महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
21 Feb 2017 - 11:16 pm
गाभा: 

महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.

http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-...

इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.

पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.

मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६

पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३

ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३

नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४

_________________________

एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.

_________________

दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

22 Feb 2017 - 8:40 am | धर्मराजमुटके

तुम्ही सतत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन असता त्यामुळे तुमचे निकालपुर्व अंदाज वाचायला आवडतील.

श्रीगुरुजी's picture

22 Feb 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

माझे अंदाज या धाग्यात दिले आहेत. इथे पुनरावॄत्ती करीत नाही.

ईंडिया टुडे - अ‍ॅक्सिस च्या अंदाजाप्रमाणेच झी-२४ तास ने देखील आपल्या मतदानोत्तर सर्वेक्षणावर आधारीत जागांचा अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार खालील परिस्थिती असेल.

मुंबई -
शिवसेना ९०-९६, भाजप ७८-८२, काँग्रेस २७-३०, राष्ट्रवादी ३-५, मनसे ७-९

ठाणे-
शिवसेना ६०-६५, भाजप २०-२५, काँग्रेस ३-५, राष्ट्रवादी २८-३०, मनसे २-३

नागपूर -
शिवसेना ४-६, भाजप ८४-८७, काँग्रेस ३४-३६, राष्ट्रवादी ४-६, मनसे ०-२

पुणे -
शिवसेना १२-१७, भाजप ५५-६०, काँग्रेस १६-२१, राष्ट्रवादी ५५-६०, मनसे ६-११

दोन्ही वृत्तसस्थांचे अंदाज एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यात फारसा फरक नाही.

माझे मत वेगळे आहे. महापालिका निवडणुकीचे यापूर्वी कधी सर्वेक्षण केले होते का याविषयी माहिती नाही. परंतु इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वक्षण करून अंदाज काढणे फारसे शक्य वाटत नाही. लोकसभा निवडणु़कीचा बराचसा अचूक अंदाज काढता येतो कारण त्या निवडणुकीत कोणताही एक मतदारसंघ घेतला तरी सॅम्पलमध्ये विविधता जास्त प्रमाणात असते. महापालिका निवडणु़कीत एखादा विशिष्ट प्रभाग म्हणजे काही जवळ्पासच्या गल्ल्या असू शकतात व तिथे राहणार्‍या नागरिकांमध्ये विविधता खूप कमी प्रमाणात असते. पुण्यात सदाशिव, शनिवार, नारायण इ. पेठांमधील प्रभागात सर्वेक्षण केले तर बहुतेक एकतर्फी अंदाज व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वेक्षण करणे हे एक धाडस आहे.

वरील दोन्ही अंदाजावरून काही शंका येताहेत. नागपूरमध्ये जरी भाजपचे प्राबल्य असले तरी एखादी लाट असल्याप्रमाणे तिथे भाजपला संपूर्ण बहुमत किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त यश मिळेल असे वाटत नाही. मागील निवडणुकीत १५२ पैकी ६२ जागा भाजपकडे होत्या. त्यात फार तर १०-१२ जागांची भर पडू शकेल. परंतु ९० पेक्षा जास्त किंवा अगदी ११० जागा मिळतील यावर विश्वास बसणे कठीण आहे. मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसला तरी त्यांना तिथे २०१२ मध्ये १२ जागा होत्या. त्यात घट होऊन जेमतेम ३-६ जागा मिळणे इतकी अधोगती होईल असे वाटत नाही. ते पूर्वी इतकेच किंवा त्याच्या आसपास यश मिळवतील असे वाटते. पुण्यात सुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष नक्की होईल, परंतु पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही. अ‍ॅक्सिसच्या अंदाजानुसार जर भाजप व सेना या दोघांनाही ३२% मते मिळणार असतील तर अगदी अर्ध्या टक्क्याचा फरक सुद्धा किमान १०-१२ जागा इकडून तिकडे हलवू शकतो. त्यामुळे तिथे ठाम निष्कर्ष काढणे अवघड वाटते.

बघूया उद्या काय होतंय ते.

पैसा's picture

22 Feb 2017 - 9:05 am | पैसा

प्रत्यक्ष निकाल येतात तेव्हा वेगळेच काहीतरी घडलेले असते.

एका मित्राच्या फेसबुक वॉलवरून साभार -

ह्या # एक्झिट_पोल वर आधारित चर्चा म्हणजे, डिलीव्हरीसाठी बायकोला आत नेल्यावर हातात असलेल्या रिकाम्या वेळात मुलगा होईल का मुलगी हा अंदाज बांधून, बाळाचं नाव ठरवून.... त्या नावानी शाळेचा फॉर्म भरणाऱ्या अस्वस्थ बापासारखे उद्योग आहेत!! काढा की # कळ दोन दिवस....।।।।

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 11:44 am | अत्रुप्त आत्मा

=))

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 12:34 pm | संदीप डांगे

अगदी अगदी!

ह्या पोल्स चा जनतेला नक्की काय उपयोग आहे हे माहित नाही, पण उपयोगहीन कोणतीही गोष्ट माध्यमांकडून घडत नाही... शोधले पाहिजे

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Feb 2017 - 1:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

जनतेला उपयोग वगैरे काही नाही, ते पोल्सचे कार्यक्रम लोक बघतातकी मन लावून! मग टीआरपी मिळतो दुसरं काय? बहुतेक चॅनेल्स सेफ गेम खेळताना दिसतात. सगळ्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतात. चुकले तर सगळ्यांचेच चुकले त्यामुळे तुमच्यापेक्षा आमचं बरोबर वगैरे कोण बघत बसणार. राजकारणात इंटरेस्ट घेणाऱ्यांसाठी शुद्ध करमणुकीचा कार्यक्रम असतो असे मला वाटते.

तुषार काळभोर's picture

22 Feb 2017 - 12:12 pm | तुषार काळभोर

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं कसं, असं कसं ?!

या दोन दिवसात घातला जाणारा धुमाकूळ जनता मोठ्या आवडीने पाहते आणि त्यामुळे वर गेलेल्या टीआरपीप्रमाणे टीव्हीवरील जाहिरातींचे दरही वर जातात... असे सुगीचे दिवस कोण चुकवेल ?! ;) =))

तुषार काळभोर's picture

22 Feb 2017 - 1:10 pm | तुषार काळभोर

केवळ अंदाज - चुकू शकतात, बरोबर आल्यास अभ्यास करून अंदाज व्यक्त केल्याचा दावा केला जाणार नाही.

पुण्यात भाजप – ६५ - ७०/ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ५०-६० / शिवसेना – २०-२५ /मनसे- ५-१० / अपक्ष-इतर - ०-५
पुण्यात मनसेला दहा हासुद्धा अगदी फारफेच्ड अंदाज आहे. मनसे पुण्यात नसल्यासारखीच होती. तुलनेत रिपाइं तरी भाजपसोबतच्या युतीमुळे नोटिस्ड झाली. यावेळी भाजप वि आघाडी अशीच निवडणूक झाली. शिवसेनेला केवळ पूर्वसंचितावर काही पारंपारिक जागा मिळतील. निवडणुकीनंतर शिवसेनेचा आधार महत्वाचा असू शकतो (भाजप-आघाडी दोघांसाठी)

नाशकात मनसे इतक्या खाली जाईल असे वाटत नाही. (आबप-माझा चा अंदाज पत्रकारांच्य मतांवर ठरवलेला आहे). तिथला काहीच अंदाज नाही, पण मनसे तिथे असावी अशी इच्छा/ अपेक्षा आहे.

मुंबईत भाजपा/शिवसेनेला परस्परांशी युती करण्यावाचून पर्याय नसेल.(नसलाच पाहिजे, मनसे/राष्ट्रवादी/कॉन्ग्रेसची साथ घेण्यापेक्षा त्यांनी परस्परांशी निवडणुकोत्तर युती करावी). ठाण्यात राष्ट्रवादीने भाजपला मागे टाकले तर आश्चर्य वाटेल.

जिप/पंस मध्ये काँ-राकाँचा वरचष्मा राहील. नगरपालिकांप्रमाणे भाजपला तितकेसे स्पेक्टॅक्युलर यश मिळणार नाही.

** परत एकदा : हे सर्व अंदाज आहेत.

शब्दबम्बाळ's picture

22 Feb 2017 - 1:30 pm | शब्दबम्बाळ

स्वतः केलेल्या कामांचा अहवाल दाखवून मते मागणाऱ्या मनसेला निवडणुकीत यश मिळाले असे वाटत राहते.
विधानसभेला देखील राज ठाकरे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन डॉक्युमेंट दाखवत असतानाच भाजप-सेना यांचा काडीमोड झाला आणि सगळं फुटेज त्यांना मिळालं. निदान काहीतरी वेगळा विचार तरी त्यांनी मांडला आहे सातत्याने!
मीडिया फक्त मारामारी भांडण यांनाच महत्व देतो असे वाटते.
जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Feb 2017 - 2:57 pm | हतोळकरांचा प्रसाद

जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.

याच्याशी प्रचंड सहमत! तसे होण्याची शक्यता कमी आहे तरी ते घडावेच असे वाटते. नाहीतर याचा अर्थ सरळ आहे, जनतेसाठी विकास आणि त्याची प्रचारातील मांडणी हा निवडणुकांच्या वेळी महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकांचा प्रचार आताच्या शिवसेना भाजपच्या प्रचारापेक्षा फार वेगळा नसेल.

राज ठाकरे / मनसे पण निवडणूक लढवत आहेत हे खूप उशीरा कळाल्यासारखे झाले. त्यात त्यांची नाशकातली प्रतिमा म्हणजे "इतका दंगा करत होते तर नाशिक मिळवून काय दिवे लावले..?" अशीच होती. जर खरंच चांगले काम केले असेल तर सुरूवातीपासून तसा दंगा करणे आवश्यक होते.

कितीही सॉलिड मुद्दे असले तरी, शेवटच्या चार दिवसात समोर आल्याने (आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड नुसार) ते चमकोगिरी वाटले असण्याची शक्यता आहे.

एकंदरीत त्यांचे मार्केटिंग कमी पडले.

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 1:36 pm | संदीप डांगे

माझ्या अंदाजाप्रमाणे... निवडणुक लढवलेल्या सर्व उमेदवारांमधून कोणी ना कोणी शंभर टक्के निवडून येणार आहे. लावा पैज! :-)

धर्मराजमुटके's picture

22 Feb 2017 - 10:01 pm | धर्मराजमुटके

तुमचा अंदआहे१००% बरोबर आहे ! मात्र मी १०१% सांगतो की काही उमेदवार शिवसेनेचे, काही भाजपा, राकाँ, काँग्रेस आणि इतर पक्षांचे देखील निवडून येतील.

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 10:06 pm | संदीप डांगे

तुमचा अंदाज साफ चुकणार आहे ह्याची तुम्हाला अजिबात माहिती नाही, अभ्यास वाढवा आणि सुमडीत पारडे फिरवणार्‍या 'अपक्षां'नाही ध्यानात ठेवत चला...!

=)) =))

धर्मराजमुटके's picture

22 Feb 2017 - 10:18 pm | धर्मराजमुटके

आन ते लगे हाथ 'मोठे व्हा' आशिर्वाद बी देऊन टाका जी !
=)) =))

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 10:24 pm | संदीप डांगे

पुढच्या प्रतिसादासाठी राखून ठेवला होता.. पण लहान मुलांसारखा उतावीळपणा करुन तुम्ही सर्व सोंगट्या उचलून खेळ बंद पाडला... 'मोठे व्हा' इतकंच म्हणेन!

=)) =))

आदूबाळ's picture

22 Feb 2017 - 3:03 pm | आदूबाळ

कब है निकाल?

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Feb 2017 - 3:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

उंद्या हाय झान्गडगुथ्था!

धर्मराजमुटके's picture

23 Feb 2017 - 10:07 am | धर्मराजमुटके

आत्ता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट व्हायला हरकत नाही.
आता कोणता पक्ष कोठे बहुमतात येतो, कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर वैचारीक युती करतो आणि कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर चुंबाचुंबी आणि शय्यासोबत करतो ते पाहणे रोचक ठरेल.

संदीप डांगे's picture

23 Feb 2017 - 10:12 am | संदीप डांगे

ख्यिक!!

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:08 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल लवकरच हाती येतील.

"मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत" हे आज संध्याकाळी कोणकोण म्हणणार एवढेच बघायचे.

हेमंत८२'s picture

23 Feb 2017 - 10:18 am | हेमंत८२

अमरावतीत भाजपच्या रिता पडोळे यांची बिनविरोध निवड, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे रवी लांडगे बिनविरोध

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:19 am | गॅरी ट्रुमन

अगदी पहिले कल हाती आले आहेत. मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये तसेच सोलापूर जिल्हा परिषदेत प्रत्येकी एका जागेवर भाजप उमेदवार पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:24 am | गॅरी ट्रुमन

पुण्यात भाजप २ जागांवर आघाडी.

मुंबईत शिवसेना आणि भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे.

अमरावती, सोलापूर, पिंचि मध्ये भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे.

नाशिकमध्ये १ जागेवर राष्ट्रवादी आणि १ जागेवर अपक्ष पुढे

नांदेड जिल्हा परीषदेत काँग्रेस पुढे. अशोक चव्हाणांचा प्रभाव चालत आहे असे दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:30 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना ४ आणि भाजप २. माजी महापौर श्रध्दा जाधव आघाडीवर

नागपूर, अमरावती, सोलापूर, पिंचि महापालिका: भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे

नाशिक जिल्हा परिषदेत भाजप पुढे तर नांदेडमध्ये काँग्रेस पुढे.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

पुण्यात राष्ट्रवादी ४ आणि भाजप ५ जागांवर तर काँग्रेस १ जागेवर पुढे. (एकूण १० )
पिंचि: शिवसेना ३ आणि भाजप १
मुंबई: शिवसेना ५ आणि भाजप २ (एकूण ७)

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:34 am | गॅरी ट्रुमन

पुणे: भाजप ११, राष्ट्रवादी ५ आणि अपक्ष १
मुंबई: शिवसेना ६ भाजप २
ठाणे: शिवसेना १

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:38 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना ८ भाजप ३ काँग्रेस १
पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २
ठाणे: शिवसेना २ भाजप १
पुणे: भाजप ११ राष्ट्रवादी ५ अपक्ष १

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:41 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना १२ भाजप ७ काँग्रेस २ इतर १
पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २
ठाणे: शिवसेना २ भाजप १
पुणे: भाजप १२ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:46 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना १५ भाजप १० काँग्रेस ३ राष्ट्रवादी १
पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २
ठाणे: शिवसेना ८ भाजप १
पुणे: भाजप १३ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १ शिवसेना १

शिवसेनेने ठाण्यात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे.

मुंबईत सध्या शिवसेना पुढे आहे पण एबीपीवर असे म्हणत आहेत की आतापर्यंतचे कल मध्य मुंबई (दादर, लालबाग इत्यादी) भागातून जास्त आले आहेत. अजून उपनगरांमधील तितके कल आलेले नाहीत.

मनसेला फार प्रभाव दाखविता आलेला दिसत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:48 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना १८ भाजप ११ काँग्रेस ५ राष्ट्रवादी १ इतर २
पिंचि: शिवसेना ४ भाजप ३ राष्ट्रवादी २
ठाणे: शिवसेना ८ भाजप १
पुणे: भाजप १९ राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १
नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:56 am | गॅरी ट्रुमन

मुंबई: शिवसेना ३१ भाजप २० काँग्रेस ६ राष्ट्रवादी २ मनसे २ इतर २
पिंचि: भाजप ५ शिवसेना ४ राष्ट्रवादी ४
ठाणे: शिवसेना ८ भाजप १
पुणे: भाजप २० राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १ इतर १
नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २
नागपूरः भाजप ७

आताचे चित्रः शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे. नागपूरमध्येही भाजप पुढे. नाशिकमध्ये मनसेला तितका प्रभाव दाखवता आलेला नाही.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 10:56 am | वरुण मोहिते

राष्ट्रवादी ४ सेना ३ भाजप १
पुण्यात भाजप ने चांगली आघाडी घेतलीये

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 11:03 am | गॅरी ट्रुमन

सध्याचे कल कायम राहिले तर अपेक्षेप्रमाणे मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष होणार. पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये भाजप पुढे.

एकूणच चित्र असे दिसत आहे की जवळपास सर्व शहरी क्षेत्रांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता 'मार्जिनल प्लेअर' झाले आहेत.

ठाण्यातील आणि नागपूरमधील कल का अडकले आहेत हे समजायला मार्ग नाही.

नाशिक मध्ये मनसे अजूनही पिछाडीवर आहे .अकोला अमरावती चे निकाल पण अडकले आहेत अजून

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 11:12 am | गॅरी ट्रुमन

मुंबईत आता ४० जागांवर शिवसेना, २६ जागांवर भाजप, ९ जागांवर काँग्रेस, ३ जागांवर मनसे, २ जागांवर राष्ट्रवादी तर २ जागांवर इतर पुढे

पुण्यात ४७ पैकी ३० ठिकाणी भाजप, नागपूरमध्ये १६ पैकी १५ ठिकाणी भाजप, नाशिकमध्ये २१ पैकी १२ ठिकाणी भाजप पुढे.

विदर्भात भाजपने आपला गड राखला आहे असे म्हणायला हवे. मुंबईत मात्र शिवसेनेला मात देण्यात भाजपला यश येताना दिसत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 11:17 am | गॅरी ट्रुमन

मुंबईत शिवसेना आतापर्यंत अर्ध्यापेक्षा थोड्या कमी जागांवर पुढे आहे. दादर, वरळी या पारंपारीक बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे. पिंचिमध्ये आता राष्ट्रवादी पुढे गेला आहे. पुणे, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये भाजप आरामात पुढे आहे. ठाण्यात शिवसेना पुढे आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर येथे आतापर्यंतचे कल अगदीच एकतर्फी आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 11:30 am | गॅरी ट्रुमन

मुंबईत आता ११० पैकी ५६ जागांवर शिवसेना, ३२ जागांवर भाजप, १० वर काँग्रेस, ५ वर मनसे, ४ वर राष्ट्रवादी पुढे. शिवसेना निम्म्यापेक्षा जास्त जागांवर पुढे.
पुण्यात ५७ पैकी ३० ठिकाणी भाजप पुढे
ठाण्यात शिवसेनेहा जोर थोडा मंदावला आहे. ३३ पैकी १४ ठिकाणी शिवसेना पुढे
नाशिकमध्ये २७ पैकी १७ ठिकाणी भाजप पुढे
सोलापूरमध्ये १७ पैकी १० ठिकाणी भाजप पुढे
नागपूरमध्ये २३ पैकी १९ ठिकाणी भाजप पुढे

सातारा रा कॉ,सिंधुदुर्गात राणे, नांदेड मध्ये चव्हाण . नगर मध्ये विखे पाटील

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 11:47 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंत मुंबईतील १४२ पैकी शिवसेना ७२ , भाजप ४०, काँग्रेस १४, मनसे ७, राष्ट्रवादी ५ आणि इतर ४
ठाण्यात ३६ पैकी शिवसेना १५, भाजप ८, राष्ट्रवादी ५
नाशिकमध्ये ३१ पैकी भाजप १८
नागपूरमध्ये २९ पैकी भाजप २० आणि काँग्रेस ९
पुण्यात ७१ पैकी भाजप ३८ आणि राष्ट्रवादी १५

मुंबईत शिवसेना स्वबळावर विजय मिळवायच्या मार्गावर आहे.

प्रसाद_१९८२'s picture

23 Feb 2017 - 11:55 am | प्रसाद_१९८२

मुंबई महानगर पालिकेत, बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता असते?

अनन्त अवधुत's picture

23 Feb 2017 - 12:21 pm | अनन्त अवधुत

एबीपी माझा वर एकूण जागा २२७ दाखवल्या आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 12:02 pm | वरुण मोहिते

नाशिक मध्ये मनसेची पिछाडी आश्चर्य कारक आहे . बहुधा माणसे चे बहुतेक नगरसेवक भाजपात गेल्याचा भाजप ला फायदा मिळाला असावा का ?

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 12:11 pm | गॅरी ट्रुमन

मुंबईत या क्षणी शिवसेनेला ८१ तर मनसेला १० जागांवर आघाडी आहे. काही जागांवर शिवसेना-मनसेमध्ये मतविभागणी झाल्यामुळे पिछाडी आली असेल ही शक्यता आहेच. मनसेला बरोबर घेतले असते तर कदाचित शिवसेनेने यापेक्षा अधिक नेत्रदीपक विजय मिळवला असता.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 12:34 pm | वरुण मोहिते

कारण प्रभाग छोटे असतात काही जागा लोक उमेदवार पाहून ठरवतात , आता मनसेला जागा सोडल्या असत्या आणि त्याच जागा निवडून आल्या असत्या मनसेच्या असं सांगता यात नाही . निश्चित आकडेवारी आली कि समजेल मतविभागणी कुठे झालीये .

प्रसन्न३००१'s picture

23 Feb 2017 - 12:20 pm | प्रसन्न३००१

नाशिक - माजी महापौर यतीन वाघ यांना पराभवाचा धक्का

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 12:23 pm | गॅरी ट्रुमन

ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर येथील निकाल अडकले आहेत गेल्या काही वेळापासून. समजत नाही काय चालू आहे ते.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Feb 2017 - 12:59 pm | llपुण्याचे पेशवेll

गम्मत केली. बर्‍याच प्रभागांची मोजणी १:३० ला चालू होणार असे सांगितले आहे.

मनिमौ's picture

23 Feb 2017 - 12:46 pm | मनिमौ

अत्यंत समाधानकारक निकाल येत आहेत. जवळपास 35 वर्षांनंतर सत्ता स्पष्ट पणे भाजप कडे जातेय. MIM ने 5 जागांवर विजय मिळवून चंचुप्रवेश केलाय. सुशीलकुमार शिंदे यांचा करिश्मा ओसरत आहे.
भाजप 22

सेना 19
राकाँ 00
काँग्रेस 05
MIM 5

अभ्या..'s picture

23 Feb 2017 - 1:11 pm | अभ्या..

येस्स्स्स.

प्रचंड आनंद झालाय. भाजपाच्या जवळपासच सेनेलाही जागा देऊन युतीची अपरिहार्यता दोन्ही पक्षांना लोकांनी जाणवून दिलीय.
जास्त आनंद सुकुची एकाधिकारशाही अन सोलापूरकरांना गृहीत धरण्याची पध्दत संपल्याचा आहे.
.
सर्वाधिक आनंद मी अ‍ॅड आणि कॅम्पेनिंग डिझाईन केलेल्या पॅनेलला कम्प्लीट विजय मिळाल्याचा आहे. टोट्टल सगळे आले.
.
अजून एक चिल्लर आनंद आहे. सेनेच्या पराभवासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांचे थोबाड फुटल्याचा. बेटर लक नेक्श्ट टैम. ;)

तुषार काळभोर's picture

23 Feb 2017 - 1:02 pm | तुषार काळभोर

कॉन्ग्रेस व राष्ट्रवादी कॉन्ग्रेस शहरी भागातून हळू हळू हद्दपार होतेय काय असा सूर हापिसकर्‍यांच्या बोलण्यात आहे.

नाशिककर आहेत का कुणी? मनसेने प्रेजेन्टेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे खरोखर कामे केली होती का? असतील तर, मनसेचा दारूण पराभव दु:खद आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Feb 2017 - 1:10 pm | llपुण्याचे पेशवेll

राजवर लोकांनी जो विश्वास दाखवला होता त्यात तो खरेच खरा उतरला नाही. अगदी पुण्यात सुधा मनसेने काही प्रभाव पाडला नाही २८ नगर सेवक असून. मगच्या वेळेला उत्साहाने मनसे ला मत दिले होते. पण नाणे खोटेच निघाले. आमच्या प्रभागात नगरसेवक मनसेचा पण कामे शेजारच्या वोर्डातला शिवसेनेचा नगरसेवक करायचा.

प्रसन्न३००१'s picture

23 Feb 2017 - 1:06 pm | प्रसन्न३००१

दादर मधून माजी महापौर विशाखा राऊत विजयी

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Feb 2017 - 1:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

शिवसेनेचा बालेकिल्ला मुलुंडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! ६ पैकी ६ जागा भाजपला - नील सोमय्यासह!

आणि इस्ट ला २ पैकी सेने नंतर १ मनसे कडे .ह्या वेळी ईस्ट मध्ये मुलुंड मध्ये भाजप अली याच आश्चर्य आहे पण एक नगरसेवक जे १५ वर्ष सेनेचे होते ते भाजप कडे गेले त्यामुळे फायदा झाला . बाकी मुलुंड मध्ये सर्वपक्षीय समभाव आहे .तरी मुलुंड पूर्वेकडील जागा जाणे धक्कादायक आहे . त्याची कारणं वेगळी आहेत .

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 1:43 pm | गॅरी ट्रुमन

आताचे आकडे:

1

2

3

4

प्रसाद_१९८२'s picture

23 Feb 2017 - 1:54 pm | प्रसाद_१९८२

आता मुंबईत भाजपा - ७३ व शिवसेना - ९२ असे आकडे दाखवत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 1:55 pm | गॅरी ट्रुमन

मुंबईत मतमोजणी सुरू होऊन आता जवळपास ६ तास पूर्ण होत आले तरी २२७ पैकी २०० जागांवरीलच कल उपलब्ध आहेत. उरलेले कल यायला इतका वेळ का लागत आहे हे समजत नाही.

मुंबईत शिवसेनेला मात द्यायला भाजपला अपयश आले आहे. गेल्या अनेक मनपा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने जास्त जागा मिळवल्या आहेत. ठाण्याचा गडही शिवसेनेने राखला आहे.

इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विदर्भात तीनही मनपा भाजप जिंकत आहे. नागपूरमध्ये तर स्वीपच आहे. अमरावतीमध्येही अर्ध्यापेक्षा जास्त आणि अकोल्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजपची आघाडी आहे. पिंपवडमध्ये पहिल्या क्रमांकासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस आहे. नाशिकमध्ये भाजपने अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त जागांवर भाजप पुढे आहे. तर पुण्यात आणि उल्हासनगरमध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजप पुढे आहे. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गजाचा गड ढासळताना दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीने पिंपवडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भाजपने मुंबईत मागच्यावेळेपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या असल्या तरी विजय मात्र मिळू शकलेला नाही.

विधानसभा आणि आताच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एक गोष्ट नक्कीच जाणवते. युती तुटणे हे विशेषतः शिवसेनेला थोडे अधिक प्रगल्भतेने घेता आले असते. ठिक आहे युती होत नाही ना, आम्ही स्वतंत्र लढतो. ज्याला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री (किंवा महापौर) असे म्हणत एकमेकांवर टिका करण्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढविला असता तर आताची कटूता आली नसती. काचेला तडा गेला आहे आता परत तो सांधला जाणे फारच कठिण.

प्रसाद_१९८२'s picture

23 Feb 2017 - 4:02 pm | प्रसाद_१९८२

'स्वबळावर सत्ता स्थापन करु' अश्या बाता मारणार्‍या किंव्हा दैनिक सामना मधून 'जिंकणार तर आम्हीच!' असे बिनबुडाचे लेख लिहिणार्‍या उद्वव ठाकरेंना साधी तिहेरी संख्या देखिल गाठता आली नाही शिवाय शिवसेनेला मिळालेल्या जागा (८८) आणि भाजपा ला मिळालेल्या जागा (८०) या दोन्ही मध्ये फार काही फरक नाही, तेंव्हा शिवसेनेने युती तोडून स्वतंत्र लढण्याचा घेतलेला त्यांचा निर्णय भाजपाच्या अगदिच पथ्यावर पडला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला स्वत:ची निदान लायकी तरी कळली. आता कुणाचा तरी पाठींबा घेतल्याशिवाय शिवसेनेला मुंमपा सत्ता स्थापन करताच येणार नाही, फक्त पुन्हा युती करायच्या निर्णयासाठी भाजपाने सेने समोर हात पूढे करु नये म्हणजे झाले.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 5:01 pm | गॅरी ट्रुमन

आता तर ८४ आणि ८१ इतकाच फरक राहिला आहे. भाजपला ६० पेक्षा कमी जागा द्यायला निघाले होते हे. इतकी वर्षे युती असताना नेमका हाच प्रकार शिवसेनेने केलेला होता.

अन्य एका चर्चेत म्हटल्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकसंग्रह जास्त उपयोगी पडतो आणि या दोन गोष्टींमध्ये शिवसेना इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पुढे आहे हे मुंबईतील कोणीही सांगू शकेल. शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनणार हे अपेक्षितच होते. पण फरक इतका कमी असेल असे वाटले नव्हते. वरच पोस्ट केलेल्या चित्रांमध्ये दोन पक्षांमधला फरक ३० पेक्षा जास्त होता. आणि शेवटी तो फरक ३ वर आला. शिवसेना पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे उधोजीराव डरकाळ्या फोडतीलच पण शिवसेनेची भाजपने पुरतीच दमछाक केली हे नक्कीच.

तसेच इतर शहरांमधूनही भाजपची कामगिरी नक्कीच चांगली आहे. एकूणच भाजपसाठी हे निकाल नक्कीच उत्साहवर्धक आहेत.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 5:23 pm | वरुण मोहिते

भाजप जश्या जागा मित्रपक्षांना देते तसेच आहे . सदाभाऊ खोतांचा मुलगा हरला . रिपब्लिकन कोण नाही, शेट्टी सोडून गेले . त्यामुळे भाजप सोबत अशीच वागणूक हवी. बाकी इतर शहरात अर्धे तर बाकीच्या पक्षातून आणि बाकी यश केंद्रात आणि राज्यात सत्तेत म्हणून त्यात नवीन काय . त्यात प्रचंड फायदा म्हणजे प्रस्थापित विरोधी राजकारण लाट .काँग्रेस ची मत मिळाली मुंबईत कित्येक ठिकाणी . बाकी २०-३० वर्ष सत्तेत असलं कि जागांचा कमी अधिक फरक पडतोच . पण भाजप च्या बाता ऐकून आज १ जागा जरी कमी मिळाली असती भाजप ला तरी मी आनंद साजरा करणार होतो . वाईन प्यावी म्हणतो:))

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2017 - 3:34 pm | llपुण्याचे पेशवेll

मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसेनेचा बालेकील्ला असलेल्या कोथरुड गावठाणात गेली २५ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या व चांगल्या कामांमुळे लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या शशिकांत सुतार यांच्या पुत्राची (पृथ्वीराज उर्फ दादा) भाजपच्या नवख्या उमेदवाराने पुरती दम्छाक केली. अ‍ॅड मिहीर (मनोज) प्रभुदेसाई हा राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला संघाचा कोथरुड भागातला स्वयंसेवक सुतांरांविरुद्ध उभा राहीला. सुतारांना ८००० मताधिक्य अपेक्शित होते तिथे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मनोज मागे पडलेला असूनही फरक काही केल्या २-३०० मतांपेक्षा वाढेना. दादा टेन्शन मधे आले पण अखेर ६०० मतांनी निवडून आले. त्या प्रभागात उर्वरीत सर्व जागा भाजपला मिळाल्या. सेनेचे खंदे कार्यकर्ते असलेले नवनाथ जाधव यांच्या सौ सेनेने तिकीट कापल्याने उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपकडे आल्या आणि तिकीट मिळाले. केवळ आणि केवळ भाजपची हवा असल्याने सेनेचा म्हणून परिचित असला तरीही आपलाच आहे म्हणून नवनाथच्या सौं ना लोकांनी मत दिले

संदीप डांगे's picture

23 Feb 2017 - 4:12 pm | संदीप डांगे

इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

ट्रुमन साहेब, मी मिपावरच एका चर्चेत म्हटले होते की अनेक पक्षांमधले अनेक लोक सध्या भाजपमध्ये जात आहेत. निवडून आल्यावर मात्र भाजपची टक्केवारी कशी वाढली ह्यावर भाजप-समर्थकांचा सगळा जोर असेल.. आपले वरिल वाक्य माझ्या म्हणण्याला दुजोराच देत आहे.

सद्यस्थितीत कोणता पक्ष निवडून आला हे तांत्रिकदॄष्ट्या बघितले तर ओके .. पण पक्षांची लेबलं लावलेली माणसं बघून निष्कर्ष काढणे महत्त्वाचे. जे कोणी भाजप्च्या बॅनर खाली जिंकले त्याम्ची पूर्वजन्माची कुंडली काढणे आवश्यक आहे..

चिनार's picture

23 Feb 2017 - 5:22 pm | चिनार

संदीप भाऊ...
राजकारणाविषयी तुमच्या आणि ट्रुमन साहेबांइतका माझा अभ्यास नाही. पण "मासे गळाला लावणे" हा राजकारणाचाच एक भाग नाहीये का? भाजप ने साठ-सत्तर टक्के उमेदवार बाहेरून आयात केले असतील असं समजू पण त्यांचा ओरिजिनल पक्ष त्यांना थांबवू शकला नाही हे अपयश कोणाचे? उदाहरणार्थ :- नाशिकात माणसे ने उत्तम काम केले असं सगळे म्हणतात. मग राज ठाकरे आपल्या लोकांना सोबत घेऊन का राहू शकले नाही ? त्याचा फायदा जर भाजप ने घेतला तर राजकीय आणि संवैधानिक दृष्ट्या त्यात गैर काय ? भाजपचा हा विजय राजकीय पातळीवर आहे असे जेंव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्यात राजकारण हा भाग येतोच. राजकारणात कोणी कोणाचे नाही (जनतेचे तर मुळीच नाही !) हे वाक्य निरंतन सत्य आहे.
आता भाजप/काँग्रेस/शिवसेना/राष्ट्रवादी आणि इतर सगळेच, ह्यांच्या नीतिमूल्यांवर चर्चा होऊ शकते. पण आजचा विजय हा भाजपच्या राजकारणाचा आणि त्यातील डावपेचांचा आहे हे तर मान्य करावेच लागेल.

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2017 - 5:40 pm | अप्पा जोगळेकर

डांगे साहेब, भाजपच्या धोरणांना विरोध समजू शकतो.
भाजप जिंकले हे दिलदार पणे मान्य करायलापेवढी अडचण का होते.

संदीप डांगे's picture

23 Feb 2017 - 6:02 pm | संदीप डांगे

चिनार, आप्पा, तुमच्या दोघांच्याही प्रतिसादाला थोड्या वेळाने उत्तर देतो... माझ्याकडे आत्ता पूर्ण आकडेवारी आणि नावे आलेली नाहीत.

