✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक थॉट एक्सपेरिमेंट

स
साहना यांनी
Tue, 10/25/2016 - 06:13  ·  लेख
लेख
खालील व्हिडीओ थॉट एक्सपेरिमेंट (विचार शोध) आहे. मिपा करांची मते जाणून घ्यायला आवडेल. दोन प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न पाहण्यासाठी text सिलेक्ट करा. १. समजा तुम्ही कुठल्या तरी सेवाभावी संस्थेला (व्यक्तीला) स्वखुशीने दान म्हणून पैसे देतात. तुम्ही बंदूक दाखवून माझ्या कडून १०० रुपये घेतले आणि तुमच्या आवडीच्या ह्या संस्थेला भेट म्हणून दिले. हे तुमच्या दृष्टिकोनातून **नैतिक दृष्ट्या** बरोबर आहे का ? (बंदूक दाखवण्या ऐवजी फक्त तोंडी धमकी दिली तर ? १०० ऐवजी १ रुपया घेतला तर ? १ लाख रुपये घेतले तर ? मी खूप खूप श्रीमंत आहे तर ? मला ठाऊक नसताना गुपचूप तुम्ही चोरून ते पैसे दान केले तर? ) उदा : एक लहान मुलाला कॅन्सर आहे. उपचारासाठी १ लाख रुपयांची गरज आहे. मी बँक मधून बाहेर येताना तुम्ही मला चाकू दाखवून माझे १ लक्ष रुपये लुटले आणि त्या गरीब लहान मुलाला दिले. तुमचे वागणे नैतिक दृष्ट्या बरोबर आहे का ? २. समजा सरकारने कुणाचे तरी पैसे धमकी देवून घेतले आणि दुसऱ्या सरकणे निर्धारित केलेल्या गरजूला दिले तर तर नैतिक दृष्ट्या बरोबर आहे का ? हा प्रश्न पाहण्यासाठी काळ्या भागाला सिलेक्ट करावे दोन्ही प्रश्नाची उत्तरे कमेंट मध्ये टाकल्या नंतर विडिओ पाहावा : https://www.youtube.com/watch?v=82NPMM85B6o
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2902 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र...

अनन्त अवधुत
Tue, 10/25/2016 - 06:34 नवीन
हपापाचा माल गपापा... वगैरे, वगैरे. म्हणी इथे लागू होतात. एकाकडून जबरदस्तीने, त्याची इच्छा नसताना, कायद्याला मान्य नसताना काहीही घेणे किंवा काही करायला लावणे हे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments

आपण दुसरा प्रश्न पहिला का ?

साहना
Tue, 10/25/2016 - 09:04 नवीन
आपण दुसरा प्रश्न पहिला का ? (जो काळ्या पट्टीने झाकला आहे ? ) आपला नैतिक आक्षेप "कायद्याने संमत" नाही म्हणून आहे का ? उद्या समजा सरकारने कायदा केला की तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही कुठल्याही हॉटेल मध्ये जाऊन १०० रुपये पर्यंत चे जेवण फुकट घेऊ शकता तर तुम्हाला ते नैतिक वाटेल काय ? (उदाहरण टोकाचे वाटले तरी तुमची नक्की भूमिका जास्त खोलांत समजावून घेण्यासाठी विचारत आहे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

एखादा कायदा मान्य नसला तरी तो

अनन्त अवधुत
Wed, 10/26/2016 - 02:21 नवीन
एखादा कायदा मान्य नसला तरी तो न पाळणे हा गुन्हा आहे. उदा कोणी 16 व्या वर्षी गाडी चालवायला शिकला तर त्याला परवाना द्यावा असे मला वाटते पण जर कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण होई पर्यंत परवाना मिळणार नसेल तर त्याने गाडी चालवू नये हे माझे म्हणणे, कारण ते कायद्याला मान्य नाही. तो कायदा बदलावा म्हणून उपलब्ध पर्यायांचा विचार करून सरकार कडे माझे म्हणणे मांडेल. आणि तुमचे 100 रुपयाचे उदाहरणाबद्दल. सरकार जर म्हणाले 100 रुपयाचे बिल तुम्ही देऊच नका तर ते मी देणार नाही. पण जर दिले नाही तरी चालतील असे शब्द असतील तर कदाचित मी ते देइनही. रच्याकने आपल्याकडे असे कायदे आहेत, ज्यामुळे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष सरकार एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला देते. धाग्याचे काश्मीर होऊ नये म्हणून असल्या कायद्यांचे उदाहरण मी देत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

अरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 10/25/2016 - 09:30 नवीन
बास झालं काय पुन्हा तेच आणि तेच आणि तेच. कळलं तुमचा मुद्दा बरोबर आहे, योग्य आहे वगैरे वगैरे पण किती धाग्यात तेच तेच लिहाल? मला माहितीये सगळे धागे वाचलेच पाहिजेत असं काही नाही. तुम्ही मला येऊन निमंत्रण दिले नाही वाचयचे वगैरे.. पण आता बस झालं. सावरा स्वःताला.
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो मिका.

बोका-ए-आझम
Tue, 10/25/2016 - 10:47 नवीन
त्यांना दुसरं काही जमत नाही, म्हणून त्या असे करमणुकीचे धागे काढतात. त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

काय

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/25/2016 - 11:18 नवीन
काय ग हे साहने? त्यापेक्षा एखादा स्वतःचा ब्लॉग का काय म्हणतात तो बनव.
  • Log in or register to post comments

स्वतः प्रश्न विचारुन तो

मराठी कथालेखक
Tue, 10/25/2016 - 16:07 नवीन
स्वतः प्रश्न विचारुन तो पुन्हा काळ्या रंगाने झाकणे हे नैतिक आहे काय ? एका अनावश्यक क्लिकमुळे माऊसची जी हानी झाली आहे ती सरकार भरुन देणार काय ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा