निबंध लिहा...

'पिंक' पॅंथर्न's picture
'पिंक' पॅंथर्न in काथ्याकूट
24 Mar 2016 - 7:07 am
गाभा: 

निबंध लिहा...

मी " अमेरिकाचा अध्यक्ष झालो तर.... "

मी खरंच काय करील याचा एक उपापोह. ..

उदा..

मी प्रथम रशियाचे सैन्य पुन्हा सिरिया मधे बोलवेल...

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

24 Mar 2016 - 7:10 am | कविता१९७८

तुम्हीच लिहा आणि आम्हाला वाचु द्या

'पिंक' पॅंथर्न's picture

24 Mar 2016 - 7:23 am | 'पिंक' पॅंथर्न

आमचं तेव्हढं ज्ञान नाय हो.. म्हणुन तुम्हाला विचारतोय. .. म्हणजे परिक्षेत "कॉपी" करायला. !!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2016 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

हुंबबबबब!
हाहा
हुस

'पिंक' पॅंथर्न's picture

24 Mar 2016 - 7:16 am | 'पिंक' पॅंथर्न

काय झालं .. लगीच दम लागला !!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2016 - 9:04 am | अत्रुप्त आत्मा

णै!
यास निरर्थक स्वात्म'कुंथन म्हणतात! ;)

राजाभाउ's picture

25 Mar 2016 - 11:03 am | राजाभाउ

१ नंबर

१० वीत ३५ गुण मिळाले होते.आम्हि काय निबंध लिहणार!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2016 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा

नाईईईईईईईई!!!!!!!
किच्चु ताई तुला येईल,लिव तू!

साहना's picture

24 Mar 2016 - 8:45 am | साहना

- गांजाचे कायदेशीर करण
- War On Drugs बंद
- मिनिमम वेज कायदा काढून घेणे
- Libertarian जज ची नेमणूक
- ओबामा केर कायदा रद्द
- उच्च शिक्षणाला देण्यात येणारी सर्व सबसिडी बंद. फक्त सार्वजनिक विद्यापिठांनाच ग्रांट.
- IRS बंद
- शाळां साठी Voucher पद्धती
- बंदुक विकत घेणे सुटसुटीत करणे
- Cilvil Liberties कायदा करून NSA वाल्यांची स्नूपगिरी बंद करणे
- इराक, अफगाणिस्तानातून तत्काळ माघार
- युरोप वाल्यांनी आपल्या सुरक्षे चा खर्च स्वतः करावा
- साखर वाले आणि गहुवाल्याना सबसिडी बंद
- CPS वाल्यांचे पंख छाटणे
- कॉमन कोर बंद

थोडक्यांत काय तर रेंड पोल ने जे केले असते ते सर्व काही.

PS : हिलरी क्लिंटन ला जेल मध्ये आरामदायी शय्या

गॅरी ट्रुमन's picture

27 Mar 2016 - 10:46 pm | गॅरी ट्रुमन

तुम्ही इन जनरल मध्याच्या बर्‍याच उजवीकडचे (कदाचित लिबर्टेरिअन) दिसता. माझे हे अनुमान चुकीचे असल्यास जरूर दाखवून द्या. मी पण बर्‍याच अंशी उजवाच आहे पण लिबर्टेरिअन नक्कीच नाही.

तरीही तुमच्या यादीतील काही मुद्द्यांना साजेसे असे दोन व्हिडिओ इथे डकवत आहे. हे दोन्ही व्हिडिओ अर्थतज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रिडमन यांचे आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ड्रग्जचा धंदा कायदेशीर करावा याविषयीचे मत ते मांडतात आणि दुसर्‍या व्हिडिओमध्ये उच्चशिक्षणावर सरकारने खर्च करू नये असे मत ते मांडतात.

मला मिल्टन फ्रिडमन यांचे बरेचसे विचार पटत असले तरी हे दोन विचार मात्र अजूनही हजम झालेले नाहीत. अशा मोठ्या लोकांचे विचार पटणे आणि पचणे तितकेसे सोपे नसते.

पहिला व्हिडिओ:

दुसरा व्हिडिओ

बोका-ए-आझम's picture

27 Mar 2016 - 11:42 pm | बोका-ए-आझम

असं मी म्हणेन. जागतिक मंदीची केन्सप्रणित कारणंही फ्रीडमनना मान्य नव्हती. त्यांच्या मते मंदीवर अर्थपुरवठा वाढवणे -:थोडक्यात नोटा छापणे हा एकमेव उपाय होता. बेकारीला ते तात्पुरती अवस्था मानत होते - केनेशियन सिद्धांतांना मिळालेलं यश बघूनसुद्धा. मला तर वाटतं की आपली मतं कोणीही मानणं शक्य नाही हे समजल्यामुळेच फ्रीडमन कधीकधी टोकाच्या आर्थिक सुधारणा सुचवत असत. आजच्या बिटका‌ॅईन्सची इंटरनेटप्रणित अर्थव्यवस्था फ्रीडमनना आवडली असती असं वाटतं.

