सोडणं अत्यावश्यक आहे का? तु कुठे कमी पडतो आहेस ह्याचा विचार केला आहेस का? अगदी सोडायचचं असेल तर मग बी.एस.सी. बी.सी.एस. हे मेनस्ट्रीम ऑप्शन आहेत. तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?
जी मंडळी बॅकलॉग क्लिअर करतात तीही आपल्यासारखीच हाडामासाचीच माणसं असतात. असाच विचार करून मी माझे एमसीए वर्ष वाया न घालवता चांगल्या गुणांनी वेळेत पूर्ण केले.
P&C (Probablilities & Combinatories) हा दुसर्या सेमचा पेपर शेवटून दुसर्या सेमला क्लिअर केला (४थ्या प्रयत्नात).
माझ्या शिक्षण प्रवासाबाबत येथे लिहिले आहे.
माझ्याहून अधिक अवलिया माणसांची उदाहरणे वाचण्यासाठी माझ्या व उगा काहितरीच यांच्या खरडवह्यांमध्ये डोकवावे.
दत्ताजी शिंदे या शूर मराठा सरदाराचे 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे मृत्यूसमयीचे उद्गार हे आम्हा एमसीएच्या विद्यार्थ्यांचे अखंड प्रेरणास्थान होते.
एमसीएला प्रवेश घेतल्यावर कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी तिथल्या होस्टेलला पोचलो तर बातमी कळली की आमच्या सिनियर बॅचने दुसर्या सेम मध्ये शून्य टक्के निकाल लावला आहे. त्या दिवसापासून पुढची तीन वर्षे मी अन माझे बहुतांश सहाध्यायी प्रेशर कुकरमधले आयुष्य जगलो.
एमसीएला सहा सेमिस्टर असतात मार्कलिस्टमध्ये दर वेळी ६ विषयांचे गुण अॅड होत राहतात. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट थेट सहाव्या (शेवटच्याच सेमिस्टरला) पाहायला मिळाली.
Statistics (विशेषकरून वर उल्लेखलेला P&C हा विषय) सुरुवातीला खूप अवघड वाटत होते. दोन अटेम्प्टस झाल्यावर कळू लागले तेव्हा तिसर्या वेळी फॉर्मुले पाठ नसल्याने गचकलो. चौथ्या वेळी उत्तरपत्रिका मिळाल्यावर महत्प्रयासाने पाठ केलेले फॉर्मुले शेवटच्या रफ पानावर लिहून काढले होते. जेणे करून प्रश्न सोडवताना गोंधळ उडणार नाही.
नववीपासून पाठांतर जमत नसल्याने बरेच शैक्षणिक नुकसान झाले फक्त वर्ष वाया गेले नव्हते. स्वतःच्या आळसावर अन भितीवर मात करून आव्हानाला थेट सामोरे गेल्यानेच तावून सुलाखून बाहेर पडलो.
धाग्यात खूपच त्रोटक पणे लिहिले असल्याने नेमकेपणाने काही सांगू शकत नाही. पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. आव्हानाचा यशस्वीपणे सामना केल्यास आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाची पुंजी जमा होते.
नमस्कार जयंत.
हा माझा स्वानुभव.
वर्ष २००२-२००३. मी बारावीपर्यंत स्वतःला तथाकथित हुशार समजणारा मुलगा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात नापास झालो.
पहिली सेम - ५ पैकी ५ विषयात फेल. मेकॅनिक्स - ५ मार्क, बीईई - १० मार्क, अप्लाईड सायन्स - ३४, मॅथ्स - ३१, सी प्रोग्रामिंग - २७.
दुसर्या सेमला १० पेपर दिले आणि ४ च क्लिअर झाले. ५ केटी रुलमुळे वर्ष वाया जाणार हे निश्चित झाले.
घरी आलो. बराच विचार करुन बापाला सांगितले की मी शिक्षण सोडणार. कांदे-बटाटे विकणारा अड्त्या होईन किंवा दुधाची डेअरी काढेन.
बापाचा सल्ला - आणखीन एक वर्ष कसून प्रयत्न कर. नाहीच जमलं तर बिनधास्त पणे बटाटे विक. मी अडवणार नाही.
मी सल्ला ऐकला आणि २००७ मधे प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो. आमच्या कॉलेजमधे कँपस इंटर्व्हू होत नसत. तरीही २३ ऑगस्टला निकाल लागला आणि २७ ऑगस्टला नोकरी मिळालीसुद्धा.
गेल्या ७-८ वर्षात बर्यापैकी व्यावसायिक यश मिळवले आहे. पुढचे ठाउक नाही.
माझ्या माहितीत २-३ ड्रॉप लागूनदेखील नंतर प्रचंड यश मिळवल्याची उदाहरणे आहेत.
आणखीनेक प्रश्न स्वतःलाच विचार. हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलास आणि तिथेही अपयश आले तर तेही सोडून देणार का ?
अप्स अॅन्ड डाउन्स इज पार्ट ऑफ द गेम.
थोड्याफार फरकाने माझेपण अप्पा साहेबंसारखेच झाले. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट शेवटल्या वर्षाला पाहायला मिळाली. फक्त मला जास्तीचे वर्ष लागले नाही आणि मी engineering सोडण्याचा कधीच विचार केला नाही. गेल्या ७-८ वर्षात मी सुद्धा बर्यापैकी प्रगती केली आहे.
दुसरी काही आवड असल्यास engineering जरूर सोडावे. पण जमत नाही हा विचार करून सोडू नये. एक नक्की सांगेल की engineering पूर्ण केल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठे न कुठे नोकरी जरूर मिळते.
मी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन मग संगणक व्यवस्थापन घेतले उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी असेच खूप जड गेले हे शिक्षण आणि त्याबरोबर विषय राहणे इत्यादी या सर्व गोष्टी झाल्या. शेवटी असा विचार केला की हे काही रॉकेट सायन्स नव्हे इतरांना जमू शकते आपल्यालाही जमेल. मग मात्र नेटाने अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण केला. आता मा. त क्षेत्रात चांगला कामाचा अनुभव गाठीशी आहे.
सेम माझ्या सारखे झाले आहे. मी पन 2013 ल 12 वी दिली . physics chemestry maths काही येत नव्हते. पुन्हा fy डिप्लोमा घेतला. जिद्दीने अभ्यास करून all clear झालो. आज result लागला 80% पडले शिवाय प्रथम क्रमांक... जिद्द नको सोडू भाऊ तुला काय अडचण आहे ते सांग
या जगात पडला नाही असा माणूस नाही. जो पडल्यावर उठून उभा राहतो, कपड्यांवरची माती झटकतो आणि परत धावू लागतो तो यशस्वी होतो.
इंजिनियरींगची अजिबात आवड नाही, पण घरच्यांच्या अथवा मित्रांच्या दबावाने इंजिनियरींग गेला असशील तर जरूर वाट बदल... पण नविन आवडती वाट कोणती ते आधी ठरवूनच, आणि त्या वाटेवरच्या प्रवासाचा नीट आराखडा बनवून मगच तसे कर. एखाद्या चांगल्या व्यवसाय समुपदेशकाचा सल्लाही उपयोगी पडू शकेल.
माझ्या मते एखाद वेळी नापास झालो म्हणुन ईंजिनीअरींग सोडणारा माणुस फक्त खालील व्यवसायांसारखे काहीतरी करु शकतो.
तुम्हाला बाकी काहीच जमणार नाही.
उगाच वरचे फुकटचे सल्ले ऐकुन वेळ वाया घालवू नका.
१. वडापावची गाडी टाकणे,
२. रेल्वे स्टेशन,एस्टी स्टँडवर हमाली करणे,
३. रस्त्यावर / देवळाजवळा भिक मागणे,
४. जुना पुराणा डबा बाटली भंगारची हतगाडी लावणे,
५. कचराकुंड्यांमधल प्लॅस्टीक किंवा लोखंडाच्या वस्तु गोळा करुन भंगारवाल्यांना विकणे,
६. हातभट्टी बनवणे व विकणे, दारुचे फुगे पोचवणे
७. एखाद्या नगरसेवकाचा पंटर म्हणुन हप्ते गोळाकरत गावभर बोंबलत फिरणे,
८. बस रेल्वे किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे,
९. घरफोड्या करणे,
१०. रात्री बेरात्री एकट्या दुकट्या माणसाला चाकु दाखवुन लुबाडणे
११. दुचाकी मधले पेट्रोल चोरणे,
१२. रस्त्यावरुन चालणार्या बायकांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या हिसकावणे,
१३. कारच्या काचा फोडून आतले कारटेप व इतर मौल्यवान चिजवस्तु पळवणे
१४. मार्केट यार्डातल्या सडक्या / फेकलेल्या भाज्या गोळा करुन विकणे
१५. दुध पिशवीतले दुध काढुन पाणी भरणे व पिशवी परत सील करणे
१६. सिग्नल वर गजरे / सांताक्लॉजच्या टोप्या / गुलाबाची फुले ई. विकणे
१७. सिग्नल ला उभ्या असलेली कार स्वतःच्या शर्टाने पुसणे व मग कारवाल्या कडे दिनवाणे बघत त्याच्या काचेवर टकटक करुन भुक लागली अशा खुणा करत पैसे मागणे.
