Skip to main content

संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 23/11/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे. काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.

वाचने 37426
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद१९७१

राजेश कुलकर्णी यांना सुध्दा काही काळासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांनी वापरलेली भाषा मुळीच योग्य नव्हती. त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केल्यास आणि त्यांचे वर्तन सुधारण्यास वाव असल्यास त्यांना परत प्रवेश देण्यास हरकत नाही. आपण जेव्हा सामाजिक संकेतस्थळावर जातो तेव्हा तेथील काही संकेत असतील ते आधी समजून घ्यावेत आणि मग पुढे जावे असा एक साधा संकेत आहे. प्रत्येक संकेतस्थळाची आपली एक प्रकृती आहे. तशी ती मिपाची सुध्दा आहे. ती समजून घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. मिसळपाव संपादक मंडळात आपण दर काही महिन्यांनी बदल करत असतोच. मात्र एकूणच सर्वच संपादकांना थांबवावे हे नवीन आहे. मला सुध्दा न पटलेला हा निर्णय आहे. तरी सुध्दा मिपासाठी हा निर्णय जो की दिवाळीच्या आधिच घेतलाय. तो आता प्रत्यक्ष राबवतोय. सोबतच अन्य सदस्यांना सुध्दा अगदी साध्या शब्दात एक विनंती करतोय की मिपावर मूळात कमीच असलेले जे नियम आहेत त्यांचे पालन करावे. मला किंवा प्रशांतला तांत्रीक आणि संपादकीय अशी दुहेरी भूमिकापार पाडताना कारवाई समजावून सांगण्याचा वेळ मिळेलच असे नाही. कारवाई मात्र तातडीने होईल. - नीलकांत

In reply to by बाळ सप्रे

माझ्या मते मिसळपावच्या संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी. म्हणजे त्यातील काही लोक जावेत आणि काही लोक येत रहावेत. त्यामुळे संपादनाची जी रचना आहे ती तशीच पुढे कायम रहावी. त्यासाठी काही जेष्ठ संपादकांनी काही काळ कायम रहावे असे मला वाटत होते. मात्र संपादक मंडळातील बहुतेकांनी सध्या थांबावे असे सुचवले होते. संपादकांनी केलेली सुचना महिन्याभरानी सुध्दा कायम होती म्हणून त्यांच्या विनंतीला मान दिला. मला ते पटलेले नाही एवढंच. पण माझ्या मनाविरुध्द आहे असे नाही. आता नव्याने मांडणी करतानासुध्दा माझी संकल्पना कायमच आहे. नवीन लोकांना एकदम जम बसत नाही. त्यासाठी काही जून्या लोकांनी काही काळ संपादनात रहावं असे माझे मत आहे. बघुया काय होतंय ते. जे होईल ते सर्वांना कळवेनच.

In reply to by नीलकांत

नवीन लोकांना एकदम जम बसत नाही. त्यासाठी काही जून्या लोकांनी काही काळ संपादनात रहावं असे माझे मत आहे.
अ‍ॅग्रीड. :) माजी संपादक मंडळाचे आभार आणि नविन (होणार्‍या) संपादकीय मंडळाला आगाऊ शुभेच्छा.

नोंद घेतली आहे. धन्यवाद, निलकांत.

नोंद घेतली आहे. धन्यवाद. तुम्ही म्हणता तर सर्व संपादक उत्तम काम करत होते तर होय. ते नक्किच करत होते, कारण इतर कोणालाही त्यांच्या कार्य-अनुभवाची माहिती जाहीर नाही आणी तुमावर अविश्वास दावाय्चा प्रश्नही येत नाही.पण सदरील संपादकांच्या कार्यकालात संपादकंच्या निपक्षपातीपणा बद्दल शंका निर्माण होतील अथवा त्यांच्या न्यायबुध्दी व विवेकपध्दतीबाबत सारासार प्रश्न निर्माण होतील असे किस्स्से घडलेले कोणी नाकारु शकत नाही. अर्थात ते उकरायची अजिबात गरज नाही. नवीन संपादक नेमले जाणार आहेत का ? उत्तर हो असेल तर त्यांचा वयोगट हा १८ ते २८ इतकाच असावा असे मला प्रकर्शाने वाटते.

