जबरा आहे राव लग्न.... हादडाअयला लग्न एकदम बेष्ट स्पॉट आहे.
आणि थोडा आनंद जाहला नवर्या नवरीच्या उंचीतला फरक पाहून... एकटे नाही आपण असे... उत्तम आहे :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
लग्नाचं वर्णन बारकाव्यांनिशी केलंय. आवडलं!
त्यांची शिस्त पाहून बरंही वाटतं पण आपल्याकडच्या लग्नात जो उत्साह, जल्लोश असतो तोही आवडतो.
लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!
बरं वाटलं वाचून. लांब असल्याने भारतातल्या लग्नांना जाता येत नाही. वर्णनामुळे लग्नाला गेल्यासारखं वाटलं.
रेवती
स्वातीताई, वर्णन तर मस्तच केलंय... लग्ना सारख्या घरगुती समरंभांची गंमत कुठेही गेलं तरी तशीच असते नाही?
एक छोटी शंका: तिथे 'कृपया अहेर आणू नये' असं' पत्रिकेवर लिहितात का?
बिपिन.
'कृपया अहेर आणू नये'
असं न लिहिता त्यांना काय काय हवं आहे त्याची यादी इमेलने पाठवतात आणि मग आपण आपल्याला त्यांना त्यातले काय द्यायचे आहे ते कळवायचे म्हणजे एक वस्तू डबल होत नाही.
स्वाती
लेख झकासच. गोर्यांच्या लग्नात नक्की काय करतात ते पयल्यांदा समजलं....
असो, फक्त त्यांच्या प्रत्येक रिवाजासोबत आपल्या रिवाजांच्या केलेल्या वर्णनामुळे लेख थोडा लांबला असे वाटले (या गोष्टी आपोआप डोळ्यासमोर येतातच). एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
एकदम मस्त लेख!! गोर्या लग्नात काय काय करतात ते कळलं! मला वाटायचं तो पाद्री काहीतरी बोल्णार मग एक किस, आणि मग संपलं लग्न! ( चित्रपटांचा प्रभाव! :()
चित्राची आयडीआ खूपच आवडली मला! मस्तच दिसतंय ते चित्र..
बाकी, दोघांच्याही लहानपणापासूनचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवणे हा प्रोग्राम आमच्या लग्नातही झाला होता! :) मस्त वाटतं!
मस्तच अनुभव शब्दबध्द केला आहे !
मागे मी देखील एका अशाच चर्च मधील लग्न समारोह मध्ये गेलो होतो त्याची आठवण आली !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
सुरेख वर्णन! विशेषतः खाद्यपदार्थांचे तर खासच!
श्वेतवारुणी आणि रक्तवारुणीचे चषकच्या चषक भरले जात होते,रिकामे होता न होताच परत परत भरले जात होते
हे खूप आवडलं.
फारा वर्षांपूर्वी मुंबईच्या मॅक्समुल्लर भवनात जर्मन शिकत असताना तेथे एका समारंभात जाण्याचा योग आला. तेथे पिंपात भरून ठेवलेल्या बियरची आठवण झाली! एक ग्लास संपला की दुसरा तयार!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
स्वाती तै मस्त लिहिले आहेस
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले
सांद्र की कायशा त्या संगीताने वातावरण जादूभरले झाले होते
बरेच वर्षा नन्तर हा शब्द वाचण्यात आला. नंदा प्रधान मधे "त्या सांद्र वातावरणात सगलेच गोरे दिसत होते" असे एक वर्णनाहे त्याची आठवण झाली
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
एका लग्नाची गोष्ट प्रेक्षणीय आणि वाचनीय झाली आहे. :)
अवांतर - मीदेखील एका अशाच लग्नाला गेलो होतो......पण खरं सांगायच तर आपल्याला नाही आवडत हे असं लग्न! अरे ज्या लग्नात गडबड-गोंधळ, मानापमान, रुसवे-फुगवे नाहीत ते लग्न कसलं? साला मुलीकडच्यांनी एक साधा टोपी-टॉवेलसुद्धा नाय दिला मला ;)
स्वातीताई,
मला वाटतं तू मागेही एकदा एका लग्नाचा वृत्तांत लिहिला होतास का?
असो..
हे वर्णन एकदम खास स्वातीताई ष्टाईल... फोटोंमुळे काहीही म्हणा पण लेखनाला एक प्रकरचा गेट अप येतो..
एकदम खास वाटलं लग्न.. आम्ही ही उपस्थित होतो तिथे असंच वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
@ स्वाती दिनेश,
झेक्ट-प्रोस्ट-ब्रेत्स्झेल...... लग्नाची पार्टी जोरात आहे :-) जर्मन यजमान असूनही पार्टीत शाकाहारी पदार्थांची रेलचेल दिसते आहे - व्हिच इज अक्चुअली अ रिलीफ ! नाहीतर आमचा एक पाकिस्तानी मित्र जर्मनांना 'गोश्तखोर' म्हणतो ;-)
मला ह्या जर्मनांचे कौतुक वाटते - आधी शॅम्पेन, मग रक्तवारुणी, मग जर्मनीचे 'पहिले प्रेम' असलेली बिअर आणि परत 'वन फॉर द रोड आहेच' :-)
लग्न-सोहळा आवडला.
-अनिंद्य
प्रतिक्रिया
हुश्श...!
पण मजा आली
वा ... झकास
मस्त!
फान्टास्टिश...
अहेर..
हे मस्तच...
मस्त
लेख झकासच.
एकदम मस्त
चागले लिहले आहे
मस्तच
मस्त
छान वर्णन
मस्त लिहिले आहेस
.
मजा आली
सुरेख!
छान !
एका
असेच म्हणतो!
अरे हे वेगळं आहे लग्न..
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
@ स्वाती दिनेश,
छान लिहिले आहे. आपण च लग्न
आपण च लग्न अटेंड केल्याचा