गॅरी ट्रुमन's picture

28 Mar 2016 - 12:32 am | गॅरी ट्रुमन

याविषयी थोडे वेगळे:

फ्रिडमन हे बऱ्याच अंशी अतिरेकी उजवे होते हे मान्य. पण

जागतिक मंदीची केन्सप्रणित कारणंही फ्रीडमनना मान्य नव्हती.

मंदीविषयीचे त्यांचे मत वेगळे होते. त्यांच्या मते जितक्या वेगाने अर्थव्यवस्था वाढणार आहे तितक्याच वेगाने अर्थपुरवठा वाढवावा म्हणजे मंदी येणार नाही. म्हणजे अर्थव्यवस्था दरवर्षी ५% ने वाढणार असेल तर दरवर्षी ५% ने अर्थपुरवठा वाढवावा. त्यापेक्षा कमी वेगाने अर्थपुरवठा वाढविल्यास किंमती कमी होऊन deflation येईल आणि त्यातूनच मंदी येईल. १९२९ ची महामंदी अमेरिकन फेडने अर्थपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर कपात केल्यामुळे आली हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे आणि त्यात तथ्यही आहे.आणि तसेच 'Inflation is always a monetary phenomenon" हे त्यांचे प्रसिध्द वक्तव्य आहेच. म्हणजेच फ्रिडमनच्या मते अर्थपुरवठा नियंत्रित केल्यास मंदीही येणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर महागाईही वाढणार नाही.

केन्सच्या मते मंदी आणि महागाई या दोन गोष्टी एकत्र येऊच शकणार नाहीत. पण १९७० च्या दशकात नेमके तसेच घडले. यालाच stagflation म्हणतात. केन्सच्या धोरणांमध्ये stagflation ला उपाय नाही कारण असे काही होऊ शकते हेच मुळात केन्सला मान्य नव्हते. अशावेळी मिल्टन फ्रिडमनच्या धोरणांप्रमाणे फेडचे संचालक विलिअम मिलर आणि पॉल व्होल्कर यांनी अर्थपुरवठा कमी केला आणि महागाईवर नियंत्रण मिळवायला सुरवातीला अधिक मंदीचा कडू घोट दिला. १९८० च्या निवडणुकांमध्ये अध्यक्ष जिमी कार्टर यांचा रॉनाल्ड रेगन यांनी दणदणीत पराभव केला. सद्यकालीन अध्यक्षाचा इतका दणदणीत पराभव व्हायची मला वाटते ही "न भूतो" अशी वेळ होती (नक्की तपासून बघायला हवे). अध्यक्ष कार्टर यांच्या पराभवामागे या आर्थिक कारणांचा वाटा मोठा आहे.

बेकारीला ते तात्पुरती अवस्था मानत होते

नाही बेकारीला तात्पुरती अवस्था मानणारे क्लासिकल इकॉनॉमिस्ट (अ‍ॅडम स्मिथ, रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल यांच्या प्रभावाखालचे). फ्रिडमन बेकारीला तात्पुरती अवस्था मानत नव्हते. केन्सच्या मते ०% बेकारी आणता येणे शक्य होते. त्यासाठी सरकारने गरजेप्रमाणे अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करून Aggregate Demand वाढविणे गरजेचे होते. १९५८ मध्ये याविषयी विलिअम फिलिप्स यांची महागाई आणि बेकारी यांच्यातील संबंध दाखविणारी ’फिलिप्स कर्व्ह’ आली. त्यावर फ्रिडमन (आणि फेल्प्स) यांनी बेकारी ०% करता येणार नाही तर कोणत्याही अर्थव्यवस्थेत बेकारीचा एक नैसर्गिक दर असतो (Natural Rate of Unemployment) त्यापेक्षा बेकारीचा दर फार काळ कमी ठेवता येणार नाही असे फ्रिडमनचे मत होते.

केनेशियन सिद्धांतांना मिळालेलं यश बघूनसुद्धा

वर म्हटल्याप्रमाणे १९७० च्या दशकाच्या पूर्वीपर्यंत केन्सच्या सिध्दातांनाच प्रमाण मानले जात होते. पण १९७० च्या दशकातील stagflation चा मात्र हे सिध्दांत खुलासा करू शकले नाहीत.

मला तर वाटतं की आपली मतं कोणीही मानणं शक्य नाही हे समजल्यामुळेच फ्रीडमन कधीकधी टोकाच्या आर्थिक सुधारणा सुचवत असत.

फ्रिडमनपेक्षाही फ्रेडरीक हायेक आणि व्हॉन मिसस हे अधिक टोकाचे उजवे होते. कदाचित त्यांच्याविषयी असे म्हणता येईल. फ्रिडमन आपली मते कोणीही मानणे शक्य नाही या कारणामुळे टोकाची मते मांडत असत असे वाटत नाही. वर म्हटल्याप्रमाणे मिलर आणि व्होल्कर यांनी फ्रिडमनचीच धोरणे अंमलात आणली होती. तसेच अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांच्यावर आर्थर लाफर यांच्याप्रमाणेच फ्रिडमनचाही प्रभाव होता.

या विविध अर्थतज्नांची मते आणि ज्याला History of Economic Thought म्हणता येईल यावर मिपावर काहीतरी लिहावे असे फार वाटते. ते कधी शक्य होते ते बघू.

बोका-ए-आझम's picture

28 Mar 2016 - 1:41 am | बोका-ए-आझम

ही अशी लेखमाला लिहाच. मला वाटतं केन्सच्या आर्थिक विचारांमध्ये stagflation चा अंतर्भाव नसण्याचं कारण त्यांनी सर्वंकष मागणी किंवा aggregate demand ला दिलेलं महत्व आणि supply creates its own demand या J.B. Say च्या सिद्धांताला दिलेला छेद. केन्सच्या विचारांमध्ये सर्वंकष पुरवठा किंवा aggregate supply हा नेहमीच aggregate demand वर अवलंबून असेल. किंबहुना उत्पादन हे मागणीच्याच आधारे होईल,त्यामुळे जेव्हा बेकारी येईल तेव्हा मागणीही कमी होईल. आणि त्यामुळे उत्पन्न कमी होईल. परिणामी परत मागणी कमी होऊन बेकारी येईल. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर सरकारी हस्तक्षेप करुन मागणी वाढवावी लागते,ज्याला priming the pump हा शब्दप्रयोग केन्सनी वापरलेला आहे.
१९७० च्या दशकात आलेली बेकारी ही ओपेक (Organization of Petroleum Exporting Countries) राष्ट्रांनी अचानक वाढवलेल्या इंधनाच्या किंमतींमुळे उत्पादनखर्च अफाट वाढल्यामुळे आलेली होती. पण अमेरिकेसकट सर्व देशांनी बेकारीच्या supply side कारणांकडे न बघता सरकारी खर्च वाढवला. पण कारणच वेगळं असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. उलट वित्तीय तूट वाढली, महागाई वाढली आणि उत्पादन कमी झालं. त्यालाच stagflation म्हणतात. Cost push inflation + Stagnant Output is Stagflation.
मला वाटतं रीगन आणि थॅचर यांनी अशा वेळी आवश्यक असणारी खाजगीकरण आणि सरकारी खर्च कमी करणारी, त्याचप्रमाणे कर कमी करुन लोकांना आणि उत्पादकांना अनुक्रमे उपभोग आणि उत्पादन हे दोन्हीही वाढवायला प्रवृत्त करणारी अर्थव्यवस्था अाणायचा प्रयत्न केला. त्याला अर्थातच डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी प्रचंड विरोध केला. चूभूद्याघ्या पण ही नीती Supply side Economics म्हणून ओळखली जाते. डाव्या विचारांप्रमाणे ही नीती समानतेच्या किंवा प्रागतिकतेच्या विरोधात आहे कारण ती प्रत्यक्ष कर कमी करते, परिणामी सरकारला महसुलासाठी अप्रत्यक्ष करांवर जास्त अवलंबून राहावं लागतं आणि ती प्रतिगामी (regressive) पद्धत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

28 Mar 2016 - 9:47 am | गॅरी ट्रुमन

या धाग्यावर खूप विषयांतर होईल म्हणून उत्तर इथे न लिहिता तुमच्या खरडवहीत लिहित आहे.

आनन्दा's picture

29 Mar 2016 - 2:38 pm | आनन्दा

नवीन धागाच काढा नाअ त्यापेक्षा.. आम्हाला पण वाचायला मिळेल.

साहना's picture

29 Mar 2016 - 10:53 pm | साहना

मी Libertarian आहे. मिल्टन फ्रीडमन ह्यांची पुस्तके आणि व्याख्याने मी अनेकदा वाचली आणि पहिली आहेत. सध्या थोमास सोवेल आणि Walter Williamस त्यांचा वारसा छान पणे चालवताना दिसतात. पत्रकारितेत John Stossel Libtertarian मुद्दे छान पणे मांडतात.