तूर्तास, जर उद्या सगळे काँग्रेसी अगदी सोन्या-राहूल-सकट भाजपात दाखल झाले आणि शहा-मोदी जोडीला हाकलून (जसे आडवाणी-जोशींना हाकलले) स्वतःचे बस्तान बसवले (अर्थातच कायदेशीर, घटनात्मक राजकारणाचा वापर करुन) तर तेव्हा आपले विचार याबद्दल काय असतील?

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2017 - 6:19 pm | अप्पा जोगळेकर

जर तरचे माहीत नाही. तूर्तास फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले हे मान्य नसेल तर काय बोलायचे.
नावडतीचे मीठ सुद्धा अळणीच असते ना.

संदीप डांगे's picture

23 Feb 2017 - 6:28 pm | संदीप डांगे

जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला ब्रॉड व्ह्यू मध्ये उदाहरण दिले... नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो.

लेबल बदलून फसवले तरी कोणाला आनंद मिळत असेल तर असो बापडा...
कोणाला कशात आनंद मिळेल आपण कोण ठरवणार...

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 11:09 am | अप्पा जोगळेकर

नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो.
नावे देऊन काय होणार ? या निवडणुकीचे पडसाद मायक्रो लेव्हल ला उमटणार नव्हतेच. कोण नगरसेवक निवडून आला हे तितके महत्वाचे नाही. सगळ्याच पक्षांचे नगरसेवक गणंगच आहेत.
या निवडणुकीचे पडसादच अधिक महत्वाचे आहेत.
काहीसे 'वॉर इज लॉस्ट ऑर वन बाय जनरल्स नॉत बाय सोल्जर्स' तसे.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 8:47 pm | गॅरी ट्रुमन

हो बरोबर आहे. भाजपने इतर अनेक पक्षातले लोक घेतले आहेत. नुसते इतर पक्षांमधले लोक घरी घेतले यापेक्षा अनेक अट्टल गुंडांना पक्षात घेतले आहे हे नक्कीच समर्थनीय नाही. नुसते इतर पक्षांमधल्यांना घेणे चूक नाही (जसे आसाममध्ये सरबानंद सोनोवाल या चांगल्या माणसाला आसाम गण परिषदेतून भाजपमध्ये घेतले) पण गुंडांना घेणे नक्कीच समर्थनीय नाही.

काही प्रमाणावर लोकांनी भाजप या पक्षाच्या नावावर या लोकांचा पुर्वेतिहास लक्षात न घेता मते दिलेली दिसत आहेत. हा खेळ फार काळ चालणार नाही. जर भाजपने असेच उद्योग चालू ठेवले आणि लोकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा दिला तर भविष्यात कधीनाकधी या प्रकाराची फळे भोगावी लागतीलच.

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 10:22 am | अनुप ढेरे

आसामध्येच हिमंत बिस्व सर्मा या उत्तम प्रतिमेच्या काँग्रेसच्या नेत्याला आयात केलं गेल्यावर्षी. राहुल गांधींच्या लहरी कारभाराला कंटाळून आलो भाजपात असं स्पष्ट म्हणालेले ते.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 4:22 pm | वरुण मोहिते

सेनेला संपवून टाकू हि भाषा करून आज भाजप हरली.कितीही आकडेवारी कोणी सांगितली तरी भाजप हरली. ज्यासाठी काम सोडून मुख्यमंत्र्यांनी केला अट्टाहास ती भाजप हरली . मोदींना आणा तरी आम्ही जिंकू हे बोलणारी शिवसेना जिंकली .वास्तविक आपण मिसळपाव वरती उत्कुष्ट प्रतिसादांना मुकलो आहेत. जर भाजप जिंकली असती तर ते प्रतिसाद वाचायला मिळाले असते . पण असो बाकी जो सत्तेत त्याच्या जागा जास्त हा नियम आहेच महाराष्ट्रात . टाइम टाइम कि बाते है .१९५२ पासून सुरुवात झालेल्या पक्षाने आजपर्यंत कुठलीही सत्ता सलग चालवली नाही यातच सर्व काही आले .बाकी जिंकत तर काँग्रेस पण आलीये आणि महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी पण .सेना संपणार हि इच्छा असणाऱ्यांना शुभेच्छा .
जात जाता -२०-३० वर्ष सत्ता सर्वपक्षीय विरोधक असताना राखणे आणि एकदाच लाट आली ५ वर्ष म्हणून जागा वाढणे यात फरक आहे बरं का ..

भाजप ३५ वरुन ८१ वर गेले.
आणि सेना ७५ वरुन ८४ वर.
म्हणजे युती करावीच लागणार ना भाजप शी.
आता काय करायचे बुवा ?
पंकजाताई, खडसे, विनोद तावडे आणि दस्तुरखुद्द उधोजी राजे सगळ्यांचे दात घशात गेले.

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2017 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर

जर मुंबईत सत्ता नसेल तर उधोजी राजे पण वांद्रे लोकलला दिसतील सकाळी बॅग अडकवून बहुधा.

ते थोडी मोदी आहेत घेतली झोळी चाललो मी , मी तर फकीर आहे असे बोलायला .

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2017 - 6:17 pm | अप्पा जोगळेकर

हो . मोदींकडे खंडनीचे पैसे नाहीत हे बाकी खरच आहे.

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 6:21 pm | वरुण मोहिते

भावासारखे गौतम आणि मुकेश असताना कशाला लागतील अतिरिक्त पैसे

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2017 - 3:38 pm | llपुण्याचे पेशवेll

आणि भरलेली तळघरेही नाहीत. :)
बाकी नोटबंदीविरुध्द उडवलेली राळ उपयोगी पडली नाही म्हणायची सेनेच्या.

७२/९४ अश्या फरकाने दोन तास राहिल्यावर ८१/८४ असा कमी फरक राहिला आहे. त्यामुळे मोठा भाऊ असलेला शिवसेना आता जुळा भाऊ झाला आहे! :))

निष्पक्ष सदस्य's picture

23 Feb 2017 - 4:46 pm | निष्पक्ष सदस्य

ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २ दातांनी पुढे ....

सुखीमाणूस's picture

23 Feb 2017 - 6:19 pm | सुखीमाणूस

मस्त

सुमीत भातखंडे's picture

23 Feb 2017 - 4:48 pm | सुमीत भातखंडे

ही सध्याची टॅली आहे मुंबईत.

निष्पक्ष सदस्य's picture

23 Feb 2017 - 4:48 pm | निष्पक्ष सदस्य

ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २ दातांनी पुढे ....

amit_m's picture

23 Feb 2017 - 5:22 pm | amit_m

भाजप आल्यामुळे..काही लोकांना प्रचंड पोटदुखी चालू झालीये.
असो!!

निष्पक्ष सदस्य's picture

23 Feb 2017 - 5:23 pm | निष्पक्ष सदस्य
प्रसाद_१९८२'s picture

23 Feb 2017 - 6:06 pm | प्रसाद_१९८२

आता चार अपक्षांनी भाजपाला पाठींबा दिलाय, असे शेलार पत्रकार परिषदेत सांगत आहेत. म्हणजे भाजपाचे ८१ व चार अपक्ष मिळून भाजपा मुंबईत सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आता मनसे बरोबर आल्यास भाजपा मुंबई महानगर पालिकेत सत्तेवर येऊ शकते कारण या आधीच कॉंग्रेज , राष्ट्रवादी कॉंग्रेज , सपा, व एम आय एम यांनी तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बहुमताचा आकडा आता ९० वर आला आहे.

प्रचंड घमेंडीत उदोजी ठाकरेंनी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'युती'ची ऑफर नाकारुन स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला हे आता सिद्ध झाले.

अर्धवटराव's picture

23 Feb 2017 - 7:18 pm | अर्धवटराव

एक शैली/इमेज म्हणुन रोकठोकपणा ठीक आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांनी सेना व्यवस्थीत सांभाळली हे हे खरे. पण सेना आपल्या कोषात इतकी का गुरफटली आहे कळत नाहि. इतर पक्षांचे, विशेषतः भाजपाचे दिग्गज बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायचे तेंव्हा त्यांनी आपल्यापुढेही मान तुकवावी हा अट्टहास का बरं. किंबहुना उधोजींनीच इतरांचे जेष्ठत्व मान्य केले असते तर राज्यात सेनेची बीग ब्रदर पोझीशन अबाधीत राहिली असती. पक्षहितापेक्षा स्वप्रतीमेला प्राधान्य दिलं कि तोटा होतोच. स्वतः उधोजी कमी म्हणुन कि काय, ते संजय राऊत वगैरे महाभाग आणखी घोळ घालतात. एव्हान स्वतःच्या सो कॉल्ड आंदोलन छबीतुन बाहेर पडुन एक पक्ष म्हणुन पोक्तपणा अंगी बाणायला हव होता सेनेच्या. तसंही आंदोलकाची इमेज सांभाळणं कठीण आहे. आंदोलनाचे ज्वलंत मुद्दे बदलत असतात. सेना तर आपल्याच सुखात मग्न आहे.

असं म्हणतात कि हि भाजप-सेनेची डमी फाईट होती. काँग्रेस-रा.काँ. ला संधीच मिळु नये म्हणुन भाजप-सेनेनी आपल्यातच संपूर्ण राजकीय अवकाष वाटुन घेतलं. पण तसं असेल तर सेना एक-एक करुन परतीचे दोर कापत चालली आहे. भरती-ओहोटीच्या खेळात असलं काहि महागात पडु शकतं.

तिमा's picture

23 Feb 2017 - 7:26 pm | तिमा

लेटेस्ट स्कोअर ८४:८२.
आता परत युती कराल तर याद राखा.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 8:29 pm | गॅरी ट्रुमन

महापालिका निवडणुकांचे निकाल---

r

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 8:38 pm | गॅरी ट्रुमन

एकूणच शिवसेनेच्या समर्थकांची गंमत वाटत आहे. सुरवातीला म्हणायचे की मुंबई-पुण्यातील आयाम वापरून 'मोदीभक्त' शिवसेनेची नक्की ताकद किती हे अंडरएस्टिमेट करत आहेत. वर दिलेल्या तक्त्यातून कळतच आहे की शिवसेनेला निर्भेळ यश केवळ ठाण्यात मिळाले आहे. तर मुंबईत शिवसेनेला भाजपपेक्षा केवळ २ जागा जास्त आहेत. पण इतर सगळ्या शहरांमध्ये मात्र शिवसेनेला भाजपपेक्षा कितीतरी जागा कमी आहेत.म्हणजे महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई-पुणे नाही हे म्हणणारे शिवसेना समर्थक आता मुंबईतल्याच (पुण्यातल्याही नाही) मिळालेल्या केवळ दोन जागा जास्त या आधारावर मोठे सेलिब्रेशन करत आहेत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Feb 2017 - 9:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

मिळालेल्या केवळ दोन जागा जास्त या आधारावर मोठे सेलिब्रेशन करत आहेत.

भाजपला बाहेर ठेवून सत्ता स्थापण्यात शिवसेना यशस्वी झाली तर कदाचित सेलिब्रेशन जास्त मोठे होईल असे दिसते.

बाकी शिवसेना भाजपमधील वादाची ठिणगी हि फक्त मुंबईकारातच होती हे उघड आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2017 - 8:48 pm | श्रीगुरुजी

सकाळी लवकर घरातून बाहेर पडून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना बघण्यासाठी गहुंजेला गेलो होतो. दिवसभर सामना बघून ६ नंतर घरी परत आलो. त्यामुळे इथे लिहायला वेळ झाला नाही.

(१) सर्वप्रथम मी या धाग्यात माझे जे अंदाज दिले होते त्याबद्दल लिहितो.

१) मुंबई: भाजप ८०-९०, शिवसेना ४०-५०, काँग्रेस ५०-६०

भाजप ८२, शिवसेना ८४ व काँग्रेस ३१ अशी स्थिती आहे. भाजपबाबतीत जागांचा अंदाज अचूक ठरला. शिवसेना व काँग्रेसच्या बाबतीत अंदाज पूर्ण चुकला. काँगेसची कामगिरी अपेक्षेच्या तुलनेत फारच खालावली. गुरूदास कामत व संजय निरूपम यांच्यातील प्रखर मतभेदांचा जोरदार फटका काँगेसला बसला.

२) ठाणे: मला ठाण्यातील फारशी माहिती नाही. परंतु इथे राष्ट्रवादीसुद्धा प्रबळ आहे. माझ्या मते ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. भाजप व सेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणे अवघड आहे.

ठाण्यात शिवसेनेने ५०% जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. राष्ट्रवादी खूप खाली दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर भाजप त्याहून खाली तिसर्‍या क्रमांकावर आहे.

ठाणे महापालिका बाबतीत माझे सर्व अंदाज पूर्ण चुकले.

३) पुणे: भाजप ६०-७० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल.

अपेक्षेपेक्षा खूपच जास्त जागा मिळवून भाजप प्रथम क्रमांकावर आला. त्याखालोखाल राष्ट्रवादी व नंतर काँग्रेस आहे. सर्व अंदाज बरोबर आले.

४) नाशिकः भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना द्वितीय क्रमांकावर असेल.

जाहीर झालेल्या ११४ जागांपैकी भाजपने ५९ म्हणजे निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना ३४ जागा मिळवून दुसर्‍या क्रमांकावर आहे. नाशिक संदर्भात अंदाज पूर्ण बरोबर आले.

५) पिंपरी-चिंचवडः राष्ट्रवादी काँगेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल.

पिंचिमध्ये राकाँची पाळेमुळे घट्ट गेली होती. परंतु भाजपने जवळपास निम्म्या जागा जिंकून राष्ट्रवादीला दुसर्‍या क्रमांकावर ढकलले आहे. माझा अंदाज पूर्ण चुकला.

६) नागपूरः भाजपला बहुमत मिळेल.

अंदाज पूर्ण बरोबर आला. भाजपला घवघवीत बहुमत मिळाले आहे.

७) अकोला: बहुजन महासंघ, काँग्रेस व भाजप या तीन पक्षात जोरदार चुरस असेल.

अंदाज चुकला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेस व प्रकाश आंबेडकरांचा बहुजन महासंघ भाजपच्या जवळपास सुद्धा आले नाहीत.

८) अमरावती: अमरावतीबद्दल फारशी माहिती नाही.

इथेही भाजपचा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला.

९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल.

ज्याप्रमाणे नांदेडमध्ये अशोक चव्हाण, बारामतीत पवार त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे प्रभुत्व होते. जरी शिंदे लोकसभेला हरले तरी शहरात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. काँग्रेसचा प्रभाव अजून सोलापूरमध्ये टिकून आहे या समजूतीत मी होतो. परंतु या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या भाजपने जवळपास बहुमत मिळवून काँग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर ढकलले. इथेही माझा अंदाज चुकला.

१०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल.

अंदाज पूर्ण चुकला. भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर आली.

(२) मुंबईत भाजप ८४ व भाजप ८२ अशी अत्यंत चुरशीची लढत झाली. स्वतंत्र लढणे हे दोघांनाही फायदेशीर ठरले. शिवसेना ७५ वरून ८४ वर आणि भाजप ३२ वरून ८२ वर पोहोचला. भाजपला एका अपक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. महापौरपदासाठी ११४ जागा हव्या आहेत. शिवसेनेला ३० तर भाजपला ३१ जागा कमी पडत आहेत. काँग्रेसला नेमक्या ३१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौर कोणाचा होणार हे काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून राहील. भाजप किंवा शिवसेना या दोघांनाही पाठिंबा देणे काँग्रेसला महागात जाईल कारण उ. प्र. ची निवडणुक अजून संपलेली नाही. त्यामुळे काँग्रेस एकतर तटस्थ राहील किंवा स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा करेल. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी (९), मनसे (७) व इतर (१४) यांची भूमिका निर्णायक ठरेल.

वाहत्या वार्‍याचा अंदाज घेऊन मनसेचे नगरसेवक स्वतःहून भाजपच्या गोटात जातील असे मला वाटते. राष्ट्रवादीचे नगरसेवक काय करतील ते सांगता येणार नाही. इतरांपैकी जास्तीत जास्त नगरसेवकांना भाजप गळाला लावण्याचा प्रयत्न करेल.

भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्याने शिवसेनेला अस्मान ठेंगणे झाले आहे. सुरवातीला शिवसेना ९३ व भाजप फक्त ५२ जागांवर पुढे असताना संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने असभ्य प्रतिक्रिया देताना "आम्ही भाजप या शाहिस्तेखानाची बोटे कापली" असे तारे तोडले होते. त्यानंतर काही वेळातच चित्र पालटायले लागले व शेवटी दोघांमध्ये फक्त २ जागांचा फरक आहे. अर्थात यामुळे आपण प्रचंड बहुमताने विजय मिळविला या भ्रमात शिवसेना आहे. परंतु इतर ८ महापालिकात मिळालेल्या यशाने भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असून ते मुंबईचे महापौरपद मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित. आपण स्वबळावर बहुमत मिळविणार, मतदानानंतर आपण केलेल्या खाजगी एक्झिट पोलनुसार आपल्याला ११० जागा मिळणार, मुंबईत फक्त आमचाच आवाज चालणार, मुंबई फक्त शिवसेनेची नाही कोणाच्या बापाची इ. वल्गना करणार्‍या शिवसेनेला फक्त ८४ जागा मिळाल्या असून भाजप फक्त २ जागांनी मागे आहे व महापौरपद मिळेल याची अजिबात खात्री नाही.

(३) १० पैकी तब्बल ८ महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती या चार महापालिकात तर भाजपला स्पष्ट बहुमत आहे. २०१२ मध्ये भाजप फक्त नागपूरमध्ये सत्तेवर होता. आता अजून ७ महापालिका ताब्यात येत आहेत व मुंबईत जवळजवळ समसमान परिस्थिती आहे.

(४) ठाण्यात मात्र शिवसेनेने निर्विवाद यश मिळविले. इथे भाजप तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला.

१९८० च्या दशकात भाजपबरोबर युती करण्यापूर्वी शिवसेना ठाणे व मुंबई या दोन शहरांपुरताच मर्यादित असलेला पक्ष होता. त्या काळात भाजपचे अस्तित्व फारसे नसले तरी कोकण, पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ अशा महाराष्ट्राच्या अनेक भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून येत असत. १९८० मध्ये भाजपचे १२ व १९८५ मध्ये भाजपचे १६ आमदार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आले होते. शिवसेनेला १९६६ ते १९८० या चार विधानसभा निवडणुकीत भोपळा मिळाला होता, तर १९८५ मध्ये त्यांचा एकच आमदार मुंबईतून निवडून आला होता.

दोघांची युती झाल्यावर मुंबई-ठाण्याच्या बाहेर प्रथमच शिवसेनेची ओळख महाराष्ट्राला झाली त्यामागचे मुख्य कारण होते भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी. परंतु आपणच भाजपपेक्षा सामर्थ्यवान आहोत असा शिवसेनेचा सुरवातीला दावा होता व नंतर आपण खरोखरच भाजपपेक्षा दादा आहोत अशी शिवसेनेची मनोमन (गैर)समजूत झाली. त्यातूनच त्यांचा उर्मटपणा, माज व अहंकार वाढत गेला. शेवटी २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा स्वबळावर जिंकून कोण दादा होता व आहे हे भाजपने दाखवून दिले. या निवडणुकीतही १० पैकी ८ महापालिकात घवघवीत यश मिळवून व मुंबईत जवळपास शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवून भाजपचे आपला जनाधार अजून वाढविला आहे, तर शिवसेनेचा महाराष्ट्रातून संकोच होणे सुरू असून शिवसेना पुन्हा एकदा १९७०, १९८० च्या दशकाप्रमाणे फक्त मुंबई-ठाणे या दोन शहरांपुरताच मर्यादित असलेला पक्ष या दिशेने घोडदौड सुरू आहे.

(५) आधी भाकित केल्याप्रमाणे मनसे हा पक्ष म्हणून संपला आहे हे पुन्हा एकदा या निवडणुकीने सिद्ध केले. २०१४ मध्ये विधानसभेत केवळ १ आमदार, नुकत्याच संपलेल्या नगरपरीषदांच्या निवडणुकीत ४७०० जागांपैकी जेमतेम ४० जागा आणि आता महापालिकेत सर्व १० महापालिका मिळून जेमतेम ३०-३५ जागा हेच दर्शवितात की मनसेचे अस्तित्व आता नगण्य आहे. अशा परिस्थितीत आता मनसेचे उरलेसुरले कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी लवकरच मनसेला रामराम ठोकून दुसर्‍या पक्षाकडे जातील. काही जण आपल्या मूळ शिवसेनेकडे परत जातील तर बहुसंख्य जण उगवत्या सूर्याला नमस्कार या न्यायाने भाजपकडे जातील. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी राजीनामा दिल्याची बातमी मागील आठवड्यात एका वाहिनीने दिली होती. परंतु नंतर त्यावर बातमी आली नाही. शक्यता ही आहे की ते मनसेचा राजीनामा देऊन कदाचित भाजपच्या तिकिटावर उभे राहून निवडून येतील.

आपले बुडते जहाज ओळखून राज ठाकरेंनी उधोजींना युतीसाठी चुचकारले होते. परंतु उधोजींनी एक अत्यंत दुर्मिळ असा विचारी निर्णय घेऊन मनसेची मदत नाकारली. समजा युती झाली असती तर सेनेला मनसेला ५० जागा द्याव्या लागल्या असत्या व त्यांची संख्या ८४ पेक्षा खूप खाली आली असती.

(६) नोटाबंदीचा जनतेला प्रचंड त्रास झाला असून जनता भाजपला निवडणुकी धडा शिकवेल. विशेषतः नोटाबंदीमुळे ग्रामीण भागाला सर्वाधिक त्रास झाला असून ग्रामीण जनता आपला संताप मतपेटीतून व्यक्त करेल असे राजकीय पंडीत वाहिन्यांवर सांगत होते. परंतु काल झालेल्या २५ जिल्हा परीषदांच्या निवडणुकी देखील किमान ९ जिल्हा परीषदांमध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. त्यापूर्वी नगरपरीषदांच्या निवणुकीत देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. लोकसभा, विधानसभा व महापालिकेत देखील भाजपच प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र भाजपच प्रथम क्रमांकावर आहे.

निव्वळ महाराष्ट्रातच नव्हे तर ओरिसातील पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने २०१२ मधील फक्त ३६ जागांच्या तुलनेत २०१७ मध्ये तब्बल ३०६ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळवून आपल्या जागांमध्ये ८५०% इतकी वाढ केली. चंदिगड व फरीदाबाद मधील महापालिका निवडणुकीत देखील भाजपने मोठे बहुमत मिळविले आहे. गुजरात व राजस्थान मध्ये देखील भाजपने मोठे यश मिळविले आहे. एकंदरीत नोटाबंदीचा अजिबात वाईट परीणाम झालेला दिसत नाही. उलट भाजपची २०१४ ची लाट अजूनही बरीचशी कायम आहे असेच चित्र आहे.

(७) मुंबईत ८४ जागा मिळविल्याने शिवसेना अत्यानंदाने फुरफुरत आहे. ८ महापालिका जिंकून ठाण्यात सपशेल पराभव व मुंबईत दुसरा क्रमांक मिळाल्याने 'गड आला पण सिंह गेला' अशी भाजपची परिस्थिती झाली आहे. शिवसेनेची स्थिती याच्या बरोबर उलट म्हणजे 'सिंह वाचला पण गड गेला' अशी आहे.

आपला पाठिंबा वाढला आहे या भ्रमात राहून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर आमदार फोडाफोडीच्या भानगडीत न पडता फडणविसांनी राजीनामा देऊन मे महिन्यात मध्यावधी निवडणुक घ्यावी. त्यावेळी भाजपला स्वबळावर मोठे बहुमत मिळेल अशी माझी खात्री आहे व शिवसेनेचा अडथळा कायमस्वरूपी दूर होईल.

(८) काँग्रेस व राष्ट्रवादी सध्या तरी शहरांतून जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. राष्ट्रवादीसुद्धा हळूहळू अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे. शेवटी महाराष्ट्रात भाजप व काँग्रेस ही द्विपक्षीय रचना अस्तित्वात येईल अशी चिन्हे आहेत. हे २०१९ पर्यंत होईल का २०२४ पर्यंत होईल याचे भाकीत करणे अवघड असले तरी हे होणार हे नक्की.

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 9:43 am | अनुप ढेरे

गुर्जी हे निकाल सगळ्यांना माहितियेत. तुमचे अंदाज देखील वाचता येतायत. उगाच, स्वतःच प्रश्नपत्रिका काढायची, स्वतःच उत्तरं द्यायची आणि स्वतःच पेपर तपासायचा हा असला प्रकार का करताय?

गुरूजींची उत्तरे चुकली असली तर तुम्हीही सुधारू शकता. त्यांनी प्रतिसाद देण्यावरच आक्षेप आहे का..?

९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल.

ज्याप्रमाणे नांदेडमध्ये अशोक चव्हाण, बारामतीत पवार त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे प्रभुत्व होते. जरी शिंदे लोकसभेला हरले तरी शहरात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. काँग्रेसचा प्रभाव अजून सोलापूरमध्ये टिकून आहे या समजूतीत मी होतो. परंतु या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या भाजपने जवळपास बहुमत मिळवून काँग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर ढकलले. इथेही माझा अंदाज चुकला.

अंदाज ही चुकला आणि निकालाची कळलेली माहीतीही चुकलीय.
भाजपा एक क्रमांकाला असली तरी सेना दोन नंबरला आहे.
भाजपा ४९ (२३ वाढल्या)
सेना २१ (१२ वाढल्या)
काँग्रेस १४ (२९ घटल्या)
एन्सीपी ४ (१२ घटल्या)
एमायएम ९ (९ वाढल्या)
.
मुंबईत पुन्हा युती झाली तर सोलापुरात युती होईल असे संकेत आहेत, बहुमताला बीजेपीला ३ जागा कमी आहेत.
.
झेडपीत
राष्ट्रवादी २३
भाजपा १४
काँग्रेस ७
सेना ५
आघाडी १२
अपक्ष ७

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 9:17 pm | गॅरी ट्रुमन

मागे कुठल्यातरी चर्चेत मी म्हटले होते की २०१९ मध्ये जर शिवसेना भाजपविरूध्द (पक्षी मोदींविरूध्द) लढणार असेल तर सगळे बुबुडाविपुमाधवि शिवसेना कशी धर्मनिरपेक्ष आहे वगैरे गोष्टी बोलायला लागतील आणि irony शंभर नव्हे तर हजार मरणे मरेल. त्यासाठी २०१९ पर्यंत वाट बघायची गरज लागली नाही. ते आताच सुरू झाले आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई इत्यादी मंडळींनी शिवसेना आणि उधोजीराव यांचे कौतुक आताच सुरू केले आहे.

a

(शेफाली वैद्य यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Feb 2017 - 9:37 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही म्हणता तसे होणारच आहे. पण कौतुक करणे आणि धर्मनिरपेक्ष म्हणणे यात फरक वाटतो. शिवसेनेला धर्मनिरपेक्ष प्रकारात टाकले तर त्यांची मते कमी होतील :):). आणि वरीलपैकी वागळे शिवसेनेकडे फार आधीच झुकलेले आहेत. शेखर गुप्ता म्हणतात ती फॅक्ट वाटते आहे आणि भाजपला २०१९ आधी यावर रणनीती तयार ठेवावी लागेल (किंवा मग असे म्हणता येईल की भाजपची यावरील रणनीती म्हणजे वेगळे लढणे आणि नंतर एकत्र येणे).

शब्दबम्बाळ's picture

24 Feb 2017 - 4:55 pm | शब्दबम्बाळ

लोकांनी फक्त भाजप चे कौतुक केले तरच ते आदरणीय/निष्पक्ष वगैरे असतात का?
शेखर गुप्ता यांचे विधान काय चुकीचे आहे?
उगीच कुठल्याही गोष्टीला एखाद्या चष्म्यातूनच बघायला लावतात हे लोक(शेफाली)...
भाजप आणि शिवसेना या दोघांनी जागांच्या बाबतीत प्रगतीच केली आहे. हे दोघे नंतर एकत्र पण येतील कदाचित.

पण काळजीची गोष्ट हि वाटते कि ताकदीचा विरोधी पक्ष नसणे! हे सगळे एकाधिकारशाही कडे झुकू नये म्हणजे मिळवली...
मनसेची मात्र पूर्ण वाताहत झालीये... काय झालं नक्की नाशिक मध्ये? कोणी सांगू शकेल का?

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 5:07 pm | संदीप डांगे

मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २५ भाजपात गेले.... उरले ते १५.... त्यात स्थानिक पातळीवर मोठे नेते मनापासून ठाकरेच्या सोबत नाहीत... नाशिकमध्ये काम झाले आहे तरी त्याचे श्रेय घेऊन मतदारांपर्यंत जाणे, हवा बनवणे, इत्यादी कार्यकर्ता, नेते पातळीवर अंतर्गत जी उलाढाल आवश्यक असते ती अगदी शून्य होती.... आमच्या प्रभागात तर मनसेचा कोण उभा होता तेही माहित नाही, खरेतर दोन्ही मनसेचे मागचे नगरसेवक भाजपात गेलेत ते दोन्ही निवडून आलेत भाजपच्या तिकिटावर...

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2017 - 8:24 pm | llपुण्याचे पेशवेll

नाशिकमधली कामे विशेषतः रस्ते, स्वच्छता ही कुंभमेळ्यामुळे राज्य सरकार कडून आलेल्या विषेश निधीतून झाली होती. गिरीश महाजनांसारखा पालकमंत्री सगळ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन होता. मग राज ठाकरे ने काय केले नुसते फोटो काढून पीपीटी?

रॉजरमूर's picture

25 Feb 2017 - 2:15 pm | रॉजरमूर

कुंभ मेळ्यात मिळालेल्या खैरातीवर नाशिक शहर चालते असा तुमचा समज आहे काय ?
नीट माहिती नसेल तर शब्दांचे बुडबुडे विनाकारण नका फोडू .........

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 2:33 pm | संदीप डांगे

=)) त्यांना भाजप जिंकल्याचा प्रचंड आनंद झालाय... तर्क आणि माहितीशी त्यांना काय करायचे आहे.. फोडू देत फटाके!!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Feb 2017 - 5:12 pm | llपुण्याचे पेशवेll

हो हो अगदी डांग्यांना सगळं माहीत आहे. म्हणूनच त्यांच्या 'काम केलेल्या' राज ठाकरेला लोकांनी बाहेरचा रस्ता दाखवला.
१. राज ठाकरे सत्तेत आल्यापासून एकही कंत्रात स्थानिक कंत्राटदाराला देऊन काम करून घेतले गेले नव्हते, सगळी कंत्राटे मुंबईतील कंत्राटदारांना दिली याचा राग खुद्द कार्यकर्त्यांनाच होता.
२. राज्य सरकारचा कुंभमेळा नियोजनात सक्रीय सहभाग होता. महापालिका प्रशासन राज्य सरकारला रिपोर्टींग असते नगरसेवकांना नाही. त्यामुळे जो काही विकासा आत्ता झाला आहे तो कुंभमेळा निधीतून झाला आहे (नाशिक त्या खैरातीवर चालते का? तर हो, कारण अशी खैरात दर १२ वर्षांनी येत असते) असे वरचे २ नाशिककर सोडून अनेक अन्य नाशिक करांचे मत असावे म्हणून राज ठाकरेंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बाकी, पडलो तरी नाक वर चालूद्या.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 5:35 pm | संदीप डांगे

१. विधान क्रमांक एकचा पुरावा आहे? का मन की बात?

२. कुंभमेळा नियोजन आणि नाशिक शहराचे डे_टू_डे विकास-संचलन दोन वेगळ्या गोष्टी आहेत... नाशिक म्हणजे कुंभमेळा एवढंच माहित असल्यावर काय बोलायचं.

कुंभमेळ्याच्या खैरातीवर नाशिक शहर चालते हे तुमचे दिव्यज्ञान बघून आमचे ड्वॉले पाणावलेत!

महापालिका प्रशासन राज्य सरकारला रिपोर्टींग असते नगरसेवकांना नाही.
>> हाच नियम मग मुंबईतल्या-पुण्यातल्या महापालिकांना लावता येईल, नैका?
गॅरी ट्रुमनसाहेब जे शिवसेनेच्या मुंबैतल्या विकासाबद्दल विचारत होते त्यांना हे उत्तर का नाही हो दिलंत तेव्हा..? कि निकाल यायची वाट बघत होते?

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Mar 2017 - 5:53 pm | llपुण्याचे पेशवेll

१. विधान क्रमांक एकचा पुरावा आहे? का मन की बात?
नाशिकमधे राहत असाल आणि मनसेचे कार्यकर्ते ओळखीचे असतील (आणि आता शिल्लक असतील) तर बोलून पहा त्यांच्याशी.

२. कुंभमेळा नियोजन आणि नाशिक शहराचे डे_टू_डे विकास-संचलन दोन वेगळ्या गोष्टी आहेत... नाशिक म्हणजे कुंभमेळा एवढंच माहित असल्यावर काय बोलायचं.

झालेले रस्ते हे डे टू डे संचालनातनं झालेले नाहीत हे नक्की सांगू शकणारे अनेक नाशिककर माहीत आहेत.
कुंभमेळ्याच्या खैरातीवर नाशिक शहर चालते हे तुमचे दिव्यज्ञान बघून आमचे ड्वॉले पाणावलेत!

बहुधा तुमचे डोळे पाणावलेल्या अवस्थेत फार राहत असावेत म्हणून स्पष्ट गोष्टी दिसत नाहीत.

गॅरी ट्रुमनसाहेब जे शिवसेनेच्या मुंबैतल्या विकासाबद्दल विचारत होते त्यांना हे उत्तर का नाही हो दिलंत तेव्हा..? कि निकाल यायची वाट बघत होते?
१. त्यांना ते माहीत आहे. २.खरे साहेबांनी तसे आधीच म्हटले आहे अन्य प्रतिसादात कि आयुक्त राज्य सरकार नियुक्त असल्याने सैंया कोतवाल तो कहेका डर अशा अर्थाचे काहीतरी लिहीले होते. ३. स्वतः ट्रुमन यांनी कोणीही आले तरी काही फरक पडणार नाही असे लिहीले होते.

आलेल्या निकालावरून असे वाटते, भारत हा एकमेव देश असेल जिथे निवडणुका अस्मितेवर लढवल्या जातात न की विकास कामावर.

थोडा फार विकास सगळेच करतात, किंवा आपोआप होतच असतो,
लोकांना आपल्या विचारांचा, जवळचा वाटेल असा नेताआवडतो.

आदूबाळ's picture

23 Feb 2017 - 10:03 pm | आदूबाळ

पुण्याचे प्रभागवार निकाल नेटवर कुठे मिळतील?

उद्याच्या ई-सकाळला सविस्तर येतील!
महापालिकेच्या पानावर आज रात्री येतील असे वाटते.

चौकटराजा's picture

23 Feb 2017 - 10:38 pm | चौकटराजा

उद्धव ठाकरे हे अति ईतिहास प्रेमी असल्याने त्यांना वर्तमानाचे भान नाही हे या निकालाने सिद्ध झाले. ते एक सभ्य गृहस्थ आहेत यात शंका नाही पण ते मोदी नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावे हे बरे ! मोदी हे त्यातल्या त्यात बरे नेते आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आणिक आघाड्या युत्या यांच्या राजकारणात या आपली पोळी भाजली जाईल अशा अटकळीने राजकारण करणाऱ्या शरद पवार व राज ठाकरे यांनी आता मुकाट्याने काँग्रेस व शिवसेना यात अनुक्रमे बिनशर्त विलीन व्हावे ! सल्ला विचित्र आहे पण अपरिहार्य आहे

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2017 - 10:44 pm | श्रीगुरुजी

>>> उद्धव ठाकरे हे अति ईतिहास प्रेमी असल्याने त्यांना वर्तमानाचे भान नाही हे या निकालाने सिद्ध झाले. ते एक सभ्य गृहस्थ आहेत यात शंका नाही पण ते मोदी नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावे हे बरे !

खरं तर त्यांना वास्तविकतेचे भान नाही असे म्हटले पाहिजे. अन्यथा "यापुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल" असे सांगून टाळ्या घेतल्या नसत्या.

सतिश गावडे's picture

23 Feb 2017 - 10:53 pm | सतिश गावडे

रायगड जिल्हा परीषदेचा निकाल कुणाला माहिती आहे का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Feb 2017 - 11:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

रायगड स्पष्ट नाही पण शेकाप येईल सत्तेत.

रायगड : ५१
शेकाप :२१
राष्ट्रवादी:१७
शिवसेना:१५
काँग्रेस:३
भाजप:3

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Feb 2017 - 11:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

*एकूण ५९.

सतिश गावडे's picture

23 Feb 2017 - 11:04 pm | सतिश गावडे

धन्यवाद.

सचु कुळकर्णी's picture

24 Feb 2017 - 2:01 am | सचु कुळकर्णी

भाउ तोरसेकर ह्यांना टि.व्ही. वर अनेकदा बाघितल होत ऑब्वियसलि मि (मराठि किंवा हिंदि) चिंधि टाईप असलेला मिडिया स्वता: पुरता बॅन करण्यापुर्वि, आणि ईतक्यात कोणितरि मिसळपाव वरच उल्लेख करे पर्यंत ह्या सदघ्रुह्स्थांच संकेतस्थळ आहे हे माहित नव्हत. त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले बहुतांश लेख वाचुन हे कळाल कि माणुस अंधभक्त कसा आसु शकतो, पण जर स्वामि भक्तिचे लेख वाचायचे असतिल तर इतक्यात लेच वाचा. काय त्या कोलांटउड्या मि तर म्हणेन माकड उड्या मारल्या आहेत शिवसेनेकरता. अहा हा.

गॅरी ट्रुमन's picture

24 Feb 2017 - 10:18 am | गॅरी ट्रुमन

मागेच या की दुसर्‍या चर्चेत म्हटले होते की भाऊंनी एकेकाळी मार्मिकमध्ये बाळासाहेबांबरोबर काम केले होते. तेव्हापासूनचे त्यांचे शिवसेनेबरोबरचे ऋणानुबंध होते. कदाचित त्या कारणामुळे ते शिवसेनेवर लेख लिहायची वेळ आली (किंवा टिव्हीवरील चर्चेत बोलायचे असेल) की ते पूर्णपणे स्वतंत्र स्टॅन्ड घेऊ शकत नसावेत. पण इतर सर्व विषयांवरील भाऊंचे लेख नक्कीच वाचनीय असतात. एखाद्या घटनेशी संबंधित जुने संदर्भ गारूड्याच्या पोतडीतून गोष्टी बाहेर काढाव्यात अशाप्रकारे ते देत असतात. मी त्यांचा ब्लॉग जवळपास दररोज वाचतो. पण शिवसेनेविषयी काही मतप्रदर्शन असेल तर मात्र ही गोष्ट लक्षात ठेवतोच.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 11:43 am | वरुण मोहिते

तोरसेकर वैग्रे . विशेष काही नावीन्य नसतं लिहिण्यात . आणि लेख राजकारणावरचे तर एकांगी होतात . ना आंतरराष्ट्रीय विश्लेषण ना कुठले राष्ट्रीय विश्लेषण .ठराविक साचेबद्ध लिखाण .

शेफाली वैद्य, भाऊ तोरसेकर आणि फ्रस्ट्रेटेड इंडियन या तिघांनाही या एकांगीपणामुळे अनफॉलो केले..

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 4:17 pm | सतिश गावडे

भाजपा राज्यात सत्तेत येण्यापूर्वीचे त्यांचे लेख वाचनीय असत. त्यानंतर मात्र त्यांचे लेखन एकांगी होऊ लागले. शिवसेनेचे सार्थन करण्याच्या नादात ते खुपच वाहवत गेले.

भटक्या चिनु's picture

24 Feb 2017 - 2:16 am | भटक्या चिनु

भाजप कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता फटाके वाजवणारे शिवसैनिक गायब. आततायी पणा नडला. देवेंन्द्र फडणवीस यांनी खरोखर औकात दाखवली. संपूर्ण निवडणुक काळात कुठेही मोदींची सभा न होता केवळ एकट्याच्या जीवावर महाराष्ट्भर ७५ सभा घेऊन संपूर्ण देशाच लक्ष वेधून घेतलेल्या आणि भारतातले या घडीचे सर्वोत्तम मुख्यमंत्रि म्हणून नावलौकिक मिळवणार्या देवेंन्द्रजींनी जवळजवळ सर्वच ठिकाणी जे घवघवीत यश मिळवलाय त्याबद्ल सलाम. मुंबई मधे तर गेल्या निवडणुकीपर्यंत अक्षरशः कोपर्यात असणार्या भाजप ला ८० च्या पुढे घेऊन जाणे म्हणजे कमाल.
सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यात ज्याठिकाणी सभा फसली म्हणून कुचेष्टेने हिणवल्या गेलेल्या फडणविस यांनी त्या प्रभागातल्या सर्वच्या सर्व सीट जिंकल्या.

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 9:36 am | अनुप ढेरे

सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यात ज्याठिकाणी सभा फसली म्हणून कुचेष्टेने हिणवल्या गेलेल्या फडणविस यांनी त्या प्रभागातल्या सर्वच्या सर्व सीट जिंकल्या.

त्याच प्रभागातल्या मुक्ता टिळक या निवडणुकीतल्या सर्वाधिक मताधिक्यानी (२३ हजार) निवडून आल्या आहेत. :)

शाम भागवत's picture

24 Feb 2017 - 2:27 pm | शाम भागवत

या प्रभागातील चारही उमेदवारांनी एकूण मतदानाच्या ५० टक्के पेक्षा जास्त मते मिळवली आहेत.
पुण्याचा विचार करता या निवडणूकीत अशा प्रकारची कामगीरी भाजपाच्या ३० उमेदवारांनी केलेली आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Feb 2017 - 5:13 pm | llपुण्याचे पेशवेll

त्याच मुक्ता टिळक आता महापौर होणार अशीही बातमी आहे.

अभिदेश's picture

24 Feb 2017 - 3:14 am | अभिदेश

हे सिद्ध होते कि आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच नंबर दोनचा पक्ष आहे. त्यामुळे आता पुढची वाटचाल कशी करायची ह्याचा विचार शिवसेनेला करावा लागेल. माझया मताप्रमाणे अजून दोन वर्ष तरी राज्य सरकारचा पाठिंबा काढला जाणार नाही. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीवर काही अंशी पुढची वाटचाल ठरेल. जर मोदी सरकार पुन्हा एकदा स्वबळावर आले आणि त्यांना कोणत्याही घटक पक्षाची गरज लागली नाही तर शिवसेनेची पुढची वाटचाल अवघड आहे. पण जर तसे घडले नाही तर शिवसेना पुन्हा एकदा जोर लावेल. आत्ताच जर पाठिंबा काढून घेतला तर पक्ष फुटण्याचा संभव आहे. थोडक्यात ही खडाजंगी अजून दोन वर्ष तरी थांबणार नाही.

सुबोध खरे's picture

24 Feb 2017 - 10:04 am | सुबोध खरे

माझ्यासाख्या एका मुंबईकर मराठी माणसाला असे वाटते कि उगाच शब्दांचा बागुलबुवा उभा न करता भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेत युती करावी. दोन मते जास्त असल्याने शिवसेनेस महापौर पद द्यावे. नाहीतरी ते पद नुसते शोभेचेच आहे. कोणताही प्रस्ताव भाजप च्या नगरसेवकांच्या मताशिवाय पारित होणे शक्य नाहीच. आणि काँग्रेसचा पाठिंबा घेणे शिवसेनेला फार महाग पडेल. मग नुसते शोभेचे पद देऊन जर शिवसेनेला खूष ठेवता आले तर काय वाईट? एक महापौर पद देऊन जर उद्धव ठाकरे यांचा अहंगंड कुरवाळला जातो तर तसे करायला काय हरकत आहे. मुळात मुंबईचा आयुक्त फडणवीस साहेबांच्या नियुक्तीचा आहे. जब सैंया है कोतवाल तो डर काहे का?
नाहीतरी मुंबई महापालिका म्हणजे भाजप ला सर्वस्व नाहीच पण शिवसेनेच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न होता.
मुंबईच्या मतदारांची सुद्धा तशीच इच्छा आहे त्यामुळेच त्यांनी या दोन्ही पक्षांना भरभरून मते दिली पण कोणालाच एकाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.
फडणवीस साहेबांच्या परिपक्वतेवर अवलंबून आहे. उद्भवजी अजूनही बेताल वक्तव्येच करीत आहेत .

बाजीप्रभू's picture

24 Feb 2017 - 12:38 pm | बाजीप्रभू

+1000

विशुमित's picture

24 Feb 2017 - 10:25 am | विशुमित

भाजपच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!!

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेल्या बद्दल विशेष आनंद झाला आहे. कारभारी बदलले पाहिजे होतेच. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर नक्कीच आत्मपरीक्षण करावं.

पुण्यामधील आणखी एका निकालामुळे खूप खूप आनंद झाला आहे तो म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात गिरीश बापटांच्या नाकावर टिचून काँग्रेस पुरस्कृत श्री रवींद्र धंगेकर यांनी गणेश बीडकरांचं विसर्जन केले. या पराजय भाजप आणि बापटांना खूप जिव्हारी लागला आहे आणि बापटांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पण त्याच बरोबर धंगेकर हे खरंच तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि महापालिकेमध्ये त्यांचे विरोधी पक्षात असणे भाजप साठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 11:01 am | अप्पा जोगळेकर

गिरीश बापट या बनेल नेत्याला लवकरच वनवास मिळेल असे वाटते. धंगेकर जिंकले ते बरेच झाले.

++१११

बनेल हा एकच शब्द शोभतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2017 - 3:54 pm | llपुण्याचे पेशवेll

धंगेकरांनी देखील भाजप प्रवेशाचा प्रयत्न गेली ६ महिने चालवला होता. पण अपयशी ठरला. गिरीश बापटांनी गणेश सारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा मान ठेऊन धंगेकरांना प्रवेश दिला नाही. त्याबद्दल बापटांचे अभिनंदन. आता हरले असले तरी सच्चे कार्यकर्ते पुढच्या वेळेला जीव तोडून काम करतील. गिरीश बापट विधान सभेवर १९९५ पासून आजवर एकदाही न पडता लागोपाठ आले आहेत.
त्यामुळे बापटांचे फार काही नाक कापले गेले नाहीय्ये.

विशुमित's picture

24 Feb 2017 - 5:24 pm | विशुमित

<<<गिरीश बापटांनी गणेश सारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा मान ठेऊन धंगेकरांना प्रवेश दिला नाही. त्याबद्दल बापटांचे अभिनंदन.>>>
-- इतर ठिकाणी आयारामांमुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय नाही झाला का? का घाबरले होते जुने कार्यकर्ते कसब्यातील?

<<<आता हरले असले तरी सच्चे कार्यकर्ते पुढच्या वेळेला जीव तोडून काम करतील.>>
-- कसले काम करतील? अरेरावी करण्याचे की चुगली करण्याचे ?

<<<गिरीश बापट विधान सभेवर १९९५ पासून आजवर एकदाही न पडता लागोपाठ आले आहेत.>>>
-- त्यामुळेच तर प्रवेश नाकारला बापटांनी.

<<<त्यामुळे बापटांचे फार काही नाक कापले गेले नाहीय्ये.>>
-- चलो ठीक आहे थोडे कापले म्हणू.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2017 - 8:33 pm | llपुण्याचे पेशवेll

-- इतर ठिकाणी आयारामांमुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय नाही झाला का? का घाबरले होते जुने कार्यकर्ते कसब्यातील?
सगळेच आयाराम पडले का? नाही ना. आता तुम्हाला तुमच्या प्रिय पवारांचा पराभव सहन होत नाही त्यामुळे तुम्हाला काहीतरी बोलावं लाग्णारच.
-- कसले काम करतील? अरेरावी करण्याचे की चुगली करण्याचे ?
अहो ते राष्ट्रवादीचे नाही भाजपचे कार्यकर्ते आहेत. :) अरेरावी, माज, चाकण एम आय डी सी मधली मुजोरी हे पराक्रम राष्ट्रवादीचे आहेत . :)
-- त्यामुळेच तर प्रवेश नाकारला बापटांनी.
?? काहीतरी संबंधित बोला हो .

-- चलो ठीक आहे थोडे कापले म्हणू.
अहो तुमच्या राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपची एकहाती सत्ता आणली ना काकडे आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी?भाजप जिंकलंय मन्य करा की.

पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा पक्ष पडला ते चांगलेच झाले. तसे खरंच खूप वाईट वाटलं पण नंतर मनाची समजूत काढली की आताच्या जनतेला विकास नाही गाजरंच जास्त आवडतात.
तसं बीडकरांचा पराभव भाजपच्या खूपच जिव्हारी लागला हे पदोपदी जाणवलं कसब्यात.

उमेदवारी अर्ज माघारी घेताना अस्लम बागवान यांना बीडकरांनी कोणती अरेरावीची आणि माजोरी भाषा वापरली होती, ती पण जरा तपासून पहा.

पुढच्या आमदारकीला बापट काय उभे राहणार नसतीलच कसब्यातून, त्यामुळे भविष्य काय असेल ते आता नाही सांगू शकत.

काकडे, जगताप, लांडगे आणि भाई सगळी पवारांनीच घडवलेली माणसे आहेत, भाजपचे कर्तृत्व सांगा? फक्त फोडून आपल्याकडे घेतले एवढेच.

(एक प्रश्न पडला आहे- पिंची मधलं हे त्रिकुट पूर्वी खूप उत्मात करायचे पण त्यावेळेस अजित पवार किंवा शरद पवार हे त्यांना कंट्रोल तरी करायचे. आता ह्यांना कोण कंट्रोल करणार? काकडे आणि बापटांना मुळा नदी तरी ओलांडून देतील का नाही शंका आहे)

: आणखी एक अवांतर शंका- EVM मशीन मध्ये फेरफार झालाय वाटतं TV ९ ला बातमी पाहिली.

पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा पक्ष पडला ते चांगलेच झाले. तसे खरंच खूप वाईट वाटलं

अरारारा... तुम्ही पण कुंपणावरचे का..?

नंतर मनाची समजूत काढली की आताच्या जनतेला विकास नाही गाजरंच जास्त आवडतात.

खिक्क.. इतका विकास करून सातत्याने निवडणुकीत तुमचा पक्ष का माती खात आहे म्हणे..? जनतेला गाजरं नाही कमळं आवडत आहेत असे निकालावरुन दिसत आहे. तुम्हाला कमळ शब्दाची अ‍ॅलर्जी असेल तर गेट वेल सून.

काकडे, जगताप, लांडगे आणि भाई सगळी पवारांनीच घडवलेली माणसे आहेत, भाजपचे कर्तृत्व सांगा? फक्त फोडून आपल्याकडे घेतले एवढेच.

मग पवारांनी घडवलेली माणसे त्यांना सोडून का गेली म्हणे..? या मुद्द्यामुळे तुम्ही खुद्द पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या लक्षात येत आहे ना..?

आणखी एक अवांतर शंका- EVM मशीन मध्ये फेरफार झालाय वाटतं TV ९ ला बातमी पाहिली.

या शंकेचा पाठपुरावा करा आणि कांही मिळाले तर इथे जरूर टाका.

बाकी मुद्द्यांवर पास.

<<<<या शंकेचा पाठपुरावा करा आणि कांही मिळाले तर इथे जरूर टाका.>>
-- हे घ्या

http://beta1.esakal.com/pune/defeated-supporters-road-32298

अनुप ढेरे's picture

25 Feb 2017 - 5:55 pm | अनुप ढेरे

२००९मध्ये भाजपा हारल्यावर असेच आरोप झालेले ऐकलं आहे. :)

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 6:03 pm | संदीप डांगे

इस बार कुछ खास है.

१. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे.
२. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही

मोदक's picture

27 Feb 2017 - 1:21 pm | मोदक

१. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे.
२. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही

याचा विदा किंवा सरकारी संस्थळावरील आकडेवारी आहे का..? व्हॉट्सअप किंवा न्युजचॅनेलवरील बातम्या नकोत.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 4:28 pm | संदीप डांगे

वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत... काल नाशिकमध्ये लोकशाही बचाव आंदोलन ह्या संस्थेने काही निर्वाचित उमेदवार अवैधरित्या निवडून आलेत त्याबद्दल , निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन दिलंय.. पुण्यातही बातम्या आल्यात वर्तमानपत्रात.. राजकिय पक्षांचे ह्या गडबडीविरूद्ध आंदोलनाचे मोर्चाचे ठरले आहे. पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच....

पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच....

ओके, हरकत नाही.

याचा इतकाच अर्थ आहे की तुम्ही केलेली पुढील विधाने अजुन सिद्ध झालेली नाहीत.

१. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे.
२. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही

ही विधाने सिद्ध झाली तर नक्की कळवा, सिद्ध झाल्यानंतर या संदर्भात जर तुम्हाला आणखी कोठेही पाठपुरावा करण्यासाठी मदत लागणार असेल तर मी मला शक्य होईल ती मदत करेन.

(सर्वमान्य संकेतानुसार वरील प्रतिसाद सुरूवातीला येणे अपेक्षित होते. असो.)

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 4:56 pm | फेदरवेट साहेब

सर्वमान्य संकेतानुसार

हॉ हॉ हॉ हॉ

(पाताळविजयमी हास्य)

तिमा's picture

24 Feb 2017 - 10:29 am | तिमा

भाजप व शिवसेना या दोघांनाही, मुंबईत मॅजिक फिगर गांठता आली नाही, हे बरेच झाले. दोघेही एकमेकांना चेक मधे ठेवतील. शिवसेनेने प्रचारातली व सामना मधली भाषा आता सुधारावी.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 10:54 am | अप्पा जोगळेकर

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाणे हे महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही कारण त्यांच्या लायकीचा दुसरा नेताच महाराष्ट्रात नाही. दानवे, पंकजा मुंडे, खडसे, विनोद तावडे आदी थर्ड ग्रेड नेत्यांनी सुरु केलेली काव काव. मराठा मोर्चे आणि कोपर्डी प्रकरण, नोटाबंदी नंतर भाजपची लाट ओसरल्याची टीका होती वगैरे मुळे पक्षश्रेष्ठींनी फडणवीस साहेबांना जिंकून दाखव असे सांगितले होते. त्यांनी खरोखरच जिंकून दाखवले त्यामुळे हे सगळे अस्तनीतले निखारे थंड पडले आहेत. पंकजाताई हरल्या ते बरेच झाले त्यांची टिवटिव थांबेल आता. आजघडीला फडणवीस यांची उंची गाठू शकेल अशा लायकीचा दुसरा नेताच महाराष्ट्रात नाही. त्यामुळे त्यांचे सीएम पद धोक्यात येणे महाराष्ट्रासाठी चांगले नव्हते.
शिवसेनेचे दात घशात गेले. जिल्हा परिषदांमधे भाजपचे घवघवीत यश म्हणजे ग्रामीण भागात सीएमने जलयुक्त शिवार ची केलेली कामे, दुस्काळात जनतेला केलेली मदत आणि स्वच्छ प्रतिमा याला मिळालेली पावती आहे.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 10:58 am | अप्पा जोगळेकर

शिवसेनेच्या माफियागिरीला चाप बसला आणि शिवसेना प्रेमी भाजप नेते कावरे बावरे झाले.
महापालिका निवडणुकीचा माझ्या द्रूष्टीने तरी एवढाच अर्थ आहे.
बाकी गुंडांना घेतले, गँगस्टर बरोबर फोटो काढला वगैरे मुद्दे हास्यास्पद आणि बालिश आहेत.
गुंडपुंड नसलेला राजकीय पक्ष भारतात आजवर अस्तित्वातच आलेला नाही.

विशुमित's picture

24 Feb 2017 - 11:33 am | विशुमित

<<<मराठा मोर्चे>>
-- माझी आंतरिक माहिती (कृपया सोर्स विचारू नका) मराठ्यांनी झाडून कमळाला मतदान केले आहे. आता बोला...

मोदक's picture

24 Feb 2017 - 11:53 am | मोदक

असे झाले असेल तर सूज्ञ मतदारांचे हार्दिक अभिनंदन.

स्वतः १० वर्षे सत्तेवर असताना मराठा आरक्षणाचे किती काम केले हा मुद्दा सोयीस्कररीत्या विसरून, सत्तेवरून पायउतार होताना मराठा आरक्षणाचे साप सोडले, आणि वर त्यासाठी भाजपाला दोष देऊन "आरक्षणाचे काम न करणार्‍या भाजपाला मतदान करू नका" असा राजकीय पवित्रा एका अराजकीय संघटनेने घेतला हे थोडे विचित्रच वाटले होते.

लगेच आत्मरंजन करण्यात मुशगुल होऊ नका. कारणे वेगळी आहेत. टंकतो नंतर संपूर्ण माहिती हातात आल्यावर.

अरेरे.. मराठा मतदार सूज्ञ आहे असे माझे म्हणणे आत्मरंजन असेल, तर नक्की वस्तुस्थिती काय आहे हे तुम्हीच तुमच्या भाषेत विषद करा.