१८. एखाद्या प्रसिध्द देवळाच्या बाहेर उभे राहुन जाणार्या येणार्यांना गंध / टिळा इ. लावणे व त्यांच्या समोर थाळी वाजवणे.
१९. आळंदी, पंढरपुर, नाशिक येथे रहात असलात तर नदिमधे चाळणी टाकत नदीमधली वाळु चाळणे व लोकांनी नदित टाकलेले पैसे गोळा करणे.
२०. रेल्वे मधे डोळ्याला काळा गॉगल लावुन हातात लाल पांढरी काठी घेउन मान वाकडी करत "इट्ट्ला ऑज्युब तुजे सॉरकॉर" अशी गाणी म्हणत फिरणे
२१. वरचे काहीच जमले नाही तर लग्न करणे. बायकोला कामाला लावणे व तिच्या पैशाने दारु पिउन तिला रोज शिवीगाळ व मारहाण करणे.
तज्ञ मिपाकर या यादित भर घालतीलच.
पैजारबुवा,
नापास होणार्यास हो ईतके मार्ग उपलब्ध आहेत हे बघुन थक्क झालो !!!
आमच्या वेळी पिताश्रींचे जोडे खाणे आणि चूपचाप परत जोमाने अभ्यासाला लागणे हाच एक पर्याय होता.
दुसर्यांदा नापास झाल्यावर पिताश्रींनी पार्श्वभागावर लत्ताप्रहार करुन पर्याय क्र. 2 या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले असते. या भीतीनेच आम्ही नापास होऊ शकलो नाही.
एकुण काय हल्लीची पिढी भाग्यवान आहे.......
अजून काही करिअर मार्गदर्शन:
-सोसायट्यांचे पाण्याचे मिटर चोरणे.
-गटारांवरची लोखंडी झाकणं चोरुन विकणे.
-कारचा लोगो पळवणे.यात चहापाणी बिडीकाडी सुटेल.
-टोलनाक्यावर उभे राहुन पळणार्या गाड्या अडवणे.
-सिग्नलवर अफू घातलेले मूल घेऊन उभे राहाणे.
-सोनाराच्या दुकानाबाहेरच्या गटारात चाळणी घेऊन काहीतरी शोधणे.
-कच-याच्या घंटागाडीवर राजाच्या ऐटीत कच-यावर बसुन गावभर फिरणे.
पैजारबुवा,
हा प्रतिसाद पटला नाही. धागाकर्त्यासारखे स्वतःच्या अपयशाबद्दल त्यातून जात असताना लिहायचे धाडस फार कमी लोक दाखवू शकतात. त्याने मदतच मागितली आहे काही वाईट काम केलेले नाही.
नर्मविनोदी शैलीने एखाद्याची थोडीफार खेचणे समजू शकतो. पण हे म्हणजे अतीच झाले.
माझा प्रतिसाद जर तुम्हाला विनोदी वगेरे वाटला असेल तर ते मा़झे अपयश आहे हे मी कबुल करतो.
सदर प्रतिसाद हा लेखकाची खेचण्यासाठी दिलेला नसून त्याची कानउघाडणी करण्यासाठीच लिहीला होता. माझ्या प्रतिसादाच्या प्रत्येक वाक्यात उपरोध / उपहास ठासून भरलेला आहे.
अशा प्रकारे जाहिर पणे मार्गदर्शन मागण्याचा प्रकार म्हणजे केवळ सहानुभूती मिळवण्या साठी केलेला एक प्रयत्न आहे.
इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते, हे लेखकाला माहित नव्हते असे समजणे फारच बाळबोध ठरेल. याउपरही पहिल्याच अपयशानंतर जर लेखक हातपाय गाळून शाखा बदलायचा विचार करत असेल तर अशा माणसाला काय बरे सल्ला द्यावा?
अशांना दोन थपडा देउन परत अभ्यासाला लावणे गरजेचे असते आणि मी माझ्या प्रतिसादामधून तोच प्रयत्न केला आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते.
(टवाऴया कुठे कराव्या याची जाणिव असलेला) पैजारबुवा,
जे काही लिहिले होते ते थोडक्यात अन प्रतिकात्मक स्वरूपात लिहायला हवे होते असे म्हणायचे होते.
ते नेमकेपणाने सांगू शकलो नाही हे माझे अपयश.
इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड दिल्यामुळे माणसाला जो आत्मविश्वास मिळतो तो भविष्यातल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी फारच मोलाच असतो याबाबत सहमत.
अजुनही कामाच्या ठिकाणी प्रथमदर्शनी अत्यंत क्लिष्ट वाटणारी फंक्श्नॅलिटी कोडिंगद्वारे इंप्लिमेंट करायची असते तेव्हा चार अटेम्प्ट मध्ये आपण P&C क्लिअर करू शकतो तर ही गोष्टही नक्कीच करू शकतो हा आत्मविश्वास बळ देतो.
- शिक्षणाने इंजिनिअर नसलेला रंगा
अच्छा तर जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य ह्याची इतर कुठल्याही क्षेत्रातल्या पदवीधराने परिक्षा दिलेली नसते. तुमचे विधान जरा चमत्कारिक नाही का वाटत?
असो.
बाकी इंजिनीअर्स त्यांच्या 'इंजिनीअरींग'बद्दल फारच म्हणजे फारच 'टच्ची' असतात, हा अनुभव आहे.. आणि हेच लोक '४०ची किंमत फक्त एक इंजिनीअरच जाणू शकतो' वाला तो व्हॉट्सअॅपवरचा जोक फिरवत असतात, हेपण एक निरीक्षण..
४० मार्क की किमत आम्हालाही चांगलीच ठाऊक आहे.
आमचेही पासिंग मार्क्स ४०च असायचे पण ते ८० मार्कांच्या पेपरात. केस स्टडीजचे प्रश्न असलेल्या पेपरमध्ये ३६ मार्क मिळून बॅक आला की खूप वैताग वाटायचा. माझ्या एका अनुभवात दुसर्या प्रयत्नात पहिल्या वेळ इतका चांगला न सोडवूनही ४४ मार्क्स मिळाले होते.
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. त्यामुळे इतक्या सार्या काहिश्या कुजकट वाटणार्या प्रतिसादांचं काही वाटलं नाही. :)
रंगाभाऊ, हा प्रतिसाद व्यक्तिशः तुम्हाला नाही. उपप्रतिसाद देण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचं फक्त शेपुट पकडलंय.
इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत.
इंजिनीयरिंग केलेल्यांना, इंजिनीअर नसणार्या इतरांनी काय केलं हे कसं समजू शकतं? की इंजिनीअरींग केल्यावर सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आपोआप येतं असं काही आहे का?
मला काहीही कुजकट टोमणे वैगेरे मारायचे नाही. आपण केलं तेच भारी, बाकीच्यांना काय सहज पदव्या मिळतात असा सूर तुमच्या, कॅप्टन आणि टकाच्या प्रतिसादात आहे. तुम्ही इंजिनीअरींगची पदवी बी.एस.सी. बीकॉम, बी.ए. लोकांशी कंपेअर करू नये असं वाटतं. याशिवाय जगात इतरही अनेक सुपरटेक्निकल क्षेत्रं आहेत जिथे तुम्ही नमूद केलेलं धैर्य चिकाटी वैगेरे सगळं लागतं आणि शिकणार्याला अंगी बाणवावं लागतं. आणि ते इंजिनीअर किंवा डॉक्टर नसतात.
मी बर्याच शहरांमधून फिरलोय. प्रत्येक शहरात राहणारा तिथला स्थानिक जो कधी शहर सोडून बाहेर गेला नाही तो आपल्या ट्रॅफिकच्या गोंधळाबद्दल हेच वाक्य म्हणतो, "इथे तुम्ही गाडी चालवली तर जगाच्या पाठीवर कुठंही चालवण्याची क्षमता तुमच्यात आहे असं समजा".
इंजिनीअर लोकांचही असंच झालंय का? ढासळणार्या धैर्याची पातळी उंचावून धरण्यासाठी असेल तर ठिक आहे. पण इतरांसोबत कंपेअर करू नका असं म्हणणं जरा अतिच होतंय.
मी प्रतिसादामधे आधीचं लिहिलं आहे की मला कुठल्याही शाखेच्या पदवीला किंवा पदविकेला तुच्छ लेखायचं नाही. प्रत्येक शाखा आपल्या विशेष कौशल्याने अर्थव्यवस्थेचा कणा मजबुत करत असते. इंजिनिअरिंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. असं क्रॉसब्रँचिंग बाकीच्या विद्याशाखांमधे कमी प्रमाणात आढळतं एवढचं म्हणायचं आहे. वाद नको.
वाद नकोच आहे. फक्त सरधोपट विधानांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
असो.
ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते.
हेच माझ्याही क्षेत्रात होतंच. किंबहुना असं नाही राहिलं तर एका झटक्यात करीअर संपतं.
दुसर्या शाखांच्या पदवीधरांना तुच्छ लेखायचा वगैरे प्रयत्न करत नाहीये कारण प्रत्येक शाखा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्या विशेष कौशल्यांनी मजबुत करत असते. पण एक गोष्ट मात्र अगदी विशेष फरकानी जाणवते ती म्हणजे "कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन मेकिंग एबिलिटी". हि आणि अॅप्टिट्युड हा इंजिनिअरिंग पदवीधरांमधे जास्त प्रमाणामधे असतो. ज्याची बाकीच्या विद्याशाखांना वेगळी तयारी करुन घ्यायला लागते तो गुण इंजिनिअरिंगमधे आपोआप विकसित होत जातो. हा फरक मिटवणेबल असतो. पण त्याला कष्टाची तयारी पाहिजे.
प्रतिक्रिया
सोडणं अत्यावश्यक आहे का? तु
हेच म्हणतो
श्रीरंगसर धन्यवाद ! माझा
का सोडतो आहेस ?
बचेंगे तो और भी लढेंगे
नमस्कार जयंत.
थोड्याफार फरकाने माझेपण अप्पा
दोघांचेही
जर तुम्हाला इंटरेस्ट असेल
तु उत्तम कन्सल्टंट बनु शकशील.
इंजीनियरिंग सोडू नये असे वाटते.
सेम माझ्या सारखे झाले आहे. मी
अभिनंदन लालगरूड,
रोज प्रयत्न करतोय ... :-D
बाबा धागा टाकुन गायबलाय!!
तोच विचार करतोय...
एक ओटो रिपेअरिंगचा कोर्स करा
कार कंपनीत NCTVT दिड वर्षाचा
या जगात पडला नाही असा माणूस
+११११
लिंक दिल्याबद्दल
वाटा काय बर्याच आहेत.
थक्क झालो !
+१
ज्ञानोबा - पहीली २ कामे
_/\_
अजून काही करिअर मार्गदर्शन:
हे राम
सहमत..
क्षमा करा जोशी सर....
तसे नाही हो
इंजिनिअरिंग म्हणजे तेथे
अच्छा तर जिद्द, चिकाटी,कष्ट
you can't compare engineering
हा तुमचा भ्रम आहे.
ओक्के..
४० मार्क की किमत आप क्या जानो
हे बरोबर..
४० मार्क की किमत
इंजिनीयरींग करणं काय असतं हे
सहमत. त्यांची शेपटी आमच्या
हा हा हा
इंजिनीयरींग करणं काय असतं हे
मी प्रतिसादामधे आधीचं लिहिलं
वाद नकोच आहे. फक्त सरधोपट
दुसर्या शाखांच्या पदवीधरांना
पैजारबुवा प्रतिसाद आवडला नाही
ते हो ते राहिले.....
अगा अयायायायायाया ...
हे काय असतं हो? डोक्यात काही