जया बच्चनचा तीव्र निषेध...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
7 Sep 2008 - 8:58 am
गाभा: 

कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने

'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!"

असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्‍यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते! मूळची बरेलीची असलेली प्रियांका चोप्रादेखील जयाच्या संगतीने हसत, थोबाड विचकत तेथेच उभी होती!

मराठीची, महाराष्ट्राची खिल्ली उडवण्याबद्दल मी जया बच्चन यांच्याबद्दल अत्यंत तीव्र आणि कडवा निषेध व्यक्त करत आहे! ज्या महाराष्ट्राने आयुष्यभर दोन वेळची भाकरी दिली त्या महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रीयांबद्दल इतकी हेटाळणी, टिंगलटवाळी करणे हे माझ्या मते अत्यंत कृतघ्नपणचे लक्षण आहे. ज्या थाळीत खायचे त्याच थाळीत हागायचे असला प्रकार आहे हा!

असो, हे हागणे संबंधितंनाच लखलाभ!

षंढ असलेले महाराष्ट्र शासन जयाच्या या मराठीची आणि महाराष्ट्राची जाहीरपणे खिल्ली उडवण्याच्या वर्तनाबद्दल आता तिच्यावर काय कारवाई करणार ते बघायचे!

या सर्वामागे समाजवादी पक्ष येथे भाषिक व प्रांतिक राजकारण करू पाहात आहे हे गर्भित आहेच!

तात्या.

प्रतिक्रिया

हेरंब's picture

7 Sep 2008 - 9:31 am | हेरंब

तात्या, आपल्याशी सहमत.
अशा कलाकारांच्या सिनेमांवर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी बहिष्कार घातला पाहिजे. हा माजोरीपणा आपल्या सध्याच्या बोटचेप्या सरकारमुळे च वाढला आहे.

सखाराम_गटणे™'s picture

7 Sep 2008 - 10:46 am | सखाराम_गटणे™

समाजवादी पक्षात असल्याच लोकांना प्रवेश असतो.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा ऐक कलाकार म्हणुन थोडा आदर वाटतो.
इतर आयुष्य तर असेच बरबटलेले आहे.

त्या बातमीचा दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3454574.cms

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 10:55 am | विसोबा खेचर

बातमीच्या दुव्याबदल आभार...

मदनबाण's picture

7 Sep 2008 - 9:34 am | मदनबाण

'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!"
महाराष्ट्राच्या लोकांनी इतके दिवस यांना माफच केल आहे ही त्याचीच फळे आहेत..
जया बच्चनचा तीव्र निषेध!!!!!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सखाराम_गटणे™'s picture

7 Sep 2008 - 9:37 am | सखाराम_गटणे™

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार.
शेवटी भाषा स्वातंत्र आहेच, तेव्हा आपण एका कलाकाराकडे अशा नजरेने पाहु नये असे वाटते.

मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्‍यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते!

वाहिन्यांना सनसनाटी काही तरी पाहिजे असते तेव्हा अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे असे वाटते.

तात्या, जयाचा या गाण्यातला भाव पाहा :)

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 9:47 am | विसोबा खेचर

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार.

अरे मग बोला ना हिंदीत! हिंदीतच काय, अन्य कुठल्याही भाषेत बरळा! पण चेहेर्‍यावर मराठीची अन् मराठी भाषिकांची खिल्ली उडवणारे भाव का? ते काय आम्हाला समजत नाहीत?

वाहिन्यांना सनसनाटी काही तरी पाहिजे असते तेव्हा अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे असे वाटते.

वाहिन्यांना सनसनाटी काहीतरी पाहिजे असते हे कबूल आहे परंतु कालची घटना माझ्या मते दुर्लक्ष करण्याजोगी नाही! सबब, मी आपल्या वरील विधानाशी असहमत आहे!

तात्या, जयाचा या गाण्यातला भाव पाहा

एक गुणी अभिनेत्री म्हणून तिला जितके मानायचे तितके मीही मानतो! परंतु या चर्चेत तिच्या अभिनयाचा मुद्दा नाही. मुद्दा आहे तिच्या महाराष्ट्र-द्वेष्टेपणाचा!

असो....

तात्या.

राघव's picture

8 Sep 2008 - 4:27 pm | राघव

निषेध तर झालाच पाहिजे.
जसे जयाबाई बोलल्या तसे त्या यु. पी. मधे जाऊन मराठी माणसाने म्हटले तर त्यांना चालणार आहे काय? सगळा सहिष्णुतेचा भार आम्ही मराठी माणसांनीच वहायचा ठेका घेतलाय काय? जेथे राहता तेथील सभ्यता तुम्हास शिकावीच लागेल म्हणावं. नसेल जमत तर परत जाऊन यु.पी.मधे एखाद्या खेड्यात जाऊन शेती करत दिवस काढा म्हणा उरलेले. तेथे हिंदीच काय काही न बोलले तरी चालेल त्यांचे.

संतापलेला मुमुक्षू

अवलिया's picture

7 Sep 2008 - 9:48 am | अवलिया

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार.

माफ करा सर
पण याला आम्ही विचारवंतांची गांडुगिरी म्हणतो

जया बच्चनचा तीव्र निषेध

नाना

(संपादक - गांडुगिरी हा शब्द चालत नसेल तर पुर्ण प्रतिसाद उडवावा. * टाकलेले निदान या प्रतिसादात चालणार नाही. नाना)

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 9:49 am | विसोबा खेचर

(संपादक - गांडुगिरी हा शब्द चालत नसेल तर पुर्ण प्रतिसाद उडवावा. * टाकलेले निदान या प्रतिसादात चालणार नाही. नाना)

गांडूगिरी हा शब्द फारसा शिवराळ नाही असे माझे मत आहे. माझ्या मते तो इथेच राहिल्यास हरकत नाही!

तात्या.

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 10:01 am | विसोबा खेचर

आणि बिरुटेसर स्वत:च संपादक पदावर आहेत त्यामुळे त्यांचा अधिकार अबाधित आहेच! :)

परंतु सरांचा प्रतिसाद माझ्याकरता देखील अंमळ धक्कादायक होता. मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिसादाशी विनम्रपणे परंतु अत्यंत कडवी असहमती दर्शवतो...!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे. अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. खरे म्हणजे सदरील चर्चेत येणारे निषेधाचे प्रतिसाद सामाजिक तणावाचे लक्षण आहे. उत्तर प्रदेश, बिहारींच्या लोढ्यांमुळे आपण असुरक्षीत वाटायला लागलो.त्याच्यातच बच्चन कुटुंबियांनी युपीत सुनेच्या नावाने शाळा सुरु केल्याची बातमी वाचायला मिळते. मग आमच्या महाराष्ट्रात राहुन आमच्याच बळावर आमच्या महाराष्ट्रासाठी काही केलं पाहिजे या भावनिक मताशी अनेकांची सहमती असू शकते. परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे. मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे. धर्म, प्रांत,भाषा यावर तर सतत आपण भावनिक राहिलो आहोत त्यामुळे 'गांडुगिरीचे' तर आम्हाला मुळीच वाईट वाटले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 10:38 am | विसोबा खेचर

अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत.

??

काही तपशील मिळेल का?

परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे.

अरे राहा ना! नाही कोण म्हणतंय? परंतु म्हणजे त्यांना जाहीरपणे मराठीची, महाराष्ट्रीयनांची खिल्ली उडवण्याचा अधिकार प्राप्त झाला का? हे खाल्ल्या थाळीत शिटणे आहे असे आपल्याला वाटत नाही का?

मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे.

सुरक्षित जागा?? मग जा ना तिकडे यूपीतच राहायला! इथे महाराष्ट्रातच का दोन टाईम तुकडे मोडत बसला आहात?

व्यक्तिशः मलाही एक भाषा म्हणून हिंदी भाषेबद्दल अतिशय प्रेम आहे, गुजराथी, मारवाडी बोलीभाषाही मला अत्यंत आवडतात. परंतु याचा अर्थ मी इतर कुठल्या भाषेची - खास करून मराठीची खिल्ली उडवावी, हेटाळणी करावी असा होत नाही! आणि काल जयाने नेमके हेच केले!

असो,

बिरुटेसाहेब, एकंदरीत आपले या बाबतीत विचार जुळतील असे वाटत नाही. सबब, मी आता येथेच थांबणे पसंत करेन..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही तपशील मिळेल का?

तपशील शोधावा लागेल, मिळाला की नक्कीच टाकेन.

बिरुटेसाहेब, एकंदरीत आपले या बाबतीत विचार जुळतील असे वाटत नाही. सबब, मी आता येथेच थांबणे पसंत करेन..

हम्म, आम्हीही ब्रेक घेतो. :)

सध्या आम्ही ' बाणा : अभिमान की अहंगंड' हा लेख वाचत आहोत. सर्वांनीच वाचावा असा लेख आहे.

