आई

अक्षय दुधाळ's picture
अक्षय दुधाळ in जे न देखे रवी...
10 Apr 2017 - 11:51 pm

आई
जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई...
उगवत्या सूर्याची तेज आई...
काटेरी वनातल नाजूक फुल आई...
पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल,
उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात
आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई...
आयुष्याच्या पुस्तकातील पहिले पान आई...
घरातल्या घरात गजबजलेल गाव आई...
घराचा पाया, मंदिरातील देव आई...
समईतून उजेड देणारा धागा आई...
मायेचा फटका, जेवणातल मीठ आई...
प्रश्नाला पडलेले उत्तर आई...
बहिर्याचे कान लंगड्याचा पाय
वासराची गाय तशी लेकराची माय आई...
सरतही नाही आणि पुरतही नाही अशी
जन्माची शिदोरी आई...
कवितेची ओळ, गाण्याची चाल आई...
आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई...
जिवंतपणी दिसनारं देवाच रूप आई
आत्मा आणि ईश्वर यांचा मिलन आई...

कविता

प्रतिक्रिया

मिलिंद के's picture

12 Apr 2017 - 10:29 am | मिलिंद के

मला एका गाण्याची पहीली ओळ आठवतेय.माझी आई नेहमी म्हणायची. ती हयात असताना मी हे गाणं मोबाईल वर रेकॉर्ड पण केले पण. इतर वाद्यांच्या कल्लोळात आई चे शब्द निटसे ऐकू येत नाहीत. माझी विनंती आहे की, या गाण्या संदर्भात कोणास काही माहीती असल्यास ती जरूर द्यावी.
गाण्याची पहीली ओळ आहे
पाय चेपीतो माय पित्यांचे
करुद्या ही चाकरी
विठ्ठला ऊभे रहा तोवरी।

पैसा's picture

13 Apr 2017 - 10:20 am | पैसा

कविता आवडली

वेल्लाभट's picture

13 Apr 2017 - 3:08 pm | वेल्लाभट

आवडली.