स्त्री लैगिंकतेचा 'ब्र'
मिपावर अनेकवेळा स्त्रीच्या लैगिकतेविषयी चर्चा झालीय. यात अनेक पुरुष सदस्यांची मते पाहण्यात आली. बरेचदा ती मत अचाट, अतर्क्य वाटली. "स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत इथे.
फार कमी वेळा स्त्री सदस्यांनी मते मांडली. कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.
आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे. तस होणं अवघडच आहे तरीपण.
झालं असं कि नुकताच माझ्या वाचनात कविता महाजन यांचा ब्लॉग आला. त्यापूर्वी मी त्यांची ठकी आणि ब्र हि पुस्तके वाचली होती. 'भिन्न' बद्दल ऐकून आहे, वाचायचे राहिले आहे. मला त्यांचा रोखठोकपणा फार आवडतो. अत्यंत मार्मिकपणे स्त्री लैगिंकतेवर त्या लिहितात. ऐसी अक्षरेच्या विशेषांकात सुद्धा त्यांची अत्यंत सुंदर मुलाखत आहे.
या चर्चेसाठी मला काही त्यांच्या कथेतील उतारे समर्पक वाटले, ते देत आहे.
'ब्र'मध्ये एक प्रसंग आहे.... एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे नवऱ्याची तक्रार करताना 'आपण नाही म्हटलं तर ऐकून घ्यावं लागतं, पण आपली इच्छा असताना त्याचं उठलं नाही तर आपण काही बोलायची चोरी असते... आता तुला सांगतेय तर तुझ्या चेहऱ्यावर कसे भाव आलेत बघ.' असं काहीतरी मैत्रिणीला सांगते.
त्यांच्या ब्लॉगवर एक 'डिमांड' नावाची लघु कथा/किस्सा आहे. उपहासात्मक शैलीत त्यांनी सत्य मांडलं आहे ..... मैनावतीने जाहिराती चाळून बऱ्या वाटलेल्या कॉलबॉय केंद्राचा फोननंबर फिरवला. एका घोगरट आवाजाच्या प्रौढ बाप्याने फोन घेतला.
मैनावतीने एका रात्रीसाठी एक बाप्या हवाय अशी डिमांड सांगितली आणि दर व दर कसे लावले जातात त्याची पद्धत असे दोन्ही विचारले.
घोगरट म्हणाले,”घरी नेणार तर दर वेगळे, हॉटेलमध्ये नेणार तर वेगळे, नुसते कॅबमधून भटकणार तर वेगळे. पुन्हा तुम्हाला कसा पुरुष हवा आहे आणि किती तासांसाठी आणि काही विशेष अपेक्षा आहेत का, यावर बाकी दरनिश्चिती होईल. तर तुमची गरज आणि अपेक्षा काय आहे ते सांगा.”
मैनावती म्हणाली,”तशी काही फार खास अपेक्षा नाहीये. चाळीशीच्या आसपासच्या वयाचा, थोडं टक्कल पडलेला, पोट सुटून अंग जरा विसविशीत झालेला, काहीसा गबाळा, फोर प्ले या शब्दातला फ देखील माहीत नसलेला, फार काही नीट करणं जमत नसल्याने कसंबसं काम उरकून तिसऱ्या मिनिटाला घोरायला लागणारा पुरुष पाहिजे आहे.”
घोगरट आश्चर्यचकित होऊन म्हणाले,”कमाल आहे. आमच्याकडे अशी डिमांड पहिल्यांदाच कुणी बाई… सॉरी तरुणी करतेय. सहसा सगळ्यांना तरुण, देखणे, दणकट, तज्ञ पुरुष हवे असतात. मी तुमच्या डिमांडनुसार व्यवस्था करतो. पण कुतूहल म्हणून विचारतोय, गैरसमज करून घेऊ नका… पण इतके पैसे मोजून तुम्हाला ‘असा’ पुरुष का हवा आहे? म्हणजे त्यामागे काही विशेष कारण आहे का?”
मैनावती म्हणाली,”गैरसमज कसला डोंबल्याचा? आणि कारण अगदी साधं आहे. गेले दोन महिने ऑफिसच्या कामानिमित्त सतत प्रवासात आहे. फार कंटाळा आलाय.”
“अहो, पण मग कुणीतरी इंटरेस्टिंग, तरणातगडा, मनोरंजक पाठवू का?”
“एरवी तसाच मागवला असता हो… पण आज किनई मला नुसता कंटाळा नाही आलेला… मला आज फार ‘होमसिक’ वाटतंय!”
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नक्की काय अपेक्षित आहे??
मिपावर अनेकवेळा स्त्रीच्या
खळबळ!
मला असे वाटत नाही
बाईश्री
त्यांच्या मुलाखतीतलं हे त्यांचं वाक्य फार बोलकं आहे
शेवटाकडे एक रोमान्स लिहायचा होता. तिथे अडखळल्यावर ध्यानात आलं की नकारात्मक लैंगिक अनुभव मी थेट लिहिले आहेत. संतापच इतका तीव्र होतो की तिथे विचार करण्याची गरज भासत नाही; पण याउलट सकारात्मक लैंगिक अनुभव लिहिताना मात्र अजूनदेखील संकोच वाटतो आहेच, हे तेव्हा ध्यानात आलं होतं.थोडक्यात, सगळं सेंसेशनल लेखन हा विकृत लैंगिक अनुभवातून आलेला भाग आहे आणि विधायक लैंगिक अनुभव लिहीतांना संकोच वाटतोयं !मला वाटत हि चर्चा 'कविता
माझे प्रतिसाद मूळ प्रश्नालाच भिडतात त्यामुळे ते व्यक्तिगत वाटतात
अवांतर
पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा
त्यांच्या कादंबरीतल्या
त्यांच्या कादंबरीतल्या उतार्यांवरुन खुद्द त्यांच्याबद्दल मत मांडणे म्हणजे शिरेलीत व्हिलनचे काम करणारा खर्या आयुष्यात तसाच असणार समजणारे आमचे गाववाले अडानी असतात तसेच काहीसे वाटून हशीवलं बगा!+१००० हे भान ठेवणे सगळ्यांना जमते असे थोडेच आहे ?! :(त्या जे के रोलिंग ला हॅरी
अजयाशी सहमत. उगाच कशाला
काही प्रतिसादांनी धाग्याचा
असेच म्हणते
+1
मला चर्चाविषयच नीट मांडलाय
तुमच्या प्रतिसादाशी संपूर्ण
+ १ . शिवाय बायकांबद्दल या
डॉ. खरेंनी काय लिहिलं
आमचे निरिक्षण असे आहे की
वास्तविक आमच्यासारखे तीशिला
१. आमचे निरिक्षण असे आहे की
संवेदनशील विषय आहे. पण यावर
ते सगळं ठीक आहे, पण या विषयात
धन्यवाद
गैरसमज नक्की आहे का ?