-दिलीप बिरुटे
(मराठी भाषा अभिमानी )

इनोबा म्हणे's picture

7 Sep 2008 - 11:08 am | इनोबा म्हणे

मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे.
मराठी माणसासाठी नव्हे, त्यांच्या मेकअपमनसाठी

अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत.
जो माणुस नुसता सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेला तरी ती मोठी बातमी होते, त्याच्या या लाखोच्या देणग्यांची(महाराष्ट्रासाठी) बातमी कधी ऐकली नाही.
टॅक्स चूकवण्याकरिता तिरुपती बालाजीला नऊ कोटींची देणगी दिलेली तेवढी माहीत आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

घाटावरचे भट's picture

7 Sep 2008 - 11:08 am | घाटावरचे भट

>>मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे. अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत.

बच्चन पती-पत्नींनी काम केलेला सदर 'अक्का' चित्रपट मी पाहिलेला आहे. अमिताभ आहे म्हणून उत्सुकतेने मी तो चित्रपट पाहिला, पण फक्त पहिल्या दृश्यात हे दोघे जण मंदिरात पूजा करतात एवढाच त्यांचा त्यातला सहभाग. त्यांनी त्या मेकअपमनला काय मदत केली ते मला ठाऊक नाही. शिवाय सदर गृहस्थाला त्यांनी मदत केली कारण तो त्यांचा मेकअपमन होता. त्याच्या ऐवजी दुसरा एखादा नवखा मराठी चित्रपट निर्माता जर त्यांच्याकडे गेला असता तर त्यांनी त्याला अशीच मदत केली असती काय?

>>मग आमच्या महाराष्ट्रात राहुन आमच्याच बळावर आमच्या महाराष्ट्रासाठी काही केलं पाहिजे या भावनिक मताशी अनेकांची सहमती असू शकते. परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे.
कलाकार म्हणून बच्चन लोक निर्विवादपणे मोठे आहेतच. परंतु बच्चन कुटुंबाचा तथाकथित पडता काळ ही सार्वजनिक समस्या नव्हे, ज्याच्यासाठी सामान्य मराठी माणसाची अस्मिता डावलली जावी. जर आपल्या विधानांना लगेच प्रसिद्धी मिळते हे त्यांना ठाऊक आहे, तर त्यांनी असल्या संवेदनशील मुद्द्यांवर जबाबदारीने तोंडं चालवावीत.

>>मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे. धर्म, प्रांत,भाषा यावर तर सतत आपण भावनिक राहिलो आहोत त्यामुळे 'गांडुगिरीचे' तर आम्हाला मुळीच वाईट वाटले नाही.

माफ करा बिरुटे सर, पण मुद्दा हा आहे, की एवढं सगळं होउन आणि शिव्या खाऊनही जर जया बच्चनच्या आणि एकूणच उत्तर प्रदेश-बिहारमधल्या लोकांच्या अंगातला खोडसाळपणा जात नसेल, तर नवनिर्माण सेनेचा रस्त्यावर उतरून त्यांची थोबाडं फोडण्याचाच मार्ग योग्य होता असे खेदाने म्हणावेसे वाटते.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मूळातच जिथे ह्या बाईने अशा प्रकारचे वक्तव्य केले तिथे ते अनावश्यक होते. जया बच्चनने औचित्यभंगच नव्हे तर शुध्द खोडसाळपणा केला आहे.
इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही यात तिचा दोष नाही(म्हणजे दोष नाही असे नाही पण खरे) तर दोष आहे बोथट मराठी अस्मितेचा आणि तथाकथित भाषा प्रवाही ठेवण्यासाठी स्वतःच्या भाषेतले चांगले शब्द टाकून इतर भाषेतले शब्द हेतूपुरस्सर मराठीत ढकलणार्‍यां लॉबीचा. हीच लॉबी महाराष्ट्रात मराठीच्या र्‍हासास कारणीभूत आहे. मराठी माणसाने राष्ट्रीय ऐक्याचा विचार करून हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून पाठींबा दिला आणि प्राणपणाने विरोध केला नाही याचा फायदा घेऊन हे सर्व भैय्ये आणि त्यांच्या कलेचे तथाकथित चाहते मुजोर झाले आहेत असे वाटते.
शेवटी अशी मुजोर माणसे आणि लाचार सामाजिक परिस्थितीच घाशीराम कोतवाल आणि/किंवा हीटलर सारखी टोकाच्या विचारसरणीची माणसे तयार करत असतात. या सर्व गोष्टी असह्य होऊन राज किंवा त्याची विचारप्रणाली मानणार्‍या लोकानी काही अविचारी गोष्टी केल्या तर त्यात पहीला दोष वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या लोकांचाच आहे. कारण पंचतंत्रातील गोष्टीप्रमाणे जेव्हा माकडीणीच्या नाकातोंडाशी पाणी आले तेव्हा तिने डोक्यावर घेतलेल्या मुलाला पायाखाली घालून स्वतः वरती कसे जाता येईल हेच पाहीले. आहे ही परिस्थिती नाही सुधारली तर आसामाप्रमाणे महाराष्ट्रातही हिंदीभाषिकांची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते.

पुण्याचे पेशवे

देवदत्त's picture

7 Sep 2008 - 10:33 am | देवदत्त

तुमचे म्हणणे एका अंगाने बरोबर असेल. हे त्यांनी चित्रपटात म्हटले असते तर चालवून घेतले असते.

पण प्रत्यक्षात कोणी आपल्या भाषेचा आग्रह करत असताना, ज्या गोष्टीचे बहुतेक जण राजकारण करत आहेत, त्या प्रकारात असे वाक्य (ते ही एका खासदाराकडून) कसे ऐकून घ्यायचे?
वाहिन्यांचे म्हणाल तर राज ठाकरेने म्हटलेले एक एक वाक्य अतिरंजित करून बहुतेक सर्व वाहिन्या दिवसभर दाखवत असतात. कारण त्यात त्यांना अमराठी लोकांचा अपमान केल्यासारखा वाटतो. मग आता ह्या वाक्याची जास्त दखल का घेत नाहीत ते? तेही एकांगी वागत असतील तर चुकीचेच आहे.

मी ही जया बच्चनचा त्यांच्या ह्या वाक्याबद्दल निषेध करतो.

देवदत्त's picture

7 Sep 2008 - 10:53 am | देवदत्त

वाहिन्यांबद्दलचे वाक्य लिहिण्याचे कारण की, आता मी पाहिल्याप्रमाणे एकाही वाहिनीवर त्याची झलकही दिसली नाही.

ही बाई कमालीची राजकारणी आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा राज यांनी अमिताभवर टिका केली होती तेव्हा आपण महाराष्ट्राचे आहोत, असे ठासून सांगत होते दोघेही. पण आता निवडणूका जवळ आल्यानंतर आणि मुंबईतील परप्रांतीयांची एक गठ्ठा मते मिळणार म्हटल्यावर यांना युपी प्रेम आठवले आहे.
२६ जुलैला मुंबईत पूर आला तेव्हा "यांना मुंबई सांभाळता येत नाही तेव्हा ती केंद्रशासीत करावी" असा सूर लावणारी ही बाई तेव्हाच डोक्यात बसली. मुंबईमुळे महाराष्ट्राची झालेली प्रगती या हरामखोरांना पाहवत नाही. मुंबई तोडण्याच्या दिशेने टाकलेले हे पहीले पाऊल आहे. आणि आपले उद्धव,विलासराव, शरदचंद्रजी साहेब मतांचे दळभद्री राजकारण करत बसले आहेत.

अमिताभ ना राष्ट्राचा आहे ना महाराष्ट्राचा तो हरामखोर फक्त युपीचाच आहे.

राज यांच्यावर टिका करणार्‍यांनी आतातरी त्यांच्या ठोकशाहीची महाराष्ट्राला किती गरज आहे हे लक्षात घ्यावे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 9:50 am | विसोबा खेचर

इनोबाशी १००% सहमत आहे....

तात्या.

मन's picture

7 Sep 2008 - 11:46 am | मन

इनोबा ह्याच्यांशी १०००% सहमत.
आत्यंतिक रागानं डोकं तापलय.
अधिक शब्दही सुचत नाहियेत.
बच्चन फ्यामिलीतील हरेक सदस्याचा कुठला ना कुठला पिक्च आवडतोच मला.
पण म्हणुन त्यांनी माझ्या कुटुंबियांवर,माझ्या माय मराठीवर थुंकलेलं चालणार नाही.
आम्ही मनसेचे आणि राज चे फ्यान(सध्यातरी) नाही आहोत. तरीही या आणि अशा मुद्द्यांवर त्याला १०००% पाठिंबा.

आपलाच,
क्रुद्ध मनोबा.

