✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भास

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Fri, 08/29/2008 - 18:55

प्रतिक्रिया द्या
11304 वाचन

💬 प्रतिसाद (42)

वा वा वा

लिखाळ
Fri, 08/29/2008 - 18:59 नवीन
मस्त कविता !! फार सुंदर. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

बऱ्याच दिवसांनी...

नारदाचार्य
Fri, 08/29/2008 - 19:07 नवीन
काही लिहिलंत. छान आहे कविता ही.
  • Log in or register to post comments

संपुर्ण कविताच आवडली.

शितल
Fri, 08/29/2008 - 19:11 नवीन
अप्रतिम कविता. :)
  • Log in or register to post comments

सुंदर!

मनस्वी
Fri, 08/29/2008 - 19:15 नवीन
तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला विरहात असे जळणार कसे ही रात्र हसे का भास तुझे छळतात मला
मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

झक्कास..!

राघव१
Fri, 08/29/2008 - 19:22 नवीन
खूप आवडली कविता. मस्त लिहिलीयेत!! राघव
  • Log in or register to post comments

अरे वा अनिरुद्ध छान कविता!

चतुरंग
Fri, 08/29/2008 - 19:33 नवीन
बर्‍याच दिवसांनी तुझी कविता बघून फ्रेश वाटले! विरहात असे जळणार कसे ही रात्र हसे का भास तुझे छळतात मला हे फारच छान! (खुद के साथ बातां : वर्षभर घरापासून दूर रहायचे म्हणजे व्हायचेच असे भास बाबा रंगा, समजून घे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

आवडली

धनंजय
Fri, 08/29/2008 - 20:37 नवीन
सुंदर विरहभावना. पण : "डसतात" शब्द आवडला नाही. "डसणे"ची अर्थच्छटा पिडाकारकच असते, बहुधा. "चावणे" मधला चावटपणा नाही, की "छळणे" मधली छुपी प्रीती नाही. (त्यामुळे शेवटच्या कडव्यातला "छळणे" शब्द मात्र अगदी योग्य वाटतो.) आता प्रेमाच्या आवेगातही तुझे ओठ मला "डसतात", आणि भेट नकोशी होते, असा अर्थ काढला तर "डसतात" योग्यच आहे, पण मग कडवे बाकीच्या कवितेच्या विरही रसाचा भंग करते.
  • Log in or register to post comments

माझ्या ढेपेला मुंगळा डसला

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 00:28 नवीन
'डसणे' मध्ये थोडीशी इरॉटिक छटा आहे. (रोम्यांटिक नसली तरी तो वेगळा प्रणयच आहे.) विशेषतः लावण्यांमध्ये हा शब्द वापरला जातो. 'डसला ग बाई डसला' किंवा 'माझ्या ढेपेला मुंगळा डसला' अशा ओळी प्रसिद्ध आहेत. 'मर्‍हाटी लावणी संग्रह' मध्ये खालील ओळी वाचल्याचे आठवते. डसला कांत विंचू मज हा लहरी । येती मज प्रेमसुखाच्या लहरी || - नवरारुपी लहरी विंचू डसल्याने प्रेमसुखाच्या विषाची झिंग चढली आहे- किंवा डसला विंचू मदन हा शरीरासी पलंग क्षणभर तरी स्वस्थ धरा हो (याबद्दल काय बोलणार!) त्यामुळे बंधतोडून धुंद होऊन आवेग अंध झाले की ओठ चावण्याऐवजी डसतील असे वाटते. आपला, (अननुभवी) आजानुकर्ण प्रतिसाद उडण्याची शक्यता असल्याने खरडवहीतही पहा. आपला, (चिंतामुक्त) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 08/30/2008 - 00:34 नवीन
प्रतिसाद आवडला. (इश्काची इंगळी देखील डसतेच. चावत नाही.) मी कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मला "डसणे" आवडले होते. आता पुन्हा वाचली, तरी आवडले. अनिरुद्ध, छान आहे कविता. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

नाही पटले - डसणे हे "इंगळी" आणि "विंचू" यांच्यामुळे

धनंजय
Sat, 08/30/2008 - 00:40 नवीन
नाही पटले - डसणे हे "इंगळी" आणि "विंचू" यांच्यामुळे आले आहे. प्रिय व्यक्तीचे ओठ डसणे असे बहुधा लावणीसंग्रहात सापडणार नाही. "इश्काची तरुणी डसली" किंवा "कांत मला डसला" नाही पटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

