पगार आठवड्याप्रमाणे मिळाला तर.......

Primary tabs

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
20 Aug 2015 - 1:41 pm
गाभा: 

आठवड्याप्रमाणे पगार झाला तर......

भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल.

आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत.

वर्षात (365/7) - 52.1428571 – 52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300
बघा कोणाला बरोबर वाटते का? चुक वाटत असेल तर का वाटते?य

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

20 Aug 2015 - 1:46 pm | द-बाहुबली

जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल.

बास के राव बोनस पध्दत म्हणूनच सुरु झाली हे सगळ्यांनाच माहित आहे ना... प्रत विकली मोड्य्ल स्टार्ट करायचे म्हणता ?

संदीप डांगे's picture

20 Aug 2015 - 1:47 pm | संदीप डांगे

(मालकः एका महिन्याचा बोनस मिळतो ना? कामं करा, चला. आले मोठे. तेरा महिन्याचा पगार पाहिजे...)

काय हो ते लोकसत्तामधे जाहिरात छापुन येणारे होरा वाले च पुस्तक वाचल काय???
आता येऊद्या लॉटरी कशी लागावी ?? मुलगाच कसा होईल ?? इ..ई..

बाबा योगिराज's picture

20 Aug 2015 - 2:03 pm | बाबा योगिराज

कुड मिळतो??? आमाला पन कळू द्या....

कपिलमुनी's picture

20 Aug 2015 - 3:34 pm | कपिलमुनी

उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25

असा कसा ओ ? ३० दिवसाचा पगार १०० . आवडड्याचा २३.३३ रु.

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 3:37 pm | अस्वस्थामा

अहो काका.. ऐसी वरच तुम्हाला गणिताचा फोलपणा सांगितला की तरी परत इथं पण तेच ?

बरं तुमचा तिथला हा प्रतिसाद घेऊ उदाहरणार्थ आणि पाहू,

आता सोपे करून सांगतो.
वर्षात (365/7–52.1428571–52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
31/7 — 4.42857143 – 4
30/7 – 4.28571429 – 4
29/7 — 4.14285714 – 4
28/7
– 4
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300

पहिली बाळबोध चूक म्हणजे,
वर्षात (365/7–52.1428571–52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,

तूर्तास पगार, बोनस बाजूस ठेवू आणि दिनदर्शिकेचे गणित पाहू,
ठिक वर्षात ५२ आठवडे हे मान्य.
वर्षात १२ महिने हे मान्य.
मग एका महिन्यात ४ आठवडे धरलेत तर १२ महिन्यात किती आठवडे ? ४८. (गणित कच्चे असेल तर कॅल्क्युलेटर वर पहा)
मग आता जे ४ आठवडे तुम्ही तेराव्या महिन्याचे ते या कॅलेंडर वर्षात कुठे बसले ? आता असे पहा, इंग्रजी कॅलेंडर वर्षात तर अधिक महिना नसतो (जसा भारतीय पंचांगात असतो.) मग ते चार आठवडे गेले कुठे ?
तसेच हे बारा महिने आणि ५२ आठवडे यांचे एकक हे "दिवस" हे आहे ते मात्र "३६५" आहे ना.

31/7 — 4.42857143 – 4
30/7 – 4.28571429 – 4
29/7 — 4.14285714 – 4
28/7
– 4

इथे अपूर्णांक वगळून तुम्ही तुम्हाला गणिताच्या दृष्टीने फसवताय हे लक्षात घ्या.
कारण ३१ दिवसांचा महिना, म्हणजे ३१/७ = ४ आठवडे आणि ३ दिवस. एका वर्षात साधारण ७ महिने असतात म्हणजे तुम्ही २१ दिवस असेच वगळले (३ आठवडे वगळलेले).
३० दिवसांचा महिना, म्हणजे ३०/७ = ४ आठवडे आणि २ दिवस. एका वर्षात साधारण ४ महिने असतात म्हणजे तुम्ही ८ दिवस असेच वगळले (१ आठवडा वगळलेला).
२८ दिवसांचा महिना म्हणजे ४ आठवडे इतकेच बरोबर.

आता करा तुमचे पगाराचे गणित..

अभ्या..'s picture

20 Aug 2015 - 4:02 pm | अभ्या..

बोंबला.
आता ते परत समजावून सांगणार, मग बाजीराव येणार मग छत्रपतींचे आक्षेप येणार.
दोन दिवस मिपा बंद त्याची अशी शिक्षा देता व्हय.

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 5:22 pm | अस्वस्थामा

अरे भौ.. ते वायलं अन हे वायलं.. कय !
आता यात त्यांनी (अथवा इतरांनी) बाजीराव नि छत्रपतींचे आक्षेप वगैरे आणले तर काय करायचं.
तसेही गणित एकदाच समजावून सांगायचं अस्तं असं आमचे मास्तर (सsssर) म्हणायचे. :)

मिलीन्द's picture

20 Aug 2015 - 4:34 pm | मिलीन्द

ईएमआय (हवे तर हप्ता म्हणा) पण ५२ भरावे लागतील ना !!!

चित्रगुप्त's picture

20 Aug 2015 - 4:54 pm | चित्रगुप्त

अमेरिकेप्रमाणे भारतात अमूक इतके रुपये तास, अशी पगाराची पद्धत सुरू केली, तर त्याचे काय काय बरे-वाईट परिणाम होऊ शकतात, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

आदूबाळ's picture

20 Aug 2015 - 4:58 pm | आदूबाळ

त्यापेक्षा भारतीय कालगणनेप्रमाणे पगार चालू करू या का? अधिक महिन्याचा पगार मिळेल यष्ट्रा..

श्रीरंग_जोशी's picture

20 Aug 2015 - 7:54 pm | श्रीरंग_जोशी

काय षटकार हाणलाय. चेंडू एकदम स्टेडियमबाहेर.

दर पंधरवड्याला पगार मिळणारा कामगार - रंगा

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2015 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यासाठी देशात सौदी अरेबियासारखा तेलाचा पैसा आणि धर्माभिमान असावा लागतात ;) :)

तेथे हिजरी शकाप्रमाणे मोजदाद होते आणि हिजरी वर्ष ग्रेगॉरियन (इंग्लिश) वर्षापेक्षा १० ते १२ दिवसाने लहान असल्याने ३५३ ते ३५५ दिवसात पूर्ण वर्षाचा पगार मिळतो. म्हणजे दर तीन वर्षात एक महिना अथवा थोडा जास्तीचा पगार चकटफू मिळतो !

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2015 - 5:58 pm | अत्रुप्त आत्मा

बाकि कै असो..पण कोडी घालायला हाच धागा अक्ष्क्षय्य्य्य करावा..अशी संमं ला इणंती.

नाव आडनाव's picture

20 Aug 2015 - 6:20 pm | नाव आडनाव

:) +१
अशीच एक विनंती विनोदाच्या धाग्यासाठी मी केली होती, पण मी अल्पमतात होतो त्यामुळे ते काही झालं नाही :)

'पिंक' पॅंथर्न's picture

20 Aug 2015 - 6:08 pm | 'पिंक' पॅंथर्न

माझ्या मित्राने सांगितलेला अमेरीकेतला १५ दिवसाच्या पगाराचा अनुभव ...

"तिथे दर १५ दिवसांनी पगार मिळत असल्याने तो पटकन खर्च केला जातो किंवा तशी मानसिकता आपोआपच तयार होते. कारण परत १५ दिवसानी पैसे मिळणारच आहेत ना ! हि त्यामागची भावना. मात्र त्यामानाने एक महीन्यानी पगार होणारे आपण मात्र पैसे जुपन वापरतो. कारण पुढचा पगार तीस दिवसांनी मिळणार असतो. महिनाखेरीस तारांबळ नको हा त्यामगचा उद्देश !!"

माझ्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी खेडेगावात अजुनही आठवडे बाजार भरतात, त्याठिकाणी मजुर आणि अन्य लोकांना आठवड्याला पगार दिला जातो. तिथे सुद्धा 'मिळणारच आहेत पुढच्या आठवड्यात पैसे' ही मानसिकता एवढी जबरदस्त असते की बचत नावाची गोष्ट नसते....

अनिवासि's picture

20 Aug 2015 - 6:18 pm | अनिवासि

पगार आठवड्याला मग घरभाडे, घरवालीचे पैसे हे सुद्धा आठवड्यालाच का?

मलाही पहिली काही वर्षे आठवद्यालाच पगार मिळत असे आणि तो सुद्धा
रोख. सगळेजण (विशेषता: आम्ही तरुण पोरे) शुक्रवारची
वाट पहात असू. मग काय-- दुपारी जेवणाला १/२ बियर आणि sandwich.
खिशात कायम पैसे खुळखुळायचे. नंतर पगार महिन्याला होऊ लागला. सरळ बँकेत जाऊ लागला. मजा गेली! बीअर च्या जागी महिन्यातून एक wine ची बाटली आली !!!

बाकी चालू द्या.

हेमंत लाटकर's picture

20 Aug 2015 - 7:50 pm | हेमंत लाटकर

हा जो माझा खटाटोप चालू आहे ताे महिन्याला पगार पद्धती पेक्षा आठवड्याला पगार पद्घत झाली तर आपल्याला 1 महिना जास्तीचा पगार मिळेल व पगारासाठी महिनाभर वाट पहावी लागणार नाही.
---------------------------
31 / 7 — 4 . 42857143 – 4
30 / 7 – 4 . 28571429 – 4
29 / 7 — 4 . 14285714 – 4
28 / 7 – 4
-----------------------------
हे वर लिहले ते उदाहरणा दाखल आहे. महिन्यात 4 आठवडे धरण्याचा उद्द्श फक्त आठवड्याचा पगार काढणे हा आहे. तुम्ही महिन्यात 28,29,30,31 दिवस आहेत हा हिशोब करत आहात. 52 आठवड्यासाठी वर्षात 365 दिवसच धरले आहेत.
उदा. (उदा. देताना नेहमी छोटा आकडा वापरतात)
महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
तुम्ही म्हणता 4 आठवडे वगळले, मग मी 52 आठवडे न घेता 48 आठवडे घेतले नसते का?
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300 (13 महिन्याचा पगार)
कंपन्या आपल्याला बोनस देऊन उपकार दाखवतात. तो बोनस म्हणजे आठवडा पद्धतीप्रमाणे मिळणारा 13 व्या महिन्याचा पगारच आहे. बोनस सरकारी आॅफीस, शाळा, काॅलेज, बँका मध्ये मिळत नाही.
बोंबलायची गरज नाही एेसी अक्षरे मध्ये कोणाला कळले नाही म्हणून मिसळपाव मध्ये टाकले.
आपणा (त्यात मी सुद्धा) भारतीयांना एक वाईट खोड आहे प्रत्येक गोष्टीत विरोध करणे. (पुरस्कार देण्यात सुद्धा)
हे सर्व प्रतिसादासाठी.

हेमंत लाटकर's picture

20 Aug 2015 - 8:17 pm | हेमंत लाटकर

हा जो माझा खटाटोप चालू आहे ताे महिन्याला पगार पद्धती पेक्षा आठवड्याला पगार पद्घत झाली तर आपल्याला 1 महिना जास्तीचा पगार मिळेल व पगारासाठी महिनाभर वाट पहावी लागणार नाही.
---------------------------
31 / 7 — 4 . 42857143 – 4
30 / 7 – 4 . 28571429 – 4
29 / 7 — 4 . 14285714 – 4
28 / 7 – 4
-----------------------------
हे वर लिहले ते उदाहरणा दाखल आहे. महिन्यात 4 आठवडे धरण्याचा उद्द्श फक्त आठवड्याचा पगार काढणे हा आहे. तुम्ही महिन्यात 28,29,30,31 दिवस आहेत हा हिशोब करत आहात. 52 आठवड्यासाठी वर्षात 365 दिवसच धरले आहेत.
उदा. (उदा. देताना नेहमी छोटा आकडा वापरतात)
महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
तुम्ही म्हणता 4 आठवडे वगळले, मग मी 52 आठवडे न घेता 48 आठवडे घेतले नसते का?
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300 (13 महिन्याचा पगार)
कंपन्या आपल्याला बोनस देऊन उपकार दाखवतात. तो बोनस म्हणजे आठवडा पद्धतीप्रमाणे मिळणारा 13 व्या महिन्याचा पगारच आहे. बोनस सरकारी आॅफीस, शाळा, काॅलेज, बँका मध्ये मिळत नाही.
बोंबलायची गरज नाही एेसी अक्षरे मध्ये कोणाला कळले नाही म्हणून मिसळपाव मध्ये टाकले.
आपणा (त्यात मी सुद्धा) भारतीयांना एक वाईट खोड आहे प्रत्येक गोष्टीत विरोध करणे. (पुरस्कार देण्यात सुद्धा)
हे सर्व प्रतिसादासाठी.

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 9:30 pm | अस्वस्थामा

काका असं कसं, असं कसं..? आता गंडवायचं नै हा..

हे वर लिहले ते उदाहरणा दाखल आहे. महिन्यात 4 आठवडे धरण्याचा उद्द्श फक्त आठवड्याचा पगार काढणे हा आहे.

चूक दाखवली की उदाहरणादाखल म्हणायचं. अहो हे गणित आहे आणि त्यात "उदाहरणादाखल" १२ चे १३ करुन कसं चालेल ?

तसेच तुमचा उद्देश हा,

भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल.

आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत.

हे सिध्द करण्याचा आहे. मी ते कसे फसवे आहे ते सिध्द केलेय.

तो बोनस म्हणजे आठवडा पद्धतीप्रमाणे मिळणारा 13 व्या महिन्याचा पगारच आहे.

इतके स्पष्ट लिहून देखील तुम्हाला बोनस हा तुमचा १३ व्या महिन्याचा पगार वाटतोय ? हद्द आहे आडगेपणाची.!!

बोंबलायची गरज नाही एेसी अक्षरे मध्ये कोणाला कळले नाही म्हणून मिसळपाव मध्ये टाकले.

ही भाषा वापरायचा काय संबंध.. ?? टिकोजीराव असाल तुम्ही, पण मुद्द्याने प्रतिवाद करावा जमल्यास.. बोंबलायची वगैरे भाषा वापरायचं काम नाही. आणि इतक्या सगळ्या लोकांना कळत नाही (आणि फक्त तुम्हालाच समजतंय!) असा तुमचा समज असेल तर धन्य आहात.. तपासून घ्या जरा (लॉजिक तुमचं ! नै तर (गैर)समज व्हायचा)..

आपणा (त्यात मी सुद्धा) भारतीयांना एक वाईट खोड आहे प्रत्येक गोष्टीत विरोध करणे. (पुरस्कार देण्यात सुद्धा)
हे सर्व प्रतिसादासाठी.

इथे तुम्ही स्वतःला बाबासाहेबांशी तुलना करताना पाहून काय बोलावे कळत नाही. एक तर तुम्ही अडाण्यासारखे गणित मांडून काहीबाही दावे करत आहात आणि वर लोकांनाच नावे ठेवत आहात ?

उलट मी असे म्हणेन की आपल्या भारतीयांना एक वाईट सवय आहे की त्यांना प्रश्न विचारले की त्यांच्यावरचा हल्ला वाटतो. अपमान वाटतो. मोठ्याना/ मान्यवरांना किमान योग्य असेही उलट प्रश्नच विचारु नयेत अशी अपे़क्षा केली जाते. मुद्द्यांचा विचार करावा आपल्या गृहितकात सुधारणा, बदल हवा असेल तर मोकळ्या मनाने करावा, यात गैर काय आहे ?

असो, माझ्या तर्फे पूर्णविराम (जर तुम्ही अजून व्यक्तिगत घसरला नाहीत तर) किमान स्वतःपुरते गणित पडताळून पहा असे सुचवतो.

जाता जाता...

"The problem with the world is that the intelligent people are full of doubts, while the stupid ones are full of confidence.”

― Charles Bukowski

संदीप डांगे's picture

20 Aug 2015 - 10:00 pm | संदीप डांगे

"The problem with the world is that the intelligent people are full of doubts, while the stupid ones are full of confidence.”

― Charles Bukowski

>> मला डाउट हाय की हे वाक्य चार्ल्स बुकोव्स्कीचं आहे.

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 10:16 pm | अस्वस्थामा

जला गीता छापली आन तुमी तळटीपेमधली टायपो एरर खुपली.! (गीतेबद्दल पण बोला वो.)

बादवे, गुगलून मग टाकलेय.. तरीपण चूकही असू शकेल. (हर फर्स्ट गुगल रिजल्ट सच नही होता, बाबू!)

संदीप डांगे's picture

20 Aug 2015 - 10:30 pm | संदीप डांगे

अर्रे देवा...

'आमाला डाऊट है' असं आमी म्हणण्याचं कारण 'आम्ही बी इंटलेझेंट हावोत' असं आमाला सुचवायचं होतं...

हेमंत लाटकर's picture

21 Aug 2015 - 9:28 pm | हेमंत लाटकर

भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 12 ऐवजी 13 महिन्याचा पगार मिळेल व पगाराची महिनाभर वाट पहावी लागणार नाही.
आठवड्याप्रमाणे पगार काढण्यासाठी वर्षात (365/7) 52 आठवडे व. पगाराचा 4 था भाग काढण्यासाठी 4 आठवड्यांचा महीना धरावा लागेल.
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300 (13 महिन्याचा पगार)
कंपनी मध्ये बोनस ((13 व्या महिन्याचा पगार) आॅलरेडी मिळतो (1940 च्या कायद्यानुसार). पण सरकारी आॅफीसेस मध्ये मिळत नाही.
अभ्या साहेबांनी बोंबला म्हणले म्हणून अशी भाषा वापरली.

बाबासाहेब पुरंदरेची बरोबरी करायला वेडा आहे का. मला एवढेच म्हणायचेहोते भारतीयांना प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची वाईट खोड आहे. जसे बाबासाहेब पुरंदरेनां पुरस्कार देण्यासाठी किती लोक विरोध करत होते. शेवटी कोर्टाकडून आर्डर आल्यामुळे व फडणविस सरकारच्यापप्रयत्नांमुळे दिला.

थॉर माणूस's picture

21 Aug 2015 - 9:57 pm | थॉर माणूस

>>>उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25

आँ? अहो एका महिन्यात फक्त ४ आठवडे? म्हणजे फक्त २८ दिवस? (६ महिन्यातले २ आणि ६ महिन्यातले ३ असे जवळपास २९ दिवस गणितात नाहीत?)
महिन्यातले दिवस ३० पकडले तर आठवड्याचा पगार होतो २३.३३ ((१००/३०)*७)
आणि वर्षाचा २३.३३ * ५२ = १२१३.३३.

का? कारण महिन्याचा पगार आठवड्यात बदलताना तुम्ही दर महिन्यातले किमान २-३ दिवस मोजलेच नाहीत आणि वर्षाचे गणित करताना मात्र ते धरलेत २९/७ = ४ आठवडे = तुमचा १ महीना.