पहिल्या Video मधील त्यांची मते आता बहुटेल ठिकाणी सर्वमान्य होताना दिसत आहेत. ंगांजाचे कायदेशीरकरण जगभर वेगाने होत आहेच पण इतर हार्ड अमली पदार्थांना असलेले गुन्हेगारी वलय काढण्यासाठी अनेक देश पुढाकार घेत आहेत. अर्थांत मिल्टन ह्यांची मते १००% कुठल्याही राजसत्तेला मान्य होतील असे मला वाटत नाही पण किमान गांजा च्या बाबतीतील त्यांची मते सर्वमान्य (policy makers) झाली आहेत असे वाटते.

दुसर्या video मधील मत जास्त वादग्रस्त आहे पण त्यांच्या ह्या मताशी मला नेहमीच सहानभूती वाटत राहिली आहे. काही लोकांना ते मत पटत नाही आणि का पटत नाही हे मी समजू शकतो पण मिल्टन ह्या बाबतीत सुद्धां बरोबर आहेत असे मला वाटते. पण त्या साठी student loan बबल फुटण्या पर्यंत वेळ पहावी लागेल कदाचित.

अन्नू's picture

24 Mar 2016 - 10:09 am | अन्नू

किती मार्कासाठीचा प्रश्ण म्हणायचा? :/

उगा काहितरीच's picture

24 Mar 2016 - 10:35 am | उगा काहितरीच

१)मागेल त्याला काम,काम तसे(च) दाम.
२)पाणी, विज, इंटरनेट, देशांतर्गत पब्लिक ट्रान्सपोर्ट या सोयी ना नफा ना तोटा या तत्वावर सर्वांसाठी. (फुकट बिलकुल नाही)
३)प्राथमीक शिक्षण फुकट (सर्वांना अनिवार्य)
४)त्यापुढील शिक्षण नाममात्र शुल्क.
जाउद्या बस झालं... हामेरीका काळी का गोरी हे पाहीन मग अजून लिहीन..

विशाखा पाटील's picture

24 Mar 2016 - 11:32 am | विशाखा पाटील

आधी तुम्ही डेमोक्रॅटिकचे की रिपब्लिकनचे ते सांगा. त्यातही उजवीकडचे, डावीकडचे की मधले ते सांगा. झालंच तर, तुम्ही अध्यक्ष झाल्यावर कॉंग्रेस कुणाच्या ताब्यात आहे ते पण बघून घ्या. मग काय करायचे ते ठरवता येईल.

रातराणी's picture

25 Mar 2016 - 12:46 am | रातराणी

फारच अवघड आहे विषय. माझा आवडता पक्षी/प्राणी, माझी शाळा, मी सर्कशीतला वाघ/हत्ती/सिंह बोलतोय असे काही विषय द्या मग बघा ;)

'पिंक' पॅंथर्न's picture

25 Mar 2016 - 2:14 am | 'पिंक' पॅंथर्न

साधारण ३५ मार्कांचा प्रश्न आहे.. बघा पास होताय का ??

'पिंक' पॅंथर्न's picture

25 Mar 2016 - 2:23 am | 'पिंक' पॅंथर्न

"साहना "...

अशिच उत्तरं अपेक्षीत.

धन्यवाद...!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2016 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी " अमेरिकाचा अध्यक्ष झालो तर.... "

मी खरंच काय करील याचा एक उपापोह. ..
उदा..
मी प्रथम रशियाचे सैन्य पुन्हा सिरिया मधे बोलवेल...

अध्यक्ष अमेरिकेचा. सैन्य रशियाचं. युद्धभुमी सिरिया. =)) ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. लैचं पावरफुल (किंवा लैचं लब्बाड) अध्यक्ष लागेल.

पैसा's picture

25 Mar 2016 - 9:51 am | पैसा

नाय लिहीत ज्जा!

इरसाल's picture

25 Mar 2016 - 10:59 am | इरसाल

असं नाय कराचं, लिव तु निबंद, १५ पैकी सताठ मार्क मिळत्यालच मिळत्याल, तवढच ३५ जवळ पोच्तो मानुस.

सस्नेह's picture

25 Mar 2016 - 10:30 am | सस्नेह

माझा पेन गुर्जींनी पळवला...!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2016 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-041.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Mar 2016 - 12:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी अमेरिका भारतात विलिन करुन टाकेन व अमेरिकेची ही झटपट प्रगती व्हावी म्हणून लालुप्रसाद यादव यांना अमेरिकेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करेन.

पैजारबुवा,

भरत्_पलुसकर's picture

26 Mar 2016 - 10:59 am | भरत्_पलुसकर

लिहतो की. बक्षीस काय हाय का नुसता कागदाचा चिटोरा देणार हाय?

वेल्लाभट's picture

29 Mar 2016 - 12:05 pm | वेल्लाभट

अच्छा.....