ताळेबंद
तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
कुणाची तरी वाट बघत,
जागलात,
काही उत्तर रात्रीचे प्रहर.
ते ही वळते केलेत ,
संधीकालाच्या वजावटीत.
ओंजळीत चेहेरा झाकून रडलात ,
ते ही होरे जमा धरलेत,
ग्रहणाच्या हिशेबात.
तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
उरलं सुरलं केलं वळतं
घसार्याच्या आकडेवारीत
तसे काही बाक़ी नाही
देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
(मुठभर राखुंडी हातात ठेवून
आयुष्य म्हणाले,
हीच काय ती गंगाजळी
इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )
ह्म्म्म... चांगली आहे!
आवडली
:)
आवडली.
सुरेख!!
केवळ...!!
सुरेख
अतिशय सुरेख
__/\__
छान