शब्द का नाहीसे होतात
गाभा
माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे. कदाचीत खरे असेल किंवा त्यात इतर भाषेतले शब्द आले असतील. तसाच एक शब्द त्याने पुनर्जीवित केला तो म्हणजे पाठशाला. गेले कित्येक वर्षे हा शब्द वापरात नव्हता तो वापरात आला तो मस्ती की पाठशाला या गाण्यामुळेच.
मागे एका कार्यक्रमात संदीप खरे कविता वाचत असताना गवाक्ष हा शब्द आला. त्याने थांबून गवाक्ष म्हणजे खिडकी असे समजावून सांगितले. आज गवाक्षचा अर्थ सांगावा लागतो. माझ्या माहीतीप्रमाणे हा शब्द बोलीभाषेत फारसा नव्हता परंतु पूर्वीच्या कवितांमधे मात्र हा शब्द बऱ्याचदा असायचा. कदाचित वृत्तबंध कवितांमधे मात्रा वगेरेसाठी उपयोगी पडत असावा. आज मात्र त्या शब्दाचा साहीत्यातला वापर कमी झाला आहे. मुक्तछंद कवितांमधे खिडकी हा शब्द वापरणे जास्त सोयीस्कर वाटत असेल किंवा मीटरमधे बसवताना कडकीला खिडकीच जोडने योग्य वाटत असेल. माझी आज ‘कवाड लाव’ म्हणायची. लहाणपणी आम्ही तिच्या कवाड या शब्दाला हसायचो. मोठे झाल्यावर कळले मनाची कवाडे उघडे ठेवा हे म्हणणे कसे काव्यात्मक असते ते. आज मात्र कवाड हा शब्द गावाकडे पण फारसा वापरला जात नाही सारेच दार हाच शब्द वापरतात. आमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनी टोकून टोकून लोकांना दार असे म्हणायला भाग पाडले असेल. आजीचा आणखीन एक शब्द म्हणजे कडत. गरम पाण्याला कडत पाणी म्हणायची. आज हा शब्दही लुप्त झाल्यासारखाच आहे.
हे फक्त मराठी हिंदीततच होते असे नाही तर इंग्रजीत सुद्धा असे घडते. ‘Thou too Brutus’ असे आजही जरे म्हटले जात असले तरी व्यवहारी असो किंवा साहीत्यिक इंग्रजी दोन्ही मधून ‘Thou’ हा शब्द केंव्हाच लुप्त झालेला आहे. आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रात वापरल्या जानाऱ्या इंग्रजीवर अमेरीकन भाषेचा इतका प्रभाव आहे की त्यामुळे आज कॉर्पोरेट जगतातून ‘Gentlemen ’ हा शब्दही नाहीसा होतो की काय अशी भिती वाटते. जो तो ‘Guys, Folks’ करीत असतो.
शब्द लुप्त का होतात? किंवा विस्मृतीत का जातात? इतर भाषेतले शब्द घेउन भाषा समृद्ध होत जाते किंवा कालाय तस्मै नमः ही जरी ढोबळ कारणे असली तरी मला वाटते प्रत्येक शब्द वापरातून नाहीसा होण्यामागे त्या शब्दाशी संबंधित काही खास कारणे असावीत. जसा प्रत्येक शब्दाच्या उत्पत्तीची काही खास कारणे असतात तशीच त्याच्या नाहीसे होण्यामागेही असावीत. तेंव्हा जाणकारांनी शब्द वापरातून का नाहीसे होतात? खरच काही खास कारणे असतात का? शब्दाचे संदर्भ संपतात का? यावर प्रकाश टाकावा. तसेच अशा विस्मृतीत गेलेल्या किंवा विस्मृतीत जाऊ शकनाऱ्या इतर अनेक शब्दांची उदाहरणे दिली तर उत्तमच.
मित्रहो
https://mitraho.wordpress.comवर्गीकरण
प्रतिक्रिया
कडत
हो
कढवणे
+१ धाग्याचा विषय छान आहे.
बादवे, कढत पेक्षा ही गरम ला
माझी आज्जी "कढत", "ऊन" आणि
अगदी!
कढवणे
पुस्तकी भाषेत नव्हते, नव्हे
नव्हते
खूप मस्तं विषय आहे. छान
उंबरा
उंबरा
अजून काही
थोडी दुरुस्ती
खरबुज
शेंदाड
मांसाहारी पद्धतीतले शब्द
राही जी यावर विलास सारंग याचा एक सुंदर लेख आहे
विलास सारंग
जबरदस्त प्रतिसाद!
काय मस्त लिहीता हो ताई तुम्ही.
अत्यंत सुंदर मार्मिक प्रतिसाद
शब्द - संदर्भ
आवडलं आणि पटलं.
संदर्भ
परीट
"बाजार" हा सुद्धा अमराठी
शब्द लुप्त होतात आणि नवे जन्माला येत असतात.
झगा
डगला !
झगा = स्कर्ट
जे शब्द आपण सतत ऐकतो
लहानपणी जेव्हा इंग्रजी 'वॉशर'
सुंदर धागा विषय आवडला
शब्द आणि संस्कृती
भाषेचे संक्रमण
अंघोळीचे गरम पाणी थोडे थंड
याबरोबरच फ्लॉपी डिस्क, (होय
आणखी काही शब्द
गवाणी म्हणजे दावणी च ना
नाही गवाणी म्हणजे गुरांच्या
हा तेच त्या जागेला आमच्या
दावणीतला बैल
त्यावरुनच तर
डॉग इन द मॅन्जर
+१ अगदी
गवाणी
दावणी
अगदी