ये ग गाई गोठ्यामध्ये

खालीमुंडी पाताळधुंडी's picture
खालीमुंडी पाताळधुंडी in जे न देखे रवी...
24 Feb 2016 - 2:36 am

ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये
बाळाची वाटी,मांजर चाटी
मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने
वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते
एक पोळी करपली,दूधासंगे वरपली
दूध झाले कडू,बाळाला आले रडू

बालगीत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 9:07 am | टवाळ कार्टा

अलेले अलेले...अच्च जालं तल

सनईचौघडा's picture

24 Feb 2016 - 9:11 am | सनईचौघडा

या मिपावर स्वागत , किती गोड !

टक्या तुला कळत नाही ते एक दिवसाचे बाळ आहे.

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 9:13 am | टवाळ कार्टा

आवडीनिवडी
इथे लिहण्यासारख्या नाहीत.

आणि बाळ???? =))

कोण रे ते, आमच्या टक्कूमक्कूशोनुला स्पर्धा करतंय ? अं घालू एक पाठीत धम्मक लाडू ?
की हवाय तुला एक गुच्चा

;) ह. घे. टक्या

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 12:52 pm | बोका-ए-आझम

या मिपावर स्वागत

अशा किती मिपा आहेत?;)

चाणक्य's picture

24 Feb 2016 - 9:11 am | चाणक्य

अतिशय आशयघन.

जेपी's picture

24 Feb 2016 - 9:17 am | जेपी

वाघमामा--अस्वल मामी??
इंटरकाष्ट??

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Feb 2016 - 11:39 am | खालीमुंडी पाताळधुंडी

अल्लेच्या पकडलत कि!!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2016 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

ये रे फोटू पांडूशॉप मधे..

Calling खाटूक... ;) to पाड विडंबन! =))

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 9:41 am | प्रचेतस

:)

अतिशय आशयपूर्ण वास्तववादी कविता _/\_

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 11:46 am | बोका-ए-आझम

;)

अजया's picture

24 Feb 2016 - 11:48 am | अजया

;)

चांदणे संदीप's picture

24 Feb 2016 - 11:24 am | चांदणे संदीप

इथे इथे बस रे मोरा पण टाका ना खामुपाधु भाऊ/तै!

:)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Feb 2016 - 11:37 am | खालीमुंडी पाताळधुंडी

इथं इथं बच(बस) ले(रे) मोला(मोरा),चाला(चारा) खा पाणी पी,भुल्लऽऽऽ(भुर्रऽऽऽ) उडून जा.

(आणखी कोणाला आठवत असतील तर टाका,असच आपलं जुन्या आठवणी)

--खाली मुंडी पाताळ धुंडी

अरे कर्मा!
(कपाळावर हात मारायची स्मायली)

खामुपाधु उबा तायला, आमी नाय पायला

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 11:48 am | बोका-ए-आझम

वाटी चाटल्यानंतरही मांजर रागाने का गेलं? नक्कीच शिवसेनेचं असणार. ;)

शिवसेनेच्या मांजराला वाघ कशाला खाईल?
बहुतेक कणकवलीचे किंवा येवल्याचे असेल. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2016 - 12:50 pm | अत्रुप्त आत्मा

@कणकवलीचे किंवा येवल्याचे असेल. ;) >> नै! डोंबिवली जवळच्या ठाकुर्लीचं!

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 12:54 pm | बोका-ए-आझम

भांडं लपवल्याने रागावून गेलं असणार!;)

पगला गजोधर's picture

24 Feb 2016 - 11:54 am | पगला गजोधर

मांजर रेल्वेइंजीनातून बसून गेलंय का ?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Feb 2016 - 12:17 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मांजराने वाटीच्या बाहेरचा भाग चाटला असावा=))

नाखु's picture

24 Feb 2016 - 12:18 pm | नाखु

भावानुवाद

ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये

आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्‍या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे

बाळाची वाटी,मांजर चाटी

अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य

मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने

जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय.

वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते

कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात.

एक पोळी करपली,दूधासंगे वरपली

श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की.

दूध झाले कडू,बाळाला आले रडू

अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !

खादीतली गुंडी घड्याळ धुंडी

यशोधरा's picture

24 Feb 2016 - 12:26 pm | यशोधरा

आत्ता समजली कविता!

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम

ह्यो इमोसनल अत्याचार सहन नाय होत आता!

खेडूत's picture

24 Feb 2016 - 1:02 pm | खेडूत

अता समजली! :)

डॉक्टर्साहेब रसग्रहणाला हल्ली येत नाहीत ते.
अता पैजार् बुवांची वाट पहाणं आलं- एका विडंबनासाठी.

आणि लगेचच विडंबन लिहिले होते....
या हो बाई वाड्या मधे.......
पण ते इकडे टिकेल की नाही याची शंका आली म्हणुन टाकाले नाही.

(पूर्वी चे मिपा राहिले नाही आता)

पैजारबुवा,

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 3:35 pm | बोका-ए-आझम

;)

नाखु's picture

24 Feb 2016 - 3:53 pm | नाखु

पाठविणे...

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 5:43 pm | टवाळ कार्टा

मलापण

जेपी's picture

24 Feb 2016 - 5:45 pm | जेपी

मला ही

पीके's picture

25 Feb 2016 - 7:01 am | पीके

मला मला पन....

आदूबाळ's picture

24 Feb 2016 - 8:25 pm | आदूबाळ

मी खरं तर तुमचाच प्रतिसाद शोधत होतो. अगदी विडंबन नाही तरी रसग्रहण वाचायला मिळेलसं वाटत होतं. पण तुम्ही तर फुलटॉसवर लेटकट मारलात...

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Feb 2016 - 1:51 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

लै भारी.

भिंगरी's picture

24 Feb 2016 - 5:22 pm | भिंगरी

वाघमावशी करते पोळ्या
बाळाला देते शिळ्या शिळ्या

बापरे! चांदोबा चांदोबा भागलास का पण आहे.

एस's picture

24 Feb 2016 - 8:18 pm | एस

हे बालगीत नसून अंगाईगीत आहे. मिपावर अंगाईगीत असा प्रकार निवडता यायला हवा लेखन करताना, अशी मी तांत्रिक समितीकडे मागणी करीत आहे.

कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं कुंड निवडता येतं तसं का?

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 10:46 pm | टवाळ कार्टा

कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं कुंड यांचा गर्भीत अर्थ काय आहे ओ? :)

दोन्ही वेगवेगळे लेखनप्रकार आहेत.

बाकी "गर्भित" अर्थ ही फ्रॉईडियन स्लिप आहे का? ;)

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2016 - 11:19 am | टवाळ कार्टा

येस्सार =))

याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला होता. शेवटी, ती बाई, "काय काम धाम नाही का? आलं काही की लागले ऐकायला? तुमचं वय काय ? तुम्ही ऐकता काय? असे काहीतरी म्हणून चीडवायची."