 1:42 pm | प्रकाश घाटपांडे

( एकेरी नावाने महाराजांना बोलण्याचा हेतु नव्हता पण संदर्भ तसेच्या तसे द्यावे लागले.)

अहो देव, राजा, आई व मित्र यांना एकेरी उल्लेख हा व्याकरणाला मान्य आहे. आपण रामाच्या देवळात जातो असे म्हणतो तो राम तो कृष्ण तो शंकर तो विष्णू तो देव असेच असते. हे एकेरी उल्लेख आदर भक्ती प्रेम श्रद्धा यातूनच असतात.

ते वाक्य माझे नाही - प्रदीप पाटील यांचे आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2017 - 11:43 am | प्रकाश घाटपांडे

होय बरोबर आहे.त्यांच्याच वाक्यावर ही प्रतिक्रिया आहे

अत्रे's picture

28 Apr 2017 - 11:55 am | अत्रे

फेसबुक वरील लेखात जरी संदर्भांची नावे दिली असतील तरी त्यात खरोखरच तसे लिहिले आहे का हे बघणे आव्यश्यक आहे.

मी त्यातला पहिला संदर्भ व्हेरिफाय केला आहे

सभासद बखर

ही बखर इथे मिळेल -
१. स्कॅन कॉपी - http://www.scribd.com/doc/17158123/- (यात पान क्रमांक १०४ पहा)
२. टाइप केलेली कॉपी - https://www.scribd.com/document/26098219/Shivaji-Maharaj-sabhasad-bakhar
३. इंग्रजी भाषांतर - http://scans.library.utoronto.ca/pdf/3/17/sivachhatrapatib00sensuoft/siv...

बाकी संदर्भ (चिटणीस बखर, मराठ्यांची बखर, शिवदिग्विजय बखर, डाग रजिस्टर आणि इतर ) ऑनलाईन कुठे मिळतील, कोणी सांगेल काय?

शाम भागवत's picture

28 Apr 2017 - 11:18 pm | शाम भागवत

मायबोलीवर असाच धागा आला होता
2011 साली <\a>

स्थितप्रज्ञ's picture

30 Apr 2017 - 11:11 am | स्थितप्रज्ञ

२०११ साली या धाग्यातील ४था पर्याय नव्हता. म्हणजेच महाराजांच्या मृत्यूनंतर ते अगदी नजिकच्या काळापर्यंत अशी शंकाही कोणाला आली नव्हती. याचे कुठे तत्कालीन संदर्भ ही सापडत नाहीत. म्हणजेच तो पर्याय नंतर संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने (३ रु पिवळे पुस्तकवाल्या संघटनांकडून) घुसडण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर संत तुकारामांनाही अशाच काही ब्राह्मणांनी मारले अशी अफवा या संघटना पसरवत आहेत. असो, त्यांचे काम ते मन लावून करतायत ते त्यांना करू द्यावे. आपण खरे काय ते समजून घ्यावे.
So we are now left with first 3 options.

तो धागा वाचला. त्यातदेखील कोणी एक माणूस

छत्रपती शिवाजी महाराजांचा मॄत्यू हा विषप्रयोगानेच झाला होता परंतू त्यांच्या बायकोने हा विषप्रयोग केला नव्हता - Submitted by बिगबॉस on 12 July, 2011 - 13:22
.

असे म्हणत आहे (संदर्भ न देता). म्हणजे २०११ मधे सुद्धा काही लोक तसा विचार करत होते.

म्हणजेच तो पर्याय नंतर संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने घुसडण्यात आलेला आहे

याचाच उगम शोधायचा आहे. नेमकी सुरवात कोणाच्या डोक्यातून झाली.

विशुमित's picture

30 Apr 2017 - 4:16 pm | विशुमित

याचाच उगम शोधायचा आहे.
===>> वेदोक्त प्रकरण हा उगम असावा बहुतेक..!!

सतिश गावडे's picture

29 Apr 2017 - 12:52 pm | सतिश गावडे

>>शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला?
या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर तुम्ही त्या उत्तराचे काय करणार आहात?

