✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तू

आ — आनंदमयी, Sun, 02/28/2016 - 19:50
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला तू चांदवा निशेच्या केसात माळलेला तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा तू साद अंतरीची देहा सुखावणारी तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा तू नाद गुंजणाऱ्या ह्या सोनसाखळीचा रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली मी एकली धरेशी तू स्तब्ध ध्रूव दूर तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे © अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
2592 वाचन

💬 प्रतिसाद (13)

छान आहे

एकप्रवासी
Sun, 02/28/2016 - 23:00 नवीन
छान आहे...
  • Log in or register to post comments

वाह

एक एकटा एकटाच
Mon, 02/29/2016 - 06:59 नवीन
वाह
  • Log in or register to post comments

मस्त! पुन:पुन्हा वाचणार.

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/29/2016 - 08:18 नवीन
मस्त! पुन:पुन्हा वाचणार.
  • Log in or register to post comments

खासच !

माहितगार
Mon, 02/29/2016 - 10:12 नवीन
खासच !
  • Log in or register to post comments

धन्यवाद... :)

आनंदमयी
Mon, 02/29/2016 - 12:51 नवीन
धन्यवाद... :)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर!

प्राची अश्विनी
Mon, 02/29/2016 - 13:48 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर!
  • Log in or register to post comments

मस्त.....खूपच आवडली.

निशदे
Mon, 02/29/2016 - 22:56 नवीन
मस्त.....खूपच आवडली.
  • Log in or register to post comments

:) :) धन्यवाद...

आनंदमयी
Tue, 03/01/2016 - 00:28 नवीन
:) :) धन्यवाद...
  • Log in or register to post comments

भारीच्च! खूप आवडली!

अमृता_जोशी
Tue, 04/05/2016 - 00:05 नवीन
भारीच्च! खूप आवडली! अवांतर: मिपावर कवितांना हवी तितकी वाहवा का मिळत नाही?
  • Log in or register to post comments

धागा जाहीरात

माहितगार
गुरुवार, 04/07/2016 - 15:30 नवीन
अवांतर: मिपावर कवितांना हवी तितकी वाहवा का मिळत नाही?
आपण विषय काढला आहेत तर आम्ही आमची धागा जाहीरात करुन घेतो. :) "मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

लयबद्ध आहे. मस्तच.

उल्का
गुरुवार, 04/07/2016 - 15:16 नवीन
लयबद्ध आहे. मस्तच.
  • Log in or register to post comments

oh my my!!!

अपरिचित मी
गुरुवार, 04/07/2016 - 15:50 नवीन
अप्रतिम!!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

चाणक्य
गुरुवार, 04/07/2016 - 16:09 नवीन
नेहमीप्रमाणेच नादमय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा