सहिष्णुतेचे मीटर - 1

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
27 Mar 2016 - 12:35 pm
गाभा: 

नमस्कार. इथली साहिष्णूतेवरची चर्चा वाचून मला प्रश्न पडला की "सहिष्णुता ही वस्तुनिष्ठपणे कशी मोजता येईल"?

त्यासाठी मी एक सर्वे तयार केला. लिंक ही आहे http://goo.gl/forms/3R7skU5FD5

यात मी सर्वसाधारण पणे लोकांच्या सहिष्णुतेची कसोटी लागू शकेल अशा ५९ गोष्टी निवडल्या. त्यांची ऑर्डर जशी सुचली तशी आहे.


प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला असे सांगायचे आहे की कोणी माणूस (तुमच्या मते) त्यांची निंदा/अपमान करत असॆल, तर तुम्ही काय कराल

प्रत्येक गोष्टीसाठी ७ पर्याय आहेत -

१. क्षाणिक राग यॆउन विसरून जाल

२. ज्याने निंदा/टीका केली त्याला शिव्या द्याल

३. ज्याने निंदा/टीका केली त्याचे तोंड काळे केले / त्याला चप्पल मारली पाहिजे असं वाटेल

४. ज्याने निंदा/टीका केली त्याला जीवानिशी मारले पाहिजे असं वाटेल

५. पोलिसांकडे जाल

६. तो तसे का करत आहे याचा विचार करणार आणि विषय सोडून देणार

७. तुम्हाला काहीही फरक पडत नाही

-----------------------
आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद . पंधरा-वीस प्रतिसाद आले की मी रिझल्ट पब्लिक करतो.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या पण सांगा .

लिंक ही आहे http://goo.gl/forms/3R7skU5FD5

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीबद्दल तुमची जनरल प्रतिक्रिया (७ पैकी) काय असेल हे जाणून घ्यायचे आहे.

PC/LAPTOP वर असाल तर arrow की वापरुन पर्याय निवडता येइल. मोबाईल वर आड्वे scroll करा.

मदर तेरेसांचं नाव राहून गेलं होतं, आता जोड्लं आहे.

उगा काहितरीच's picture

27 Mar 2016 - 6:06 pm | उगा काहितरीच

Width थोडी मोठी करा . एकावेळी पुर्ण पर्याय दिसत नाहीएत. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर लक्षात आलं मला जे पर्याय निवडायचे होते त्याच्या बाजुचे पर्याय निवडल्या गेले होते.

अत्रे's picture

27 Mar 2016 - 7:27 pm | अत्रे

width वाढ्वायचा option सापडत नाहिये गूगल form वर. PC/LAPTOP वर असाल तर arrow की वापरुन उजवीकड्चा पर्याय निवडता येइल. मोबाईल वर आड्वे scroll करा.

सर्वे भरल्याबद्दल धन्यवाद.

उगा काहितरीच's picture

27 Mar 2016 - 11:25 pm | उगा काहितरीच

Laptop वरूनच भरत होतो. व्यवस्थित भरल्या गेला नाही. त्यामुळे कॕन्सल केला. तुमचे धन्यवाद परत घेऊ शकता:-D ;-)

नन्द्या's picture

28 Mar 2016 - 3:41 am | नन्द्या

जेव्हढे दिसले त्यावरून ही सहिष्णुता कुणि आपल्याला बोलले तरच कितपत सहिष्णुता दाखवू शकतो, असा हा प्रश्न असावा असे वाटते.

तर मा़झे असे आहे.
१. बायकोच काहीहि बोलली तर मुकाट्याने ऐकून घेणे या पलीकडे काहीहि करणे शहाणपणाचे होणार नाही.
२. मुले, नातू काही गैर बोलले तर शांतपणे त्यांना सांगावे की हे बरोबर नाही, असे बोलू नको. एक दोनदा सांगून ऐकले नाही तर मात्र जरा कठोर शब्दात, रागावून, सांगावे. मारू नये.
३. ओळखीचे किंवा नेहेमी दिसणारे, लोक जर काही गैर बोलले, तर प्रथम शांतपणे सांगावे की हे असले बोलणे मला अजिबात आवडत नाही, माझ्यासमोर पुनः बोलू नका, नाहीतर मी माझ्या मार्गाने प्रत्युत्तर देईन ते महागात पडेल तुम्हाला. त्यातून क्वचित कधीतरी भेटणारे लोक असतील तर त्यांची संगत टाळावी.
४. अनोळखी कुणि काही बोलले तर संपूर्ण दुर्लक्ष करावे. फार तर परखडपणे सांगावे की तुला काही कळत नाही, सोडून देतो.

हो, बरोबर आहे। बऱ्याचदा आपण असा विचार करतो की त्या व्यक्तीला तसे बोलण्याचा 'अधिकार' आहे का।

प्रतिवाद कराल/ चर्चा कराल्हाअ पर्याय मिळाला नाही. तस्मात आपला पास. आपण तर बुवा चर्चेवर विश्वास ठेवतो. अगदी समोरचा "बबरे तुझे म्हणणे मान्य आहे, पण वाद घालू नको" असे म्हणेपर्यंत.

तो पर्याय टाकणार होतो, पण नेहमीच तसे प्रॅक्टिकली शक्य नसते, म्हणून नाही टाकला। उदा. आपण कुठे जाऊन एम एफ हुस्सेनशी किंवा ओवेसीशी चर्चा करणार...

गॅरी शोमन's picture

28 Mar 2016 - 11:57 am | गॅरी शोमन

जर अदनान सामीला भारताचे नागरिकत्व नेमके त्याच काळात घ्यावेसे वाटत असेल तर सहिष्णुता अपनी चरम सीमा पर है.

असहिष्णुता म्हणण्याचे कारण काही नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Mar 2016 - 12:04 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ही सहिष्णुता कोण?
उत्तर → असहिष्णुतेची सावत्र बहिण



असहिष्णुता वाढली आहे,चार वर्षापुर्वी पाहिली होती तिला,केवढीशीच होती,अजून दातही आले नव्हते:'(

मृत्युन्जय's picture

28 Mar 2016 - 12:10 pm | मृत्युन्जय

आपले पर्याय अपूर्ण आहेत असे वाटते. खालील पर्याय असावेतः

१. आनंद वाटेल
२. हताश वाटेल / दु:ख होइल
३. या व्यक्तीला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे असे वाटेल.

आपले बरेच प्रश्न या ३ कॅटेगरी मध्ये मोडु शकतात. त्यामुळे पर्याय वाढवुन नव्याने मतदान घ्यावे अशी सूचना करतो.

सुचनेबद्दल धन्यवाद। दुसरा, तिसरा मुद्दा समजला, पण आनंद वाटेल चा संबंध कसा?

अशा अजून सूचना आल्या तर बरं होईल सुधारित सर्वे काढायला। विचार करतो।

मम्बाजी सर्वज्ञ's picture

29 Mar 2016 - 2:19 pm | मम्बाजी सर्वज्ञ

अहो एवढी मोठी लिस्ट टाकून आमच्या 'सहिष्णुतेचा' अंत बघताय काय?
[:-)]

अत्रे's picture

29 Mar 2016 - 5:01 pm | अत्रे

हाहाहा..

आता काय करावे। लोकांना १०० श्रद्धास्थाने असल्याने तर लिस्ट पण तेवढीच वाढली। जितकी श्रद्धास्थाने कमी तितका डोकं थंड राहायची जास्त शक्यता!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

29 Mar 2016 - 6:59 pm | मम्बाजी सर्वज्ञ

बुल्झ आय!!!
सर्वेचा 'निकाल' लावा लवकरात लवकर. उत्सुकता जास्त ताणु नका.
अवांतर : कल्पना आवडली. मला वाटते आमिर वगरे लोकांना पण लिंक पाठवायला हवी. नाहीतरी लोकांना विजा देऊ नका म्हणून सह्या करायला मोकळे असतातच ते....

धन्यवाद। निकालाची लिंक खाली सापडेल।

अत्रे's picture

29 Mar 2016 - 5:44 pm | अत्रे

आलेल्या प्रतिसादांची आकडेवारी इथे पाहू शकता. हे पेज अपडेट होईल अजून कोणी सर्वे भरला की.

https://docs.google.com/forms/d/1Ym6mEJ-xWzUqAJS_8yvlzzV1VeJ-cDT_jnCZLm1...

यातून काही निष्कर्ष निघतात का याचा मी विचार करतो.

आपणापैकी कोणी याचे विश्लेषण कोणी करू इच्छित असेल किंवा कोणाला 'वैयक्तिक "सहिष्णुतेचे मापन" कसे करावे' याविषयी काही सूचना असतील तर त्या सांगाव्यात. धन्यवाद. :)

'तो तसे का करतोय ह्याचा विचार करणार आणि सोडून देणार' आणि 'काही फरक पडत नाही' वाले कॉन्स्टंट आहेत सगळीकडे.
.
.
आमचा निष्कर्ष : हेच होणार, अजून काय?

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 2:02 am | तर्राट जोकर

हा हा हा, सही पकडे अभ्याभौ. लोक हिथंच लठ्ठम् लठ्ठी करणार. अ‍ॅक्चुअलमदे 'मला काही फरक पडत नाही' हाच अ‍ॅटीट्र्युड दिगंत. =))

सध्याचे तन्मय भट प्रकरण पाहता या सर्वेमधे सचिन आणि लता यांना समाविष्ट केले पाहिजे होते असे वाटत आहे!