मराठी विकिपीडिया वर जाऊन ते सेक्शन ऍड करीन म्हणतो.

सतिश गावडे's picture

29 Apr 2017 - 2:04 pm | सतिश गावडे

नंतर उत्तरदायित्वास नकार द्यायला विसरु नका. :)

सतिश गावडे's picture

29 Apr 2017 - 2:04 pm | सतिश गावडे

नंतर उत्तरदायित्वास नकार द्यायला विसरु नका. :)

स्थितप्रज्ञ's picture

30 Apr 2017 - 10:42 am | स्थितप्रज्ञ

या बाबतीत बाबासाहेब पुरंदरेंचे "शिवचरित्र" काय म्हणते यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?

अण्णाजी पंडित, केशव पंडित, प्रल्हाद पंडित वगैरेंनी कट करून पोटात विष भरलेली मासळी संभाजीच्या ताटात वाढली. हे एका मुलाने संभाजीस सांगितल्यामुळे कट उघडकीस आला. ती मासळी खाल्यामुळे एक कुत्रा आणि एक मुलगा दोघेही मरण पावले (३० ऑग. १६८१). संभाजी खवळला, त्याने विष देणाऱ्या सोयराबाई, बालाजी प्रभू, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जद वगैरेंना व त्यांच्या २० साथीदारांस हत्तीच्या पायी तुडविले, (१२ ऑक्टो.१६८१) याच लोकांनी शिवाजी महाराज लवकर मरावे म्हणून सोयराबाईंच्या मदतीने शिवाजीस विष देऊन ठार मारले असे संभाजीस वाटत असावे. शिवाजींचे प्राणोत्क्रमण झाले त्यावेळी पेशवा मोरोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो हे अधिकारी त्यांच्याजवळ नव्हते. पण विष देण्याची त्यांना सवय होती हे संभाजीच्या प्रकरणावरून सिद्ध होते. ह्या सर्वांना संभाजी अप्रिय असल्यामुळे त्यांनी संभाजीस स्वार्थी, दुष्ट, क्रूर, मद्यपी, व्यभिचारी, दुर्व्यसनी वगैरे विशेषणे लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला.*

*सर जदुनाथ सरकार म्हणतात 'Sambhaji.. is painted in maratha history as a wicked and selfish youngman.......This story is based upon the accounts written after his death by his ministers of his father's court, all of whom he had antagonised by persecution for their attempt to disinherit him in favour of ...... Rajaram.....Thus Sambhaji's partisans have been denied a hearing at the bar of history.....but it is now possible to learn their case.....in a sanskrit poem of Paramananda'
House of Shivaji, p. No. 195-196.

मध्ययुगीन भारताचा इतिहास,
पृष्ठ क्र. ५९ (युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा)
प्रा. देशमुख.

गामा पैलवान's picture

11 May 2017 - 5:33 pm | गामा पैलवान

व्ही. डी. सी.,

पाहिलं म्हणजे सोयराबाईंना शंभूराजांनी मारलं नाही. दुसरं म्हणजे विषारी मासळीचा कट फसल्यावर उपरोक्त लोकं पळून गेली असती. शंभूराजांच्या तावडीत सापडणं अशक्यं वाटतं. तस्मात ही अफवा आहे असं माझं प्रथमदर्शी मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

हे वाचा ,(मी सहमत नाही ...फक्त माहिती करता
http://hbwinner.blogspot.com/2014/01/chh-shivajis-death-or-murder.html

श्वेता व्यास's picture

22 Jul 2019 - 12:54 pm | श्वेता व्यास

लेखकाने लिहिलंय,
>> याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.
ज्या पद्धतीने हा लेख लिहिला गेला आहे (अफवा पसरवणे, दिशाभूल करणे, कपटकारस्थान करणे) त्यानुसार लेखकाच्या तर्कटाप्रमाणे लेखक नक्कीच 'ब्राह्माण' असावा.