दादा कोंडके यांचे चित्रपट
मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.
परन्तु त्यानी बनवलेले चित्रपट डीव्हीडी /डाउनलोड या माध्यमातून उपलब्ध नाहीत ,त्याचप्रमाणे मराठी टीव्ही चॅनेल वर देखील दाखवले जात नाहीत . यामागचे कारण नक्की काय आहे? कॉपीराइट संबन्धी किंवा त्यांच्या वारसाहक्कावरून काही वाद असल्याचे मागे ऐकिवात होते . परन्तु अशा कारणासाठी उत्तमोत्तम व सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिन्यापासून जनसामान्य प्रेक्षक वन्चित राहणे योग्य वाटत नाही .
यासंबंधी कोणास माहिती आहे का? व ते चित्रपट डीव्हीडी च्या माध्यमातून किंवा चॅनेलवर लावण्यासन्दर्भात काय करता येइल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दूरदर्शनने (आत्ताच्या
डीव्हीडी मिळतात कि!!!
शाहीरांचे चित्रपट खुप आवडायचे
गावडे साहेब सहमत,
सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,
बोट लावीन तिथे गुदगुल्या