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Sep 2008 - 7:03 pm | डॉ.प्रसाद दाढे

मी आत्ताच जया बच्चनची 'ती' क्लीप पाहीली. खरोखर॑च पित्त खवळत॑! च्यायला, या॑च॑ आजपर्य॑त इतक॑ कवतिक केल॑.. ल॑ब्याच्या शोले, डॉन, दीवारची व जयाच्या कोशिश, अभिमान, परिचयची पारायण॑ केली.. जीव ओवाळून टाकला तरी हर्रामखोर अस॑ म्हणू धजावतात? जया इतकी बिनडोक असेल अस॑ कधीच वाटल॑ नव्हत॑. इतकी खाज? आता जर द॑गली पेटल्या तर सरळ सरळ बच्चन कुटु॑बिया॑नाच जबाबदार धरल॑ पाहीजे. पहिल॑ झूट त्या अबू आझमीला बडवल॑ पाहिजे आणि अभिषेकच्याही त॑गड्या गळ्यात बा॑धल्या पाहिजेत (मी दात तोडायलाही मदत करेन :)
कन्नडिगा॑नी रजनीच्या पिक्चरचे जे हाल केले तेच ह्या॑चेही केले पाहिजेत.

इनोबाची प्रतिक्रीया अत्यंत बोलकी आहे.
त्याच्या मताशी पुर्णपणे सहमत.

>>>>अमिताभ ना राष्ट्राचा आहे ना महाराष्ट्राचा तो हरामखोर फक्त युपीचाच आहे.

ह्या वाक्यावर तर टाळ्या....
:)

रम्या's picture

10 Sep 2008 - 4:19 pm | रम्या

अगदी सहमत!

चेहर्याचा मला तरी फार पुर्वीपासुन तिटकारा आहे....पण गेले बरेच दिवस ही बाई डोक्यानेही मठ्ठ आहे याचा प्रत्यय येत होता...आज भर कार्यक्रमात आपण किती "रेम्याडोक्या"आहोत हे तिने आणि तिच्याबरोबर हो ला हो करुन त्या प्रियांका चोप्राने सांगितले आहे. मनसे च्या महिला आघाडीने दोघींना चांगलाच "प्रसाद" द्यायला हवा

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

मराठी_माणूस's picture

7 Sep 2008 - 11:51 am | मराठी_माणूस

कदाचित कोणाला ह्या बोलण्याचि गंभिर दखल घ्यावी वाटलि नसेल , पण जर हे वेळच्या वेळि ठेचले नाहि तर त्याचे परिणाम आपण पाह्तोच आहोत . आपल्या बोटचेप्या धोराणा मुळेंच ह्यांचि हि हिम्मत होते.
सध्या मुंबईत मोबाइल फोन ची सेवा देणार्‍या एका कं. चि जाहिरात झळकत आहे . काय तर म्हणे 'मि अमुक तमुक ठिकाण चा पण माझ्या कडे कार्ड मुंबचे मग मि पण मुंबईचा ' , अरे तुम्हाला धंदा करायचा आहे ना मग नीट करा ना , नाहि त्या गोष्टित कशाला नाक खुपसत आहात.

रेवती's picture

7 Sep 2008 - 4:34 pm | रेवती

अगदी असाच राग येतो जेंव्हा आपल्या शहरात (राज्यात) बाहेरचे लोक येतात, पैसा कमावतात (आपापल्या क्षेत्रात, ह्यात फक्त अभिनयच असे म्हणायचे नाही तर कोणतेही क्षेत्र) मग तिथल्या लोकांना, असलेल्या असुविधांना (त्या कुठे नसतात? प्रमाण कमीजास्त असते व ते तेथील लोकसंख्या, हवामान, खासकरून तिथल्या रूढी, परंपरा व अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.) नावं ठेवतात. आज महाराष्ट्राच्या भाषेला नावं ठेवली, आला आपल्याला राग! नंतर मुंबईच्या पूरपरीस्थीतीत असच काहीतरी झालं, आला अपल्याला राग आणि मला तरी राग येणं साहजिक आहे असंच वाटतं. पण मग आपणच कळत नकळत तर कधी खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने दुसर्‍याच्या शहराला (जसं पुणे, नागपूर, अशी अनेक शहरे) किंवा राज्याला नावं ठेवतो ते कटाक्षाने टाळले पाहीजे.

रेवती

अनिल हटेला's picture

7 Sep 2008 - 5:37 pm | अनिल हटेला

तात्या ,इनोबा आणी मंडळी !!!

अगदी सहमत !!!

निव्वळ निषेध करण्यात च आपण वेळ घालवतोये !!!

  1. मनसे च्या महिला आघाडीने दोघींना चांगलाच "प्रसाद" द्यायला हवा

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रकाश घाटपांडे's picture

7 Sep 2008 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे

ग्लॅमर असले की लोक डोक्यावर घेउन नाचतात. तेच ग्लॅमर संपले कि पायदळी तुडवतात. मराठी लोकांची मन जिंकायची असली की दोन तीन वाक्ये मराठीत बोलुन मराठी लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न अनेक प्रथितयश अमराठी लोक करतात. समजा तसे जया बच्चनने केले असते तर?
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2008 - 2:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी लोकांची मन जिंकायची असली की दोन तीन वाक्ये मराठीत बोलुन मराठी लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न अनेक प्रथितयश अमराठी लोक करतात. समजा तसे जया बच्चनने केले असते तर?

चांगला प्रश्न विचारला ! जया बच्चन या मराठीत बोलल्या असत्या तर इथेच अभिनंदनाचा प्रस्ताव आणि त्यांना डोक्यावर मिरवायचं बाकी राहिलं असतं आणि त्यावरुन मराठी भाषा सर्वांची झाली आहे असे तात्पर्य काढायला आम्ही मोकळे झाले असतो. :)

जया बच्चन यांनी मराठी भाषेला नाक मुरडून बोलून मराठी भाषेची प्रचंड हानी केली आहे, असेही आम्हाला वाटू लागले आहे. ;)

इनोबा, तात्यांशी १०००००००००००% सहमत. साले कमवतात इथे. युपीचे गुणगाण करण्यास हरकत नाही. पण जे खिल्लीवजा विधान मराठ्यांसाठी केले त्याचा निषेध . कसे काय आपण लोक हे सहन करतोय.बिरूटे सरांचा एकही मुद्दा पटलेला नाहीये.
कोणीतरी एक जोक सांगितलेला, कौन बनेगा करोडपती मधे आभिकेश बचपन ला आजिबात बुच्चन एक प्रश्न विचारतो
प्रश्न : आबिकेश .. आपके पिताजी इनमे से कोन है ?
१. अमर सिंह
२. अजिबात बुच्चन
३. युपी
४. बिहार
बावळट आबिशेक यावेळी पण नेहमी प्रमाणे कंफ्युज असतो .. आणि आईला फोन करतो...
आई : " देखो आभी ... ऑप्शन २ तो मेरे खयाल से कम चान्स है ... १,३ और ४ मे मै भी कंफ्युज हू ..."

(वरच्या प्रकाराच्या सत्यतेची आपल्याला कल्पना नाही... ऍज अ जोक ऐकला आहे :) .. पण जया बुच्चन च्या प्रेमाचा ओढा पहाता काहीही शक्य आहे असे वाटते )

'राज'कारणी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

देवदत्त's picture

7 Sep 2008 - 6:46 pm | देवदत्त

निषेधाच्या ओघात एखाद्यावर असल्या प्रकारचे वैयक्तिक विनोद करणे चुकीचे वाटते.

देवदत्त साहेब .. आपल्या इथे सरदार, लालू-रबडी, वाजपेयी, मनोहर-सोनिया,मायावती,...(अगणित लिस्ट आहे) यांच्यावर भरपूर प्रमाणात वैयक्तिक विनोद होतात. वरील विनोद हा विनोदच आहे. तो विनोदाच्या अंगानेच घ्या .. म्हंजे चुकीचे नाही वाटनार. आपल्याला माननिय,आदरणीय जयाजी आणि युपी-बिहारचा पुळका आहे काय ?

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

देवदत्त's picture

7 Sep 2008 - 10:10 pm | देवदत्त

युपी बिहार/ जया बच्चन ह्याचा पुळका असता तर माझी आधीची प्रतिक्रिया दिलीच नसती.
वाचून सोडून देणे एक पर्याय होता, पण नाही झाले. असो. आता सोडून देतो.

धक्कादायक.........द्रोण सिनेमाचे संगीत आणि मराठी बोलणे ह्याचा काहिच संबध नव्ह्ता.द्रोण हा हिंदी सिनेमा होता. कार्यक्रमाला सगळी बॉलीवुड्ची मंडळी होती.मग जया मध्ये तिथे कोणता किडा वळवळला?मराठी बद्द्ल बरळायची काही गरज होती का?
फक्त राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे.राज ठाकरेना विरोध म्हणुन कोण मराठीला विरोध करणार असेल तर त्याचे थोबाड सर्वांनीच रंगवायला हवे.बिरुटे सराच्या मताला आपण सहमत नाही आहोत. सर मला माफ करा.
मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार.

म्हणुन बोलताना मराठीचा अपमान करण्याची काही गरज होती का? "द्रोण" सिनेमावर महाराष्ट्रामध्ये बहिष्कार घातला पाहिजे. मग ह्याना अक्कल येइल.

