Skip to main content

मातृभक्ति आणि मराठे

लेखक raudransh_27 यांनी बुधवार, 19/08/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव: असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन) (Partially atheist ) जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते.. पण मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes. जय जिजाऊ, जय शिवराय _/\_ (लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच. हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत" सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

वाचने 34805
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

जय भवानी, जय शिवराय.. . . एक अगदी पक्के सांगतो. आमच्या जेप्याला निदान ५ वेळा तरी या धाग्यावर यावे लागणार. . . आई राजा उदे उदे. सदानंदीचा उदे उदे. येलकोट येळकोट घे.

In reply to by raudransh_27

१६३० सालचा दुष्काळ इतका भयंकर होता की मरण पावलेल्या माणसांचे मांस खाऊन काही लोकांना गुजराण करावे लागले. अशा परिस्थितीचे वर्णन करताना असा उल्लेख उपमा अलंकाराचा प्रयोग असू शकतो. सदर लेखन ५० वर्षांहून अधिक काळापूर्वी झालेले असल्याने तेव्हा वापरली गेलेली भाषा आज आपल्याला रुचेलच असे नाही. हे माझे अंदाज आहेत हे पुन्हा एकदा लिहितो.

अरे किती खोटं बोलावं. शेती असो घरची म्हातारी. तिचं पार पोतेरं करणारी शहाण्णव कुळी बघितली आहेत. लाज वाटायला हवी यांना.

In reply to by अर्धवटराव

काय खोटं आहे हो यात. त्यांनी स्पष्ट म्हटलंय विचारधारा आहे म्हणून. विचारधारा. जरा विचार करा अर्धवटराव!

In reply to by अर्धवटराव

as in विषाचा अणू= विष्णु? खेडेकरांच्या की कुणाच्या एका पुस्तकात आहे असं मुक्ताफळ (एका आसनानंतर मुक्त झाल्यानंतर येणारं फळ अशी फोड़ असेल)

धन्य!!!! बादवे.. ते ब्राम्हण पुरुषांबद्दल काय वाट्टेल ते लिहीलं होतं मध्ये एकांनी.. त्याबद्दल पण आपली विचारमौक्तिकं येणार का? (पण खरंच.. त्या पुस्तकावर खटला भरला का हो? काय झालं त्याचं खरं पुढे..?)

In reply to by पिलीयन रायडर

खेडेकरावर खटला भरला गेला आणि त्यामध्ये त्याने विनाशर्त माफी मागून ही पुस्तके मागे घेतली.