तर्क

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 00:50 नवीन
विंचू हे मदनाचे रुपक आहे. आणि पती ऊर्फ कांत हा साक्षात मदनच. त्यामुळे ए=बी आणि बी=सी म्हणून विंचू = पती. पतीचे ओठ = विंचवाची नांगी. डसले. आपला, (उतारा) आजानुकर्ण (ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

तेच म्हणतो आहे - विंचवाचा उल्लेख आवश्यक आहे

धनंजय
Sat, 08/30/2008 - 02:25 नवीन
विंचवाचे रूपक मध्ये आल्याशिवाय डसण्याची क्रिया संदर्भात येत नाही. याला उत्प्रेक्षा म्हणावी पाहिजे तर. (म्हणजे उपमान-उपमेयाच्या फरकांकडे उत्प्रेक्षा=दुर्लक्ष करून एकाचे नसलेले गुण दुसर्‍याला चिकटवणे.) पण ते उपमान आणि उपमेय काय आहेत त्यांचा उल्लेख काव्यात व्हावा लागतो. डसणे हा शब्द काही विशिष्ट कीटक-जिवाणूंसाठी आरक्षित आहे. म्हणजे विंचू इंगळी साप, वगैरे डसतात. कुत्रा, डास, माणूस (आणि चणे!) वगैरे चावतात - ते डसत नाहीत. मदन/इश्कासारखी या कवितेतली "तू" इंगळी किंवा नागीण असेल, तर त्या रूपकशब्दाचा स्पष्ट उल्लेख व्हावा लागेल. "देवा, तुझ्या पायांभोवती मी भुणभुणतो आहे" असे म्हटले तर बहुधा अर्थाच्या दृष्टीने वाचकाला ते कोड्यात पाडेल. कदाचित "भुणभुणणे" शब्दाचा नावडता अर्थ समोर येईल. "देवा, तुझ्या पदकमलाभोवती मी भुंगा होऊन भुणभुणतो आहे," असा दुवा स्पष्ट दाखवावा लागेल बहुतेक. मग संदर्भ बघून हे भुणभुणणे भक्तिभावाचे वाटेल. अवांतर : उत्प्रेक्षा म्हणजे बळेच दुर्लक्ष करून सुंदर वैचित्र्य साधण्यासाठी उपमान-उपमेयांचे फरक म्हणजे फरक नाहीतच जणू म्हणून फरकच "साम्य" म्हणून सांगायचा, असा मी अर्थ लावतो. (उत्प्रेक्षा शब्दाचा सामान्य अर्थ दुर्लक्ष असा आहे.) सर्किट - याबद्दल तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

नाही

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 02:38 नवीन
डसणे हा शब्द विशिष्ट किटकांसाठी आरक्षित आहे हे पटले नाही. चित्त यांची ही कविता बघा.
काळजाला पिसू नये कोणी हाल इतका पुसू नये कोणी जीव घ्यावा खुशाल प्रेमाने बोचकारू, डसू नये कोणी कुंतलांशी असे न खेळावे मग स्वत:शी हसू नये कोणी
यामध्ये विंचू, सर्प किंवा इंगळी तत्सम प्राणी वा कीटक नाहीत तरीही डसू हा शब्द इथे परफेक्ट बसतो. आपला, (मुद्देसूद) आजानुकर्ण अजून काही वैभव जोशी यांची ही ओळः
लाटांवर उठती लाटा, तृष्णेला फुटती वाटा वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा
आणि ही
मज डसून गेली कुठली, चांदरात सळसळणारी देहावर दंश दिसेना, पण काया तळमळणारी
श्रीकृष्ण राऊत यांची ही ओळ
केली होती जरी परीक्षा गर्भजलाची; चौथ्यानेही मुलगी होउन डसली चिंता.
सलील वाघ यांच्या या ओळी
कवितांमधून ठार लयीत एकदा मला एक कोणतंतरी फूल सापडलं होतं म्हणजे फूल असं नाही फुलासारखंच काहीतरी ते मी तुझ्याकरता दोनशेपानी वहीत जपून ठेवल होतं फार हमसाहमशी. तू दिसताक्षणीच शेकडो शुभवाद्यं डसली इत्यादी सगळं मी तुला कसं कळवू कायम ठेवू कवितेतनंच
आपला, (तर्कदुष्ट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आणि इथे डसण्याची क्रिया कशी वाटते?