रेवती's picture

7 Sep 2008 - 7:42 pm | रेवती

घातला तर ठीकच, पण या सगळ्यात (त्यात पुन्हा गणेशोत्सव) जर छोट्या दंग्याचे रूपांतर मोठ्या दंग्यात झाले तर त्रास सर्वसामन्य लोकांना होणार आहे. सगळे कलाकार आपापल्या बंगल्यात सुरक्षारक्षकांच्या गराड्यात निवांत. ठाकरेंना जर जयाबाईंना धडा शिकवायचा असेल तर त्यांनी तो अश्या पद्ध्तीने शिकवावा की साप मेला व काठी ही तुटली नाही. जया बच्चन यांनी जपून विधाने करावीत. सामन्य जनतेचा विचार त्या करत नाहीत मग जनतेनेही ही बाब मनात ठेवावी त्यांना धडा शिकवायची संधी येइल तेंव्हा सोडू नये.

रेवती

सर्वसाक्षी's picture

7 Sep 2008 - 10:35 pm | सर्वसाक्षी

मराठी माणसाची परधार्जिणी वृती याला जबाबदार आहे.

क्या भय्या, कैसा है? असे हौसेने आपणच विचारतो. नपेक्षा इथे पोटपाणी चालवायला आलेले भैय्ये निमूट मराठी शिकले असते. पण आपल्याला हौस दांडगी ना. कै. वसंतराव नाईक हे स्वतःच्या बुद्धिने महाराष्ट्राचे राज्य चालविणारे शेवटचे काँग्रेसी मुख्यमंत्री. त्यानंतर सगळी लाचारांची फैय्यर. अजिजीने दिल्लीश्वरांपुढे वाकुन मुजरे घालण्यात आपल्या राज्यकर्त्यांची हयात गेली. कुणी त्यांचे जोडे उचलले तर कुणी डोक्यावर छत्र धरले.

सामान्य मराठी माणूसही असाच. एरवी एव्हढ्या तेव्हढ्या वरून मान- अपमान काढणारा मराठी माणूस परप्रांतिय - विषेशत: उत्तरभारतियांच्या बाबतीत एकदम उदार असतो. जिथे मराठी माणुसच मराठी माणसाच्या हिंदी बोलण्याची खिल्ली उडवतो तिथे इतरांनी का सोडावे? तामिळ माणसाचे हिंदी वा मल्लूचे तेलगु बोलणे किंवा पंजाब्याचे बांगाली हा टिंगलीचा विषय नसतो मात्र मराठी माणसाचे हिंदी या विषयावर मराठी माणसानेच सातत्याने मराठी माणसाच्या हिंदीची टर उडवणार्‍या कथा प्रसिद्ध केल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच या स्थळावरच एका मराठी व्यक्तिने असेच लिहिले होते व त्याला अनेक मराठी लोकांनी प्रतिसादही दिले होते. जन्मभर इथे राहुन मोजके मराठी बोलणारे गुज्जु वा धेडगुजरी मराठी बोलणारे भैय्ये यांच्यावर कधी आपण असे लिहित नाही!

आपलाच दाम खोटा तर परक्याशी झगडा काय करणार? असे लोक ज्या भूमित आहेत तिथे जया बच्चन असे बोलणारच. आणि त्यांच्या प्रांतातले असेच मुजोरपणे वागणार व उत्तरप्रदेशी संस्कृतिचा प्रसार इथे टिच्चून करणार.

मात्र या पार्श्वभूमिवर मला मारवाडी समाजाचे या बाबतित कौतुक करावेसे वाटते. मारवाडी जेथे जातात तिथली भाषा व चलन वलन अंगिकारतात. ते आपली संस्कृति वा सणवार अवश्य सांभाळतात पण तरीही ते जिथे जातात तिथे एकरुप होतात. महाराष्ट्रात कसलीही सक्ती नसताना व लोक स्वखुषीने इतर भाषीयांची भाषा बोलायला तयार असल्यावरसुद्धा महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहत आलेले मारवाडी लोक उत्तम मराठी बोलतात - अगदी त्यांना मराठी समजले जाण्याईतके.

रेवती's picture

8 Sep 2008 - 4:28 am | रेवती

बरोबर आहे. माझ्या पहिल्या प्रतिसादात हेच म्हणायचा प्रयत्न केला आहे. आपणच मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर म्हणून चर्चेचे नवे धागे चालू करतो व पानंच्या पानं खरडतो (म्हणजे सर्वजणांबद्दलच बोलतीये मी). आपलाच दाम खोटा दुसर्‍यांना काय बोलणार?

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2008 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर आहे. माझ्या पहिल्या प्रतिसादात हेच म्हणायचा प्रयत्न केला आहे. आपणच मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर म्हणून चर्चेचे नवे धागे चालू करतो व पानंच्या पानं खरडतो (म्हणजे सर्वजणांबद्दलच बोलतीये मी). आपलाच दाम खोटा दुसर्‍यांना काय बोलणार?

आपसात आपण कितीही भांडलो, वाद घातला, एकमेकांवर हसलो तरीही आज मराठीच्या अभिमानाचा विषय निघाला आणि एक झालो.
रेवतीताई, जेव्हा आपल्या मातेवर हल्ला होतो तेव्हा आपण सर्व एकशेपाच होतो, आहोत, आणि भविष्यातही असूच! बघा, इथे टारझन, ऍडीजोशी, पुण्याचे पेशवे, तात्या, मी, आम्ही सगळे पुण्या-मुंबई-विदर्भ-मराठवाडा-महाराष्ट्र असे वाद घालत होतो; आज जया बच्चनने मूर्ख आणि आगाऊपणाचं विधान केल्यावर हेच सगळे मुंबई-पुणे-नागपूरकर एकत्र झालेच ना?
आपला दाम खोटा नाही, आपलाही बंदा, खणखणीत रुपया आहे.

अदिती

जैनाचं कार्ट's picture

8 Sep 2008 - 9:41 am | जैनाचं कार्ट (not verified)

साक्षीसाहेब,

१००% सहमत आपल्या विचारांशी !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

लंबूटांग's picture

7 Sep 2008 - 10:37 pm | लंबूटांग

खाजवून खरूज काढणे म्हणतात ना ते ह्यालाच. काही गरजच नव्ह्ती असे बोलण्याची जेव्हा सगळे शांतपणे सुरू आहे.

नये बच्चे भले इंग्लिशमें बात करते हो, मगर यह फिल्म हिंदी है। हे ठीक आहे. तिच्या स्वतःच्या मुलाला हिंदी आणि हिला इंग्लिश येत नसावे बहुधा ह्याचा सल बाहेर पडला असावा बहुधा. हम तो यूपी है, हिंदीमेंही बोलेंगे। महाराष्ट्र के लोग हमे माफ कर दें। ह्या वाक्याची काहीच गरज नव्हती. ह्यांच्याच भाषणांवर बंदी आणली पाहिजे. आता ह्यावरून जर राडा केला मनसे किंवा कोणीही तर मग जया बच्चन यांनाच जबाबदार धरले पाहिजे.

"द्रोण" सिनेमावर महाराष्ट्रामध्ये बहिष्कार घातला पाहिजे. मग ह्याना अक्कल येइल. अगदी सहमत.

संदीप चित्रे's picture

8 Sep 2008 - 4:39 am | संदीप चित्रे

जया बच्चनबद्दल एक अभिनेत्री म्हणून पूर्ण आदर ठेवून तिच्या ह्या वक्तव्यासाठी जाहीर निषेध. हिंमत असेल तर दक्षिणेला जाऊन हेच तुणतुणं वाजवून दाखवावं

मीनल's picture

8 Sep 2008 - 7:06 am | मीनल

मग जाना युपीत.रहा हिंदीत बोलत!
महाराष्ट्रात काशाला तडमडताहात?

शिवसेना त्यांना त्यांच्या भूमीत पाठवण्याचा स्तुत्य उपक्रम करीत आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र!

मीनल.

श्रीकृष्ण सामंत's picture

8 Sep 2008 - 7:16 am | श्रीकृष्ण सामंत

कुणीसं म्हटलंय,
"सूर्याकडून एक शिकावं संध्याकाळ झाली की आपलं अस्ताला जावं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

8 Sep 2008 - 7:36 am | रेवती

एकदम छान बोललात!
आता जयाआज्जी व अमित आजोबांचे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. बोबडे बोल (हिंदीत) ऐका व स्वस्थ रहा म्हणावं. सून डोक्यावर मीरे वाटेल तेंव्हा कळेलच.

रेवती

विसोबा खेचर's picture

8 Sep 2008 - 7:46 am | विसोबा खेचर

बोबडे बोल (हिंदीत) ऐका व स्वस्थ रहा म्हणावं. सून डोक्यावर मीरे वाटेल तेंव्हा कळेलच.

रेवतीचा प्रतिसाद जहबहर्‍याहा! :)

आपला,
(मिरपूडप्रेमी) तात्या.

खरा डॉन's picture

8 Sep 2008 - 9:08 am | खरा डॉन

ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात कशाला इथ हगायला??हरामखोर साले..

खरा डॉन [बाकी सगळे क्लोन....]

मनिष's picture

8 Sep 2008 - 11:49 am | मनिष

डॉन भाऊ, मेघना, अँडी -- तुम्ही आता बंगलोरात कानडीतच बोलत असाल नाही? ;)

आपण परप्रांतियांना मराठीत बोलायला उत्तेजन द्यावे हे पटते (त्यासाठी आपन आधी आवर्जून मराठीत बोलले पहिजे), धम्या म्हणाला होता तसे अधूनमधून खेळकर चिमटा घ्यावा हे पण पटते; पण मराठी बोललेच पाहिजे ही सक्ती, त्यासाठीचा तो हिंसाचार हा मला पटत नाही. बंगलोरातल्या मराठी लोकंनो - उद्या जर हैद्राबादला किंवा चेन्नई ला बदली झाली तर लगेच ८ दिवसात तिथली भाषा बोलता येईल कारे तुम्हाला? आपण मुळात मराठी, कुठेही गेलो तरी मराठीत बोलायला मिळाले, वाचायला मिळाले की आनंद होणारच ना? मग तसेच इतर भाशिकांचेही नाही का?

पण तरीही जया भादूरी-बच्चन चा १००% निषेध, कारण हि मंडळी इतकी वर्षे मुंबईत राहिली, तरिही इथ्ली भाषा नाही शिकली ह्याचे दु:ख होते, पण सरसकट पोटापाण्यासाठी नुकतेच इथे आलेल्या परप्रांतीयांवर त्याचा राग निघावा असे वाटत नाही. पण एखाद्या वर्षात त्या प्रांताची भाषा जुजबी तरी शिकावी असे वाटते, आणि ते करण्यासाठी आधी आपण मराठीला आपल्या महाराष्ट्रात इज्जत मिळवून द्यावी, अगदी बरिस्ता पासून ५-७ स्टार मधे आवर्जून मराठी बोलावे.

अवांतर - जया भादूरी-बच्चन बंगाली आहे, तर यु.पी कुठुन आले? जर सासर यु.पी म्हणून म्हणत असेल तर मग कर्मभुमी महाराष्ट्राचे काय? त्याचे काही देणे लागतो की नाही? आणि ते सिनेमात काम वगैरे राहू दे, त्याचे अर्थकारण फार वेगळे आहे. तोच काय पण आपल्या (??) मराठि माधुरी दिक्षितने मराठीत काय केले? त्यामानाने नंदिता दास (बंगाली) हिने माती-माय साठी केलेली मेहनत लक्षत घ्या...ती वर्‍हाडी ग्रामीण बोली स्वतः शिकली आणि सिनेमात तिचे बंगालीपण जाणवथी नाही!

मेघना भुस्कुटे's picture

8 Sep 2008 - 12:18 pm | मेघना भुस्कुटे

मनिष,
मी कानडीत बोलत नाही.

पण -
मी इथली लोकप्रिय अभिनेत्री नाही.
मी आजी / माजी खासदार नाही.
मी काहीही बोलले तरी त्याकडे काळं कुत्रं लक्ष देत नाही.

शिवाय -
मी नित्योपयोगी कानडी शब्द शिकून ते वाक्याच्या अधेमधे पेरण्याचे कष्ट घेते.
कानडी गाणी ऐकते.
आणि असं मानते, की एखाद्या ठिकाणी राहिल्यावर तिथली भाषा-संस्कृती-खाणं-पिणं यांच्याशी निदान परिचय करून घ्यावा. मग जमल्यास तुलना करावी आणि नंतर हिंमत झाल्यास शिव्या घालाव्यात.

'मी महाराष्ट्रातून आले आहे, मी कानडी बोलणार नाही,' असं आचरट वक्तव्य मी आजतागायत केलेलं नाही. कानडी लोक राष्ट्रभाषेला डावलण्याचा उर्मटपणा करत असतानाही.

असं असताना जया बच्चनचं बेताल बोलणं आणि डॉन्या, मी किंवा ऍडी यांची तुलना कशी काय होऊ शकते?

छोटा डॉन's picture

8 Sep 2008 - 2:33 pm | छोटा डॉन

जया बच्चनचं बेताल बोलणं आणि डॉन्या, मी किंवा ऍडी यांची तुलना कशी काय होऊ शकते?

अगदी शब्दशः सहमत. होऊच शकत नाही तुलना मुळी ...
आम्ही काय आमचे "इमान" विकायला काढले नाही अजुन ...
च्यायला ४ दमड्यांसाठी स्वतःचे स्वतःच्या मातीशी असलेले इमान विकणार्‍यांची स्वार्थी, अप्पलपोटी जात ही, त्यांची तुलना आमच्याशी कशाला ???
ज्या क्षणी " बच्चन कुटुंबियांनी" करबुडवेगिरीसाठी स्वतःला "अनिवासी भारतीय" घोषीत केले त्याक्षणापासुन आमचा व त्यांचा जो काही होता तो संबंध संपला ...
आता त्यांनी कुठल्याही केलेल्या माकडचाळ्यांनी, अभिनयाने, कामाने आमचे मनोरंजन होत नाही, त्यांची लायकी आमच्यादेखी "कस्पटासमान" आहे व आम्ही अशा उडणार्‍या कस्पटांची पत्रास ठेवत नाही.

राहता राहिला प्रश्न "निषेधाचा" , कसला निषेध हो ?
काय फरक पडणार आहे त्याने ? त्यांचा काय केस वाकडा होणार आहे त्याने ?
हे प्रश्न आता "सनदशिर निषेध" वगैरे मार्गांनी सुटण्यापलीकडे गेले आहेत, त्यांना आता "दंडुक्याचीच भाषा" समजेल ...

आता राहता राहिला प्रश्न की जनतेच्या उत्स्फुर्त "रिऍक्शन" वर येणार्‍या प्रतिक्रीयांचा ....
काही काळजी नसावी, ही सो कॉल्ड "मानवीहक्क,जनकल्याण वा इतर" काही नावाखाली "मुजोर चॅनेल्स" वर पोपटपंची करणारी जमात नुसती बोल्"बच्चन" असते.
ह्यांना नुसते शब्दांचे मोठ्ठेच्या मोठ्ठे फुगे सोडणे जमेल, बाकी काही ह्यांच्याक्डुन अपेक्षीत नाही ....
आपण पाहिलेच आहे की जेव्हा जेव्हा सामान्य जनतेच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तेव्हा हे पोपट कुठे गेलते ते ? ते बसले होते त्यांच्या जुहुच्या अलिशान बंगल्यात आपल्या बायकापोरांना कवटाळुन आणि बाहेर ज्यांचे पोट हातावर आहे अशी जमात आपले रोजचे भुक भागवणारे काम सोडुन हातात सोटे घेऊन समाजकंटकांचे डोके सडकायला बाहेर पडली होती ते. सबब, याची काळजी नसावी ...

तात्पर्य : बच्चन कुटुंबियांचा माज समजावुन सांगण्याच्या पलीकडे गेला आहे. आता काहीतरी भडक कृती आवश्यक ...

अवांतर : मी ह्या वादात पडणारच नव्हतो कारण "बच्चन कुटुंबियांची " किंमत माझ्या लेखी "शुन्य" आहे. पण मनिषभाईंनी मुळच्या "खर्‍या डॉनला" उत्तर देताना डायरेक्ट "माझ्या, मेघना, ऍडी, यशो व अभिज्ञ" यांच्या आम्ही सध्या रहात असलेल्या बेंगलोर बद्दल असलेल्या "इमानाच्या" बाबत प्रश्नचिन्ह उभे केले. म्हनुन हा उत्तर देण्याचा खटाटोप. तुम्ही कुठलेही असा, पण सध्या रहात असलेल्या ठिकाणाशी "इमान" जरुर ठेवा, कमीत कमी ते नाही जमले तर "अपमान" तरी करु नये हे आम्हाला समजते कारण ते न समजायला आम्ही आमचे आडनाव "बच्चन" लावत नाही. असो. बरेच विषयांतर झाले ...

अतिअवांतर : आता "दक्षिण सस्मितेचा व बेंगलोरचा" विषय आहे म्हनुन जाता जाता एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. मागे झालेल्या "होगेनक्कल धरणाच्या वादात" मुळचा महाराष्ट्रीयन, उमेदीचा काळ बेंगलुरात घालवलेला पण सध्याचा तमिळ सुपरस्टार "रजनीकांत" ह्याने कर्नाटकच्या राजकारण्यांविषयी "ते असमंस आहेत" असे विधान केले होते. तो "कर्नाटकी भाषा, संस्कॄती वा इतर काही" बाबत अवाक्षर बोलला नाही हे लक्षात घ्यावे. ह्यावर प्रतिक्रीया म्हणुन कन्नडिगांनी चौफेर "रजनीकांत " बंदी आणली [ कुठलाही स्पष्ट राजकीय आदेश नसताना ] व त्याचे १०० % पालनही झाले. शेवटी त्याला शरण येऊन " मी जे काही बोललो ते असमंजसपणे बोललो, मला माफ करा" असा पवित्रा घ्यावा लागला ...
आता लोकप्रियतेची तुलना करायची तर "बच्चन" हे "रजनी" च्या पासंगाला पुरणार नाहीत, व रजनीचे "जनकल्याणचे काम" ही नक्की दुर्लक्षीत करण्याजोगे नाही.
तरीही "जन प्रतिक्रीयेची महती" लक्षात घेतल्यास बरेच काही शिकता येईल ह्यांच्याक्डुन ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मी जया बच्चन यांचा निसंदिग्ध शब्दात निषेधच केला आहे, मी जे भाषेबाबत म्हटले ते डॉन च्या ह्या वाक्याला --

ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात कशाला इथ हगायला??हरामखोर साले..

ह्याच न्यायाने उद्या मला कोणी बँगलोर, हैद्राबाद मधे म्हटले तर की आम्ची भाषा येत नाही तर कशाला आलाय इथे? तो विचार करून पोटापाण्यासाठी इथे आलेल्या माणसांना समजून घ्यावे असे मला वाटते...शिवाय आपल्या भाषेचा अभिमान आपणच बाळगावा हे नक्की! माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.

अभिज्ञ's picture

8 Sep 2008 - 3:41 pm | अभिज्ञ

मनीषजी,
आपली काहितरी गफलत होतेय.
ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात
कशाला इथ हगायला??हरामखोर साले..
हे विधान खरा डॉन ह्यांचे आहे. छोटा डॉन ह्यांचे नाहि. त्या अनुषंगाने आपण समस्त बेंगलोरकर मिपाकरांना ह्या वादात
ओढले आहे असे वाटते.
बाकि त्याबद्दल मेघना व छोटा डॉन ह्यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे.

अभिज्ञ.

मनिष's picture

8 Sep 2008 - 4:21 pm | मनिष

हे विधान खरा डॉन ह्यांचे आहे. छोटा डॉन ह्यांचे नाहि. त्या अनुषंगाने आपण समस्त बेंगलोरकर मिपाकरांना ह्या वादात
ओढले आहे असे वाटते.

गोंधळलो खरच ह्या खर्‍या/खोट्या छॉटा, मोठा च्या चक्करात. :)

मेघना भुस्कुटे's picture

8 Sep 2008 - 10:12 pm | मेघना भुस्कुटे

ठीक आहे यार, चलता है. :)
अस्मिता - निष्ठा - सहिष्णुता... यांचा घोळ आहे खरा. जागा बदलली की काही गोष्टी डळमळतात, काही स्पष्ट होतात!
माझी गळेकाढू समाजवादी सहिष्णुता गळून पडली आणि भाषा या एरवी चैनीच्या वाटणार्‍या गोष्टीची अत्यावश्यकता कळली. माझ्यापुरता बेंगळुरूनं शिकवलेला धडा!

धमाल मुलगा's picture

8 Sep 2008 - 11:47 am | धमाल मुलगा

हे जे काही चाललंय ते काय चाललंय?
खरं म्हणजे त्या कुटुंबानं ह्या मातीशी इमानदारी दाखवायला हवी हे ही खरंच, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण हातात कायदा घ्यावा, किंवा राडे करावे...
चार समजुतीच्या गोष्टी सांगुन त्यांचं मन आपण वळवलं पाहिजे, त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे, मला विश्वास आहे ते नक्की सुधारतील. शेवटी स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणुन त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहेच...त्याचा आपण आदर करायला नको?

-(सुधारलेला भावी नडगीफोड कॉर्पोरेटर) ध मा ल.

---------------------

च्यायचा घो!
माज माज म्हणजे किती करावा माणसानं? इतकी गुर्मी? बरं त्या चोप्रांच्या कार्टीनं असं केलं तर लहान आहे, अवखळ (???) आहे, म्हणुन खपुन जाऊ शकतं, पण अश्या मुरब्बी धुर्त राजकारणी बाईचं हे वागणं म्हणजे, 'बघा, तुम्ही कितीही डोकं फोडुन घ्या, आम्ही सुधारणारच नाही, आणि काय करता त्यावर पाहु' असं आहे.

अर्थात त्यात त्यांची काहीच चुक नाहीये. काय बाबा, कुठुन आलास? गंगेच्या तीरावरुन, बरं ये ये. काय मराठी नाही येत? कुच काळजी मत करो. हम तुम्हारे लिये हिंदी बोलेंगे.

काय बाबा, कुठुन आलास? कर्नाटक्/आंध्रा/तामिळनाडू? बरं ये ये. काय मराठी नाही येत? पर्वा इल्ले.येन आण्णा? येन माडति? काय जमतंय का आम्हाला तुमच्याशी बोलायला?
हां..आता कसं? सगळेजण या आमच्या महाराष्ट्रात. आमच्या इथे कामं करा, आणी हो, इथं राहुन इथल्या लोकांना त्यांच्या मातृभाषेबद्दल खिजवा...
अरे आम्ही आहोतच षंढ!
आम्ही दाक्षिणात्य कट्टरता जवळ करायची म्हणलं तर आम्ही ठरतो गुन्हेगार! ते मात्र जाज्वल्य अभिमानी!
असंच वागा रे परप्रांतियांनो...
जवळपास अर्धा मराठी माणुस षंढ झालेला आहेच, तुम्ही काळजी करु नका, तुम्ही फक्त अशा अधुन्मधुन फुणग्या टाका...
एखादा राज ठाकरे चवताळुन उठलाच तर हे उरलेले बोटचेपे सहिष्णु हिजडे, आपणहोऊन त्या अभिमानी वृत्तीला जाळुन पुरुन टाकतील.. तुम्ही इथं मराठी मातीच्या छाताडावर खुशाल नंगानाच करा!!!!

शेवटी महाराष्ट्र, त्याची राजधानी मुंबई हे सगळं तुमच्याच बापाला इंग्रजांनी आंदण दिलंय ना?

मन's picture

8 Sep 2008 - 3:59 pm | मन

एखादा राज ठाकरे चवताळुन उठलाच तर हे उरलेले बोटचेपे सहिष्णु हिजडे, आपणहोऊन त्या अभिमानी वृत्तीला जाळुन पुरुन टाकतील.. तुम्ही इथं मराठी मातीच्या छाताडावर खुशाल नंगानाच करा!!!!

हो.......
तस्सच होतय (दुर्दैवानं) असं वाटतय.

++१
आपलाच,
मनोबा

एक's picture

8 Sep 2008 - 10:05 pm | एक

पासून पुढे १००००% सहमत

रेवती's picture

9 Sep 2008 - 7:27 pm | रेवती

नडगीफोड प्रतिसाद आवडला.

रेवती

विसुनाना's picture

8 Sep 2008 - 12:31 pm | विसुनाना

जया भादुरी-बच्चन या एकेकाळच्या बर्‍या नावाजलेल्या अभिनेत्रीकडून केवळ दर्जाचे राजकारण करण्यासाठी असे हीन आणि कृतघ्न वर्तन अभिप्रेत नव्हते.

पुण्याच्या एफ टी आय आय पासून तिची हिंदी कारकिर्द सुरू झाली. नाहीतर तिला प. बंगालबाहेर कोण विचारले असते?
मराठी गायिकांनीही तिच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला हातभार लावला. लता मंगेशकर किंवा आशा भोसले जर असे म्हणाल्या असत्या की 'मी मराठी आहे, मी मराठीच गाणी गाणार' तर किती हिंदी नट्या यशस्वी झाल्या असत्या हा एक प्रश्नच आहे.

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.

आणि 'हिंदी येणार्‍याला मराठी येऊ शकत नाही' ही निव्वळ लोणकढी आहे. एकच वर्ष महाराष्ट्रात राहिलेले अनेक कलेक्टर्स , व्यावसायिक अस्खलित मराठी बोलू शकतात. पर्याय नसेल तेव्हा कोणीही भोजपुरी, मारवाडी, गुजराती , कानडी इतकेच काय पण पंजाबी माणूसही मराठीत बोलू शकतो. मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍याच्या चुकांना मराठी माणूस हसत नाही.

बाहेरच्या प्रांतात गेलेला मराठी माणूस 'मी महाराष्ट्रीय आहे म्हणून मराठीतच बोलणार' असे म्हणत नाही / म्हणू शकत नाही. त्यामुळे मराठी माणूस इतरत्र सहज स्विकार्य आहे. तेव्हा 'पर्याय नाही अशी अवस्था न आणू देणे' हे इतरभाषिकांचे कर्तव्य आहे. अन्यथा ही दुही वाढत जाऊन दंडुकेशाहीने मराठीची सक्ती होईल आणि उदारमतवाद्यांनाही त्याला नाइलाजाने मान्यता द्यावी लागेल.

नंदन's picture

8 Sep 2008 - 2:11 pm | नंदन

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.

-- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

इनोबा म्हणे's picture

8 Sep 2008 - 2:54 pm | इनोबा म्हणे

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.
अगदी हेच म्हणतो.
"जिसकी काठी, उसकी भैस" असल्या संस्कृतीतून उपजलेल्यांना सरळ भाषा कळत नाही. यांना सरळ करायचे तर 'बांबू'च हवा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

राघव's picture

8 Sep 2008 - 4:24 pm | राघव

अगदी सहमत आहे.

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.

१००% योग्य.

मुमुक्षू

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2008 - 5:03 pm | प्रकाश घाटपांडे


तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.


सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

8 Sep 2008 - 9:56 pm | सर्किट (not verified)

लता मंगेशकर किंवा आशा भोसले जर असे म्हणाल्या असत्या की 'मी मराठी आहे, मी मराठीच गाणी गाणार' तर किती हिंदी नट्या यशस्वी झाल्या असत्या हा एक प्रश्नच आहे.

सहमत !!

-- सर्किट

आजानुकर्ण's picture

8 Sep 2008 - 10:36 pm | आजानुकर्ण

विसुनानांशी सहमत आहे.

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

म्हणुन काय जाहिर समारंभात असा मराठीचा अपमान करावा काय?
शिवाजी महाराजाचे भाउबंद आज ही कर्नाटका मध्ये आहेत. ते काय तिथे मराठी बोलतात काय? ते शुध्द कानडी भाषेत आपले सर्व व्यवहार करतात.माझी आज्जी धारवाडची होती, ती खुपच छान कन्नड बोलत होती.ज्या भागात आपण राहतो. भाकरी कमावतो,तिथली भाषा ,रितीरिवाज आपलेसे केले पाहिजेत.
ही नटमोगरी जया हेच सर्व आसाम मध्ये जाउन बोलु शकते काय? ज्याना काही अक्कल नाही,कशाचे सोयरेसुतक नाही अशा दलालाच्या नादी हे बच्चन कुंटुबिय लागले पासुन ह्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पण बौध्दीक दिवाळखोरी सुरु झाली आहे.नाहीतर बच्चन ने रामुच्या आग के शोले व नि:शब्द मध्ये हिडिस भुमिका केल्या नसत्या.
वेताळ

विजुभाऊ's picture

8 Sep 2008 - 5:10 pm | विजुभाऊ

हे असले हिन्दी लादुन घेण्यापेक्षा महाराष्ट्राने हिन्दीच्या जोखडातुन कायमचे मुक्त व्हावे.
देशाची तिजोरी भरायची महाराष्ट्राने आणि खर्च करायची हिन्दी बिमारु राज्यानी?
वर हिन्दी भाषिकांची मुजोरी सहन करायची.
कशासाठी ? कशासाठी ?कशासाठी?
भाषेचा विषय आला की राष्ट्रभाषा असे म्हणायचे आणि स्थानीक भाषेला हिणवायचे. हा हिन्दी लोकांचा सरसकट स्वभाव आहे.
मी माझ्याशी कोणी हिन्दीत बोलले तर सरळ सांगतो की मला हिन्दी येत नाही मराठीत नाहीतर इंग्रजी जर्मन अथवा मलेशियन भाषेत बोला.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आर्य's picture

8 Sep 2008 - 6:14 pm | आर्य

आपला मुद्दा सरळ आहे.........
आपण ज्या प्रदेशात रहातो त्या प्रदेशातील भाषा/संस्कृती / विचार यांचा नक्की आदर करावा. (या गोष्टी आत्मसात जरी करता आल्या नाहीत तरी त्यांच अवमान करू नये)
प्रत्येक राज्यात/प्रांतात काही प्रगत शहरं आहेत जी Cosmopolitan (बहू -संस्कॄतीक) बनली आहेत, या शहरांचा विकास फक्त त्या गावच्या / प्रदेशातल्याच लोकांनी केलेला नाही. बाहेच्या लोकांनी संधी साधून ती कर्म-भूमी बनवली आणि स्वतःचा आणि पर्यायानी त्या गावचा विकास घडवलाय. आजच पुणं किंवा मुंबई फक्त पुणेकरांनी / मुंबईकारांनी बनवलेली नाही. मोठया शहरांत हा बहू -संस्कॄतीक वादाचा प्रकर घडणारच आणि त्या मुळे ही असली वादळेही निश्चितच आहेत.
पण जया बच्चना यांनी केलेल्या या विधानाचा मात्र निषेधच !

बेंगळूरू वासी (मराठी) आर्य

ज्ञ's picture

8 Sep 2008 - 6:32 pm | ज्ञ

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. >>>
ह्या वाक्याशी १०० सहमत..

भारता बाहेर जाणारे जे कोणी आहेत त्यांच्या पुढच्या पिढीची भाषा ही ते जिथे जातात तिच भाषा बहुतेक वेळा होते.. अर्थात ते तिथेच राहिले तर.. आणि भारतातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स ह्या देशांना जाताना झक मारत जशी त्या देशांची भाषा शिकली जाते तसेच आपण भारतातल्या एखाद्या राज्यातून दुसर्‍या राज्यात दिर्घ काळासाठी वास्तव्यास जाणार असू तर त्या प्रदेशाची भाषा शिकली पाहिजे..

पण फक्त महराष्ट्रात अशी गरज पडत नाही.. धमाल मुलग्यानी म्हटल्या प्रमाणे कुठल्याही राज्यातून आलेला माणूस महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांशी संपर्क करु शकतो कारण मराठी माणूस समोरच्या माणसाला कष्ट होऊ नयेत असे बघतो.. आता हा त्याचा बोटचेपे पणा म्हणायचा की दुसर्‍याला मदत करायची प्रवॄत्ती हे ठरवणे अवघड आहे..

तसेच जर एखादा सामान्य माणूस जर एका प्रांतातून दुसर्‍या प्रांतात कामाच्या निमित्ताने कायम स्वरुपी स्थायीक झाला तर त्याची पुढची पिढी ही ता दुसर्‍या प्रांताची भाषाच जास्त व्यवस्थित बोलते....

अर्थात हे माझे मत झाले पण जया बच्चनने केलेल्या वक्तव्याचा निषेध आहेच..

आत्ताच आयबीएन-लोकमत वर बातमी पाहीली

राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांचा एकही चित्रपट माफी मागेपर्यंत रिलिज होऊ न देण्याची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) केली आहे
कुत्सितपणे हसून मराठी भाषेची खिल्ली उडविणार्‍या जया बच्चन यांनी यु.पी. मधे जाऊन रहावे एवढे यु.पी. प्रेम ओतू चालले असेल तर..
मुंबईने जे दिले ते यु.पी. देईन का ?

आपण तर राज ठाकरेंबरोबर आहोत... असा दणका दिल्याशिवाय त्या यु.पी. वाल्यांना कळतच नाही...

ऑनलाईन न्यूज बघायची असेन तर http://www.watchanytv.com/index.php?mid=12 येथे आणि http://khabar.josh18.com/ येथे हिंदी वाहिन्यांची कारागिरी बघायला मिळेल...

जय महाराष्ट्र
(मराठीप्रेमी) सागर

देवदत्त's picture

8 Sep 2008 - 7:38 pm | देवदत्त

नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का?
महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या?
काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे.

आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे.
ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.

आजची सकाळ बातमी घेऊन आली की जया बच्चनने माफी मागितली आहे..... आता हे नेभळट सरकार 'राज ठाकरे' यांच्यावरील बंदी उठवायचे कष्ट घेणार का? माफी जया बच्चन यांनी मागितली आहे , तेव्हा त्यांची चूक त्यांना मान्य आहे. तेव्हा राज ठाकरे योग्य तेच बोलत होते हे सिद्ध झाले आहे. तेव्हा आता बघायचे आपले पोलिस कमिशनर महाशय काय करतात ते.... अर्थात असल्या पक्षपाती कारवायांना 'राज ठाकरे' गणतीत धरत नाही ते वेगेळे...

मराठी माणूस पेटला की कोणालाही झुकवू शकतो हे मात्र यातून सिद्ध झाले... आता कालपर्यंत राज ठाकरे की हिटलरशाही म्हणून जोरात स्वतःची पोळी भाजणारे न्यूज चॅनेल्स आता दुसर्‍या बातम्यांकडे वळतील.... का तर एका हिंदी भाषिकाला माफी मागायला लागली ना....
असो...राज ठाकरे मात्र जयाने सार्वजनिक माफी मागेपर्यंत विरोध कायम ठेवायचे ठरवले आहे. येथे ही बातमी पाहू शकता http://khabar.josh18.com/news/3117/3

जय महाराष्ट्र
सागर

फिल्म ईंस्टीट्युट मधे, नवरा मरायला टेकला तेव्हा दगडूशेठ गणपतीला नवस करायला आली होती.

आणि आता हा माज?

बेसनलाडू's picture

9 Sep 2008 - 4:00 am | बेसनलाडू

हे वाचा. आणि शहाणे व्हा :)
(शहाणा)बेसनलाडू

सुचेल तसं's picture

9 Sep 2008 - 8:32 am | सुचेल तसं

राज ठाकरेंचं एक वाक्य आपल्याला तर फार आवडलं - गुड्डी बुढ्ढी झाली तरी तिला अजुन अक्कल नाही आली.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मनीषा's picture

9 Sep 2008 - 11:23 am | मनीषा

अनुल्लेखाने मारणे चांगले... काही वेळा हा पब्लिसिटी स्टंट पण असू शकतो ... आपल्या सुपुत्राच्या चित्रपटांकडे कोणी लक्ष देत नाही ... म्हणुनही कदाचित जया ने हे वक्तव्य केलेले असेल . आपल्या मुलाचा चित्रपट चालावा म्हणुन अनेक समस्या असलेल्या समाजात आणखी समस्या निर्माण करणे म्हणजे स्वार्थीपणाच ... आणि स्वतःला सामजसेवक म्हणवना-या जया बच्चन सारख्या व्यक्तीने (राजकीय नेते हे जनतेचे सेवक असतात ना?) असे करणे म्हणजे बेजबाबदारपणाच आहे.

मिसंदीप's picture

9 Sep 2008 - 8:21 pm | मिसंदीप

समस्त मिपा मंडळी,
नमस्कार ...
आपल्या सर्वांच्या "जयी" बद्दलच्या प्रतिक्रिया पाहुन अतिशय आनंद झाला व पटले कि मराठी अस्मिता अजुनही मराठी माणसात जिवंत आहे.बाकी राज्यात जसे तेथील प्रादेशिक भाषेत बोलण्याला प्राधान्य दिले जाते तसे महाराष्ट्रामधेही आपण मराठी बोलुनच या "टुकार" लोकांची बोलती बंद केली पाहीजे.
मुळात त्यांनी हिंदी मध्ये संभाषण चालु केले कि आपण मराठी मधुन उत्तरे दिल्यास आपसुक हि वाह्यात मंडळी मराठी शिकण्यास प्रव्रुत्त होतील.
मला माहीत आहे कि हे एवढे सोपे नाही, पण अशक्य ही नाही !!

भास्कर केन्डे's picture

10 Sep 2008 - 8:51 pm | भास्कर केन्डे

या भय्ये बुच्चनांच्या तर.... आबू आझमी, गोविंदा यांच्या सारखे अमराठी नेते, महेश भट, शबाना सारखे नतद्रष्ट कलाकार आणी हे बच्चन, चोप्रा... सगळ्यांना बिहार/कोसीच्या पुरात नेऊन सोडाय पायजे साल्या पाजी लोकांना.

आपला,
(भडकलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

गणा मास्तर's picture

11 Sep 2008 - 7:57 am | गणा मास्तर

अभिताभ बच्चनने त्याच्या ब्लॉगवर माफी मागितली आहे, पण शेवटी आम्ही इतके पैसे दान केले हे केले आणि ते केले असे पालुपद आहेच.
जया काही चुकिच काही नाही बोलली असेही लिहिले आहेच. आता आपण एक करु त्याच्या ब्लॉगवर जाउनच त्याचा निषेध करु
ह दुवा
http://blogs.bigadda.com/ab/2008/09/10/day-144/

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

गिरीराज's picture

11 Sep 2008 - 5:39 pm | गिरीराज

CNN-IBN च्या वेबसाईटवर मी दोन ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवली. पण अजूनही ती प्रतिक्रिया तिथे दिसत नाहीये. बहुदा मराठी समर्थक प्रतिक्रिया तिथे दिसू देत नाहीत.
राजदीप सरदेसाई मराठी माणूस आहे असे मला वाटते.

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 9:09 pm | देवदत्त

ह्म्म... मी तिथे प्रयत्न नाही केला. पण अमिताभ बच्चनच्या ब्लॉग वर माझी प्रतिक्रिया टाकली.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर

अमिताभच्या एका मुलाखतीत (ह्या वादंगा नंतरच्या) म्हंटले आहे की, 'जयाला मराठी समजते आणि बोलताही येते.' त्यामुळे जया बच्चान ह्यांना मराठी येत नाही हा मुद्दाच बाद होतो.
अमिताभने स्वतः अमेरिकन सिटीझनशिप घेतली आहे असे वाचले होते. म्हणजे ज्याला भारताबद्दलच प्रेम नाही, त्याला महराष्ट्राबद्दल काय असणार?
जया बच्चनच्या 'त्या' कार्यक्रमातील नुसते शब्दच नाही तर त्यासोबत जी 'ऍक्शन' (हावभाव) ती जास्त अपमानकारक आहे.
हा 'माज' येतो कसा? पैसा, प्रसिद्धी, राजकारण्याचे आशिर्वाद आणि मेंदूवर चढविलेले तोकड्या बुद्धीचे आच्छादन. ठाकरे घराण्याशी निकटचे संबंध असणार्‍या बच्चन कुटुंबाची बहू असणार्‍या जया बच्चन ह्यांना 'कोण राज ठाकरे, आम्ही ओळखत नाही' म्हणण्याचे धैर्य येते कोठून? त्याच बरोबर 'राज ठाकरेंनी कोहिनूर मिलची जमिन मोफत आम्हाला द्यावी आंम्ही इथेही 'मुलींची शाळा काढू' असे निर्लज्यपणे म्हणण्यासही त्या कमी करीत नाहीत.
ह्याला थोडीफार शिवसेनाही जबाबदार आहे. केंदातील सत्ता उपभोगण्यासाठी, महाराष्ट्राबाहेर पडून नॅशनल पार्टी होण्याच्या नादात मराठी मुद्दा सोडून हिन्दूत्वाचा व्यापक मुद्दा हाताशी घेणं, सत्तेच्या लोभात बिजेपीशी हात मिळवणी करणं ह्यातही आजच्या समस्येची बीजे आहेत. बिजेपीशी हात मिळवणी केल्यामुळेच उत्तरभारतियांना महाराष्ट्रात ते विरोध करू शकले नाहीत. उलट, उत्तरभारतियांचे लांगुलचालनच करावे लागले. राज ठाकरेंनी केलेल्या रेल्वे भरतीच्या वेळच्या आंदोलनाला शिवसेनेत आतुन विरोधच होता. राज ठाकरेंच्या मनसेकडे मराठी मने का वळू लागली? कारण ती आधीच शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेमुळे त्या पक्षापासून लांब चालली होती. राज ठाकरेंनी पुन्हा मराठीमाणसाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून ती आपल्याकडे वळविण्यात बर्‍यापैकी यश मिळविले. तेंव्हा शिवसेना 'जागी' झाली आणि मराठीचा 'मुद्दा आमचाच' असे ओरडून सांगू लागली. अशा शिवसेनेलाही हे बच्चन कुटुंबिय निकटचे वाटते. बाळासाहेब स्वतः 'बच्चन आणि ठाकरे कुटुंबात कुठलेही गैरसमज नाहीत. आम्ही आजही मनाने एकमेकांच्या जवळच आहोत' असे टीव्ही मुलाखतीत सांगतात. बच्चन कुटुंबाला 'मराठी द्वेष्टेपणा करू नका' असे खडसावून सांगू शकत नाहीत.

जया बच्चन ह्यांचा मी तीव्र निषेध करतो. सर्व मराठी भाषकांनी बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे. कलाकाराच्या कलेचा आदर जरूर वाटतो पण तो पर्यंतच, जो पर्यंत तो कलाकार ताळतंत्र सोडून वागत नाही.
'भारतात कलावंतांचा तुटवडा आहे म्हणून बॉलीवूडला पाकिस्तानातून कलाकार आमंत्रित करावे लागतात' असे म्हणणार्‍या फते अली खानला आपल्या घरात पाहुणा म्हणून ठेवून घेणार्‍या आणि ह्या वक्तव्याचा त्याला जाब न विचारणार्‍या जावेद अख्तरचाही म्हणूनच राग येतो. 'कसल्या धर्माच्या गोष्टी करतात, ब्राह्मणांची जानवी बनविणारे कित्येक कारागीर मुसलमान आहेत' असे म्हणणार्‍या शबाना आझमीचाही मला राग येतो. स्मिता पाटीलशी लग्न करूनही, 'मुंबई तुमची पण भांडी घासा आमची' म्हणणार्‍या राज बब्बरचाही राग येतो.

ह्या सर्वांचा माज कोणीतरी उतरविलाच पाहिजे. हिंसा, निरपधांना मारहाण मलाही आवडत नाही. पण कधी-कधी तोच मार्ग योग्य आहे असे वाटायला लागण्याच्या मनःस्थिती पर्यंत सुशिक्षित माणूस येण्यासाठीही शासनच जबाबदार आहे. महाराष्ट्र शासनाने ह्या बाबतीत पावले उचलली पाहिजेत. तरच परप्रांतियांना थोडीफार जरब बसेल.

पंचविस वर्षे अरबस्थानात राहिल्यावर तिथली भाषा (मोडकी तोडकी का होईना), रिती-रिवाज शिकून घेतले. तिथले सणवार आणि स्थानिकांच्या हक्कांचा आदर नेहमीच केला. हे सुशिक्षित मनाचे लक्षण असले तरी तिथल्या राजकारणाचा, सरकारचा त्यात सिंहाचा वाटा असतो. भूमीपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण तेथील सरकार आवर्जून करते. परप्रांतियांस तिथे हक्क असे फार थोडेच असतात.

मराठी माणसानेच आधी मराठी भाषेचा आदर करण्यास शिकले पाहिजे. मराठीचा वापर सर्रास केला पाहिजे.