सवाई गंधर्वच्या निमित्ताने ...
पुण्यात यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव संपन्न होत आहे ...
त्या निमित्ताने : सवाईला अनेक वर्षे गाण्याचा आनंद घेतानाच केलेले एक निरीक्षण
सवाईला दोन प्रकारचे लोक येतात
पहिल्या प्रकारचे लोक ....
हे बरेचदा ऑफिस मधून डायरेक्ट येतात. जमाल तर योग्य करणे देऊन राजाही मिळवतात .
हे लोक स्वतःच्या कपड्यांचा फारसा विचार करत नाहीत. जीन्स , टी शर्ट , स्वेटर असे काहीही चालते. हे लोक एकमेकांची जागा धरतात. यांना पटकन राग ओळखता येईल याचे खात्री नसते. पण ते "हा राग कोणता ? " असे बिनधास्त विचारतात. पण असे असले तरी गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतात.आणि मागे असलेल्या भेळ, थालीपिठ. खिचडी यांचाही अनमान करत नाहीत. मागे लावलेल्या जुन्या फोटोंचे प्रदर्शनही आवडीने बघतात. थोडक्यात सर्वसामान्य रसिक ...
पण ही जी दुसरी जमात आहे .. ती फारच उच्चं ... अभिरुची वगैरे शब्द वापरणारी ,,, हे ओळखायची लक्षण कोणती ?
१. हे लोक हमखास झब्बा घालतात.. वर एखाद जाकीटही
२. हे लोक गाणं ऐकायला येत नाहीत तर "संगीताचा आस्वाद" घ्यायला येतात
३. भूपात सगळे स्वर शुद्ध असतात इतपत त्यांना संगीताचे ज्ञान असते.. मुळात त्यांनी संगीत "वाचलेले" असते.. पण ऐकलेले नसते
४. ही लोक गाणं सुरु झाले की हा राग कुठला यावरच चर्चा करतात. पण मूळ मुद्दा आपण पूर्वी हा राग कुठे कुठे ऐकला हा असतो.
५. दुसऱ्या दिवशी अशोक रानडे प्रभुतींचे सकाळ मधील लेख वाचून यांना काल काय गायले याचा बोध होतो. मग ते त्याची चर्चा पुढच्या सवाई पर्यन्त करतात
६. सर्वात महत्वाचे म्हणजे यांचा ताल व लयीचा अंदाज अगाध असतो .. त्यामुळे समेवर द्यायची दाद हमखास उशिरा देतात
तेंव्हा बघा यंदाच्या सवाईला ही जमत तुम्हाला ओळखता येते का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आदूबाळ यांच्या एका लेखाची
अरे वा .. हा लेख वाचला
हा फालतुपणा शास्त्रीय संगीता संदर्भात व पुण्यात जरा जास्त असतो.
नो डाऊट सवाई त अत्यंत जाणकार श्रोते ही असतातच.
सवाई कधी आहे यंदाचा?
ओह, सुरु झालाय :(
एकदम सहमत मारवा जी ,,
गवैयांपासून खवैयांपर्यंत
ते सोडा... खरंच चेपुवर लाईव्ह
एका गाजावाजा नसलेल्या संगीत
काही गोष्टींचे महत्व ..
आमच्यासाठी सवाई चा अर्थ एकांकिका स्पर्धा हा आहे.
मलाही त्यातलं का ही ही कळत
मलाही त्यातलं का ही ही कळत
मला अनेकदा असल्या