लक्ष्मीचा भर्वसा धरी...
आजही दासबोधातील सर्वाधिक लोकप्रीय समास आहे "मूर्ख लक्षण" समास!
हे केवळ विधान नाही तर, हे संगणकीय आकडेवारीवरून केलेले निरीक्षण आहे.
दासबोध.कॉम ही जगभरात दासबोधावर जितकी संकेतस्थळे आहेत त्यातील आजच्या दिनांकाला सर्वाधिक वाचले जाणारे संकेतस्थळ आहे. त्यातील सर्वाधिक वाचला जाणारा समास हा मूर्ख लक्षणांचा आहे!
त्यातील एकेका ओवीत समर्थ रामदास काय सांगतात हे वाचल्यावर कळते की आजही दासबोध कालबाह्य झालेला नाही!
उलट त्यातील उपदेशाची गरज अधीकच भासू लागलेली आहे!
समर्थ एके ठिकाणी म्हणतात, लक्ष्मीचा भर्वसा धरी । तो येक मूर्ख!
किती खरे आहे पहा ना! आज जेंव्हा अचानक सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या तेंव्हा हे लोकांना जाणवले!
तोवर सगळे "बदचलन" आपल्याच चलनमस्तीत होते!
मुळात नोट म्हणाजे काय हेच आम्ही जाणलेले नाही! ते पैसे नाहीत! धन नाही! मूल्य आहे!
सेल्फ़ सर्व्हीस काउंटर वर जसे टोकन देतात प्लास्टिकचे तितकीच तिची किम्मत! फ़क्त ते टोकन त्या दुकानापुरते चालते व नोट देशापुरती इतकेच! ती नोट म्हणाजे रिजर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नराने दिलेली तितक्या रकमेची फ़क्त हमी आहे! की बाबा रे या देशात आहेस तोवर हा कागद दाखविलास की इतके मूल्य तुला देऊ करू!
दुकानदार जसा कधीही पिवळी टोकने बाद करून नवी लाल टोकने आणु शकतो तसेच काहीसे या सरकारने केले! त्याने कुणाचे धन कमी नाही झाले! अर्थात हे जाहीर केलेल्या धनाबाबतच सत्य आहे!
पण गम्मत अशी वाटली की हा मूर्खलक्षण समास वाचताना इतकी म्हणजे इतकी उदाहरणॆ डोळ्यासमोर दिसू लागतात की जी आज आजूबाजूला घडताहेत! अगदी स्वत:पासून सांगतो, आपल्याच अनेक चुका यात उद्धृत केलेल्या आढळतात! आपल्याकडे पहातच हा समास लिहिलाय की काय असे वाटू लागते!
आता चलनबाद तर झालेले आहे, पैसा बदलून आणणे तर क्रमप्राप्त आहे, मग रांगेत थांबल्या थांबल्या मोबाईलवर हा मूर्खलक्षण समास चाळायला काय हरकत आहे?
http://www.dasbodh.com/2012/07/blog-post_282.html
हा समास वाचून तुम्हीच अशी अजून शेकडो उदाहरणे कमेंटमध्ये द्याल अशी खात्री आहे!
उदा. सांगे वडिलांची कीर्ती --> राहुल गांधी
समर्थावरी अहंता | अंतरीं मानी समता | सामर्थ्येंविण करी सत्ता | ---> केजरीवाल इ.इ.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कसं आहे, काही वेळा तत्वज्ञान
सुंदर
मार्कस ऑरेलियस यांसी