कदाचित (भयगुढ कविता)
कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये
कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो ढगांना प्रसवतोय
दाराछतातून टपटपून
अंगावर बर्फशहारे आणतोय
कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत शिकाऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत
कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय
कदाचित हा फक्त भास असेल
कुणीतरी जोरात किंचाळल्याचा
आपोआप दिवे विझल्याचा अन
मानेवरच्या उष्णगार श्वासांचा
कदाचित भासच असेल हा
कदाचित स्वप्न असेल
कदाचित...
ती आली असेल
-----------------------------------------------
व्वाह! मजा आ गया.
वाह, क्या बात है! मस्तच.
बापरे!
सर्वांना धन्स. _/\_
कदाचित.....
मस्त आवडली
कदाचित
ती कोण आहे आणि का आली असेल
भयानक प्रेमकविता, जबरदस्त
सर्वांना कविता आवडली याचा
रात्रीस खेळ चाले....