श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय
कंचा स्वातंत्र्यदिन मनायचा पावनं? मराठ्यांना वंदनीय? आँ, आम्हालापण वंदनियच आहेत कि हो. नै म्हणजे स्पेसिफिक जातीचा उल्लेख केलाय म्हणुन विचारतोय.
भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले
सगळ्याच जातीधर्मातले लोक्स हसत हसत मृत्युला सामोरे गेलेत. फक्त मराठेचं गेलेत असा काही विदा आहे का तुमच्याकडे? असेल तर द्या. का आम्ही इतिहास (बि)घडवतो असा अहंभाव कशाला पाहिजे.
परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन) (Partially atheist )
नेमका मुद्दा काय आहे? तुम्ही तिकडे एका हातात भगवा आणि दुसर्‍या हातामधे तिरंगा घेउन गेला होतात हा? लव्ह मॅरेज आणि इतिहास? का फक्त आईची काळजी? त्या एका विशिष्ट संंघटनेमधे बापाला वार्‍यावर सोडुन देतात काय? असेल बाबा. थोर लोकं ती. नव्या प्रथा असतील बॉ!!
जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते..
परत तेचं. बापाला आरक्षण द्यायला पायजे का काय बापप्रेम, बापभक्ती वगैरेंसाठी. कारण माझा मित्रपरिवार चओफेर पसरलेला आहे. त्यांच्यामधे तर बापाला प्रेम, आदर वगैरे देतात. फक्त आईवर भक्ती करणारी हि पिलावळ कुठली म्हणायची? साने गुरुजींचा एकेरी उल्लेख?
लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच. हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"
त्या विचारधारेची अनेक पारायणं झालेली आहेत. काय हो नेमका असा उल्लेख कुठे आहे? न्युनगंडाचे (होल वर्ल्ड इझ प्लॉटिंग अगेन्स्ट मी टैप) बळी एवढचं म्हणेन. किंवा अपराधी भावनेचे. (तसं नसावं हि अपेक्षा). शुद्र? आँ. वर्णव्यवस्था जिवंत ठेवायचं समर्थन जेवढं मनुस्मृतीमधुन झालं नसेल तेवढं हे न्युनगंडाचे बळी पडलेले विचारजंत करत असतात नेहेमी त्याला काय करणार फाट्यावर नेउन मारणं सोडुन.
आजोबाअंधअनुयायीनीं
मुकबधिरअंधअपंगपॅरॅलिटिकशुद्धयझथुंकीझेलब्रिगेडअनुयायींच्या लिखाणाला वाचत असाल तर असे प्रश्ण पडणारचं त्यात नवल काय?
तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )
कोणाची कुठल्या रंगाची असावी हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे. आणि हो आपला ब्राहमणद्वेष आणि ब्रिगेड** वृत्ती लपत नाही तुमच्या "बुरख्या"मधे. सद्ध्याचा बुरखा लहान आहे बराचं चेहेरा झाकला की बुड उघडं पडतय आणि वाईस वर्सा. जेपी बरचं सामानं काढ रे सत्काराला. चार पोकळ बांबु पण काढ ष्टॉकमधुन. इथे अजुन मंडळी येणार ओकारी करायला. क्षत्रियकुलावतंस गोब्राहमणप्रतिपालक शिवाजी महाराज कि जय, वीरमाता जिजाउआई की जय, हिर्‍याला पैलु पाडणारे गुरु दादोजी कोंडदेव की जय. (धरलाकीहाणपळालाकीसोडकुत्रा ब्रिगेड अध्यक्ष) -कॅजॅस्पॅ-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहितात होय? वाचणार कधी ... आणि रिप्लाय कधी करतील ? तोपर्यत पुढच्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण जाहीर झाला असेल ...

In reply to by अजया

स्वागत आहे आमच्या ब्रिगेडमधे. आमचे भांडार अधिकारी श्री.श्री. जे.पी. ह्यांच्याकडुन लाठ्याकाठ्या आणि बाग्बाण घेउन ठेवा. =))

सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही
हे सर्व मराठा मतांच्या ध्रुवीकरणासाठी चालू आहे असे दीसतेय. मराठाच काय कोणीही आपली आई विकायला तयार होणार नाही. उगाच लोकांची माथी भडकवायची आणि आपला कार्यभाग साधायचा. फाट्यावर मारुन पुढे चला...

In reply to by खटपट्या

मताचं राजकारण सुरुय हे स्पष्टच दिसतेय, जे राज ठाकरे वर्ष बोलत नाही ते अचानक ५,५ मुलाखती देतात.. अजित पवार लोकांकडुन विरोध होतोय लश्रात येताच वाक्ये फिरवतात.. राज्य सरकारचे मंत्री पुढे येत नाहीत.. खंत म्हणजे छ.शिवाजी नावाचा विचार यात लुब्ध होतोय.. दोन्ही बाजुची वैचारिक गुलामगिरी पाहुन किव वाटते.. यावर इतिहासअभ्यासकाचीं जाहीर चर्चा व्हायला हवी होती.. सांस्कृतिक मंञालयाने सर्वाने बोलवुन इतिहासकाराचीं समिती वगैरे स्थापन करायला हवी होती.. तसेही मागच्या चर्चावैळी दिसुन आले बमुपु इ कुठे येत नाहीत.. यांना नुसते वाद चिघळत ठेवायच असतात.. संशोधन मडंळावर कागदपञे जाळुन करुन शेवटी शिवरायाचंचेच नुकसान होतेय. आम्हाला शिवरायानांबद्दल आदर आहे माँसाहेब वंदनीय आहेत असे म्हणायचे नुसते अन् बदनामी करण्याची पाठराखण सरासर सुरुय.. कोणीही आईची बदनामी सहन करणार नाही, मी माझ्या वरच्या प्रतिसादातच म्हटलेय तात्पुरता मराठे हा शब्द बाजुला ठेवा, "आई विकत असत " याला कोणीच समर्थन करणार नाही.

In reply to by पैसा

प्रथमत आपण अनमोल विचार मांडण्यापुर्वी (अजुन) एकदा वाचावे ही विनंती..शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही.. राहिला भाग मराठीचा, माझ्या कळफलकावर अनेक अश्रर सापडत नाहीत उदा. Dyaneshwar सारखे शब्द टाईप करताना अडचण येते.. आतंरजालावर मराठी टाईप करताना अडचणी येतात हे सगळ्यानां ठाऊक आहे. काही लोक उगाच मराठी भाषा खतरे में है असा आव आणतात. ककट्टर लोकानां मुद्दापेश्र काना वेलाटीं व्याकरण याचीच लय काळजी

In reply to by raudransh_27

अश्रर = क्ष सारखे अक्षर लिहिता येत नाही, इतकेच नव्हे तर Dyaneshwar वगैरे स्पेलिंग इंग्लिशमध्येही चुकीची लिहिली जातात. बाकी
ककट्टर लोकानां मुद्दापेश्र काना वेलाटीं व्याकरण याचीच लय काळजी
तुम्ही त्या तोतर्‍या शारुकचे अनुयायी आहात हा साक्षात्कार झाला आत्ताच. 'ककट्टर' वगैरे वाचून. ब्रिगेडी शाळेत मराठी शिकवतात की बाहुबली पिच्चरमधली कालकेय दैत्यांची किलिकिली भाषा?

In reply to by raudransh_27

म्हणूनच तुम्ही स्कॅन कॉपी द्या सांगतेय. वर कपिलमुनीनी उतारा दिलाय तो अजून १० वेळा वाचा. मग आता अजून कुठे आक्षेपार्ह काही म्हणताय त्याची स्कॅन कॉपी इथे द्या. तुमच्या म्हणण्याला आधार म्हणून काय ते पुरावे दिलेत तर इथे तुमचे नक्कीच ऐकून घेऊ. मात्र हातात कीबोर्ड आहे म्हणून टाईप करत सुटायला मिपा हे कोणाचेही मुखपत्र नाही. मी अँड्रॉईड आणि विंडोज मोबाईल, टॅब, लॅपटॉप, पीसी सगळ्या प्रकारांच्या कीबोर्डवरून मिपावर फार काय इतर आंतरजालावर लिहिते. मला कधीही कोणत्याही अक्षराला प्रॉब्लेम येत नाही. मिपावर अडचण येण्याचा तर सवालच नाही. मिपावर लिहिण्यापूर्वी इथे जी मदत पाने आहेत ती आधी वाचा आणि मगच टाईप करायला सुरुवात करा.

In reply to by raudransh_27

हे असले फालतु प्रतिसाद द्यायला वेळ आहे. पुरावे द्यायला नाही ना? शुद्धलेखन सोडा, स्वतःचा लेख (किंवा जे काही लिहायचा प्रयत्न केलाय ते..) वाचलात का एकदातरी? कळतंय का काय लिहीलय नक्की?

In reply to by raudransh_27

@प्रथमत आपण अनमोल विचार मांडण्यापुर्वी (अजुन) एकदा वाचावे ही विनंती..शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही.. >>> तुम्हाला आलेल्या अ'काली दीर्घजीवी मतिमंदत्वाच्या तळातून अकलेचे अंकूर फुटून तुमच्या बुद्धिवादाला.. प्रतिभा संपन्नतेची झळाळी येवो ..असे अशुभाशिष देऊन..मी माझे ते वीस शब्द संपवितो.

In reply to by raudransh_27

काय आहे माहित्ये का, आपल्याला येत नाही ती गोष्ट महत्वाचीच नाही असा आग्रही युक्तिवाद करणारे अनेक जण दिसू लागलेत आता. कान्हा, मात्रा, वेलांटी (हेही शब्द तुम्ही नीट लिहिलेले नाहीत) हे सगळं महत्वाचं आहेच मराठी भाषेत. चव्हाणातला 'च' हवाच का? असं विचारल्यावर मंचावरच्या त्या नेत्याची वाचा खुंटली होती. तसंच आहे हे. तुम्हाला येत नसेल तर मिपावर मदत करायला अनेक जण आहेत. पण माझंच बरोबर असं म्हणणं असेल तर मग अनेकच जण आहेत. :) बाकी तुमचं ज्ञान (बघा हं ज्ञ लिहिला) अगाध आहे !

In reply to by raudransh_27

शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही..
आधी जाऊन मराठीची शिकवणी लावा. माझ्याकडे आलात तरी चालेल. तुम्हाला वडील या शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे? आणि तुमची शिकवणी पूर्ण झाली का रा.रा. खेडेकर आणि रा.रा. साळुंखेंना तुमच्याकडे शिकवणी लावायला लावा. आयला कुठून कुठून येतात देव जाणे!

In reply to by raudransh_27

माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात: "ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!" दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय? दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात: "क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल. मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)
संजय सोनवणी यांच्या ब्लॉग पोस्टमधून साभार

In reply to by कपिलमुनी

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"
हं आत्ता कळलं. मग राग येणारच ना हो या रडत राऊत ना! यांच्या सारख्यांच्या बद्दलच तर लिहिलंय पुरंदरेंनी!! "स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही" म्हटल्यावर यांची ट्यूब पेटली.. स्वतःबद्दलच लिहिलंय म्हणून.

In reply to by raudransh_27

ध्याच्या वादात आक्षेपार्ह मानले गेलेले अंतराने येणारे वाक्य म्हणजे, "ब-या, नीटस, गो-या जातीवंत कुणबिणी" बाजारांत सहज ’पंचविस होनांस पांच’ विकत मिळत होत्या." हे होय. कुणबी आणि मराठे एकच असल्याने हे विधान मराठा पुरुषांची बदनामी करणारे आहे असे म्हटले जाते. वरकरणी पाहता ते खरेही वाटेल. अर्थात या वाक्याआधीचे ब्राह्मणांबाबतचे उद्वेग कसे व्यक्त झाले आहेत हे आपण थोडक्यात पाहिले. १६३० च्या प्रलयंकारी दुष्काळात ’पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया, स्वता:ला गुलाम म्हणून विकून घेत. आया बालकांची विक्री करीत." असे हृदयद्रावक वर्णण डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवले आहे. या दुष्काळाची वर्णने तुकाराम महाराज, रामदास, परमानंद यांनीसुद्धा करुन ठेवली आहेत. तुकोबांचे तर नुसते दिवाळे निघाले नाही तर पत्नी व मुलही गमवावे लागले. या दु:ष्काळात होनाजी निबरे नांवाच्या गृहस्थाने घर व जमीन २५ होनास विकली असे पत्रसारसंग्रह ३२९ मद्धे नमुद आहे. अशी त्याकाळातील अगणित उदाहरणे आहेत. इअतकी कि माणुस मृत माणसाला खात होता. (वरील माहितीसाठी संदर्भ: मराठे आणि महाराष्ट्र, ले. अ. रा. कुलकर्णी, पान १०८ ते ११६) आणि पुरंदरेंचे विवेचन नेमके १६२९-३० या काळातील स्थितीचे आहे. दुष्काळातील आहे. पुरंदरेंनी कुणबिण शब्द वापरला आहे आणि कुणब्याची बायको अथवा मुलगी म्हणजे कुणबीण असा अर्थ येथे घेतला गेलेला दिसतो. त्यामुळे वितंड आहे. मराठा म्हणजे कुणबी हे सध्या समीकरण तेजीत असल्याने पुरंदरेंनी मराठा बायकांची बदनामी केली असा समज होने स्वाभाविक आहे. पण वास्तव काय आहे? कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको-पोर तर बटकी कोण होती? ती कोणाची बायको-पोर होती? कुणबीण हा रखेली या शब्दाचा प्रतिशब्द होता. कुणब्याची बायको म्हणून तत्कालीन स्थितीत तो अभिप्रेतही नव्हता. याचे शिवकालापासुन, खुद्द शिअवरायांच्या पत्रांतील पुराव्वे उपलब्ध आहेत. बटकी म्हणजे घरकामासाठी राबणारी. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको/पोर नव्हे तर एखाद्या माणसाची विक्रय झालेली शय्यासोबतीन. भावीण या शब्दाचा अर्थ भावेंची बायको असा होत नाही तसेच हे आहे. दोन्ही सर्वस्वी वेगळ्या संज्ञा आहेत. यात लग्न अभिप्रेत नाही. ब्रिटिश काळ येईपर्यंत, स्त्रीयांची खरेदी/विक्री थांबेपर्यंत ही प्रथा होती. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन रोमन व बायबल काळापासुन चालत आलेल्या ल्यटिन "Concubine" या शब्दाचा तो मराठी अपभ्रंश आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ आहे "a woman who cohabits with a man to whom she is not legally married, especially one regarded as socially or sexually subservient; mistress.". थोडक्यात ठेवलेली बाई. मग ती विकत घेतलेली असेल वा ती स्वेच्छेने राहत असेल. याचा कुणबी जातीशी संबंध जोडणारे व कुणबी समाजाची स्वत:हुन बदनामी करुन घेणारे किती मुर्ख? जसा बटकीन या शब्दाचा जातीय अर्थ नाही तसाच कुणबिण या शब्दाचाही जातीय अर्थ नाही. कुणबिणी आणि बटकिणींचे क्रय-विक्रय हा महाराष्ट्रातील (अन्यत्र वेगळ्या नांवांनी) सुरु असलेला फार जुना व्यवसाय आहे. पेशवे काळातही शनिवार वाड्यासमोर कुणबिण-बटकिणींचे बाजार भरत व पाच रुपये ते ऐंशी रुपये दराने त्यांची खरेदी होत असे अशा नोंदी उपलब्ध आहेत. आणि या विकावु स्त्रीया कुणबाऊ समाजाच्या असत असे नव्हे तर बव्हंशी सर्वच जातीतील असत. अशा सर्व स्त्रीयांना कुणबीन अशी संज्ञा होती. यामद्धे एकजातीयता शोधणे अनैतिहासिक आहे. किंबहुना हा वेगळाच वर्ग होता ज्यात कोणत्याही जात/धर्माची स्त्री असु शके.

In reply to by कपिलमुनी

आम्ही आपले लेखकाकडे उतारे मागतोय, का की तो निदान त्या निमित्ताने तरी तिथे काय लिहिलंय ते वाचेल! आणि तू दु.दु. कुठला! सरळ अशी हवा काढून टाकतोस?

In reply to by कपिलमुनी

कुणबीण हा शब्द Concubine वरून आलाय असे म्हणण्यास काहीही पुरावा नाही. कुणबीण, कसबीण असे शब्द पूर्वीच्या काळी वापरात होते. जसे सर्व युरोपियन फॉरेनर लोकांना फिरंगी म्हटले जायचे त्यातलाच हा प्रकार आहे. फिरंगी हा शब्द अरबी-फारसी असून त्याचा मूळ अर्थ फ्रँकिश टोळ्यांमधील लोक, फ्रँक असा आहे. ते म्हणजेच आजच्या फ्रेंचांचे पूर्वज होत. फ्रँक शब्दाचाच तो अपभ्रंश आहे. तोच प्रकार कुणबीण या शब्दाचाही आहे. साधारण नीचजातीतली रखेल स्त्री असा त्याचा अर्थ आहे. निव्वळ उच्चारसाधर्म्यामुळे तसे कनेक्शन लावण्यात कै अर्थ नाय.

In reply to by बॅटमॅन

विनालग्न एखाद्या संग करणारी "कुणबीण" हा शब्द "कुळहीन/कुलहीन" (कुल्टा) या शब्दाशी साधर्म्य दाखवतो ना ? (एक सहज विचार … विदा नाही )

In reply to by बॅटमॅन

तोच प्रकार कुणबीण या शब्दाचाही आहे. साधारण नीचजातीतली रखेल स्त्री असा त्याचा अर्थ आहे.
सोनवणींनी बघुधा पु.ना. कनेक्शन लावले असावे. बाकी या अर्थानुसार तो शब्द योग्य आहे . पूर्वी मराठा समाज कुणबी समाजासोबत लग्न व्यवहार टाळायचा. पण सध्या कुणबी समाजास आरक्षण आहे त्यामुळे बरेचजण कुणबी जात लावून घेताना दिसत आहेत. शिक्षण नोकरीसाठी कुणबी आणि व्यवहारासाठी ९६ कुळी असा दुटप्पीपणा काही स्वार्थी लोक करत आहेत. त्यामुळे अचानक ब्रिगेडी लोकांना कुणबीण हा शब्द आक्षेपार्ह वाटू लागला आहे. बाकी आई किंवा बहीणी पोटच्या मुली ,मुले विकणे / मारणे तेव्हाही चालू होते आणि आत्ताही सर्वत्र चालू आहे.

कमाल आहे ब्वॉ! एवढे उच्चशिक्षित(?) लोक सुद्धा असे अडाण्यासारखे कसे काय वागू शकतात याचे आश्चर्य वाटतेय.

खालील शब्दांचे 100 वेळेस शुद्धलेखन करा.बाकीचा लेख नंतर पाहु. पुञ = पुत्र, क्षञिय = क्षत्रिय, छञपती = छत्रपती, मिञ = मित्र, पञे = पत्रे, नीट लिहायच. वर अभ्या..ने शब्द दिलाय त्याप्रमाणे 5 वेळेस येईन तासायला.

In reply to by जेपी

इतक्या ठिकाणी 'प्रतिष्ठाण' असे लिहिलेले वाचुन तोच योग्य शब्द आणी 'प्रतिष्ठान' हा चुकीचा असे वाटु लागलेला...

In reply to by प्यारे१

सहमत. इतकेच नव्हे तर बरेचजण ब्रह्म चा उच्चार ब्रम्ह, चिह्न चा उच्चार चिन्ह, प्रह्लाद चा उच्चार प्रल्हाद असे करतात. ह्रस्व चा उच्चार र्‍हस्व असा करणे हे अजूनेक उदा.

In reply to by जेपी

दिक्शनरी छापायलाय काय बे ! (सुशिक्तानी ते डि क्शनरी असे वाचावे.....भेंडी हाय काय त्यात) तुम्ही चालु द्याहो, ह्या टारगटांकडे ल्कश नका देऊ.

लोकांना काय मिळतं जात-पातीच्या राजकारणावरून रिकाम्या चर्चा करून? परत म्हणतात आपला देश प्रगती का करत नाही, तेवढा वेळ इतर विधायक कामांना दिला तर तेही होईल. जग कुठे चाललंय,आपण कुठे आहोत,काय करतोय, कोणालाच हे प्रश्न का पडत नाहीत.

प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत
हे वाक्य नेमके कोणी कोणास म्हटले? कोणत्या प्रसंगी? कोणत्या पुस्तकात? कोणत्या संदर्भात? कोणत्या विषयाबद्दल बोलताना?

In reply to by पैसा

त्र अक्षर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ञ असं लिहिलंय. त्या शब्दांचा उच्चार करताना जीभ वळून गेली. हे नक्की मी समजते तेच शब्द आहेत का दुसर्‍या कुठच्या भाषेतले शब्द आहेत?

तुम्ही काय लिवलंय ते तुम्हाला तरी कळलं आहे अशी तुमची खात्री आहे का ? असल्यास आपली धन्य __/\__

ज्यांना छत्रपती हा शब्द धड शुद्ध लिहिता येत नाही त्यांची बडबड ती काय सीरियसलि घ्यायची? हे लोक एरवी साडेतीन टक्केवाल्यांची भाषा म्हणून संस्कृतला शिव्याच घालतात. कशाला सांगता मग छात्या पुढे करकरून संभाजीराजांनी बुधभूषणम् हे संस्कृत काव्य लिहिल्याचे ???? यातल्या एकालाही धड संस्कॄत हा शब्दही लिहिता येईल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. जशी शुद्धलेखनाची बोंब आहे तशीच विचारशुद्धता, तर्कशुद्धतेचीही बोंबच आहे. एकुणात शुद्धता या संकल्पनेशीच ज्यांचे वैर आहे त्यांना काय सीरियसलि घ्यायचे. महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या या टिनपाटांना त्यांची जागा जनतेने दाखवूनच दिली पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

संस्कृतचा उदोउदो करणार्यांना तरी कुठे संस्कृत येते? चार पाच आरत्या,दोन तीन श्लोक पाठ असणारे संस्कृत संस्कृत करतात तेव्हा खूप. गंमत वाटते.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

एतदपि सत्यं किन्तु "अकरणान्मन्दकरणं श्रेयः" इति उक्ति: श्रुता किल भवता? अज्ञानगर्वस्तु ब्रिगेडानुयायिनां स्थायीभावोऽस्तीति मे मति:| भवतोऽज्ञानं दॄष्ट्वा रञ्जितोऽस्मि मुहुर्मुहु:| भवान्सदैवास्मान् रञ्जयतु | अपि च- ये जना: लेखने 'त्र-ञ-'यो: अपि पार्थक्यं न जानन्ति तान्प्रति को यत्नः???? :)

In reply to by बॅटमॅन

आमचं संस्क्रुत कच्चंय मनुन आमी संस्क्रुतचा उदो उदो नाय करत, पण वरच्या पर्तेसादाचा आमच्या मते येकच अर्थ हायः . . . "ह्या ब्याट्याला कोणीतरी धरून हाणा रे"

In reply to by बॅटमॅन

साधु: साधु:| भो: वल्गुदशास्त्री महोदय, सत्यं अवदत् त्वया|

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन ह्यांचा सिक्सार ... चेंडू पार स्टेडीअमच्या बाहेर!!! बाकी संस्कृत न शिकता आल्याची अजूनही खंत असल्याचे प्रामाणिकपणे कबूल! आंतरजालावर कुठेशिक आहे का शिकण्याची सोय?

In reply to by बॅटमॅन

और ये लगाया बॅटमॅनने छक्का, फुलथ्रॉटल जिनियस हो गये हक्का बक्का.. फुलथ्रॉटल जिनियस यांचा चुकीच्या माणसाला टोला हाणायचा प्रयत्न मस्त फसला आहे.. बॅटमॅन भौ _/\_

In reply to by बॅटमॅन

दादा कशाला एवढा त्रास करून घेतोय . . (ते सगळं टंकायचा ) ह्या यडझव्या डी ग्रेडींची बौद्धिक लायकी नाही , हे सगळं समजायची . किंवा एकुणात काहीही समजून घ्यायची . पण असो . हा सिक्सर पार अगदी गावाच्या बाहेर मारलेला आहे . दंडवत

मिपावर सगळे 'भट'च आहेत कि काय? बहुतेक प्रतिक्रिया वाचून तसेच वाटते. (भट=विद्वान,असे म्हणायचे आहे, कृपया चिडू नका)

In reply to by प्रदीप साळुंखे

भट=विद्वान,असे म्हणायचे आहे >> मला चुकून महेश भट का आठवले कुणास ठाऊक.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

साहजिकच आहे.तुम्हाला महेश भट च आठवणार.

In reply to by प्रदीप साळुंखे

साळुंखे, मी बहुजन समाजातला आहे. माझ्या एका चुलत बहिणीनं मराठा मुलाशी आणि एका मावसबहिणीनं ब्राह्मण मुलाशी लग्न केलंय. सगळे व्यवस्थित जा ये खा पि करतात. तुमचा नक्की काय आक्षेप आहे? आपण भट म्हणजे विद्वान या अर्थानं नाही म्हणालात हे तुम्हालाही माहिती आहे. वेळ प्रसंगी मी आमच्या जातीला, मराठ्यांना आणि बामणाना पण श्या देतो. खातो पण. भरपूर मुस्लिम, अनेक आणखी जातीतले धर्मातलेही मित्र मैत्रिणी आहेत. तुमचा नक्की काय आक्षेप आहे????

In reply to by प्यारे१

ओ.ह. माफ करा आ.ह. यांचे नक्की कोण आहेत त्याची चव्कशी करा जरा !!! बाकी रुमाल टाकून आहे. चार जागा पकडून ठेवणे शेंगा-कणसं घेऊन येतो. चिर्कूट चिमण मेंबर

In reply to by प्रदीप साळुंखे

मग अजून कोणी आठवायला हवे होते?