धनंजय
Sat, 08/30/2008 - 02:51 नवीन
पिसणे, हाल (करणे? - हाल कोणी पुसल्यास काय संदर्भ आहे?), जीव घेणे, बोचकारणे, डसणे, वगैरे... बघता त्या कवितेचा रस कुठलातरी वेगळाच आहे. या सर्व दु:खदायक गोष्टी सरळसरळ उपमाने आहेत. एका लांबलच यादीत पिसणार्‍या अवजारासारखे पिसणे, डसणार्‍या जिवाणूसारखे डसणे, बोचकारणार्‍या टोकासारखे बोचकारणे, वगैरे अध्याहृत असणे तितके कोड्यात पाडत नाही. अन्य उदाहरणांतही चांदरातीच्या डसण्यानंतर कवी दंश शोधतो, वगैरे स्पष्टीकरणे येतात. (आणि मला वाटते, वरील उदाहरणांपैकी सर्वच कविता चपखल शब्दयोजनेच्या दृष्टीने धडे म्हणून घेऊ नयेत.) वाटलेच तर सामांतर्याने अनिरुद्ध यांच्या कवितेत ओठ डसणार्‍या कुठल्यातरी जिवाणूसारखे डसतात असा अर्थ निघेल. तरी अनिरुद्ध यांनी खाली स्पष्टीकरण दिलेच आहे. त्यांना ओठ नव्हे, तर आठवण=इंगळी असे रूपक वाचकाच्या मनात जागवायचे होते. ते चित्र पटण्यासारखे आहे, फक्त पहिल्या वाचनात मला स्पष्ट नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 02:54 नवीन
मात्र ,
वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा
मध्ये ती दु:खदायक नाही. डसणे हे क्रियापद चावणे चे सुपरलेटिव म्हणून वापरली जाते असे असावे. अर्थात डसणे चा अर्थ कंटेक्स्ट बेस्ड इरॉटिक किंवा दु:खदायक दोन्ही असावा माफ करा. फारच कीस काढला मी. आपला, (क्षमाप्रार्थी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

डसणे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 08/30/2008 - 03:08 नवीन
डसणे हा शब्द काही विशिष्ट कीटक-जिवाणूंसाठी आरक्षित आहे. म्हणजे विंचू इंगळी साप, वगैरे डसतात. कुत्रा, डास, माणूस (आणि चणे!) वगैरे चावतात - ते डसत नाहीत. विदर्भातील ग्रामीण मराठीत "चावणे" हे क्रियापदच नाही. सर्व प्राणी (माणसासह) डसतात. डास हा कीटक चावण्या ऐवजी डसायला हवा, कारण "डसणारा" म्हणजे डास, नाही का ? एकनाथांनी मात्र विचू चावला, असे म्हटले आहे. विंचू डसला असे नाही. थोडक्यात काय, की डसणे आणि चावणे हे इंटरचेन्जेबली वापरता येते. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कर्णाशी

मेघना भुस्कुटे
Tue, 09/02/2008 - 06:55 नवीन
कर्णाशी सहमत. कविता ज-ब-रा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

डसतात मला

अनिरुद्ध अभ्यंकर
Sat, 08/30/2008 - 02:20 नवीन
धनंजयशेठ, प्रथम प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. ही संपुर्ण कविता ही भुतकाळात घडून गेलेल्या आठवणींवर आहे.. त्यामुळे आज जेव्हा तो आवेग आठवतो तो ओठांचा स्पर्श आठवतो तेव्हा ती आठवण आता इंगळीच्या डंखा सारखी त्रास देते ,वेदना देते म्हणून 'डसतात मला' अशी शब्द रचना केली अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

हंम्म

धनंजय
Sat, 08/30/2008 - 02:32 नवीन
चालेल. फारच गोष्टी अध्याहृत आहेत. म्हणजे "आठवण" आणि "इंगळी" ही मूळ उपमान-उपमेय जोडीच शब्दांकित नाही. त्यामुळे डसणारे ते ओठच आहेत, (ओठ/कुठलासा डसणारा जिवाणू = उपमान-उपमेय जोडी) असा गैरसमज व्हायची शक्यता आहे. स्पष्टीकरण दिल्यानंतरचे चित्र कवितेच्या रसाला पोषकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध अभ्यंकर

लईच भारी

दत्ता काळे
Fri, 08/29/2008 - 20:03 नवीन
अनिरुध्दा ते मन पिसे कवितेत दिसे हा विरह असे कि, त्रास असे ? कळते फक्त तुझेच तुला
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Fri, 08/29/2008 - 20:42 नवीन
तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला वा.. क्या बात है ! स्वाती
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
Fri, 08/29/2008 - 21:36 नवीन
कविता आवडली. पुनर्वाचनाचा आनंद वेगळाच. धन्याशेठच्या म्हणण्याकडे लक्ष/त्याचे स्पष्टीकरण द्यावे/दिल्यास उत्तम, तुमची भूमिका स्पष्ट होईल. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

बेला

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 00:30 नवीन
माझ्या परीने स्पष्टीकरण दिले आहे. आपला, (आगाऊ) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

भावोत्कट

ऋषिकेश
Fri, 08/29/2008 - 22:38 नवीन
संपूर्ण कविता आवडली.. भावोत्कट! - ऋषिकेश
  • Log in or register to post comments

केशवराव

आजानुकर्ण
Sat, 08/30/2008 - 00:31 नवीन
केशवराव, कविता आवडली. पाडगावकरांकडून तुम्ही थोडेसे शाहीर प्रभाकरांकडे निघालात याचा आनंद होतो. आपला, (चाहता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

अभ्यंकर

घाटावरचे भट
Sat, 08/30/2008 - 02:21 नवीन
अभ्यंकर साहेब, अप्रतिम कविता....खूपच आवडली... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sat, 08/30/2008 - 02:23 नवीन
कविता, अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

चांगली कविता!

रेवती
Sat, 08/30/2008 - 03:21 नवीन
कविता वाचताना पहेली सिनेमातल्या खाली है तेरे बीना दोनों अखियां गाण्याची आठवण झाली. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच

मदनबाण
Sat, 08/30/2008 - 04:00 नवीन
मस्तच !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

वा! एक

विसोबा खेचर
Sat, 08/30/2008 - 07:20 नवीन
वा! एक वेगळीच कविता रे अनिरुद्धा! आवडली....! तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर..

मनीषा
Sat, 08/30/2008 - 12:07 नवीन
तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला खूपच छान !!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!!!!!!

पंचम
Sat, 08/30/2008 - 14:02 नवीन
जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

हा माझा सांगितिक प्रतिसाद!

प्रमोद देव
Sat, 08/30/2008 - 14:34 नवीन
कविता आवडली म्हणून स्वरबद्ध केली. इथे ऐकता येईल.
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/30/2008 - 20:27 नवीन
कविता आवडली, देव साहेब मस्त स्वरबद्ध केली बरं का कविता !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

अभिनंदन

ऋषिकेश
Sat, 08/30/2008 - 23:28 नवीन
काका, कविता छान स्वरबद्ध झाली आहे. अभिनंदन! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

कविता आवडली

विसुनाना
Sat, 08/30/2008 - 17:50 नवीन
एका विशिष्ट लयीतली ही कविता आवडली. विशेषतः -
तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला
'डसणे' वर झालेला संवादही माहितीपूर्ण. कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींची एकच ओळ बरी वाटली असती. कान्हा हा शब्द मात्रांच्या दृष्टीने खटकला.
  • Log in or register to post comments

सुरेख

सर्वसाक्षी
Sat, 08/30/2008 - 19:28 नवीन
अनिरुद्ध, आज चीनमध्ये ही कविता वाचायला आणि "दैवी"आवाजात ऐकायला बरे वाटले.
  • Log in or register to post comments

छान कविता .

ईश्वरी
Sun, 08/31/2008 - 07:09 नवीन
छान कविता . आवडली. तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला विरहात असे जळणार कसे ही रात्र हसे का भास तुझे छळतात मला ह्या ओळी खासच. प्रमोद काकांची चालही छान. ईश्वरी
  • Log in or register to post comments

तू दूर

सैरंध्री
Sun, 08/31/2008 - 07:13 नवीन
तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला सुरेख कविता. शब्दयोजना समर्पक वाटली. कवितेतला नाद ही आवडला. सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments

सुंदर!

अजिंक्य
Sun, 08/31/2008 - 14:45 नवीन
मस्त कविता! तू दूर तिथे हे सूर इथे आकाश रिते का श्वास तुझे कळतात मला हे फारच छान! -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

अनिरुद्ध अभ्यंकर
Mon, 09/01/2008 - 13:28 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments

सहीच

सुमीत भातखंडे
Mon, 09/01/2008 - 14:56 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा