✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्राची लोकयात्रा

म
माहितगार यांनी
Sat, 12/26/2015 - 13:54  ·  लेख
लेख
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) यांची मराठी विकिपीडियावर सध्या नमुद ओळखीनुसार ते मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. २०१५ साली पंजाब मधील घुमान येथे २०१५ साली झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे साप्ताहीक सकाळमध्ये महाराष्ट्राची लोकयात्रा नावाचे सदर चालू आहे. ते मी अधून मधून वाचत असतो. बरीच माहिती मिळते. हा घागा लेख काढण्याचा उद्देश त्यांच्या लेख मालेतील मागच्या लेखात "2 मे 1980 या दिवशी "दीनबंधू'च्या नव्या स्वरूपातील पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला." ... "अखेर एप्रिल 1980 मध्ये "दीनबंधू' बंद झाले." ... असे उल्लेख आले आहेत जे प्रथमदर्शनी कालसुसंगत नसण्याची साशंकता वाटते या बद्दल जाणकारांकडून माहिती हवी. (डॉ.मोरेंना त्यांच्या रेडिफमेलवर मेल पाठवीले पण अद्याप उत्तर नाही आले) अशा चुका राहुन गेल्या की त्या ज्ञानकोशातही कधीकाळी पोहोचू शकतात म्हणून अशा सदरांचे वाचन आणि चर्चा जरूरी आहे असे वाटते. चर्चेत सहभागासाठी आभार.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1024 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा