तेंव्हा एक कर! (विडंबन)

दिप्ती's picture
दिप्ती in जे न देखे रवी...
5 Sep 2008 - 3:16 pm

तेंव्हा एक कर ! (विडंबन)

जेंव्हा तुझा नंबर पासांच्या यादीत नसेल
तेंव्हा एक कर -
तू नि:शंक मनाने डोळे पूस ,
ठीकच आहे , चार दिवस धपापेल
जीव गदगदेल!
उतु जाणारे हुंदके आवर
कढ आवर, नवा ऑक्टोबरचा फॉर्म भर
उगीचच मार्च च्या नादी लागू नको!
खुशाल , खुशाल तुला वेळ मिळेल तसा अभ्यास कर,
पुढच्या मार्च ला स्मरून कर
हवे तर मार्चला विस्मरून कर!

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

5 Sep 2008 - 3:37 pm | पांथस्थ

जेंव्हा तुझा नंबर पासांच्या यादीत नसेल
तेंव्हा एक कर -
तू नि:शंक मनाने डोळे पूस ,
ठीकच आहे , चार दिवस धपापेल
जीव गदगदेल!

१२वी मधे गणित हा विषय राहिल्यावर गदगद्/धपधप काहिहि झाले नाही....नापास होणार हे माहीत होते...पण तरिही बोर्डाच्या कारभारावर थोडी आशा होती...म्हणजे १७ चे ७१ वगैरे...असो...

उतु जाणारे हुंदके आवर

ते पण फक्त पालकांच्या नशिबी :(

कढ आवर, नवा ऑक्टोबरचा फॉर्म भर
उगीचच मार्च च्या नादी लागू नको!

आम्ही तर १२वी चा नाद सोडून सरळ पदविकेच्या दिशेने कुच केले (बरोबर वाचलेत...'कुच'...कारण शिक्षणाचे सगळे महत्वाचे टप्पे म्हणजे संग्राम असतात...नंतर पानिपत)

खुशाल , खुशाल तुला वेळ मिळेल तसा अभ्यास कर,
पुढच्या मार्च ला स्मरून कर
हवे तर मार्चला विस्मरून कर!

एकदम असेच केले बुवा!

(अजुनही गणिताच्या परिक्षेची स्वप्ने पडणारा) पांथस्थ...

दिप्ती's picture

5 Sep 2008 - 3:58 pm | दिप्ती

आपली उत्कट भावना व्यक्त केल्याबद्द्ल पांथस्थां ना धन्यवाद. :''(

वेलदोडा's picture

5 Sep 2008 - 11:51 pm | वेलदोडा

सांत्वनपर उपदेश चांगला सांगितलाय.