✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बायका पुरुषांची बरोबरी का करतात???????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Sun, 11/20/2016 - 18:26  ·  लेख
लेख
बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो. १. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात २. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी? ३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात ४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा? ५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते. तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे. तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7756 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

जिनियस! सिंथेटीकली.

यशोधरा
Sun, 11/20/2016 - 18:29 नवीन
जिनियस! सिंथेटीकली.
  • Log in or register to post comments

हे राजेश घासकडवींकृत सुडंबन

माहितगार
Sun, 11/20/2016 - 21:57 नवीन
<पुरुष बायकांची बरोबरी का करतात> हे राजेश घासकडवींकृत सुडंबन लेखक महोदयांना त्यांची टर्बॉलॉफी चार्ज करण्यास उपयूक्त ठरावी आणि त्यांच्या नजरेतून अनवधानाने सुटू नये म्हणून दुवा येथे डकवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे

आदूबाळ
Sun, 11/20/2016 - 18:52 नवीन
आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे का? सकाळपासून दोन कातिल धागे आलेत.
  • Log in or register to post comments

अगदी, अगदी.

यशोधरा
Sun, 11/20/2016 - 18:56 नवीन
अगदी, अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पहिला फ्री आणि त्या एकावर एक

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/20/2016 - 21:44 नवीन
पहिला फ्री आणि त्या एकावर एक फ्री, अशी डबल बेनेफीट स्कीम आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्त!! आता मुंबै वि. पुणे!!

पिलीयन रायडर
Sun, 11/20/2016 - 19:16 नवीन
मस्त!! आता मुंबै वि. पुणे!!
  • Log in or register to post comments

पुरुष मागे पडू नयेत म्हणून .

कंजूस
Sun, 11/20/2016 - 19:27 नवीन
पुरुष मागे पडू नयेत म्हणून .
  • Log in or register to post comments

ठ्ठो!!!

पिलीयन रायडर
Sun, 11/20/2016 - 21:56 नवीन
ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पुढचे विषय मी सुचवतो.

बोका-ए-आझम
Sun, 11/20/2016 - 19:33 नवीन
१.टाऊन विरूद्ध सबर्ब्ज २. नदीअल्याडचे पुणे विरूद्ध पेठांमधले पुणे ३. म्हातारा महंत विरूद्ध बाकीचे सगळे (याला रेफरी मी. बाकी सगळे तराट झाल्यावर एक शुद्धीवर नको?) ४. चहा विरूद्ध काॅफी ५. सुरती उंधियूं विरूद्ध कांदिवली/बोरिवली इ. अहमदाबादच्या उपनगरांत मिळणारा उंधियूं बाकीच्यांनी सुचवा आता.
  • Log in or register to post comments

आणि एव्हरग्रीन शाकाहार वि.

पुंबा
Sun, 11/20/2016 - 21:19 नवीन
आणि एव्हरग्रीन शाकाहार वि. मांसाहार म्हणजे महिनाभराची निश्चिती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लग्नाच्या बाजारात मुलांच्या

अभिजीत अवलिया
Sun, 11/20/2016 - 21:45 नवीन
लग्नाच्या बाजारात मुलांच्या अपेक्षा विरुद्ध मुलींच्या अपेक्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

त्यात

नाखु
Mon, 11/21/2016 - 17:05 नवीन
मुलांच्या (आईवडीलांच्या अलिखित पण ठांम) अपेक्षा विरुद्ध मुलींच्या (आईवडीलांच्या अलिखित पण ठांम)अपेक्षा समाविष्ठ आहेत काय? नसल्यास त्याचे गुर्हाळ वेगळे लावावे तेही बारा महिने चालते.
स्त्री मुक्ती,पुरुष कुचंबणा यासरखे आले लिंबू असल्याने ग्राहकांची मागणी सदोदित असते.
तुम्ही हे लावाच टक्याला पाचशेचा अनुभव आहे. मिपा ष्टॅण्डावरील वायफळ मळा ते भिंतीच्या तुंबड्या या बशीत जागा न शोधणारा प्रवासी नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

टक्याला पाचशेचा अनुभव आहे.

टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 17:47 नवीन
टक्याला पाचशेचा अनुभव आहे.
ना खूनी चाचा...पाश्शे प्रीतीसादांचा पर्तिसादांचा अनूभव आहे असे पश्ट ल्हिआ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अरे देवा

नाखु
Tue, 11/22/2016 - 09:02 नवीन
मी प्रीतीसादांचा प्रतीसादांचा अनुभव असेच म्हणत होतो. खुलाश्यातील खलाशी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ईश्श्य

पैसा
Sun, 11/20/2016 - 19:36 नवीन
ईश्श्य!!
  • Log in or register to post comments

स्वतःचे अगदी पर्सनल प्रॉब्लेम

संदीप डांगे
Sun, 11/20/2016 - 19:37 नवीन
स्वतःचे अगदी पर्सनल प्रॉब्लेम आंतरजालावर टाकू नये असं म्हटलं जातं.
  • Log in or register to post comments

बापरे !!

झेन
Sun, 11/20/2016 - 19:45 नवीन
आधीच नोटाबंदी त्यात म्हणे हिमेश रेशमीया नवीन सिनेमा काढतोय आणि आता हा धागा, उपरवाले ऊठाले रे बाबा ...
  • Log in or register to post comments

छे बाई !

धर्मराजमुटके
Sun, 11/20/2016 - 20:20 नवीन
पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.
याचा बदला म्हणून पुरुषांना स्कर्ट आणी टॉप वापरायचा सल्ला दिला तर चालेल काय ?
  • Log in or register to post comments

याचा बदला म्हणून पुरुषांना

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 11/20/2016 - 20:24 नवीन
याचा बदला म्हणून पुरुषांना स्कर्ट आणी टॉप वापरायचा सल्ला दिला तर चालेल काय ?>>>>> इमिटेशन रुट फिमेल टू मेल आहे.मुद्दा असा आहे की बायका पुरुषांना बेंचमार्क का मानतात? त्यांचे स्वतःचे काही इन्व्हेंशन का करत नाहीत.
  • Log in or register to post comments

हाय काय अन नाय kaay

nanaba
Sun, 11/20/2016 - 20:26 नवीन
तुम्हीही त्यांची बरोबरी करा. साडी नेसा पंजाबी ड्रेस स्कर्ट ए लाईन ड्रेस घाला. जास्त टशन दाखवायची असेल तर सासुरवाडीला रहायला जा. नोकरी करता करता सासू सासरे मेव्हण्याशी जुळवून घेत घेत स्वैपाक पाणी मुले सांभाळणे इतर घरकाम करा. अडनाव नाव बदलून बायकोचे लावा. तिच्या नावचे कुंकू मंगळसूत्र वगैरे घाला. अगदी नाकावर टिच्चून तुम्हीही त्याची बरोबरी करा. अरे हाय काय अन नाय काय!
  • Log in or register to post comments

ह ह पु वा. हा अगदी वर्मावर

निरंजन._.
Mon, 11/21/2016 - 16:58 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

ह ह पु वा. हा अगदी वर्मावर

निरंजन._.
Mon, 11/21/2016 - 16:58 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

=))

पिलीयन रायडर
Mon, 11/21/2016 - 21:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

तुम्हीही त्यांची बरोबरी करा.>

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 11/20/2016 - 20:58 नवीन
तुम्हीही त्यांची बरोबरी करा.>>>>>> हे आर्ग्युमेंट नाही होत हो ,आर्ग्युमेंट कसे करायचे ते ही आता पुरुषांनी शिकवायचे का?
  • Log in or register to post comments

खी खी खी

टवाळ कार्टा
Sun, 11/20/2016 - 21:01 नवीन
खी खी खी
  • Log in or register to post comments

चला नवीन विषय आला.........

जानु
Sun, 11/20/2016 - 21:21 नवीन
चला नवीन विषय आला..........हुश्श.........
  • Log in or register to post comments

=))))))

अजया
Sun, 11/20/2016 - 21:51 नवीन
=)))))) विनोदी लेखांची मिपावरची उणीव भरुन काढल्याबद्दल धन्यवाद_/\_
  • Log in or register to post comments

बा पु ब का का ?

गामा पैलवान
Sun, 11/20/2016 - 21:51 नवीन
टफि, मला वाटतं ते उत्तर सांगतो. बाईला लहानपणापासून तू बाई आहेस तेव्हा सांभाळून रहा म्हणून सतत सांगितलं गेलेलं असतं. त्यामुळे पुरुषांसारखं वागून बघायचं कुतूहल जवळजवळ प्रत्येक बाईला असतंच. म्हणून त्या पुरुषांची कॉपी करू इच्छितात. माझ्या मते असं कुतूहल बाळगण्यात काही चुकीचं नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हे राजेश घासकडवींकृत सुडंबन

माहितगार
Sun, 11/20/2016 - 21:58 नवीन
<पुरुष बायकांची बरोबरी का करतात> हे राजेश घासकडवींकृत सुडंबन लेखक महोदयांना त्यांची टर्बॉलॉफी चार्ज करण्यास उपयूक्त ठरावी आणि त्यांच्या नजरेतून अनवधानाने सुटू नये म्हणून दुवा येथे डकवत आहे.
  • Log in or register to post comments

संपादकांना विनंती

माहितगार
Sun, 11/20/2016 - 22:00 नवीन
कदाचीत एचटीएमल त्रुटीमुळे दुवा दिसत नाही दुरुस्ती करुन द्यावी हि विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

नानासाहेब नेफळे,

श्रीगुरुजी
Sun, 11/20/2016 - 22:33 नवीन
नानासाहेब नेफळे, माईसाहेब कधीपासून तुमची बरोबरी करायला लागले?
  • Log in or register to post comments

आलाव तूमी ट्फी काकानू?

खटपट्या
Sun, 11/20/2016 - 22:40 नवीन
आलाव तूमी ट्फी काकानू?
  • Log in or register to post comments

किती दिवसांनी जरा हसायला

रेवती
Mon, 11/21/2016 - 00:55 नवीन
किती दिवसांनी जरा हसायला मिळालं.
  • Log in or register to post comments

हसा की मग ,पण हसण्यातही कॉपी

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Mon, 11/21/2016 - 09:54 नवीन
हसा की मग ,पण हसण्यातही कॉपी पेस्ट करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/21/2016 - 10:01 नवीन
तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men.
असा झाला तर तो प्रकार सगळा! ----------------------------- समांतर :- डूआयडी बरोब्बर मूळ आयडिंसारखेच का वागतात!? =))
  • Log in or register to post comments

बायका पुरुषांची बरोबरी का

सस्नेह
Mon, 11/21/2016 - 11:36 नवीन
बायका पुरुषांची बरोबरी का करतात?
अरेरे ! बायका पार पुढे गेल्या तरी तुमच्यासारख्या पुरुषांची अजुनी हीच समजूत आहे का ? कृपया स्वत:ला उप्दते करा ...!
  • Log in or register to post comments

Activa , Scooty चालवणार्‍या

मराठी कथालेखक
Mon, 11/21/2016 - 12:05 नवीन
Activa , Scooty चालवणार्‍या सगळ्या पुरुषांचा निषेध करतो. (मी नाही हं त्यातला) झालंच तर दारू न पिणारे म्हणजे बायकी पुरुष (कारण
दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे
) ..त्यांचाही निषेध. (पुन्हा एकदा मी नाही हं त्यातला.. मी पित असतो)
  • Log in or register to post comments

हाहाहा

पाटीलभाऊ
Mon, 11/21/2016 - 17:55 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

हे सगळं करणार्‍या मुली जर

सूड
Mon, 11/21/2016 - 18:40 नवीन
हे सगळं करणार्‍या मुली जर समोर उभ्या राहिल्या तर फिलॉसोफर काय म्हणतील त्याचा विचार कर्तोय.
  • Log in or register to post comments

या पुढे जाऊन काही चवळीच्या

याॅर्कर
Mon, 11/21/2016 - 18:48 नवीन
या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात
:(
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा