सालसा कसा करावा?

वेताळ's picture
वेताळ in पाककृती
10 Sep 2008 - 6:22 pm

जाणकार माहिती सचित्र देतील तर बर होईल.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

10 Sep 2008 - 6:48 pm | प्रियाली

नावाच्या पदार्थाची कृती हवी आहे? का सालसा नावाच्या नृत्याची की सालसा संगीताची माहिती? (कसा करावा असे विचारल्याने संगीत नसावे)

फोटो दोन्हींचे नाहीत. पदार्थाच्या ४-५ कृती सांगू शकेन. संगीत-नृत्याबाबत तोंड बंद!

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 7:02 pm | आनंदयात्री

चला या निमित्ताने माहितीची देवाणघेवाण झाली !!
सालसा नावाचा पदार्थ असतो हेच्च आम्हाला नव्हते माहित.

प्रियाली's picture

10 Sep 2008 - 7:09 pm | प्रियाली

माहितीची देवाणघेवाण

हंहं! आणखी थोडी देवाण -

सल्सा म्हणजे स्पॅनिश भाषेतला सॉस किंवा मराठीतली चटणी.

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 7:14 pm | आनंदयात्री

>>सल्सा म्हणजे स्पॅनिश भाषेतला सॉस किंवा मराठीतली चटणी.

अच्छा .. बरं बरं !! चटणी व्हय ! म्हणजे खुप प्रकार असतील.

बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ??

-
आंद्या बादरायण

प्रियाली's picture

10 Sep 2008 - 7:18 pm | प्रियाली

बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ??

न्हाय न्हाय बहुधा संगीत आणि नृत्य हे हॉट अँड स्पाईसी (चटकदार) असावेत चटणीसारखे. ;)

(व्युत्पत्तीकार) प्रियाली

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आंद्या, तू नाचताना, तुझा पाय पडला तर चटणी म्हणून तुझी व्युत्पत्ती बरोबर आणि प्रियाली असेल तर तिचं म्हणणं बरोबर, कसं? (ह.घ्या)
:-)

(संदर्भाप्रमाणे अर्थ लावणारी) छोटी/अदिती

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 11:10 am | आनंदयात्री

तु गेली आता प्रियालीच्या हिटलिस्ट वर. अग आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !!
अब तेरा क्या होगा अदिती ??
यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी !!

(सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !!
मी तिला प्रियालीताईच म्हणते, आणि मी तिला नाही, तिच्या व्युत्पत्तीला म्हटलं, हॉट अन स्पायसी!
आणि कोण म्हणतं ते महत्त्वाचं असतं का नाही?
यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी!!
मग आहेच ती भारी! ताई आहे ती माझी!

(सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)'
ये जरा मराठीत सांगणार का वो, भौ?

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 11:55 am | आनंदयात्री

प्रियाली तुझ्या खरडवहीतल्या स्वागताच्या मजकुरासाठी सातवा पॉइंट मिळाला

७. गळेपडु बहिणींचा मला तिटकारा आहे.

;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 12:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, सातवा पॉईंट असा की

फालतू लोकांकडे मी लक्ष देत नाही!

पण तुला काय रे त्याचं, तिला काय लिहायचं ते ती बघेल? तू काय तिचा आशिश्टंट का?

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 12:10 pm | आनंदयात्री

तुझा हितचिंतक !!

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 6:56 pm | आनंदयात्री

राजा विक्रमला बोलवावे अन त्याच्याबरोबर विक्रम-वेताळ सालसा करावा !!

लिखाळ's picture

10 Sep 2008 - 8:16 pm | लिखाळ

सालसा या पदार्थाच्या कृती बद्दल आपण चौकशी करत असाल तर-
http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html
साप्ताहिक सकाळ मध्ये वसुंधरा पर्वते यांचा लेख आला आहे तो पहावा. रुचीपालट या सदरात 'चवदार व बहुपयोगी सालसा' असा लेख आहे.

त्या लेखाचा दुवा मी तयार करु शकलो नाही. साप्ताहिक सकाळच्या लेखाचा दुवा कसा करावा?
--लिखाळ.

देवदत्त's picture

10 Sep 2008 - 9:33 pm | देवदत्त

हा घ्या दुवा.

लिखाळ, सकाळवर दुवे घेताना दुव्यावर उजव्या बटणाच्या टिचकीतून 'कॉपी शॉर्टकट' हा पर्याय निवडावा.

प्रियाली's picture

10 Sep 2008 - 9:43 pm | प्रियाली

टंकायचे कष्ट वाचले.

वेताळ's picture

11 Sep 2008 - 10:50 am | वेताळ

वरील दुव्या बद्दल धन्यवाद विक्रम.
वेताळ

सहज's picture

11 Sep 2008 - 11:54 am | सहज

दुव्याबद्दल धन्यवाद.

बर झालं दुवा दिला नाही तर

सालसा कसा करावा? - बेभान होउन!

करायची कृती - एक नर घ्यावा व एक नार घ्यावी. नार ही नरापेक्षा कमी वजनदार असावी की हाताळताना सोपे जावे. मग दोन नर घेउन चालेल का असे कोणि विचारल्यास ही पारंपारिक पाकृ असल्याने एक नर व नार घेउन आहे. बाकी कोणास दोन नार असलेली पाकृ माहीत असेल तर जरुन फोटो द्यावा असे काहीसे लिहावे का असे ठरवत होतो...
;-)

प्रियाली's picture

11 Sep 2008 - 4:04 pm | प्रियाली

सालसा कसा करावा? याचे उत्तर आवडले.

पाकृचे प्रात्यक्षिक करताना विडिओही टाकायचा होता की. ;)

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2008 - 11:32 am | स्वाती दिनेश

सकाळमधील लेख आवडला.लिखाळ आणि देवदत्त धन्यवाद.
स्वाती

चकली's picture

11 Sep 2008 - 10:13 pm | चकली