१३.३३ रुपड्यासाठी लय गणितं करून र्‍हायले राव तुमी. :) (हे १४ रुपये पण मोजता येतात पण अजून नवे गोंधळ नकोत)

बरं दुसर्‍या पद्धतीने गणित मांडू...
महिन्यात कामाचे आठवडे फक्त ४ धरू... कामाचा आठवडा ५ दिवसांचा. म्हणजे एका महिन्यात १० सुट्या (२ कामाचे आठवडे). थोडक्यात कामाच्या ५ दिवसीय आठवड्यांची एका महिन्यातली संख्या ६.
आता वर्षभराला दर आठवडा २५ रुपयाने गणित करुयात...

१२ * ६ = ७२ आठवडे
७२ - २४(सुट्ट्यांचे आठवडे) = ४८ आठवड्याचा पगार
४८ *२५ = १२०० रुपये!!!

सुट्या पकडल्या तरीही...
दर आठवडा १०० / ६ = १६.६६ ने गणित...
७२ * १६.६६ = १२०० रुपये!!!

अस्वस्थामा's picture

21 Aug 2015 - 10:02 pm | अस्वस्थामा

काका तुम्ही ग्रेट्ट आहात. माझा प्रतिसाद वाचला नसला तरी चालेल पण खालील इतरांचे तरी वाचलेत का?
वाचले असतील तरी,

भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 12 ऐवजी 13 महिन्याचा पगार मिळेल व पगाराची महिनाभर वाट पहावी लागणार नाही.

हेच पालूपद अजून आळवताय ते ही माझ्यासहीत इतरांच्या एकाही मुद्द्यबद्दल न बोलता.!

असो.. ऐसीवरच्यांचा आणि मिपावरच्यांचा वरचा मजलाच कमी त्याला तुम्ही काय करणार ?
आता हीच योजना अस्तित्वात येण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे मी सुचवेन. सुरुवात https://www.change.org/ पासून करावी. त्याच बरोबर न्यायालयातही जनहितार्थ याचिका (पेटिशन) दाखल करावी. एक लेखही छापून आणावा सकाळ मध्ये.
तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा.!

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 9:34 pm | प्यारे१

अमको अमारा कुंपणी बोनस नै देता जी! क्या कर्ना तोडा बताओ ना जी!

आनन्दा's picture

20 Aug 2015 - 10:33 pm | आनन्दा

मुळात हा लेखच चुकीच्या गृहितकावर आधारलेला आहे.. ते म्हणजे आपल्याला महिन्याचा पगार मिळतो.. खरेतर आपल्या वर्षाचा पगार मिळतो. बघा तुमचे कोणत्याही कंपनीशी होणारे कॉण्ट्रॅक्ट. तुमची सी टी सी ही नेहमी वर्षाची असते. ती फक्त तुम्हाला १२ महिन्यांमध्ये विभागून मिळते.
जर तुम्ही म्हणालात मला आठवड्याला हवी, तर मग ती आठवड्याला मिळेल. हा का ना का. शेवटी हिशोब तोच नाही का?

आनन्दा's picture

20 Aug 2015 - 10:36 pm | आनन्दा

बाकी मला मागचे काही दिवस आठवड्याला पगार मिळतोय.. आणि मजा पण येतेय.

हेमंत लाटकर's picture

21 Aug 2015 - 9:45 pm | हेमंत लाटकर

मग वर्षात 52 आठवडे येतात. फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात म्हणून महिन्यात 4 आठवडे धरले.

थॉर माणूस's picture

21 Aug 2015 - 10:00 pm | थॉर माणूस

मार्चमधे ३१ असतात... मग ४.५ आठवडे पकडा की. १२ * ४.५ = ५४ आठवडे!!!

आदूबाळ's picture

20 Aug 2015 - 10:50 pm | आदूबाळ

बरं ... आता जरा वेगळ्या पद्धतीने.

(समजा) तुमचे लेख वाचून रतन टाटांचं मन हेलावलं. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं. त्यांना वाटलं, "अरे झरत्रुष्टा! आजवर आपण आपल्या कारखान्यांत आणि हपीसात काम करणार्‍या हजारो लोकांच्या तोंडचा तेरावा घास पळवून आपल्या तुंबड्या भरल्या. छ्या! ये दौलत, ये शोहरत, ये बंगला, ये गाडी ... सब किसी गरीब मजदूर के मूंह का निवाला छीन के बनायी गयी हय...."

त्यांनी तडक बॉम्बे हाऊसला धाव घेतली, आणि म्हणाले, "बेटा सायरस, आजपासून सगळ्यांना आठवड्याच्या आठवड्याला पगार दे!"

सायरसने हुकुम सर आखोंपर मानत आपल्या पीएला बोलावलं.

"पीए, पगार काय तुझा?"
"वर्षाला सहा लाख रुपये सर! तुमच्याच सहीचं ऑफर लेटर आहे..."
"बरं! आजपासून तुला पगार दर आठवड्याला मिळेल... लाटकरांच्या म्हणण्याप्रमाणे तुला आता तेरा महिन्यांचा पगार मिळणार आहे, पण खबरदार सहा लाखावर एक दमडा घरी नेलास तर!"

..रतन टाटा चर्चगेटजवळच्या अग्यारीच्या दिशेने जाऊ लागले.
..सायरस मिस्त्री पुढच्या कामाकडे वळले.
..पीए डोकं खाजवू लागला.

तर लाटकरसाहेब,
१/ पीएला आठवड्याला किती पगार मिळेल?
२/ वर्षाकाठी किती पैसे पीए घरी नेईल?

याबाबत टाटा ग्रुपला जरा मार्गदर्शन करता का?

आणि अजून एक.. यापूर्वी आम्ही पेरोल प्रोसेसिंग ओव्हेरहेड १% धरत होतो.. आता ते ४% धरण्यात येईल. महिन्याला ४ वेळा तरी पगार करावा लागणार. सबब तुम्हाला आठवड्याभरात नवीन कोंट्रॅक्ट मिळेल - ४% कापून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

साहेब,

उद्योगधंदे चालविणार्‍यांना पैश्याच्या व्यवहारात उत्तम बुद्धी असते हे तुम्हाला मान्य असेलच. खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य परतावा मिळेल याची खात्री त्यांनी केली नाही तर उद्योग बुडितखात्यात जाईल हे नक्की. तेव्हा ते कोणत्या चलाख हिशेबाला बळी पडून कर्मचार्‍यांना त्याच्या उत्पादनपात्रतेपेक्षा जास्त पगार देतील हे शक्य नाही... आणि उद्योग शिल्ल्क राहून वर्षानुवर्षे कर्मचार्‍याला पगार देत रहावा यासाठी तरी... नसावे !

आठवड्याचा पगार झालाच तर तो खालीलपैकी एका प्रकारे मोजला जाईल...

१. "आठवड्याच्या सुट्टीचे दिवस आणि शासकीय आणि कंपनीच्या प्रशासनाने मान्य केलेले सुट्टीचे दिवस" हे सर्व कामाचे दिवस असतात हे गृहितक धरून पगार काढण्याची पद्धत :

एका दिवसाचा पगार = पूर्ण वर्षाचा पगार / ३६५ * (* : लीप वर्षात हा आकडा ३६६ असेल)

एका आठवड्याचा पगार = एका दिवसाचा पगार X ७

२. कामाच्या तासावर अवलंबून असलेला पगार :

आठवड्याचा पगार = {(आठवड्यात केलेल्या कामाचे तास) + (त्या आठवड्यातले सरकारने आणि कंपनीच्या प्रशासनाने मान्य केलेले सुट्टीचे तास)} X प्रती तास मानक (स्टँडर्ड) पगार

अजून काही मोजमापाचे प्रकार असू शकतात, पण हे दोन जास्त वापरले जाणारे पर्याय आहेत.

संदीप डांगे's picture

21 Aug 2015 - 12:17 am | संदीप डांगे

समजा मला दिवसाला हजार रुपये मिळतात.

१ दिवस = १,०००
३० दिवस = ३०,०००
१२ महिने = ३,६०,०००
३६५ दिवस = ३,६५,०००
७ दिवस = ७,०००
५२ आठवडे गुणीले ७,००० = ३,६४,०००

ह्यात कुठेही मला तेरावा पगार दिसत नाहीये हो... मालक?

(महिन्याच्या हिशोबाने फक्त ५ हजार कमी होतात कारण दिवसांच्या हिशोबाच्या तुलनेत महिन्याच्या हिशोबाला वर्षाला ५ दिवस कमी पडतात.)

आता साहेबांचं गणीत महिन्याला चार आठवडे धरल्याने गंडलय. म्हणायला वर्षाला ५२ आठवडे धरायचं आणि महिन्याच्या पगाराला ४ ने भागायचं इथंच चुकतंय. कसं?

१२ महिने = ३,६०,०००
१ महिना : ३०,००० भागीले ४ आठवडे = ७,६०४
(४ गुणिले ७ =२८ दिवस. उरलेले सात महिन्याचे २१, ४ महिन्याचे ८ दिवस, एका महिन्याचा एक दिवस असे ३० दिवस कुठे गेले?)
५२ आठवडे गुणीले ७,६०४ = ३,९५,४१६ (इथे आले ते, एक्स्ट्रा जोडले परत)

- संदीप डांगे: गणित- ५२/१५०, एसएससी, म्हारास्ट बोर्ड, १९९७

योगी९००'s picture

21 Aug 2015 - 8:22 am | योगी९००

मस्त प्रतिसाद..!!

एकदम बावन्नकशी सोन्यासारखा...!! म्हणूनच तुम्हाला गणितात ५२ मार्क पडले बहुतेक..!!

ढंप्या's picture

21 Aug 2015 - 3:01 pm | ढंप्या

- संदीप डांगे: गणित- ५२/१५०, एसएससी, म्हारास्ट बोर्ड, १९९७

लयचं खवाट प्रतिसाद.......!!!

अस्वस्थामा's picture

21 Aug 2015 - 3:16 pm | अस्वस्थामा

डांगे सायेब, वरती कै आमी कानडीत लिव्हलंय कै ? हेच लिव्हलंय की.. तरी बी त्यांना समजत नसंल तर काय.. :)

संदीप डांगे's picture

21 Aug 2015 - 4:08 pm | संदीप डांगे

तुमच्याच प्रतिसादाचा आधार घेऊन लिहिलंय...! तरी ते ऐकत नाहीत म्हणून त्यांचंच गणित त्यांच्याच शब्दात मांडलं.

उत्तर काय काढायचे ते मनात धरून कसेही गणित मांडता येते.

आता खरेसाहेबांनी जे सत्य सांगितले त्यावर आधारित एक गणित इथे देतो:

१२ महिन्याचा पगार. काम ९ महिने. म्हणजे ३ महिने फुकटचा पगार

म्हणजे १२ + ३ = १५ महिन्याचा पगार फक्त ९ महिने काम करून मिळत आहे. आत्ताच!

स्वामी संकेतानंद's picture

21 Aug 2015 - 5:50 am | स्वामी संकेतानंद

आँ! महिन्याचे बरोब्बर एक्सक्ट चार आठवडे? म्हणजे तुमचा प्रत्येक महीना २८ दिवसांचाच का हो? वर्षाला १२ फेब्रुअरी महीने?

सर्वसाक्षी's picture

21 Aug 2015 - 10:56 am | सर्वसाक्षी

लाटकरसाहेब

आपला पगार जर मासिक देय रकमेवर आधारित असेल तर पगार महिन्यातून एकदा दिला किंवा दर आठवड्याला दिला, रकमेत फरक पडणार नाही. मासिक देय रक्कम भागिले महिन्याचे दिवस गुणिले आठवडे किंवा अपूर्ण आठवड्याचे नेमके दिवस या सूत्रानुसार

२८ दिवसांच्या महिन्यात ४ आठवड्यांचा पगार मिळेल
२९ ------------------------------------------ आणि एका दिवसाचा पगार मिळेल
३० --------------------------------------------------- दोन दिवसांचा --------------
३१ ---------------------------------------------------- तीन ------------------------

जेव्हा बिनपगारी खाडा होतो तेव्हा मासिक देय रक्कम भागिले महिन्याचे दिवस गुणीले हैरहजर दिवस याच सूत्रानुसार गैरहजर दिवसांचा पगार कापला जातो.
कुठल्याही प्रकारच्या वेतन मापनात पगारी रजा / जाहिर केलेल्या सुट्ट्या मोजल्या जात नाहीत.

ग्रॅचुइटी मोजताना मात्र कर्मचार्‍याला महिन्याला किमान चार सुट्ट्या अनिवार्य या गृहितकाच्या आधारे मापन केले जाते व उचीत लाभ दिला जातो आणि सुलभ मापनासाठी सर्व महिने सरासरी ३० दिवसांचे धरले जातात.
.
म्हणजे जर ग्रॅच्युइटी वर्षाला १५ दिवसांचे मूळ वेतन अशी असेल तर देय रक्कम मोजताना

मूळ वेतन भागीले २६ गुणीले ३० गुणिले १५ गुणिले झालेल्या सेवेची वर्षे असे मापन केले जाते.

आता आपल्या मागणीनुसार जर पगार आठव्ड्याला द्यायचा असेल तर मालक पगार ठरवतानाच आठव्ड्याच्या बोलीवर ठरवेल, महिन्याच्या वा वर्षाच्या बोलिवर ठरवणारच नाही. तेव्हा बारा ऐवजी तेरा महिन्याचा पगार हा मुद्दाच गैरलागु आहे.

पैलवान's picture

21 Aug 2015 - 11:08 am | पैलवान

असल्या धाग्यांवर काहीही समजावयची /स्पष्टीकरणाची काही गरज असते काय?
उगा ट्यार्पी वाढवायची ...

थॉर माणूस's picture

21 Aug 2015 - 11:19 am | थॉर माणूस

पगार मनाप्रमाणे मिळाला तर....

असा धागा काढायला हवा. २०० तरी नक्की होतील. :D

सुबोध खरे's picture

21 Aug 2015 - 12:42 pm | सुबोध खरे

आम्ही रोजगारावर आहोत (स्वयं रोजगार योजना) रोजगार हमी नाही.
ज्या दिवशी आलो नाही त्यादिवशी उपास. जेंव्हापासून दुकान बंद त्यानंतर उत्पन्न बंद. पेन्शन, संतोष फंड किंवा भविष्य निर्वाह निधी शून्य. तेंव्हा मरेपर्यंत काम करणे आवश्यक. काय घेऊन बसता महिन्याला का आठवड्याला पगार?
मी तर म्हणतो वर्षाला पगार असावा.तो सुद्धा रोजचे किती पैसे ते गृहीत धरून तितक्या दिवसांचा पगार वर्षा अखेरीस. म्हणजे मोलकरणी स्वागत सहायिका या सर्वाना पगार एकदाच. दिवाळी बोनस द्यायची गरज नाही.महिन्याला दोन सुट्या ५२ रविवार सणासुदीच्या १४ सुट्ट्या धरून नोकर २७० दिवसापेक्षा कमी काम करतात.म्हणजे ९ महिनेच पण पगार मात्र १३ महिन्यांचा( १ महिन्याचा पगार बोनस धरून). वर सरकारी जावयांची कटकट.
हे धंद्याचे खरे गणित. बोला करता का धंदा?

आठवड्याला पगार मिळाला तर मजा येइल. व्याजाचा खर्च लय वाढेल धंदा करणार्‍यांचा. साला महिनाभर वापरता येतात पगाराचे पैसे, ते मग आठवडाभरच वापरता येतील. बाकीचे कर्जाऊ घ्यावे लागतील!!

आणि उलट पगारदारांना मात्र पैसे लवकर मिळाल्यामुळे बचतीवर जास्त व्याज मिळवता येइल.

लाटकर साहेब करा हो प्रसार आपल्या आयडीयेचा. चांगलंय...!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2015 - 8:38 pm | श्रीरंग_जोशी

धाग्यात मांडलेल्या कल्पनेशी थोडेफार साधर्म्य असल्याने हे उदाहरण म्हणून लिहित आहे.

आमचे गृहकर्ज १५ वर्षे एवढ्या कालावधीचे होते. जालावर दर दोन आठवड्यांनी हप्ते चुकवण्याच्या पर्यायाबद्दल वाचले होते. आम्ही तो पर्याय निवडला आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे.

  • महिन्याचा हप्त्याची रक्कम जेवढी त्याच्या निम्मी रक्कम दर दोन आठवड्यांनंतर येणार्‍या शुक्रवारी भरावी लागते.
  • पूर्वी वर्षातून १२ वेळा जितकी रक्कम भरावी लागायची त्याच्या निम्मी रक्कम २६ वेळा भरावी लागते.
  • दर महिन्यात पहिल्या अन तिसर्‍या शुक्रवारी नव्या पद्धतीने हप्ता भरावा लागतो.
  • वर्षातून दोन महिन्यांत ५ शुक्रवार येतात. त्यावेळी पहिल्या, तिसर्‍या अन पाचव्या शुक्रवारी हप्ता भरावा लागतो.

या रचनेमुळे आमचे कर्ज १६ महिने अगोदर संपणार आहे अन व्याजाची एकुण रक्कमही थोडीफार कमी होत आहे.

बादवे हे अमेरिकेतले गॄहकर्ज आहे. भारतात ही पद्धत आजवर पाहिलेली नाही.

तुमच्या केसमध्ये कंपाउंडिंग महिन्याने व्हायच्या ऐवजी पंधरा दिवसांनी होत असल्याने, आणि तुम्ही पंधरा दिवसांनी हप्ता भरून ब्यालन्स कमी करत असल्याने ते १६ महिने लवकर संपत असावं.

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2015 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी

हो बरोबर आहे. तुम्ही ते योग्य संज्ञा वापरून सांगितले आहे.

असंका's picture

24 Aug 2015 - 12:05 am | असंका

"इ एम आय" नैये का? (उदा. मुद्दल आणि व्याज मिळून प्रत्येक हप्त्याची रक्कम वेगवेगळी येतेय का?)

श्रीरंग_जोशी's picture

24 Aug 2015 - 12:14 am | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत इ एम आय हा शब्द मी कार लोन घेताना वापरला. कर्ज देणार्‍या बँकवाल्याला कळलंच नाही की इ एम आय म्हणजे काय?

हो आमचे कर्ज इ एम आय पद्धतीने फेडले जात आहे. १८० हप्प्त्यांऐवजी त्या हप्प्त्याच्या रमकेम्च्या निम्म्या रकमेचे १६४ * २ = ३२८ हप्ते भरायचे आहेत. दर दोन आठवड्यांनी पेमेंट होणे अन दर वर्षी एका महिन्याचे पेमेंट अधिक होणे या दोन कारणांनी व्याजाची रक्कम कमी होऊन कर्ज १६ महिने अगोदर संपत आहे.

असंका's picture

24 Aug 2015 - 12:23 am | असंका

धन्यवाद...!

खरंतर कॅलेंडर बघितले तर त्यात ५२ आठवडेच होतात! प्रत्येक महिन्यात पूर्ण आठवडा सोडून शिल्लक राहिलेले दिवस मोजले तर ५२ आठवडेच होतात. कृपया दिनदर्शिका बघा!!!