✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'हिंदू' नववर्ष?

ह
हकु यांनी
गुरुवार, 03/31/2016 - 19:01  ·  लेख
लेख
हल्ली पुण्या मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. अत्यंत दिमाखात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पण जागोजागी 'हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा!' असे फलक लावलेले दिसतात. मला असं वाटतं की आपण जर हिंदूच आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवसासाठी 'हिंदू' हे नाव वेगळे का वापरावे लागते? नवीन वर्ष म्हंटले की याचा साहजिक अर्थ गुढीपाडवा हा का असू नये? १ जानेवारी च्या दिवशी आपण 'इंग्रजी नव वर्षाच्या शुभेच्छा ' किंवा 'ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा'असं म्हणतो का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2099 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ही सहा वाक्ये पाडव्याची

एस
गुरुवार, 03/31/2016 - 19:09 नवीन
ही सहा वाक्ये पाडव्याची मिरवणूक निघेल तेव्हा तिच्या संयोजकांना ऐकवा. हाकानाका.
  • Log in or register to post comments

हम्म

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 03/31/2016 - 19:13 नवीन
आरारा टायटलमध्ये हिंदू शब्द असला कि ट्यार्पी दणकून येतोय नै!!:'( पण आता लोक कंटाळलेत
  • Log in or register to post comments

सहमत

अत्रे
गुरुवार, 03/31/2016 - 19:31 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

1 जानेवारी हे पाश्चात्य

विजय पुरोहित
गुरुवार, 03/31/2016 - 19:34 नवीन
1 जानेवारी हे पाश्चात्य नववर्ष असल्याचे अध्याहृतच आहे... त्यामुळे असेल कदाचित
  • Log in or register to post comments

माझे मत

माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 21:20 नवीन
नववर्षांचे सेलिब्रेशन कोणत्याही कॅलेंडरने असोत खरेतर सांस्कृतिक घटना आहेत धर्मसंस्थांना कोणत्यातरी नववर्षा केवळ आपला अधिकार दाखवण्याने प्रत्यक्षात फारसे नुकसानकारक नाही पण डोळसपणा ठेवला तर धर्म आणि संस्कृती यांची जनमानसातील गल्लत टळून सर्वधर्मीय लोक एकमेकांनी साजर्‍या केलेल्या नववर्षात सहभागी होऊ शकतील. गुढी या विषयावर तर मी आतापर्यंत पुरेसा सखोल ऑनलाईन अभ्यास केला आहे आणि काठीपूजा परंपरा विशीष्ट धर्म अथवा विशीष्ट भौगोलीक क्षेत्रापुरत्या मर्यादीत नसून तो एक आदीम मानवा पासून चालत आलेला सांस्कृतीक ठेवा आहे. गुढीला हिंदूंनी स्वतःचे म्हणून एक प्राचीन परंपरा आपलीशी करण्यात गैर नाही, हिंदूंनी ती आपलीशी केली तसे हा मानवी सांस्कृतीक ठेवा इतर धर्मीयांनी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत न करता आपलासा करण्यास काहीच हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रश्न यथोचित आहे.

गामा पैलवान
Fri, 04/01/2016 - 00:50 नवीन
ह्कु, तुमचा हा प्रश्न समर्पक आहे : >> नवीन वर्ष म्हंटले की याचा साहजिक अर्थ गुढीपाडवा हा का असू नये? मात्र याचं उत्तर मला माहीत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

आपण जर हिंदूच आहोत तर

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 03:01 नवीन
आपण जर हिंदूच आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवसासाठी 'हिंदू' हे नाव वेगळे का वापरावे लागते? >>काय हकु साहेब, किती शतकं मारायची आहेत? दंगा पोटेन्शियल वाक्य टाकताय म्हणून म्हटले. बाकी हे नववर्ष शोभायात्रा मिरवणुका मुंबई प्रदेशाचे एकमेव सांस्कृतीक केंद्र डोंबोलीतून सुरु झाल्याची दंतकथा आहे. त्या आधी सर्व महाराष्ट्रात गुडीपाडवाच साजरा केला जायचा. वर्षबदल झाल्याचा आंग्लदेशीय आनंद नवे पंचांग आणणार्‍यांखेरिज बहुतेक कुणाकडे साजरा होत नव्हता. दिवाळीपासून नवा चोपडी लिवायसाठी नयासाल नया धंदा अशी रित होती. आता आ सब फेनेन्सियल यीअरमां गया.
  • Log in or register to post comments

गुढीपाडवा खरंच 'आपलं' नववर्ष

प्रचेतस
Fri, 04/01/2016 - 06:18 नवीन
गुढीपाडवा खरंच 'आपलं' नववर्ष आहे का?
  • Log in or register to post comments

जरा आपणच माहिति दिलित तर बर

संजय पाटिल
Fri, 04/01/2016 - 07:27 नवीन
जरा आपणच माहिति दिलित तर बर होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टंकाळा.

प्रचेतस
Fri, 04/01/2016 - 07:33 नवीन
टंकाळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

+ वण!

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/01/2016 - 08:34 नवीन
+ वण! आपलं नाही तर कुणाचं? ते तरी सांगा .. उगीच कशाला खेळायचा तो टांगा!? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

"हिंदू" नववर्ष

सुनील
Fri, 04/01/2016 - 08:55 नवीन
लेख वाचून असे वाटते की फक्त मराठी, कन्नड, तेलुगु आणि सिंधी मंडळीच तेवढी "हिंदू" म्हणवून घेण्यास पात्र आहेत, कारण ही एवढीच मंडळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवे वर्ष साजरे करतात!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा