सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

राजेश कुलकर्णी's picture
राजेश कुलकर्णी in काथ्याकूट
19 Nov 2015 - 11:59 pm
गाभा: 

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?
स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा .
.
.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे.

मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग.

हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय?

दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे.

शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे. यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा.

आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला.

शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.

प्रतिक्रिया

ह्यांना एक सेपरेट विभाग काढून द्या रे प्लीज.
भयानक पोटेन्शिअल आहे

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Nov 2015 - 12:01 am | लॉरी टांगटूंगकर

+॑१

विशाल कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 1:58 pm | विशाल कुलकर्णी

+१००

मंदार कात्रे's picture

20 Nov 2015 - 12:25 am | मंदार कात्रे

ओ कुलकर्णी तुम्ही लिहिताये ते मुद्दे योग्य वाटतात . पण धडाधड धागे अन एकाच धाग्यात सत्राशे साठ विषय मांडण्याची घाई कशाला ?
प्रत्येक परिच्छेद एका दिवशी एक धागा म्हणुन घ्या की . जिलबी दुकान फुल्ल फॉर्म मध्य चालु होइल

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 10:17 am | राजेश कुलकर्णी

मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते कसे करायचे ते कल्पना नाही. मात्र येथे अनेक मुद्दे आहेत. आणखीही मुद्दे इतरांच्या सहभागामुळे याव्यात. धन्यवाद.

मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे.

ओके.. ठीक आहे.

एक काम करा.. १ महिना चुपचाप वाचनमात्र रहा. तोपर्यंत तुमचे मुद्दे थांबू शकतील का? बहुदा थांबतीलच, नाही थांबले तरी कुणाला काय फरक पडणार आहे? त्यामुळे इथली पिच कशी आहे आणि नक्की कसा खेळ खेळतात याची माहिती करून घ्या.

तुम्ही भारी क्रिकेट खेळता म्हणून बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग तुम्ही एकाचवेळी करू शकता का? नाही.
म्हणजे एका वेळी एकच मुद्दा पकडा आणि त्यावर काय ती चर्चा करा.

..आणि एक, जुने धागे शोधून शोधून वाचा.
तुम्ही एखादा नवीन शोध लावला असेल कदाचित, मात्र मिपावर त्याच्या पेटंटच्या कॉप्या गल्लोगल्ली पडल्याही असतील
त्यामुळे आधी थोडा अभ्यास करा मग या खेळायला.

अभ्यास न करता खेळणार असालच तर लगेच आऊट होण्याची दाट शक्यता आहे, आणि आऊट झालातच तर पिचच बाद आहे, फिल्डर असहिष्णू आहेत, नवख्या बॅट्समनची गळचेपी करतात वगैरे आरोप करू नका.

दोन तीन ठिकाणी तुम्ही जागेच्या वापराबाबत लैच जागरूक दिसलात म्हणून इतका प्रपंच करत आहे. समजून घ्याल अशी आशा आहे.

कपिलमुनी's picture

20 Nov 2015 - 2:58 pm | कपिलमुनी

खेळाडू बहुधा रीटायर्ड हर्ट होउन बाहेर गेलेला असेल आणि पुन्हा एंट्री मारतोय.
बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग आणि पिच याचा अभ्यास असेलच हळू हळू बाहेर येइल

माझ्या मते एवढे सगळे करण्याची काही गरज नाही. मला पटते तसेच मी करेन. त्यांना पसंत आहे ते सहभागी होतील. कोणावर कसली जबदस्ती नाही. नाही का?
कोणी काही प्रतिसाद दिला नाही तरी त्याबाबत तक्रार करण्याचे काही कारण नाही. तेव्हा कोणावर काही करण्याचे आतातरी काही प्रयोजन दिसत नाही. कारण खरोखर तसे काही कारण नाही.
मी काही शोध लावण्याच्या हेतुने लिहित नाही. मला वाटते ते लिहितो. शिवाय इतरांचे चोरून माझ्या नावावर खपवण्याची माझी व्ृत्ती नसल्यामुळे इतरांच्या पेटंटबद्दल चौकशी करण्याची आवश्यकता नाही.
मी येथे प्रथमच पोस्ट टाकतो आहे याचा जो उल्लेख केला तो दुस-या संदर्भात होता.
धन्यवाद.

धन्यवाद आणि शुभेच्छा..!!

pacificready's picture

20 Nov 2015 - 3:54 pm | pacificready

मोदक,
प्रतिसाद आवडला नाही.
-मिका

तुमच्या आवडीनिवडी जपायला आम्ही मिपावर येत नाही.

-नोलानकथेतील बॅटकुमार.

आपणास मुद्दा समजलेला नाही.
(गणेश लेखमालेवेळी आम्ही असाच सल्ला दिला तेव्हा ज्येष्ठांनी 'प्रतिसाद आवडला नाही' असं कळवळलं होतं. आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत)

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

नाखु's picture

20 Nov 2015 - 4:16 pm | नाखु

!@#$%^&

तुम्ही *&^%$#@! चे बळी आहात..

-उसंत नाटकर

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 3:11 am | संदीप डांगे

'होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं' म्हटल्यावर स्मारकं स्वारी 'चर्चा तर होणारच'.

ट्रेड मार्क's picture

20 Nov 2015 - 3:39 am | ट्रेड मार्क

तुम्हाला बाळासाहेबांविषयी फारशी माहिती नसावी असं वाटतंय. तुम्ही फक्त शिवसेनेने केलेल्या काही कृतींबद्दल बोललात पण त्यामागची पार्श्वभूमी आणि कार्यकारण भाव समजून घेणे आवश्यक आहे. मुंबईतील दंगल तुम्ही अनुभवली आहे कि नाही माहित नाही पण मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिले ते केवळ शिवसेनेमुळे. हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगतोय, कुठे वाचून नाही. अजून एक स्पष्ट करणे महत्वाचे आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी नाही आणि नव्हतो.

मियांदाद ला बोलावले होते तेव्हा त्याचा आणि दाऊदचा काही (लग्न)संबंध नव्हता. ही भेट मियांदादच्या विनंतीनुसार २००४ मध्ये झाली आणि त्याच्या मुलाचा विवाह २०११ मध्ये झाला.

मुख्य मुंबईत एवढे वर्ष राहून मला कधी वाटलं नाही की शिवसैनिक अरेरावी किंवा दादागिरी करतात.

खालील लेख वाचवा अशी विनंती:
http://jagatapahara.blogspot.com/2012/11/blog-post_26.html

कृपया बाळासाहेबांबद्दल अजून माहिती मिळवा.

शीर्षक आणि बाकी लेख याच्यात गफलत झाली आहेच. परंतु लेख मूळ गाभा फक्त बाळासाहेबांना नावे ठेवणे एवढाच वाटतोय.

ढिस्क्लेमर: शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर मला काहीही भाष्य करायचे नाही.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 10:14 am | राजेश कुलकर्णी

मियांदाद दाउदचा व्याही नंतर झाला हे मला माहित आहे. पण दाउदकडचे लग्न हे मॅट्रिमोनियल पाहून झाले असे आपल्याला वाटते काय? यांचे आधीपासूनचे संबंध असतात.
बाळासाहेवांचे नाव हवाला ऑपरेटर्सशी संबंध असणा-यांच्या यादीमध्ये व्होरा कमिशनच्या रिपोर्टमध्ये स्पष्तपणे आहे. त्यात आपले पवारसाहेब, व तेव्हाचे इतर कॉंग्रेसचे नेते यांचाही उल्लेख आहे. तेव्हा हा व्होरा अहवाल संसदेत आजवर का मांडला गेला नाही हे आपल्याला सहज कळू शकते.
शरद पवार काय किंवा बाळासाहेब काय यांच्यासारख्यांना मिळालेली लोकप्रियता पाहता ते महाराष्ट्राचे कल्याण करू शकले असते. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत असे हे दोघे म्हणत असत याचा अर्थ आळीमिळी गुपचिळी असा घ्यायचा हे एव्हाना कळलेले आहे.
धन्यवाद.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 10:47 am | राजेश कुलकर्णी

http://timesofindia.indiatimes.com/india/Dawood-sons-wedding-in-Pakistan...

वरील बातमीप्रमाणे मियांदादची ठाकरे भेट व मियांदादचे दाऊदशी कौटुंबिक संबंध जुळणे यात एकाच वर्षाचे अंतर आहे हे स्पष्ट आहे.

आपण जागता पहारा या ब्लॉगच्या लेखकांचा जो संदर्भ दिले आहेत, ते मुद्दे सोडून शब्दच्छल करत व शब्दांचा पिसारा फुलवत वादविवादाला हवे तसे वळण देण्यात तरबेज आहेत. शिवसेनेबाबतची त्यांची दोन उदाहरणे मी मागेच त्याच्या लक्षात आणून दिली होती. एक म्हणजे मुंबईतील कम्युनिस्ट कामगार नेत्याच्या शिवसेनेने केलेल्या हत्येबद्दल लिहिताना त्यांनी तो नेताच गुंड होता वगैरे विधाने केली होती. शिवाय दक्षिणेत हिंदी चित्रपट दाखवण्यास बंदी घातली गेली तेव्हा ठाकरेानी दक्षिणी निर्मात्यांचे हिंदी चित्रपट मुंबईत दाखवण्यास बंदी घातली याचे कौतुकही सदर ब्लॉगलेखक महाशयांनी केले होते. यात प्रश्न हिंदी निर्मात्यांच्या हिताचा. शिवाय बंदी घालणारे तमिळ सरकार, त्यावर मुंबईत उपाययोजना करण्याचा काय संबंध. बरे हा प्रश्न सोडवणारे ठाकरे कोण? तेव्हा यातल्या खंडणीखोरीची सुरूवात तेव्हाच झालेली होती. या गोष्टी लक्षात न घेता ठाकरेंचे कौतुक करणा-या ब्लॉगलेखकाकडे फार लक्ष देऊ नये असे वाटते. ते भाडोत्री लेखक आहे असे मला म्हणायचे नाही, मात्र त्यांचा तर्क त्या दिवशी त्यांचा जसा मुड आहे तसा चालतो हे नक्की.

अन्नू's picture

20 Nov 2015 - 3:41 am | अन्नू

१००% सहमत. खरं तर हे राजकरणी दुतोंडी आहेत- एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात!
अवांतर- सध्या आमच्या वॉट्स-अ‍ॅपवर यांचा 'वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा' असा उल्लेख केला जातेय! ;)

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 10:20 am | राजेश कुलकर्णी

स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव.

मृत्युन्जय's picture

20 Nov 2015 - 10:40 am | मृत्युन्जय

एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात!

बी ग्रेडी ग्रुप्सवर कोण कोणाला काय म्हणतय याच्याशी इथे कोणाला शष्प देणे घेणे नाही.

मोगा's picture

20 Nov 2015 - 5:59 am | मोगा

साहेबांचं स्मारक आद्य साहेबांच्या शेजारी म्हणजे रायगडावर उभारावे. लोकाना एकाच भेटीत दोन साहेब दिसतील. रायगडाचाही जीर्णोद्धार होइइल. महाराज व साहेब एकत्र गप्पा मारत बसतील.

रमेश आठवले's picture

21 Nov 2015 - 12:46 am | रमेश आठवले

हिंदुपद पादशाही ला खेटून घराणेशाही !
ये बात कुछ हजम नही हुई.

पगला गजोधर's picture

20 Nov 2015 - 8:15 am | पगला गजोधर

साहेब महापौर बंगल्यावर राहिलेले काय ?
साहेब जिथे राहिले त्या मातोश्रीवर, किंवा जिथून काम केलं त्या भवनामध्ये, बनवा तुम्हाला हवं तेव्हड मोठं स्मारक.
च्यायला पब्लिक प्लेस वर डोळा नेमका.

पण 3 वर्षापूर्वी सुधधा शिवाजीपार्कच्या जागेसाठी
धिंगाणा सुरूच केलेला, पण सी एम पृथ्वीराज नी, आत्ता सी एम देवेंद्रनी , बरोब्बर गंडवलाय यांना. गुड गेम देवेंद्रजी ..

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 10:23 am | राजेश कुलकर्णी

महापौर बंगल्याच्या जागेची मागणी ते अगदी अंत्यसंस्काराच्या वेळेपासून करत आहेत. आता हेरिटेज वास्तु म्हणून ते करता अाले नाही तर त्याच्या शेजारची जिमखान्याची जागा तरी बळकावता येईल असा डाव यामागे आहे असे काल टीव्हीवरच्या चर्चेत सांगत होते.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 10:28 am | संदीप डांगे

'मातोश्री'च स्मारक म्हणून योग्य राहिल.

सतिश पाटील's picture

20 Nov 2015 - 12:09 pm | सतिश पाटील

श्रीमान राजेश कुलकर्णी

आपण उपरोक्त लेखात जी गरळ ओकली आहे त्याबद्दल आपल्या अफाट बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपली तुलना मला प.पु. राहुल गांधी याच्याशी करण्याचा मोह आवरत नाही आहे.

अर्धवट ज्ञान घेऊन आपण या विषयावर एखादे तज्ञ असल्यासारखे निरीक्षण नोंदवले आहे.
कुठ्लारी दुषित ग्रह मनात ठेवून आपण हे लिखाण केले आहे. विषय एक आणि लिखाण भलतेच ?

कुठल्यातरी एखाद्या पुचाट पक्षाचे आपण प्रवक्ते असल्याचाहि दाट संशय वाटतोय...

किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यावर टीका करून आपण लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा एक फालतू प्रयत्न दिसतोय,

असो... परंतु मिपावरील आपला पहिलाच लेख बाळासाहेबांविरोधात लिहून आपण दणदणीत एन्ट्री करण्याचा आपला प्रयत्न कदाचित सफल होईल...
आपला हा लेख वाचून आम्ही धन्य झालो आहोत, यापुढे आपला एकही लेख वाचण्याची नामुष्की आमच्यावर याजन्मी तरी येऊ नये , हीच इच्छा...

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 2:00 pm | संदीप डांगे

ओ शिवसेनावाले,

जरा योग्य शब्दात प्रतिवाद करा की राव..! त्यांनी लिहलेल्या प्रत्येक वाक्याला खोडून दाखवा, मग तुमचंही ज्ञान अर्धवट आहे का फुल्ल आहे ते बघता येईल. नुसतं ;हुं; करून जाऊ नये.

अन्नू's picture

20 Nov 2015 - 2:27 pm | अन्नू

++१

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 2:45 pm | राजेश कुलकर्णी

अनेकदा दुस-याच्या हेतुवरून वैयक्तिक टीका केली जाते. एकतर प्रतिवास कसा करायचा असतो हे माहित नसते किंवा ते माहिते असले आणि अापल्याकडे प्रतिवाद करण्यास योग्य मुद्दे नसले की मग वैयक्तिक टीकेवर उतरले जाते. असो.
धन्यवाद.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 2:28 pm | राजेश कुलकर्णी

सतिश पाटील,
आपली प्रतिक्रिया वाचली. अशी प्रतिक्रिया मला नवी नाही. तुम्ही माझ्या हेतुबद्दल किंवा मी कोण आहे यावर जागा न घालवता काही मुद्दे मांडले असते तर ते अधिक योग्य वाटले असते.
प्रतिवाद करणा-यांचे काही सामान्य मुद्देही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला किती गर्दी होती, तुम्ही दहा माणसे तरी तुमच्या मागे उभे करून दाखवा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया असतात. मग मीदेखील त्यांना काही माफियांच्या अंतयात्रेला किती गर्दी झाली होती, वगैरे ऐकवतो.
तेव्हा यात वैयक्तिक पातळीवरील प्रतिक्रिया न देता, विषयापासून म भरकटता मुद्द्यांवरून प्रतिक्रिया दिलीत तर बरे वाटेल.
धन्यवाद.

लेखातले मुद्दे योग्य आहेत. शिवसेना सपोर्टर्स एक तर गरळ नैतर राडे यापलीकडे दुसरी भाषा जाणत नाहीत हे सर्वांनीच पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.

रमेश आठवले's picture

21 Nov 2015 - 10:06 pm | रमेश आठवले

+१

_मनश्री_'s picture

20 Nov 2015 - 3:19 pm | _मनश्री_

कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने
कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ?
काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय
त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा
तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा
इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना
ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता
निवारा मिळण मुश्किल झालय
पण तरीही फारच हौस असेल तर
एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा
'स्मारक पार्क '
हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक

_मनश्री_'s picture

20 Nov 2015 - 3:26 pm | _मनश्री_

कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने
कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ?
काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय
त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा
तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा
इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना
ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता
निवारा मिळण मुश्किल झालय
पण तरीही फारच हौस असेल तर
एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा
'स्मारक पार्क '
हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक

नाखु's picture

20 Nov 2015 - 3:34 pm | नाखु

एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा

स्गळे सगळे एका ठिकाणी मावत नसतील तर अक्षरशः (फक्त आणि फक्त)सोडत पद्धतीने १००,१०० चे गट करून महाराष्ट्रातील सगळ्या गडांवर किमान १०० तरी पार्क उभारून ठेवावेत.

  • रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)हे स्थानीक महीला बचत गटालाच चालवायला द्यावे (उपहार्गृग सोयी सकट) त्या बदल्यात अगदी नाम मात्र भाडे आकारावे.
  • त्या त्या महामंडळाने सरकारला पुतळा देखभाल खर्च द्यावा
  • प्रत्येका (पुतळा असलेल्या) व्यक्तीचा पुण्यतीथीला तेथे एक माहीती पट (फक्त १० मिनिटांचा,आणि त्या गडाचे इतीहासाचा १० मिनिटांचा ठेवावा)
  • त्या मुळे गडावर किमान सोयी पाणी-इतर होईल आणि कमी खर्चात पुतळ्यांची आणि गडाचीही सोय होईल.
  • जागा अडवणारे पुतळे आणि त्यांच्या आजू बाजूची बाग ताब्यात घेऊन तिथे बस स्थानक्,मेट्रो ई स्थानके लगेच बांधावीत.
  • वाकडे वाडी जमनालाल बजाज पुतळा (बागेचा परीसर पहा), पिंपरी आंबेडकर पुतळा परिसर

कुठल्याही सरकारी जागेवरील पुतळ्याबाबत हेच मत असलेला.
सरधोपट नाखु

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 3:45 pm | प्रसाद१९७१

•रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)

शांळांना आणि विद्यार्थ्यांना १०० पट जास्त शुल्क ठेवावे. ह्या राजकीय सो कॉल्ड नेत्यांचे पुतळे बघुन बाल आणि संस्कारक्षम मनावर वाईट परिणाम होण्याचीच शक्यता. खरे तर १८ वर्षा खालील कोणाला ही बंदी च असावी ह्या लोकांचे पुतळे आणि माहीती वाचण्या साठी

कपिलमुनी's picture

20 Nov 2015 - 3:19 pm | कपिलमुनी

सध्या राज्यात दुष्काळ असताना रोज शेतकरी आत्महत्या करत असताना
१ बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक ,
२ शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामधील स्मारक ,
३ आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक ( सध्या लंडनमधील घरावर पैसे घालवलेच आहेत)
इतर अजून कोणी थोर पुरुष असतील त्यांची स्मारके बांधण्याचे नियोजन बंद केले पाहिजे व तो पैसा राज्ज्यासाठी वापरला पाहिजे.

सतिश पाटील's picture

20 Nov 2015 - 3:22 pm | सतिश पाटील

स्मारक कुठे करायचे हा मुद्दा जरी वादाचा असला तरी ज्या व्यक्तीचे स्मारक करायचे आहे त्या व्यक्तीबद्दल वाद उभा करण्याची गरज नाही.

एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही म्हणून ती सर्वांनाच आवडत नाही , अस होत नसते .

भाषा भाषणे शिवराळ आहे, असभ्य आहे, गुंडगिरी करतात, - हि झाली नाण्याची एक बाजू ... दुसरी बाजू काय? माहित असूनही आपण ती आपण मान्य करणारच नाही..

"स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव."

हि या कुलकर्णी महाशयांनी वर दिलेली एक प्रतिक्रिया.

आमच्या सारखे सामान्य लोक अश्या दाव्यांना भुलतात ...मान्य ..
आपण दोघेही भुलला नसाल कारण आपण असामान्य आहात....

अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला असा इतिहास आहे. ( पोट फाडले म्हणले तर गोंधळ व्हायचा ) मग त्याचा सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केला. चुकले का त्यांचे ? मृत्यु नंतर वैर संपते असे म्हणतात.

बर अफजलखानाने प्रतापगडावर येण्यापुर्वी किती मुर्ती फोडल्या/ काय काय लुटले याचाही इतिहास आहे. वास्तवीक शिवाजी महाराजांनी अफजलाखानाच्या प्रेताचे धिडवडे काढले असते तर लोकांनी अजुन तिखट प्रतिसाद देऊन आणखी नविन वाचनात आले असते.

असे काय वाईट झाले हो बाळासाहेबांमुळे ? ते स्पष्ट वक्ते होते हा गुन्हा होता ? भुमीपुत्रांच्या अधिकाराला त्यांनी वाचा फोडली हा गुन्हा झाला ?

त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते. स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.

आपल्या लेखाचा सर्वांगाने पुन्हा विचार करावा.

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 3:48 pm | प्रसाद१९७१

स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.

आमच्या लाडक्या काकां चे काय विचारता? त्यांनी त्यांची पण सोय केली.

आता काकांच्या स्मारकाची वेळ आली की उद्धव पण लगेच पाठींबा देणार.

त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते.

मोदींनी आधी काका पुतण्यानी ( हे पुतणे वेगळे, मी तो नाही ) बारामतीला वेठीस धरले असे म्हणले होते, आता म्हणतात की आमच्या लाडक्या काकांसारखी १०० लोक तरी पाहिजेत. काकांचा करीश्माच वेगळा आहे.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 4:13 pm | राजेश कुलकर्णी

काय वाईट केले व काय वाईट झाले हेच तर वर सांगितले आहे. त्यामुळे द्विरूक्ती करत नाही.
भुमिपुत्राचा आवाज उठवन्याबद्दल आपल्या अशा माफक अपेक्षा असतील तर माझी काही हरकत नाही.

कोणत्याही राजकिय नेत्याची शक्ती ही लोकसामर्थ्यातूनच व्यक्त होत असते. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व पाहिले असता असे स्मारक लोकांनीच उभे केले पाहिजे.

अर्थातच अश्या स्मारकातून नेमके काय साध्य होईल हे सांगता येणे नक्कीच अशक्य आहे हे मात्र खरे.

उद्धव ठाकरे यांना तहहयात अध्यक्ष ठेवणे हे देखील अनुचित आहे.

लोकांनी कशाला सोसायचा भुर्दंड
या महागाईच्या काळात स्वतःचाच खर्च भागवण मुश्किल
शिवाय कररूपात जनता पैसा देतच आहे सरकारला

ऋषिकेश's picture

20 Nov 2015 - 5:03 pm | ऋषिकेश

सरकारला योग्य वाटेल अशा कोणाचेही स्मारक उभारायला माझी ना नाही. मात्र माझा(टॅक्सरुपाने भरलेला) पैसा त्यात लागणार असल्याने त्याचे स्वरूप कसे असावे याविषयी माझी (जनतेची) मतेही सरकारने मागवावीत व त्यावर विचार करावा असे वाटते.

शिवशि, त्यासाठी सार्वजनिक जागा (विशेषतः मैदाने) वापरू नये असेही मत आहे. नवी जमिन विकत घ्यावी किंवा आधीच काही भाग आरक्षित ठेवावा.

_मनश्री_'s picture

20 Nov 2015 - 5:10 pm | _मनश्री_

पण सरकारकडे असलेला जनतेचा पैसा स्मारक बांधण्यात खर्च करण हेच चुकीच आहे

मोगा's picture

20 Nov 2015 - 8:39 pm | मोगा

शिवसेना भाजपावाले काँग्रेसला शिव्या घालतात.

पण गांधीजी , नेहरू , पटेल इ लोकांची स्मारके ही त्या व्यक्तींचे नातेवाइक / चाहते यानी दान दिलेल्या जागेत आहेत. साबरमती आश्रम , मणीभवन , मोतीलाल नेहरु स्मारक , डॉ. आंबेडकरांचे घर इ इ या खाजगी जागा होत्या.

अगदी ब्यारिस्टर जिनानीदेखील आपले मुंबैइचे घर पाकिस्तानी दूतावासास देण्यास सांगितले होते. ( सध्या ती जागा भारत , पाक व जिनांचे वारस यांच्या वादात आहे. )

म फुल्यांनी जी शाळा सूरू केल होती तो वाडाही मालकाकडून ऐतिहासिक महत्व हे कारण दाखवून आपल्या ताब्यात घेऊन मग तिथे स्मारक उभे केले असे ऐकून आहे.

आणि ठाकरेना मात्र उलटा न्याय ? ठाकरे ऐतिहासिक व्यक्तित्व होते तर त्यांचे निवासस्थान ताब्यात घेऊन तिथे सरकारने स्मारक उभे करावे.

....

भाजपावाले बहुमतात असुनही सेनेची मागणी मुकाट्याने मान्य करत आहेत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे.

म्हणजे सत्तेचा वापर करुन उद्या भाजपावालेही काही भूखंड बळकावतील त्याला सेना उपद्रव करणार नाही. दुसर्‍या लबाड लोकांचा विरोधही अशा मांडवलीच्या उद्देशानेच असणार , असे वाटते

भाते's picture

20 Nov 2015 - 11:08 pm | भाते

धाग्याचे शिर्षक वाचुन धागा उघडला. पण या माणसाचे (मुद्दाम एकेरी उल्लेख करतो आहे) इतर धागे वाचुन त्याची लायकी कळली.
पहिल्या दोन ओळी आणि शेवटचे दोन परिच्छेद सोडले तर या माणसाला ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते.

संपादक मंडळ,
माफ करा, पण व्यक्तीस्वातंत्र्य, नविन लेखकांना प्रोत्साहन म्हणुन (एक मिपाकर आणि केवळ वाचक म्हणुन) काय आणि का सहन करायचे हे मी सगळे?

अनावश्यक वाटल्यास प्रतिसाद अवश्य उडवा.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 11:12 pm | टवाळ कार्टा

भौतेक प्रतिसाद उडेल ;)

अनुप ढेरे's picture

20 Nov 2015 - 11:20 pm | अनुप ढेरे

ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते.

या दोघांबद्दल आदर असावा असही काही केलेलं नाही यांनी. लेखातील मुद्दे चुकीचे कसे आहेत ते सांगा.

लेख आवडला!

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 11:20 pm | राजेश कुलकर्णी

तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सारे ठाकरे हे खरे तर ठकवणारे आहेत असे मी एरवी सांगतो व त्याची कारणेही देतो. मी येथे ठाकरेंच्या स्मारकाबद्दल बोलतो आहे. एवढ्या वादग्रस्त असलेल्या (त्याची कारणे दिली आहेत, आणखी अनेक जोडता येतील -लिहून मीच थकल्यामुळे एवढ्यावरच थांबवले) व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने का मदत करावी? मुंबई महापालिका वर्षानुवर्षे लुटली यांनी, त्यातून स्वत: स्मारक नाही का उभे करता येत? अंत्यसंस्काराच्या वेळेपासून महापौर बंगल्याचा धोशा लावला आहे? यांची वेयक्तिक मालमत्ता अाहे का तीदेखील लुटायला?

हे सगळे खरे सांगितले तर तुमच्यासारखे ठाकरे व शिवसेनाप्रेमी दुखावतात, मग एवढे सगळे कर्त्ृत्व असतानाही कोणी काही आक्षेप घेऊ नये वाटते का तुम्हाला?

माझ्यावर आरोप न करता पोस्टमधील मुद्द्यांबद्दल बोलला असता तर अधिक बरे झाले नसते का? ते न करता 'काय काय सहन करायचे?' हा कांगावा काय करत आहात?

सुज्ञ's picture

21 Nov 2015 - 1:25 am | सुज्ञ

मोठमोठाली भाषणे करून लोकांची मते मिळवणे व त्याद्वारे स्वताचे घरदार चालवणे हे फक्त उद्योग. लेखास वरवर विरोध करणार्यांनी त्यांची किमान १० ठोस कार्ये लिहून दाखवा व मुंबई आमची मुंबई आमची म्हणताना व महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगत असून स्वताचा रिमोट असताना मुंबई चा कसा गतिमान विकास झ्हाला हेही आमच्या ज्ञानात भर म्हणून लिहून दाखवा. सबळ पुरावे म्हणून या पावसाळ्यात सर्व रस्ते कसे अजिबात तुंबले न्हवते , लोकल निट धावत होत्या लोक आनंदाने कामावर जात होते वगैरे चे फोटू टाकल्यास अति उत्तम.

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2015 - 1:49 am | श्रीरंग_जोशी

या चर्चेच्या विषयावर मला काही बोलायचे नाही. काही जणांनी स्व. बाळासाहेबांचे योगदान काय हे विचारले आहे त्याचे माझ्या परिने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. इतरांना पटावेच असा आग्रह (नेहमीप्रमाणेच) नाही.

१९९८ ते २००४ या काळात प्रथमच दीर्घकालासाठी वाजपेयींच्या रुपाने गैर काँग्रेसचा पंतप्रधान देशाला लाभू शकला. या काळात अनेक लहान पक्ष कधी अण्णाद्रमुक, कधी तेदेप, कधी तृकाँ पाठिंब्याच्या बदल्यात सरकारला ब्लॅकमेल करत असत. या सर्व काळात सेनेच्या पाठिंब्याच्या रुपात स्व. बाळासाहेब भक्कमपणे वाजपेयींच्या पाठिशी उभे होते. त्या काळात देशाची प्रगती उत्तम होऊ शकली.

दुसरी गोष्ट स्पष्टपणे जाणवेलच असे नाही. पण संपूर्ण भारतात शिवसेनाच असा (आकारमानाने दखल घेण्याजोगा) पक्ष आहे जो जात पात बघून उमेदवार उभे करत नाही. किती तरी सर्वसामान्य माणसं निवडून येण्यासाठी बहुतेक वेळी लागणारी जातीची अन पैशाची पार्श्वभूमी नसताना सेनेच्या माध्यमातून राजकारणात येऊ शकली अन यशस्वी होऊ शकली.

मोगा's picture

21 Nov 2015 - 5:49 am | मोगा

वाजपेयींचे सरकार प्रगतीशील होते तर लोकानी पाचच वर्षात का हाकलले म्हणे ?

....

राजेश कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 9:14 am | राजेश कुलकर्णी

तुम्हाला सेनेचा दलितद्वेष माहित कसा माहित नाही याची कल्पना नाही. इदिरा हत्येनंतर मुंबईतील शीखांनी रात्रीतून त्यांच्याकडे कॉंग्रेसने महाराष्ट्रात लाख पापे केली असतील, पण कोणा गुंडाला मुख्यमंत्रीपदी बसवले नाही. यांनी राणे नामक गुंडाला तेथे बसवून त्या पदाला काळे फासले. उठसूट लोकांना मूर्ख बनवण्याचा त्यांचा धंदा आता लोकांना कळून चुकलेला आहे, त्यामुळे येत्या काळात सेनेला ओहोटी लागणार अाहे.
सेना भाजपसरकारच्या मागे भक्कमपणे उबी राहिली म्हणता म्हणजे त्यांनी काय केले. महाराष्ट्रात त्यांचे व भाजपचे सरकार आले होते त्यावेळी आताच्या भ्रष्टगुंडवादीने जसे महाराष्ट्राला लुटले, अगदी तसेच सेनेच्या मंत्र्यांनी लुटले.
त्यामुळे सामान्यांना दिसेल अशा रूग्नवाहिका, रक्तदानशिबिरे, सोडता त्यांच्याकडून सकारात्मक काहीच झालेले नाही. म्हणूनच मी याला ५% समाजसेवा व इतर आमचा मेवा असे म्हणतो.

अन्नू's picture

21 Nov 2015 - 2:29 am | अन्नू

ज्या घराणेशाहीने लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करुन लाखोंचे संसार उध्वस्त केले, दंगली पेटवून लोकांचे निर्घुण बळी घेतले- लोकांचे अन्नपाण्याविणा हालहाल केले, त्याच घराणेशाहीला आता लोक ग्रेट मानून त्यांच्या कुकर्माला पाठीशी घालत आहेत!!?? वर म्हणतात त्यांनी एवढं काय वाईट केलं?
महाशय त्या दंगलीत आपली माणसे गमावलेल्या लोकांना विचारा- त्यांनी काय एवढं पाप केलं होतं? जे त्यांच्यादेखत त्याच्या कुटूंबियांना कापण्यात किंवा जाळण्यात आलं? काय वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्यांना?
मी हे सांगतोय कारण, ही दंगल आणि जाळपोळ आंम्ही स्वतः पाहीली आहे, अनुभवली आहे. मेन दंगलीच्या संवेदनशील ठीकाणीच राहात असल्याने त्याच्या झळाही सोसल्या आहेत, रात्री अपरात्री घरावर पडणार्‍या स्फोटकाच्या बाटल्या आणि हैवानासारखी हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या आंम्ही बघितल्या आहेत. चोवीस तास अन्नपाण्यावाचून स्वतःला घरात कोंडून ठेवणे ही काही साधी गोष्ट नाही, पोलिसांना तर 'शुट अ‍ॅट साईट' ची ऑर्डरच देण्यात आली होती. मग तो कोणीही असो.
एवढं सगळं का आणि कशासाठी? एका राममंदिरासाठी?

ज्या शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या मस्जिदीच्या विटेलाही कधी हात लावला नाही, त्याच शिवाजींच्या नावाने चुकीचा फतवा काढून हे बाबरी मस्जिद पाडायले निघाले होते?
एखाद्याचे अंधानुकरण करण्यापेक्षा डोळे उघडून त्याची खरी सत्यता पडताळून पहायला हवी. तरच समाज सुधारु शकेल, नाहीतर पुन्हा बाबरीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. :(

ट्रेड मार्क's picture

21 Nov 2015 - 7:38 pm | ट्रेड मार्क

नक्की कोणाबद्दल बोलताय? कोणाच्या घराणेशाहीमुळे धार्मिक तेढ निर्माण झाली? हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या शिवसेनेच्या होत्या आणि त्या तुमच्या घरावर हल्ले करत होत्या?

मी तर दादर मध्ये राहायला होतो जेव्हा दंगल झाली, शिवसेनाभावनापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर. मी सुद्धा प्रत्यक्ष अनुभवलंय हे सगळं. पण हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या मुसलमानांच्या होत्या ज्या आमच्यावर हल्ले करायच्या तयारीत होत्या आणि त्यावेळेला फक्त शिवसैनिकांमुळे आमचं रक्षण झालं. पोलिस स्टेशनला फोन केला तर त्यांनी सांगितलं सगळीकडेच दंगल आहे आमच्याकडे तेवढे पोलिस नाहीत, पण शिवसैनिक मात्र धावून आले.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खरी सत्यता पडताळून पहायला हवी नाहीतर पुन्हा बाबरीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, म्हणजेच मंदिरांच्या जागी मशिदी व्हायला वेळ लागणार नाही. बाबरी मशीद पाडली फक्त म्हणूनच मुंबईत दंगली झाल्या हे म्हणणे हा भाबडेपणा आहे.

स्मारक कुठे करावं हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण त्यासाठी बाळासाहेबांवर चिखलफेक कशाला करायची? नुसता स्मारकाचा मुद्दा मांडला असता तर योग्य होतं.

राजेश कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 9:17 am | राजेश कुलकर्णी

अन्नू, सुज्ञ यांनी दाखवलेली बाजू अगदी वास्तवाला धरून आहे.

नाखु's picture

21 Nov 2015 - 9:33 am | नाखु

अन्नू, सुज्ञ यांनी दाखवलेली बाजू अगदी वास्तवाला धरून आहे.

विस्तवाला अशी दुरुस्ती करावी ही नम्र विनंती..

आस्तीक-नास्तीक-स्वास्तीक-कास्तीक-जास्तीक-राजकीय धाग्यांने पीडीत अस्सल मिपाकर वाचक महासंघाच्या "मी मिपाचा,मिपा माझा" या दैनिकातून साभार.

विस्तवाला अशी दुरुस्ती करावी ही नम्र विनंती..

वास्तव हे विस्तवासारखेच आहे हो, ते समजुन न समजल्यासारखे करणार्‍यांची किव येते.

दणदणीत लेख (भाषण?) आहे. थोडा सौम्य पाहीजे होता, आणि जनरलायझेशन कमी हवं होतं.

जय२७८१'s picture

21 Nov 2015 - 5:42 pm | जय२७८१

राजेश कुलकर्णी, सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?
मुद्दा काय? आणि तुम्ही लिहिता काय ?
बाळासाहेबांविषयी माझ्या मनातील द्वेष असा काही तरी धागा तुम्ही काढायला हवा होता.
तुमचा मुद्दा क्रमाक १) (कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले.) हो शिवसेना नेहमी अन्याया विरोधात लढत राहिली आणि राहील. मराठी माणसाच्या न्याय व हक्क साठी शिवसेना नेहमीच लढत राहिली आहे. मग कधी समोर कम्युनिस्ट, लुंगीवाले मद्रासी,भैय्ये,मुसलमान कोणी हि येवो. मुंबई मध्ये कुठे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सर्वाधिक समाजपयोगी कामे झाली. आज मुंबई मधील उड्डाण पूल असो कि मुंबई-पुणे महामार्ग असो या बाळासाहेबांच्या दूरदृष्टी मुळेच झाल्या तुम्ही हे सोयीस्कर रित्या विसरता.
(मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा.)हे प्रश्न चर्चेने सुटणारे होते मग इतर पक्षांनी किंवा तुम्ही का नाही सोडविलेत हे प्रश्न चर्चा करून ????? हे म्हणजे असे झाले कि सावरकर क्रांतिकारक म्हणून ते वाईट आणि गांधीजी सत्याग्रही म्हणून ते तेव्हडे भले......
(विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग)हे तुम्हि सिद्ध करा आणि मग बोला उगाच लिहिता येते म्हणून काही हि लिहू नका.
(हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय?)तुम्हाला कुणी सांगितले हिंदूहृदयसम्राट म्हणायला. त्यांचे चाहते त्यांना कोणत्या हि नावाने हाक मारतील तुम्हाला त्याचे काय ? तुम्ही हि तुमचे नामकरण हव्या त्या नावाने करून घ्या आमचा काही एक आक्षेप नाही. आणि दलितांचा द्वेष कुलकर्णीच्या पूर्वजांनी केला असेल......बाळासाहेबांनी मुळीच नाही. सर्व प्रथम शिवसेना-भिमसेन एकत्र येण्याची संकल्पना साहेबांनीच मांडली हे विसरू नका.
(दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत.) मियादातला मातोश्रीवर कुणी बोलावणे पाठविले नव्हते. तो पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात खेळू द्या. अशी विनंती करण्यासाठी आला होता. पण बाळासाहेबांनी तेव्ही त्याला स्पष्ट बजावून पाठविले. जोवर सीमेवर शांतता नांदत नाही तो वर तुम्हाला भारतात खेळता येणार नाही. या वरून तरी समजा पाकिस्तान सारखा देश या माणसाची दखल घेतो पण तुम्ही त्याचा द्वेषच करता हा तुमचा करंटे पण नाही का ? आणि जावेद मियादातचे लग्न दाउदच्या मुलीशी या भेटी नंतर झाले आहे.चिखल फेक करायची म्हणून काही हि सबंध कुठेही जोडायचे का?
इंदू मिलची १४ एकर जागा जेव्हा बाबासाहेबांच्या स्मारका साठी मागितली तेव्हा का तुमचा कंठ फुटला नाही. तेव्हा का नाही विरोध दर्शवणारा एखादा धागा काढावासा वाटला नाही?

माझ्या लेखाचा प्रतिवाद करायचा प्रयत्न तर तुम्ही केलात. पण दुर्दैवाने एकाही मुद्द्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही हे दिसले. उलट भलत्याच गोष्टींचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही वहावत गेला आहात.

तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर प्रथम. डॉ. आंबेडकरांबद्दल तुमचे काय आक्षेप आहेत? त्यांच्या स्मारकाला जागा देण्याला का कोणाची हरकत असेल? त्यांचे कार्य व ठाकरेंचे यांची तुलना करायचा विचार करताहात की काय?

मियांदादच्या भेटीच्या किती नंतर त्याचे दाऊदशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले हे मी वर एका कमेंटमध्येच दाखवले अाहे. वाचायची तसदी घेतली असतीत तर पुन्हा लिहावे लागले नसते. शिवाय तुमचे उद्धव आजही गेल्या पंचवीस वर्षांपासून सेना पाकविरूद्ध देशप्रेम ओकत आहे असे म्हणतात. २००३नंतर आतापर्यंत किती वर्षे झाली मोजा बरे. ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही आणि मियांदादला थेट घरात घेता, त्यातही काही वावगे वाटत नाही?

पाकिस्तान ठाकरेंची दखल घेतो असे म्हणता. केवढा विनोद आहे हा. तुम्ही त्या बरळू राऊतांचे लेख गंभीरपणे घेता की काय?

ठाकरेंनी दलितद्वेष केला नाही म्हणणे म्हणजे तर हद्दच झाली. सगळा द्वेष करून थकल्यानंतर शिवशक्ती व भीमशक्तीचे सुचले. पण यांची कुठली शिवशक्ती? मी म्हणले ना स्वत:च स्वत:ला हिंदूह्ृदयसम्राट म्हणून घ्यायचे, स्वत:च स्वत:ला वाघ म्हणायचे, तसेच स्वत:च स्वत:ला शिवशक्ती म्हणायचे. कमाल आहे की नाही?

सावरकर व गांधींचा येथे कोठे संबंध येतो हो? शिवाय ती उदाहरणे स्वातंत्र्यापूर्वीची. ठाकरे काय मुस्लिमांविरूद्ध क्रांती करत होते की काय? तेव्हा तुमचे आर्ग्युमेंट किती पोकळ अाहे हे तुम्हालाच कळेल.

तुम्ही ठाकरेंच्या दूरद्ृष्टीबद्दल बोलता. त्यांची द्ृष्टी तर मातोश्रीच्याबाहेर कधी गेलीच नाही. बाकी मराठी माणसासाठी त्यांनी कायकाय केले याची एकदा यादी करा. म्हणजे तुमचे तुम्हालाच कळेल.

ठाकरे लढवणार १६० वगैरे जागा, भाजप लढवनार ११० जागा. तरीही ज्याचे अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला किती भन्नाट होता. बरे यांनी सत्तेत आल्यावर किती खा-खा केली माहित आहे की नाही? बरे, कॉंग्रेसने लाख पापे केली पण कोणा गुंडाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले नव्हते. पण ते पाप ठाकरेंनी केले. एका गुंडाला तेथे बसवून. त्या पदाला काळे फासले. अजून काय सांगू तुम्हाला?

असो. सतत सेनेच्या भाटांचेच ऐकून, सामना वाचून तुमचे ब्रेनवॉशिंग झालेले दिसतच आहे. आता राजू परूळेकरांचा ब्लॉग वाचायचा प्रयत्न करा. मी काहीच लिहिले नाही, आणखी लिहायला हवे होते असे तुम्हाला वाटेल. प्रथम जमल्यास डोळ्यावरची पट्टी काढून टाका.

काळा पहाड's picture

22 Nov 2015 - 1:48 am | काळा पहाड

ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही आणि मियांदादला थेट घरात घेता, त्यातही काही वावगे वाटत नाही?

बिचारे? फारच पाक प्रेम उफाळलेलं दिसतंय! त्या कसूरीचं पुस्तक प्रसिद्ध कशासाठी करू द्यायचा अट्टाहास होता म्हणे? तो कसूरी काय सासरा लागतो काय? भारत पाकिस्तान मॅच कशासाठी हवीय? मॅच पुन्हा मुंबईत ठेवलीच तर पुन्हा खेळपट्टी उखडावी असं आम्हा पाकविरोधकांना वाटतंय.
जर भाजपानं त्यांचं पाकिस्तान प्रेम थांबवलं नाही तर माझं पुढचं मत शिवसेनेला जाईल. काय गंमत लावलीय काय?

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 11:54 pm | भंकस बाबा

कुलकरणीजी आपण कुठे रहाता यावर मी पैज् मारू शकतो. तुम्ही मुंबईतल्या दंगली अनुभवल्याच् नसणार, त्याशिवाय असे बेजाबदार आरोप तुम्ही करणार नाही. बाबरी मशिद पडल्यानंतरच्या दंगली घ्या. मुस्लिमानि मुम्बई पेटवण्याची सुरुवात केलि होती तरिही हिन्दू गप्प होते. राधाबाई चाळ जळीत हत्याकांड झाले आणि शिवसेनेने मुम्बई पेटवली. नारायण राणेचे नाव तुम्ही घेत आहात , तर मग धाकले पवार साहेब चांगल्या कुलात जन्माला येऊन काय दिवे लावतात ते पाहिलेच आहे उभ्या महाराष्ट्रांने सॉरी भारताने. धरणात मुतायच्या गोष्टी भर सभेत तेहि समोर बायका असताना , शोभते काय हो त्यांना? आत्ता राणे गुंड असून देखील त्यांनी अशी असभ्य भाषा सार्वजानिक ठिकाणी वापरली नाही ती बाळासाहेबांचा धाक होता म्हणुन.
ज्या ठाकरी भाषेला तुम्ही आक्षेप घेत आहात ती भाषा ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपर्यातून लोक शिवतीर्थावर दसरयाला धाव घ्यायचे. इतकिच हिम्मत होती तर कॉंग्रेसने का नाही खटला दाखल केला त्या वेळी.
तुम्ही कुठेतरी शिखाचे उदाहरण दिले आहे. काय माहीत आहे हो तुम्हाला शिखाबद्दल? दिल्लीत जेव्हा शिखांचे शिरकान होत होते तेव्हा महाराष्ट्रात त्याचा मागमुसही नव्हता. का तर बाळासाहेबानि आवाज दिला होता की ख़बरदार कोणी शिखांना हात लावाल तर. शिख लोक हे बिझनेस करणारी लोक आहेत. कोणत्याही व्यावसायिकला स्थिर सरकार असेल तर व्यवसाय वृद्धि करता येते. जेव्हा शिखानी मतदानाचा कल बघितला तेव्हा त्यांनी कॉंग्रेसला उखडून फेकली.
बाळासाहेब गेले ते दिवाळीत, त्यानंतर एप्रिल मधे आलेल्या मोहमंद पैगबराच्या वाढदिवसाला मुंबईतल्या चेकाळलेल्या धर्मांध मुस्लिमानि मिरवणुक काढली होती. कोणत्या हदीस वा कुराणात लिहून ठेवले आहे की अशी मिरवणुक काढावि? या मिरवणुकीत ट्रकवर गाई व् बकरया घेऊन मुस्लिम बसले होते. बाळासाहेब असेपर्यंत अशी हिम्मत मुंबईतल्या मुसलमानात नव्हती.
इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे की तुम्ही थोड़े जरी नरम पडलात तर तुमचा गैरफायदा घेतला जातो. बाळासाहेबानि मवाळ धोरण घेतले असते तर कदाचित् मुंबईत उपरे डोइजड झाले असते.
दाऊद व् गवळीच्या उदाहरणाबाबत. दाऊदने मुम्बई पोलिसांना हाताशी धरून आपले साम्राज्य उभे केले होते. मन्या सुर्वे, सुहास भाटकर, वरदाभाई हे दाऊदचे शत्रु एकतर संपवले गेले अथवा नाडले गेले. त्यावेळी जर बाळासाहेबानि असे सूचक विधान केले तर तो राजनीतिचा भाग होता. गंमत अशी आहे की रमा नायक सारखे ढगांत गेले पण अरुण गवली अजुन जिवंत आहे. योगायोग नाही आहे हां.

मोगा's picture

23 Nov 2015 - 12:52 pm | मोगा

अग्गोबै ! गणपतीची मिरवणुक काढा हे कुठल्या वेदात आहे म्हणे ?

सार्वजनिक गणेशोत्सव हा अर्वाचीन प्रकार आहे, कशाला वेद आणताय मधे ? तो सुरु करण्यामागे नक्कीच एक विधायक उद्दिष्ट होते (जे आता हरवलेले वाटते).

सतिश पाटील's picture

23 Nov 2015 - 12:15 pm | सतिश पाटील

प्रिय राकु आपल्याला रोग झालाय,

रोगाचे नाव - विचारजंत
रोगाचे लक्षण- डोळ्यावर , कानावर झापडे आल्यामुळे, आणि मेंदूला बुरशी लागल्यामुळे , मी प्रकांड पंडित , मीच बरोबर बाकी सगळे चुकीचे, असे सांगत बोंबलत लिहिणे.
रोग- उप्चारेबल

जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधा.

मोफत आणि योग्य उपचार केले जातील.

मोगा's picture

23 Nov 2015 - 12:37 pm | मोगा

त्या दंगलीत सेनेने विधायक काम केले हे क्षणभर ग्राह्य मानू.

पण म्हणून १९७० ते ९१ आणि ९३ ते २०१५ मधील निश्क्रियतेचा हिशोब विचारला तर त्याला उत्तर म्हणुन नुसते ९२ चे अनुभव दिले की झाले का ?

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 1:00 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा

ब्यॅट्या आणि मोगा यांचे एकमत??? पुर्वी असेच एकदा श्रीगुर्जी आणि दादूस (का मै) यांचे एकमत झालेले....फटू काढा रे कोणीतरी या प्रतिसादाचा =))

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 4:03 pm | बॅटमॅन

दू दू दू

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 4:35 pm | टवाळ कार्टा

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ

धागा टाकणारे मैदान सोडून पळाले. आत्ता सर्वधर्मसम्भाव वाले उत्तर देत् आहेत.
इमाम भीखारी दिल्लीत राहून पाकिस्तानची भाषा बोलतो. त्याची व्यक्तत्त्वे हिन्दुविरोधी गरळ ओकतात् भारतातले असंख्य मुसलमान त्याचा शब्द प्रमाण मानतात. अशा माणसाकडे सोनिया गांधी निर्लजपणे मुस्लिमांची मते मागायला जातात. त्या बदल्यात बेकायदेशीर मशीदिना हात लावला जाणार नाही हे आश्वासन मिळते. भुकारी देखिल सर्व मुस्लिम मते आपल्या बापाची जागीर असल्याप्रमाणे आवाहन करतो. काय कारवाई केली हो या धर्मांधावर? मग बाळासाहेबानि हिंदुचि बाजू मांडली तर काय बिघडले?
वर कोणीतरी दंगलीचे वर्णन केले आहे. जरा पोलीसांचे रेकॉर्ड तपासा मग कळेल दंगेखोर कोण आहेत ते. दंगलीचे कशाला गुन्हेगारीची रेकॉर्ड तपासा, टक्केवारी कोणाची जास्त आहे?
दादा कोंडकेनि एक आठवण सांगितली आहे. हां किस्सा जुना आहे. तेव्हा मुंबईतील मराठी माणूस लालबाग परळ भागातून बहुसंख्येने होता. दादाचा सिनेमा म्हणजे महाराष्ट्रात १००% सुपरहिट . तेव्हा देखिल प्लाझा चित्रपटगृहाने दादाचा सोंगाड्या हा चित्रपट कबुल करुन देखिल दुसऱ्या चित्रपटासाठी वेळ दिला . दादानी बाळासाहेबाकडे दाद मागितली. साहेबानीच न्याय मिळवून दिला. गोष्ट छोटीशी वाटेल पण जे फ़िल्म इंडस्ट्रीत आत्ता काम करत आहेत त्यांना विचारा की जी जूनियर आर्टिस्ट जी संगठना आहे जी जास्त करून बाहेरच्या राज्यातील आहे ते मराठी निर्मात्याना कसे नडतात ते?

मोगा's picture

23 Nov 2015 - 8:32 pm | मोगा

बुखारीना सोनिया , कंऑग्रेस याप्रमाणे मोदी अडवानी भाजपी भेटतात. वोट ब्यान्क व गुरुकृपा सार्‍य्नाच हवी असातॅ

....

बुखारी पाकची भाषा करत्सत. तर तुम्हीही अखंड हिंदुस्तानची भाशा कraa.. कोण अडवलय का तुम्हाला ? कृण्वन्तु विश्वम आर्यम .. शुभेच्छा !

.....

राजकारणी लोक आपल्या गटातील maaÑasaalaa मदत करतात. जशी साहेबानी दादाना मदत केली तसे इतर पुढारीही karàtaat.

.......

मूळात हा विषाय एक खिचडी आहे.

१. बाळासाहेब महान होते का ?
२. त्यांचे स्मारक होणे योग्य आहे का ?
३. त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात व्हावे का ?

याची हो हो हो , ना ना ना , हो हो ना , हो ना ना

अशी अनेक उत्तर निघु शकतात.

हो हो हो वाल्यानी एकही उत्तर ना असलेल्याना लगेच पाकिस्तानात ढकलू नये.

तसेही इथल्या कौलावर ते स्मारक होणे न होणे अबलंबून नाही.

मोगा's picture

23 Nov 2015 - 8:42 pm | मोगा

साहेबांचे स्मारक मातोश्री किंवा रायगडावर व्हाव.

अन्नू's picture

24 Nov 2015 - 1:35 am | अन्नू

इमाम भीखारी दिल्लीत राहून पाकिस्तानची भाषा बोलतो. त्याची व्यक्तत्त्वे हिन्दुविरोधी गरळ ओकतात् भारतातले असंख्य मुसलमान त्याचा शब्द प्रमाण मानतात. अशा माणसाकडे सोनिया गांधी निर्लजपणे मुस्लिमांची मते मागायला जातात......

पटवून देताना विषय खुपच भरकटला गेला आहे तुमचा. मुळात कुठला पक्ष-धर्म श्रेष्ठ आणि कुठला नाही- असा हा वादच नाही. आणि खरं सागायच तर कोणताही पक्ष उदारवादी वगैरे नसतोच. आपला स्वार्थ जिथे असेल तिथेच आणि तोच मुद्दा तो बरोबर खुबीने घेत असतो.
"आणि माझ्या मते तर- कुठलाही राजकिय पक्ष कधीच विश्वासपात्र नसतो!"

बाळासाहेबानि हिंदुचि बाजू मांडली तर काय बिघडले?

काहीच बिघडलं नाही, पण ते करताना- कारण नसताना, हिंदूंना मुसलमानाविरुद्ध भडकवणे आणि बाबरी मस्जिद पाडायला लावणे ही कुठची आणि कुणाच्या हीताची गोष्ट म्हणायची?

पहिल्यांदा तर आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी इतर हिंदूंना भडकवून बाबरी मस्जिद पाडायला लावली- छाती ठोकून "बाबरी मस्जिद पाडायला सर्वात पुढे शिवसेनेची लोकं होती" असं सांगितलं आणि नंतर दंगल होऊन सगळं अंगावर यायला लागल्यावर तेच वाक्य झटक्यावर बदललं!!-"नाही-नाही मी तसं म्हणालोच नव्हतो- मी म्हणालो होतो बाबरी मस्जिद पाडायला गेलेली शिवसेनेची लोकं नव्हती!"????
हसावं कि रडावं असल्या विधानावर?
आणि महाशय- दंगलीबद्दल कसल्या कागदपत्रांच्या गोष्टी करताय तुंम्ही? आत्ता सरकारी कागदोपत्री झालेल्या किती गोष्टी सत्यात आलेल्या दिसत आहेत तुंम्हाला? कि अजुनही सरकारी आणि पोलिसी रेकॉर्ड- कागदपत्रांवर तुमचा गाढ विश्वास आहे?
म्हणजे ज्यांनी ते जवळून बघितलं अनुभवलं ते खोटं आणि कागदोपत्री जे नमुद झालं ते खरं का?
आणि जर फक्त त्या कागदपत्रांचा आधार घेऊन तुंम्ही हे सांगत असाल, तर तुंम्हाला कॄषीमंत्र्यांची उपमा का देण्यात येऊ नये?
त्यांनीही मधे- जमवलेल्या 'कागदपत्रांच्या' आधारेच "शेतकरी हा वैयक्तिक प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतो" असे विधान केले होते!

गुन्हेगारीची रेकॉर्ड तपासा, टक्केवारी कोणाची जास्त आहे?

अहो इथे काय गुणवत्ता तपासायची आहे का टक्केवारी काढून? ते श्रेष्ठ कि आंम्ही श्रेष्ठ?
जर समजा, एखादवेळी हिंदूच्या एखाद्या पवित्र मंदीराबरोबर मुसलमानांनी गैरव्यवहार केला तर तुंम्ही गप्प बसाल का?
आणि महत्त्वाचा मुद्दा कि- त्यावेळीही तुंम्ही हीच टक्केवारी विचारात घ्याल का?
नक्कीच नाही! कारण त्यावेळी तुमचा एकच प्रश्न असेल- "आधी सुरवात कोणी केली?"

आता दादाकोंडके मराठी होते म्हणून ठाकरेंनी त्याला मदत केली असं तुमचं मत एकदम निष्ठेने मान्य केलं तर, मग मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या- मागे गोधरा हत्याकांडात ठाकरेंनी मोदींना मदत केली होती- त्यातून भाजपला त्यांनीच तारलं होतं, तर मग मोदी हे कुठल्या आणि कसल्या अ‍ॅ॓गलने मराठी आहेत हो???

-कॄ. ह. घ्या
अवांतर- डोळ्यांवरची पट्टी काढा- तुंम्हाला सगळ्याच राजकिय पक्षांची सत्यता दिसेल! :)

भंकस बाबा's picture

24 Nov 2015 - 9:34 am | भंकस बाबा

बाबरी मशीदिवर बोलाल तर पुरातत्व खात्याने तिथे राममंदिर होते असा निर्वाळा दिला आहे. हे आमच्यावर झालेले आक्रमण आहे हे सांगायला बहुसंख्य हिंदुना उणिपुरी ४००वर्षे जाऊ देऊ लागतात. इमाम ओकारी बद्दल त्याचा एक वीडियो मधे वायरल झाला होता. एका मुस्लिम पत्रकाराने भर सभेत त्यांना विचारले की बाबरीनाम्यामधे जर रामजन्मभूमि ही हिंन्दूचि जागा असेल तर ती त्यांना द्यायला काय हरकत आहे? यानंतर भुकारीने गोंधळ घातला तो अभूतपूर्व होता. अगदी प्रवीण तोगड़िया, साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्रग्न्या यांना तुम्ही संत म्हणाल असा.
बाळा साहेबानी केलेले वक्तव्य हे होते की बाबरी मशिद तोडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही वडाची साल पिंपळाला लावत आहात.
हां प्रश्न मी आधी पण अनेक प्रतिसादावर विचारला आहे. कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. तुम्ही मुस्लिम वस्तीत रहाता काय? मी राहतो . माझ्या आसपासचे मुस्लिम जीवाला जिव देणारे आहेत. मला असे प्रेम मी जेव्हा हिन्दू वस्तीत राहात होतो तेव्हा पण मिळाले नव्हते. पण जेव्हा धर्माचा विचार होतो तेव्हा मात्र हे गरळ ओकतात. तुम्ही जराशि टिंगल करा तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते . पण स्वतः मात्र खुशाल हिंदू देवदेवताची खिल्ली उडवतात. हुसैन ची चित्र बघितलि की तुम्हाला कल्पना येईल. किती सेक्युलर म्हणवण्यार्या नेत्यांनी हुस्सैन चा विरोध केला?
बाळा साहेबानि नेमके या मार खाण्याऱ्या हिन्दुला एकत्र केले. स्वतः हुन हल्ला करायचा नाही पण अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय सोडायचे नाही.
मराठीची बाजू घेतली म्हणुन बाळासाहेंबावर टिका होते. भारततल्या कोणत्या राज्यांत प्रांतीय भाषेची अस्मिता जपली जाट नाही? दक्षिण भारतात तर विंगर्जित बोलतील पण हिंदी बोलणार नाही. आपले मराठी जिथे जातात तेथील संस्कृति आपली म्हणतात पण आपल्याकडे आलेले परप्रांतीय आपले ते दुसर्यावर लादन्याचे प्रयत्न करतात. उदा. लग्नसभारम्भ, बारसे या प्रसंगी हिजड़े नाचवणे ही परप्रांतीय प्रथा पण आता ती आपल्यावर बेमालूम पणे लादली गेली आहे. पैसे द्यायला नाही म्हणा बघा कसे हैदोस घालतात ते?
गोधरा हत्याकांड नव्हे गुजरात दंगल. मोदींना सुप्रीम कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वर आहात काय?
मुंबई दंगलीचि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन मुंबईत ब्लास्ट घड़वण्यात आले . हे निर्लज्ज उद्दगार मुस्लिम नेते आजवर काढत आले आहेत. याकूब मेमेनच्या फाशीच्या वेळी काय अकांडताण्डव केले हे पण सर्वानी बघितले. तरिही तुम्ही बोलता की हिंदुना भड़कवले जाते म्हणुन?
प्रेमाचा,अहिंसेचा सन्देश घेऊन आलेला बौद्ध धर्म एके काळी अफ़ग़ानिस्तान पासून पार खाली कम्बोडिया पर्यन्त पसरला होता. मुस्लिम आक्रमकानि पूर्व आशिया कड़े रोख वळवल्यावर त्या धर्माची दाणादान उडाली. हिन्दुनि प्रतिकार केला ते टिकले. हा आता तुम्हाला बांगाच् ऐकयच्या असतील तर काही हरकत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2015 - 10:13 am | कैलासवासी सोन्याबापु

बाबरी मशीदिवर बोलाल तर पुरातत्व खात्याने तिथे राममंदिर होते असा निर्वाळा दिला आहे.

ह्यावर काही दुवा असल्यास देणे, वाचायला आवडेल ह्या विषयावर अजुन.

शिवाय

बॅटमॅन अन प्रचेतस ह्यांची मते सुद्धा वाचायला आवड़तील

प्रचेतस's picture

24 Nov 2015 - 10:17 am | प्रचेतस

राममंदिर होते की नाही ते माहीत नाही. पण कुठले तरी मंदिर शिव / विष्णू चे नक्कीच असावे. बाबराने तिथली असंख्य मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या होत्या ह्यात काहीच वाद नाही.
तसे रामाचे दैवतीकरण फार उशिरा झाले. रामाची स्वतंत्र अशी मंदिरे १२ व्या शतकानंतरचीच दिसतात. रामायणातील प्रसंग मात्र मंदिर पट्टीकांवर कोरलेले बर्‍याच ठिकाणी दिसतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2015 - 10:31 am | कैलासवासी सोन्याबापु

मुळात विष्णु मंदिर किंवा गरुड़ खांब किंवा गणेश पुजा ही उत्तरगुप्त काळात सुरु झाली होती असे बहुतेक के कृष्णा रेड्डी का व्ही डी महाजन मधे वाचल्याचे स्मरते, ह्यावर काही प्रकाश टाकता येईल का प्रचेतस जी?

प्रचेतस's picture

24 Nov 2015 - 10:53 am | प्रचेतस

एकूणातच मंदिर उभारण्याची पद्धत इस. १ /२ शतकात सुरु झाली. बेसनगरचा हेलिओडोरसचा गरुडस्तंभ इस.पू २ र्‍या शतकातला आहे जो भागवदधर्माची महती सांगतो. त्यामुळे रूढार्थाने पूजा तेव्हापासूनच सुरु झाली ह्यात काहीच शंका नाही. गणेशपूजन मात्र उत्तरगुप्त काळातच सुरु झाले.

बॅटमॅन's picture

24 Nov 2015 - 3:39 pm | बॅटमॅन

उत्खननात तिथे १०-११व्या शतकातल्या मंदिराचे अवशेष सापडलेत इतके मात्र खरे आहे. बाकी डीटेल्स विसरलोय अता.

पगला गजोधर's picture

24 Nov 2015 - 5:21 pm | पगला गजोधर

त्खननात तिथे १०-११व्या शतकातल्या मंदिराचे अवशेष सापडलेत इतके मात्र खरे आहे.

१६ व्या शतकाच्या, मुघल शासक बाबर च्या कालखंडाच्या दरम्यानच, तुलसीदास यांनी रामायण लिहिले, पण त्यात कुठेही त्यांनी राममंदिराचा उल्लेख केलेला नाही, जर अयोध्येत खरंच राममंदिर असते, की जे बाबराने फोडल्याचा दावा केला जातो, तर तुलसीदासांनी त्या राममंदिराचा उल्लेख नक्कीच केला असता, वाटते.

मोगा's picture

24 Nov 2015 - 10:35 am | मोगा

राजेशाहीच्या काळात बाबराने युद्ध करुन जी जमीन जिंकली तिच्यावरील वास्तूम्चे काय करायचे हे तोच ठरवणार ना ?

तेंव्हा गप्पगुमान बसलेले लोक आता लोकशाहीच्या काळात हा हिशेब सेटल करु शकतात हे पाहून मौज वाटली.

....

४०० वर्षापुर्वीचे कारण दाखवून मशीद पाडली तर तो कार्यकारणभाव मान्य होतो.

पण दोन चार वर्षापुर्वी मशीद पाडली म्हणून बाँब उडला तर तो कार्यकारणभाव मान्य होत नाही.
.....

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2015 - 11:30 am | कैलासवासी सोन्याबापु

राजेशाही च्या काळात थोरल्या राजांनी अफज़ल खान फाड़ला अन मुंडके पुरले, तेव्हा त्याचे आज काय करायचे हे राजेंची जनता अन किल्ल्याचे मालक असलेले छत्रपती ठरवनार न?

काहिशे वर्ष पूर्वीच्या कार्यकारण भावानुरूप (इस्लाम ला मान्य नसतानाही) मजार अन थड़ग्याची पूजा चालते

पण त्या थड़ग्याचे काय करायचे हा प्रश्न राजांच्या वंशजांनी ठरवतो म्हणले की जाळपोळ सुरु!

भंकस बाबा's picture

24 Nov 2015 - 2:57 pm | भंकस बाबा

मोगाजि किती निर्लज्ज पणाचे उत्तर आहे तुमचे! मशिद पाडली कारसेवकानी , लोकांचे संसार उध्वस्त केले नाही. तुम्ही दाऊदचे समर्थन करत आहात. हे मत माझे नाही तुमचा प्रतिसाद असे सांगतो.
शिवाजी महाराजांची अफझलखानाची कबर बांधन्याची कृति ही त्यांच्या गनिमि काव्याला अनुसरुन होती. महाराजांनी अफझलखानाचे मुंडके भाल्यावर टोचुन विजयी मिरवणुक काढली असती तर इस्लाम खतरे में ची आरोळी मारून सर्व मुस्लिम राजवट रांगायला लागलेल्या स्वराज्यावर तुटून पडली असति. शिया असलेल्या आदिलशाही विरुद्ध महाराजानी असे काही दावपेच लढवले की सुन्नी मुघल यापासून दूर राहिले. राहता राहिले अफझलखानाची कबर, तुम्ही प्रतापगड़ावर गेला आहत काय? जाऊन बघा , महाराजानी कब्रिसाठी जागां दिली होती दर्ग्या साठी नाही. मी स्वतः तीथे मुस्लिम लोकांना नमाज पड़ताना बघितले आहे म्हणजे ४०० वर्षांनंतर क्रूरकर्मा असलेला खान बाबा बनला काय? हाच नियम जर लावला तर कसाब व् अफझल गुरु पण ४००वर्षांनंतर पूजले जातील. कारण पाकिस्तानच्या मते ते तर हीरो आहेत ना?

मोगा's picture

24 Nov 2015 - 3:27 pm | मोगा

कारसेवकानी माणसे मारली नाहीत म्हणून त्यांचे मशीद पाडणे जस्टिफाइड कसे ठरते म्हणे ?

अफ्जलखानाची कबर बांधण्यामागे सहिष्णुता वगैरे काही नसून ती एक राजकीय खेळी होती , असे तुम्हाला सुचवायचे आहे का ?

भंकस बाबा's picture

24 Nov 2015 - 3:53 pm | भंकस बाबा

काश्मीर मधे हिंदुना हो हिंदुना ते फ़क्त हिन्दू आहेत म्हणुन पळवून लावले जाते, विचार करा ते काही उपरे नाही तर वर्षानुवर्षे त्यांच्या अनेक पिढ्या तिथे नांदल्या. नेसत्या वस्त्राणिशि बाहेर पडलेल्या त्या कश्मीरी पण्डिताचा टाहो कोणी नाही ऐकला. हजारो नाही लाखो! आणि इतिहास सांगतो आहे की बाबराने मंदिर पाडून मशीदि बांधल्या ,तरिही त्या पडल्याबद्दल इतका टाहो? ती पण एकच मशिद!हजारो काश्मिरी पण्डिताचे शिरकान , शेकड्यांने केलेले बलात्कार हे सर्व विसरयायचे राव , बाबरी मशिद तेवढी लक्षात ठेवायची. हिन्दू मार खान्यासाठी जन्माला आले आहेत, थोडेसे धर्मान्तरित झाले तर काय बिघड़ल, ठाकरेनी मात्र सयंम बाळगायचा, वा मोगाजी वा
बाकी मी मशिद पाडण्याचे समर्थन केले आणि करिन. आता तुम्ही काय कराल? बॉम्ब स्फोटाचे समर्थन?

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 3:59 pm | संदीप डांगे

बाबराने मंदीर पाडून मशिद बांधली. त्याचा ती मशिद पाडून तुम्ही जो बदला घेतला गेला त्याचे समर्थन करताय. आता लाखो कशमिरी पंडीत निर्वासित झाले, बलात्कार झाले त्याचा तसाच बदला घेण्याबद्दल समर्थन कराल का?

भंकस बाबा's picture

24 Nov 2015 - 4:18 pm | भंकस बाबा

पण मी हिंदू संस्कृति मानतो. बलात्काराला बलात्कार हे समीकरण मी कधीच मानणार नाही. तशी शिकवण नाही दिली मला माझ्या आईवडिलांनी. विचार करा हे जे निर्वासित झाले त्यांनी पुष्कळसे स्वताला सावरले, जर हिंदू नेत्यांनी अतेरेकि शिकवण दिली असती तर ह्यांना मानवी बॉम्ब बनायला वेळ लागला नसता. बाळासाहेबानी देखिल हेच सांगितले . बाकि तुम्ही तुम्हाला दुसर्याला जे बनवायचे आहे ते बनवून मोकळे होता .
तो धागावाला कुठे गेला? मला वाटते पुण्यातील सदाशिवपेठेत् राहणारा हा सातवी फ चा विद्यार्थी असावा , शाळा सुरु झाली ना, आता गृहपाठ करायचा असेल?

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 4:29 pm | संदीप डांगे

नाही हो. मशीद पाडून मंदीर बनवायचे होते असे आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो तेव्हा ऐकले होते. लोक सत्तेचे सोपान चढले मंदीराचे आमिष दाखवून. पुढे मंदीराचे काय झाले ते कळले नाही. काही माहित आहे का तुम्हाला...?

असो, विषय मोठा आणि नेहमीचाच आहे. बाबरी पाडण्याचं समर्थन करणारे भेटले की जुन्या आठवणी आणि प्रश्न जागतात. कश्मिरी पंडीतांना परत कश्मिरमधे कधी पाठवताय बाकी...?

मोगा's picture

24 Nov 2015 - 4:54 pm | मोगा

http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahin...

अबबबं ! चौदाशे कोटी ढापले म्हणे !

पण दोन चार वर्षापुर्वी मशीद पाडली म्हणून बाँब उडला तर तो कार्यकारणभाव मान्य होत नाही.

बाकी जाऊंदे पण तुम्ही आता दाऊदला/दहशतवादाला डिफेंड करताय.

मोगा's picture

24 Nov 2015 - 4:31 pm | मोगा

मी मशीदही पाडली नाही व बाँबही उडवला नाही.

या दोन्ही पार्ट्या कशा डिफेन्स करत आहेत ते मी फक्त लिहिले.

त्ञो तुमचा संजय , आधी याने त्याला कसा मारला हे बोलुन मग त्याने याला कसा मारला हे बोलायचा , तसे.

...
तटस्थ मोगा उवाच !

भंकस बाबा's picture

23 Nov 2015 - 4:51 pm | भंकस बाबा

टाइपिंग मिस्टेक नाही आहे ती

मोगा's picture

24 Nov 2015 - 5:46 am | मोगा

बुडाला औरंग्या पापी ... असं येड्यागत बडबडत बसलं की लगेच औरंग्या बुडत नाही .

जय२७८१'s picture

23 Nov 2015 - 5:58 pm | जय२७८१

(माझ्या लेखाचा प्रतिवाद करायचा प्रयत्न तर तुम्ही केलात. पण दुर्दैवाने एकाही मुद्द्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही हे दिसले. उलट भलत्याच गोष्टींचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही वहावत गेला आहात)सगळे तुम्हीच ठरविणार का? बॉल माझा, ब्याट माझी मग मीच ठरविणार मी आऊट कि नाही सगळे माझेच खरे......
(ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही ) मग तुमचे काय मत आहे यांचा कार्याक्रम शहीद जवानाच्या माता-भगिनीनच्या मनोरंजना साठी ठेवायचा का ? तुम्ही शिवसेनेला विरोध करता करता तुम्ही पापिस्तानला सपोर्ट करायला लागलात. तुम्ही किती वाहत गेलात ते बघा जरा ....
वायफळ बडबड बंद करा आता ....

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2015 - 6:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

बिचारा गुलाम अली एक गायक

बिचार्या ग़ुलाम अलीचा एक किस्सा,

एकदा हा खाल्ल्या इंडस्ट्री चे वासे मोजणारा कृतघ्न गवई पाकीस्तानहून भारताला येत होता तुमच्या सारख्या रासिकांना रिझवायला, तेव्हा त्याच्या शेजारी एक डिप्लोमेट बसला होता त्याच्यासमोर हा पंजाबी शेर भारतीय कसे बुळे अन बिना कण्याचे आहेत वगैरे वर्णन करू लागला, मुळात तो अधिकारी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलाती चा अधिकारी होता पण ग़ज़लनवाज त्याला "अपनावाला" समजून तोंड ढीले सोडते झाले अन त्या अधिकाऱ्याने हसून विषय बंद केला, दिल्लीत आल्याबरोबर त्या अधिकाऱ्याने तातडीने ह्या हरामखोराची फ़ाइल मागवुन रेड मार्क शेरा लिहिला अन त्यानंतर बरीच वर्षे हे गवईबोवा भारतातून बॅन होते कारण विसाच मिळत नसे

मुद्दा हा की हे पाजी म्हातारडे अजिबात बिचारे गायक वगैरे अजिबात नाही

टिप :- गायकाची फ़क्त गायकी पहावी इतर पाहु नये वगैरे कृपया सांगु नये, अन त्यों थेरडा पाजी आहे म्हणुन सेना लै भारी आहे अश्यातला भाग नाही ती सुद्धा दिव्य लोकांचीच जत्रा आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Nov 2015 - 7:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुळात तो अधिकारी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलाती चा अधिकारी होता पण ग़ज़लनवाज त्याला "अपनावाला" समजून तोंड ढीले सोडते झाले अन त्या अधिकाऱ्याने हसून विषय बंद केला,

ही कथा अजिबात पटत नाही आहे रे बापू. एक तर असे शेरे मारण्याआधी तो माणूस समोरच्याला नाव-गाव नाही विचारणार? त्या अधिकार्याची टी.व्ही.वर येऊन सरळ बोलायची हिम्मत आहे? आणी त्या अधिकार्याने उलटे सुनावले असेल तर प्रश्नच मिटला.
आमचे अधिकारी 'मी साळसूद' हे दाखवायच्या प्रयत्नात असतात असे ह्यांचे मत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Nov 2015 - 7:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा.

योग्य बोललास रे राजेश.नातवंडांना शारदाश्रम्,बालमोहन ऐवजी बॉम्बे स्कॉटिशमध्ये घातल्याची बातमी वाचल्यावर
शिवसेनेला मत देणे कायमचे बंद केले होते.असो.

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2015 - 11:46 am | प्रभाकर पेठकर

लेखात मांडलेल्या बहुतांश मुद्यांशी सहमत आहे.

शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंच्या हयातीत त्यांच्याच सांगण्यावरून मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी झाली. तेंव्हा 'शिवसेना ही समाजसेवी संघटना आहे' असे जाहिर करण्यात आले होते. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' अशी घोषणा प्रबोधनकारांनी केली होती. तसेच, मराठी माणसाची व्याख्या 'जी व्यक्ती २० किंवा त्याहून अधिक वर्षे महाराष्ट्रात आहे ती मराठी' अशी केली होती. नोकरीच्या मुद्द्यावर शिवसेनेने जे दाक्षिणात्यांवर विरोधाचे हत्यार उपसले होते ते योग्यच होते. त्या काळात शिवसेनेच्या सहाय्याने निरलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज, गोदरेज, सिएट टायर्स, स्टेट बँक, अमेरिकन एक्स्प्रेस आदी आस्थापनांमध्ये मराठी माणसांची भरती सुरु झाली. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये ८० टक्के मराठी उमेदवारांना नोकरीचा अधिकार मिळाला. ह्या सर्व विधायक कार्यामागे शिवसेनाच होती. आणि त्यामुळे तत्कालीन बेकार मराठी तरूण शिवसेनेकडे आकृष्ट झाला. फुटपाथ वरती शिवसेना पुरस्कृत वडापावच्या गाड्या मराठी पोरांनी लावायला सुरुवात केली आणि कांही अंशी उद्योजकता मराठी माणसात रुजायला सुरुवात झाली. मराठी माणसाला हक्कांची जाणीव शिवसेनेने करून दिली. ह्या सर्वाचे योग्य ते श्रेय शिवसेनेला दिलेच पाहिजे. इथपर्यंत शिवसेना चांगली होती. लोकमानसात, खास करून मराठी मनांत, शिवसेनेला मानाचे स्थान होते.
पुढे महाराष्ट्राच्या शासकिय कर्मचार्‍याच्या संपात शिवसेना तोंडघशी पडली. 'संप अयोग्य आहे मागे घ्या. तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत' असे संपकार्‍यांना बाळासाहेबांनी सुनविले होते आणि सरकारने संपकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून शासकिय कर्मचार्‍यांच्या मनांत शिवसेने बाबत दुरावा निर्माण केला आणि शिवसेनेचा एक मोठा मतदार गट तोडला. शिवसेनेच्या कुठल्याही दंगलीत समाजकंटकांनी दंगलीचा फायदा घेऊन (आणि शिवसैनिकांनी समाजकंटकांच्या नांवाचा फायदा घेऊन) दुकाने लुटली. वैयक्तिक हेवेदावे साधून घेतले, तोडफोड केली आणि शिवसेना बदनाम होत गेली. ह्याला वेळीच आवर घालण्याऐवजी बाळासाहेबांनी हिच पक्षाची ताकद बनविली आणि शिवसेनेला गुंडसेना हे नामाभिमान प्राप्त झाले. सभ्य आणि सारासार विचार करू शकणारा मध्यमवर्ग शिवसेनेपासून दूर जाऊ लागला. पुढे खंडणी शिकवण सुरु झाली. आणि त्यालाच महत्व प्राप्त होऊन शिवसेनेचे समाजकारण मागे पडत गेलं. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' ही प्रबोधनकारांची घोषणा केंव्हाच मागे पडून शिवसेना राजकारणात गळ्यापर्यंत बुडाली होती. मुसलमानांना, परप्रांतियांना विरोध करणार्‍या शिवसेनेत मुसलमानांचा आणि पारप्रांतियांचा प्रवेश झाला होता. पाणी बरेच गढूळले होते. पुढे प्रदेशस्तरावरून देशस्तरावर शिवसेना नेण्याच्या उद्देशाने भारतिय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात मराठी उद्योजकांच्या संधी डावलून उत्तरभारतिय उद्योजकांनी लहान मोठी सरकारी कामे मिळविण्यास सुरुवात केली. भारतिय जनता पक्षाशी केलेल्या राजकिय हातमिळवणीमुळे शिवसेनेला उत्तरभारतियांना विरोध करता येईना आणि शिवसेना 'मराठी माणसाची' उरली नाही. पण तो पर्यंत बरीच ताकद गोळा केली असल्यामुळे आता मराठी माणसाची गरजही उरली नव्हती. मग सुरू झाले राजकिय स्वार्थी डावपेच आणि अर्थकारण. शिवसेनाही एक स्वार्थी राजकिय पक्ष म्हणूनच उरला. मराठी माणसांची सहानुभूती गमावून बसला.
शिवसेनेची सुरुवातीची आदर्श प्रतिमा १०-१५ वर्षांपेक्षा जास्त टिकली नाही. पण स्वार्थाने बरबटलेली बाजू जास्त प्रभावीपणे पुढे आली. बाळासाहेबांना मान होता तो त्यांच्या धाडसी वक्तव्यामुळे. तथाकथित 'ठाकरी शैली' समाजाच्या एका वर्गाने उचलून धरली, उदो उदो केला पण भडकाऊ भाषणाने निवडणूका जिंकता आल्या नाहीत. शेवटच्या निवडणूकीतही शिवसेनेला जनतेने नाकारले तेंव्हा आपले काय चुकले आहे ह्यावर विचार न करता 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' असे उद्वेगजनक उद्गार शिवसेनाप्रमुखांनी काढले. (नंतर सारवासारव केली).
कुणाही राजकिय पुढार्‍यांचे स्मारक-पुतळे उभारू नयेत ह्या वैयक्तिक मताचा मी आहे. त्यातून दादर मधील एव्हढी मोठी जागा स्मारकाच्या नांवाखाली शिवसेनेच्या घशात ढकलणे मान्य होत नाही. उद्या बारामतीत पवार साह्बांचे मोठ्ठे स्मारक होईल, दादरमध्ये उद्धवजींचेही होईल आणि राज ठाकरेंचेही होईल. आमचा ह्या सर्वाला कितीही विरोध असला तरी आम्हाला विचारतो कोण? तेंव्हा जे चालले आहे ते पाहात राहणे एव्हढेच हातात आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2015 - 12:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय जबरी विश्लेषण आहे काका __/\___

महासंग्राम's picture

24 Nov 2015 - 4:22 pm | महासंग्राम

हुश्श्श……. झाला एकदाचा १०० नंबरी धागा… पदार्पणातच शतक मारल्याबद्दल अभिनंदन ना बाप्पू !!!

शंभर झाल्याबद्दल या धाग्याला स्मारक* म्हणुन घोषीत करावे.

आखिलमिपाहेवनवाशीआयडीफॅनक्लब.

महासंग्राम's picture

24 Nov 2015 - 4:42 pm | महासंग्राम

जेपी खरंच हेवनवाशी जाहला का हो हा आयडी ?????

हेवनवाशी= छिद्रान्वेशी कसला टायमिंग आहे ….

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 4:55 pm | संदीप डांगे

फुल्ल ट्यांक मारुन अनुमोदन... धागावाचनमात्र करावा. परत नेहमीचीच दळणे दळायला येण्याआधी कारण गिरणीमालक पदच्युत झाला आहे.