In reply to by भाऊंचे भाऊ

>>>त्यांचा वयोगट हा १८ ते २८ इतकाच असावा. १८ च्या खालील आणि २९ च्या वरचे सदस्य अपरिपक्व असतात असा अर्थ काढावा काय? नविन संपादक मंडळ येईल तेंव्हा त्यांच्या नांवासमोर त्यांचे वय सुद्धा जाहिर करणार का?

In reply to by प्रभाकर पेठकर

अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो १८ च्या वर वय असणे आवश्यक आहे मिपा सदस्य बनण्यासाठी. म्हणून किमान मर्यादा १८. २९ च्या वरचे सदस्य हे बरेच शिस्तप्रिय, अनुभवी, मिपा साहीत्य समृध्द करु शकणारे असल्याने उगा संपादक बनवुन त्यांच्या लिखाण स्वातंत्र्यावर दडपण आणने योग्य नाही. अन्यथा त्यांचे संस्थळाशी असलेले वैचारीक काँट्रीब्युशन कमालीचे खालावते जो सामान्य वाचकांवर अन्याय आहे. अशांना साहित्य संपादक अथवा सल्लागर मंडळात नेमणुक देणे वगैरे उज्वल दर्जाची कामे व पदे मिपावरती नक्किच उपलब्ध्द आहेत.
नविन संपादक मंडळ येईल तेंव्हा त्यांच्या नांवासमोर त्यांचे वय सुद्धा जाहिर करणार का?
जर का अनाहीता प्रवेषासाठी सदस्यांना त्यांचे नेमके लिंग जाहीर करणे बंधनकारक आहे तर संपादक मंडळातील सदस्य नेमके वय नको पण किमान ते १८ ते २८ वयोगटातीलच आहे याची जाहीर हमी द्यायला कोणाला त्रास वाटेल ?

In reply to by भाऊंचे भाऊ

>>>> शिस्तप्रिय, अनुभवी, मिपा साहीत्य समृध्द करु शकणारे म्हणजे हे गुण संपादकांमध्ये नको म्हणताय का?

In reply to by भाऊंचे भाऊ

असहमत. कुठल्याही संस्थळाच्या यशस्वी वाटचालीत शिस्तप्रिय, अनुभवी, साहीत्य समृध्द करु शकणारे संपादकच हातभार लावित असतात. असो.

पारदर्शक माहीतीबद्दल अन घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेकानेक धन्यवाद मालक. आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

मी अभ्याच्या बॅनर शब्दाबाहेर नाही... पुढील संपादकांना शुभेच्छा !!!! ता.क.अभ्या पुढील टी शर्ट कधी ???

In reply to by नाखु

अभ्या पुढील टी शर्ट कधी ???
येणार नाहीत. ऑर्डर कॅन्सल. . मनासारखे नवीन संपादक आले तर कदाचित फेरविचार करण्यात येईल. ;)

In reply to by अभ्या..

यालाच म्हणतात.... आपल्या मनाविरुद्धा जरा काहि झाले की असहिंश्नुता म्हणून .. बरं असो.. टि शर्ट वापसी कधी पासून चालू करूयत?

मिपाच्या हितासाठीचा निर्णय ! पुढील संपादकांना शुभेच्छा ! या ट्रान्झिशन काळात सर्वतोपरी सहकार्य राहील.

In reply to by कपिलमुनी

या ट्रान्झिशन काळात सर्वतोपरी सहकार्य राहील.
या ट्रान्झिशन काळात आणि नंतरही कायमच सर्वतोपरी सहकार्य राहिलच :) नवे संपादकमंडळ जेव्हा केव्हा नेमले जाईल तेव्हा त्यांना आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो.

मिपासाठी इतकी वर्षे काही काम करू दिल्याबद्दल नीलकांतला खूप धन्यवाद! मिपा आणि मिपाकरांनाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यापुढेही नीलकांतच्या कोणत्याही निर्णयाला संपूर्ण पाठिंबा आणि शक्य ती मदत नक्कीच असेल. मिपाकरांना खास धन्यवाद! कधी काही अप्रिय घटना कामाचा अपरिहार्य भाग म्हणून घडल्या असतील त्यासाठी क्षमस्व. त्यात कधीही वैयक्तिक रागलोभ नव्हता. इथे भेटत राहूच!!

In reply to by पैसा

आपली तर बुआ सुरवातीपासून एकच भूमिका आहे एक मिपाकर म्हणून संपादक मंडळ व मालकांच्या निर्णयांचा मान राखणे. आणि मिपावर आपला सकारात्मक सक्रीय सहभाग देणे.

In reply to by निनाद मुक्काम …

आपली तर बुआ सुरवातीपासून एकच भूमिका आहे
असे नाही चालणार निनाद. तुम्ही "माझी भुमिका" असा एक धागाच काढला पाहिजे. असे प्रतिक्रियेत २ ओळी लिहुन नाही चालणार.

In reply to by प्रसाद१९७१

आपण माझे सुरवातीपासून चे लेख चाळा , म्हणजे वाचले तरी चालतील त्यातील प्रतिसाद त्यावरील वाद हे सुरवातीच्या वर्षात झाले तेव्हा माझी भूमिका मी सविस्तर मांडली आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद - माझा पॉईंटर यनावालांच्या "माझी भुमिका" ह्या धाग्याकडे होता. चेष्टेत लिहीले होते.

चळवळकरांना करा संपादक.होऊ द्या हौस पुरी.बाकी नावं सुचवा असं ठरवलं असेल तर - १) जेपी, २) नादखुळा ३) खटपट्या ४) यशोधरा ५) प्रगो यांना विचारा.श्रीरंग_जोशी अगोदरच साहित्य मदत मंडळात आहेत.

In reply to by कंजूस

१) नादखुळा, २) परिकथेतील राजकुमार ३) यनावाला ४) विवेक पटाइत ५) प्रगो ६) अतिवास ७) पिशी अबोली ८) पिलीअन रायडर

In reply to by भाऊंचे भाऊ

आता तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे नवीन नावं ही १८-२८ मधली सुचवायची की. बाकी नाही माहीत पण हे २ तरी ह्य वयोगटात नाहीत. :) ३) यनावाला ४) विवेक पटाइत

In reply to by शलभ

माहित होतं एकजण तरी हा प्रश्न विचारणार. तरीही मी वयोगट न विचारात घेता नावे सुचवली कारण मला माहीत आहे १८ ते २८ वयोगट मान्य करण्याची हिम्मत बहुसंख्यांमधे* नाही ( अवांतर :- माझी तिशी केंव्हाच उलटली आहे ) * १८-२८ वयोगटातील सदस्य इथे अल्पसंख्यांक आहेत.

In reply to by भाऊंचे भाऊ

एखादा अनिवासी सुद्धा संपादक मंडळात असावा. धमाल मुलगा तसेच प्रभाकर पेठकर इत्यादी अनुभवी (अर्थात मिपाच्या संदर्भात जास्त) सभासद आहेत. त्यांचा विचार व्हावा.

घेतली आहे, सहकार्य आहेच, ते कायमच राहिल. स्वाती

अजून तरी संपादक मंडळाबदल कांही गैर अनुभव नाही. भविष्यातही नसेल अशी अपेक्षा.

संपूर्ण संपादक मंडळ एकसाथ बरखास्त करण्यात नीलकांत ची जी काही कारणे असतील, ती असोत. पण हा निर्णय मिपा साठी चांगला नाही असे मला वाटते. संपादक मंडळाला मी आभार देऊ इच्छितो . त्यानी खूप कठीण काम व्यवस्थित पार पडले आहे. हे एक thankless काम आहे. ते उत्तम केल्यासाठी सलाम! बाकी वयाची अट घालून संपादक निवडणे हे discriminatory आहे. वय, लिंग वा जाती अशी कुठलीही अट नको, please ! फक्त कामाची योग्यता !

अवघडच झाले की हे! आता आम्ही अरण्यरूदन कोणाच्या नावाने करायचे? ;) ज्यांनी आजवर ही जबाबदारी सांभाळली त्यांचे खरंच धन्यवाद. माझ्यासारखे सभासद सांभाळणे म्हणजे खरंच अवघड असते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुलाच संपादक मंडळात घ्यावे अशी विनंती नीलकांतला करावी म्हणतो. वर्गातल्या सगळयात वांड मुलालाच मॉनीटर करतात ना तसं :P

संपादक मंडळ कसे निवडले जाते ? ते प्रत्येक लेख प्रतिसाद वाचत असतात का ?

सहकार्य आहेच. कायम. नवीन संपादकांना आधीच शुभेच्छा!

आधीच्या संपादक मंडळाचे आभार, नवीन सं.मं साठी शुभेच्छा. सहकार्य नेहमीच राहील.

वेबसाइट कशा चालतात त्याचे काही तांत्रिक ज्ञान नाही.छापील लेखनात त्यातील प्रसिद्ध केलेल्या मजकुराची जबाबदारी एका अधिसूचित संपादकावर असते.इथे स्वप्रकाशन असल्याने लेखनाच्या मजकुराचे कायदेशिर अथवा दोषारोपाचे उत्तरदायित्त्व त्या लेखकाकडे जाते.थोडक्यात लेखकांनी असंयमित होण्याचे लक्ष्य संपादक होऊ लागले तर पुढे कोणी ही जबाबदारी घेईल का याबद्दल शंका आहे.

संपादक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल नीलकांतचे अनेक आभार. मिपासाठी सहकार्य कायम असेल आणि राहिलच. मिपाच्या भावी वाटचालीला अनेकोत्तम शुभेच्छा.

संपादक म्हणून नीलकांतनी टाकलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आणि संपादकीय कामातील पाठींबा/सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार ! संपादक म्हणून काम करताना सदस्यांपैकी कुणाला नकळत दुखावले असेल तर वैयक्तिकरित्या दिलगीर आहे. सदस्य म्हणून मिपा प्रिय आहेच आणि राहील.

In reply to by सस्नेह

हेच. हीच ती गंमत.
संपादक म्हणून काम करताना सदस्यांपैकी कुणाला नकळत दुखावले असेल तर वैयक्तिकरित्या दिलगीर आहे.
मुळात संपादक म्हणून काम करताना कोणी कोणाला का दुखावले / सुखावले याचा ताळेबंदच जर समोर ठेवला जाणार नसेल तर ही औपचारीकता प्रांजळ का ठरावी ? अवांतर @ निलकांतः- राज्यसभेसारखी रचना निर्माण करण्यापुर्वी मिपावर जर RTI लागु केला तरच त्या नेमणूकांना अर्थ आहे. ;)

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊ साहेब मिपा हे "लोकांनी, लोकांचे आणी लोकांसाठी चालवलेले संस्थळ" नसून ते एक खाजगी संस्थळ आहे आणी त्याचे सर्वाधिकार श्री नीलकांत यांच्याकडे आहेत. (असे असूनही ते लोकशाही पद्धतीने चालविले जाते) तेंव्हा त्यात आर टी आय लागू होत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by सुबोध खरे

ब्रीटनमधे राजेशाही असुनही लोकशाही त्याखालोखाल नांदते असे काही माननीय निलकांत साहेबांच्या मनात असावे म्हणूनच त्यांनी एखाद्या खाजगी संस्थळावरील संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी अशी आस लागली असावी. पण ती पुर्ण होण्या पुर्वी राज्यसभेच्या संकल्पनेची परीपक्वता त्यांच्या या स्तुत्य विचारात उतरावी म्हणून मी काही इनपुट दिले आहेत. आणी ते कुठेच अस्थायी नाहीत. मुळात संस्थळ खाजगी आहे तर त्याला राज्यसभा का बनवता असा अनुभवी सल्ला आपण द्यायला हवा.

In reply to by भाऊंचे भाऊ

उदाहरण चुकीचे आहे ब्रिटनची राजेशाही नाममात्र आहे आणी राणी फक्त उत्सवमूर्ती आहे. तेंव्हा ब्रिटनला विकून ती मोनाको बेटावर निवृत्त होऊ शकत नाही. मिपाचे तसे नाही. नीलकांत मिपा विकून किंवा बंद करून घरी बसू शकतात. त्यांनी फक्त आमच्या सारख्या मंद बुद्धी लोकांना समजावे कि मागील पानावरून पुढे चालू कसे राहावे यासाठी म्हणून राज्यसभेचे उदाहरण दिलेले आहे. तशी कोणतीही आस लागण्याचे त्यांना कारण नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊ मिपा संमं ची रचना रज्यसभेसारखी का असावी याचे कारण नीलकांत ने अगदी स्पष्टपणे दिले आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे आहे तो उद्देश काही इथे दिसत नाही. त्याच कारणासाठी डॉक्टरांनी नीलकांतला काही सल्ला दिला नसावा.
माझ्या मते मिसळपावच्या संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी. म्हणजे त्यातील काही लोक जावेत आणि काही लोक येत रहावेत. त्यामुळे संपादनाची जी रचना आहे ती तशीच पुढे कायम रहावी.

In reply to by मृत्युन्जय

भाऊसाहेब मी भावी संपादक नाही किंवा इच्छुक सुद्धा नाही. मुळात मी एक लेखकही नाही जे लिहितो ते फक्त माझे प्रत्यक्ष अनुभव आहेत. माझ्या दवाखान्यातून वेळ मिळतो त्यातील काही वेळ मी मिपावर असतो एवढेच.त्यात संपादकांची फुकट फौजदारी करण्यासाठी मला वेळ नाही आणि माझी तेवढी लायकी पण नाही. श्री.निलकांत यांना मी ओळखत नाही कि मी कधीही भेटलेलो नाही प्रत्यक्ष किंवा व्यनितूनही. अगोदरचे मालक श्री तात्या यांना एकदा २००८ मध्ये भेटलो होतो त्यांनी मिपावर यायचे आमंत्रण दिले त्यावर मी २०१३ मध्ये मिपावर आलो. बाकी आपल्याला जसा सोयीस्कर अर्थ काढायचा असेल तो आपण काढायला मोकळे आहात.

In reply to by सुबोध खरे

मी गंमत म्हणून बोललो आहे हो (खडा टाकायचा म्हणून/ खोडकरपणा म्हणून). कृपया अतिराग नको. बाकी तुम्ही वेळ देउ शकणार नाही हेच एकमेव कारण आहे की मी तुमचे नावं रेकमेंड केले नाही. अन्यथा आपली तारतम्यता बर्‍याच सदस्यांपेक्षा जास्त परिणामकारक आहे अशीच माझी आपल्याबद्दल धारणा आहे ( आपले अनुभवलेखन वाचुन बनलेली आहे.) बाकी संपादक बनायला तुम्ही मुळात लेखक असले पाहीजे हा निकश इथे अजिबात नाही याची खात्री बाळगा. तेंव्हा आता अपण एकत्र संपादकांची फुकट फौजदारी करणार्‍यांना शुभेच्छा देउन चर्चेवर इथेच पडदा टाकुया.

In reply to by भाऊंचे भाऊ

अरे काय चाललयं ? हा प्रतिसाद खरे साहेबांना दिलाय. भलत्याच जागी प्रकाशीत झाला वाटते.