✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असे कधी घडत नसते!

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, गुरुवार, 11/05/2015 - 06:37
तुम्ही लिफ्ट दिलेली व्यक्ति तुमचा गळा आवळू लागते श्वास कोंडतो डोळेबाहेर येतात शरीर सुटण्यासाठी धडपडू लागते त्याचा चेहरा क्रूर होतो अन् पकड़ घट्ट होवू लागते त्याला ढ़कलण्यास पुढे केलेल्या हातास पण काहीही न सापडते अधिकच घाबरता मग तुम्ही जगण्याची आशा मालवू लागते इतक्यात तुम्हाला अचानक कशी कोण जाणे जाग येते दचकून उठता मान चाचपडता काही नाही! तुम्हास बरे वाटते दुस-या दिवशी मात्र दिवसभर मान तुमची दुखत असते खरेच का सांगा आता बरे 'असे कधी घडत नसते?' झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच तुमची चाल मंदावू लागते कितीही नास्तिक वा धीट असलात तरी हलकेसे भय तुम्हास वाटू लागते श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो शरीर थोडेसे घामेजू लागते वळण ते पार होताच मात्र तुमची स्थिती पूर्वपदावर येते कधी तरी घरी पोहचता घर जणू तुम्हाला आलिंगन देते फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष तुम्हास ते खटकू लागते तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची तुम्हाला चिड येऊ लागते कधीतरी होते सारे असह्य तुमच्या तोंडून किन्काळी फुटते माणसे, घर सारे... काहीच नाही! जणू विरून गेले! तुम्हाला जाणवते 'ते' वळण अजुनही न सरले अन हेही कळून येते अजुन देखिल तुम्ही म्हणु शकता? "असे कधी घडत नसते!"

प्रतिक्रिया द्या
1214 वाचन

💬 प्रतिसाद (1)

डेंजर!

रातराणी
गुरुवार, 11/05/2015 - 12:55 नवीन
डेंजर!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा