काही जलरंगातील चित्रे.

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in मिपा कलादालन
14 May 2015 - 12:20 pm

या धाग्यात आपण स्केच पेन आणि वॉटर कलर पेन्सिलने रेखाटलेली चित्रे पाहीलीत.

सध्या जलरंगात रंगविलेली चित्रे काढ्ण्यास सुरुवात केली आहेत. जलरंग हे माध्यम सोपे नाही (असे मला जाणवते). खुप सराव लागतो. तर सध्या फक्त प्रख्यात जलरंग चित्रकार मुळीक यांची कॉपी . सराव झाल्यानंतर स्वकला :-)

konkan

konkan2

konkan3

प्रतिक्रिया

अमृत's picture

14 May 2015 - 1:53 pm | अमृत

मला चित्रकलेत विशेष गती नाही पण तरी माझी नोंद. १ल्या चित्रात घरच्या भींतीचा कोपरा कुठे आहे हे स्पष्ट होत नाही कदचीत त्यामुळेच छताचा आणि भींतींचा मेळ कळून येत नाही. ३र्‍या चित्रातील बैल मात्र खूप आवडलेत. अजून येऊ द्या.

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 2:24 pm | बबन ताम्बे

जनरली मुळीकांच्या चित्रांमधे डीटेल्स नसतात तर आभास निर्माण केलेला असतो. पण अर्थातच जी काही उणीव दिसते आहे चित्रात तो माझा दोष आहे. जलरंगावर माझा अजून हात बसलेला नाही.

सानिकास्वप्निल's picture

14 May 2015 - 2:02 pm | सानिकास्वप्निल

छान आहेत सर्व चित्रे, क्रः२ आणि क्रः३ विषेश आवडले.

आदूबाळ's picture

14 May 2015 - 2:23 pm | आदूबाळ

छान आली आहेत. अगदी मुळाबरहुकूम.

दुसर्‍या आणि तिसर्‍याचा फोटो नीट काढता येईल का? पहिल्यात जसं कागदाचं टेक्शचर दिसतंय तसं दुसर्‍या आणि तिसर्‍यात दिसत नाहीये.

बादवे - कागद कोणता वापरता? मॅट फिनिश का?

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 2:28 pm | बबन ताम्बे

हँडमेड पेपर वापरलाय.

दुस-या आणि तिस-या फोटोच्या कागद आणि कॅमेरा यामधे काच आहे :-) म्हणून टेक्श्चर दिसत नाहिये.

चौकटराजा's picture

14 May 2015 - 2:48 pm | चौकटराजा

मी मिलिंद चा पंखा आहे.आपका प्रयत्न मस्त.

मस्त. मला इथवर पोचायला अजून बराच सराव करावा लागणार असल्याची जाणीव झाली.

प्यारे१'s picture

14 May 2015 - 3:44 pm | प्यारे१

चित्रं आवडली.

फेसबुक वर विशाल वाडये https://www.facebook.com/vwadaye?fref=ts यांची चित्रं पहा.
अफाट आहेत.

जागु's picture

14 May 2015 - 4:00 pm | जागु

छान चित्रे.

पियुशा's picture

14 May 2015 - 4:03 pm | पियुशा

व्वा मस्त !

एस's picture

14 May 2015 - 8:41 pm | एस

खूप छान चित्रे!

मलाही मिलिंद मुळीकांची चित्रे किंबहुना त्यांची जोरकस शैली फार आवडते. कुंचल्याच्या फटकार्‍यांवरील त्यांची हुकुमत पाहण्यासारखी आहेच. जलरंग आणि चित्राचा हातकागद यांच्यातील द्वंद्व त्यांना फार चांगले समजते. मीही कधीकधी त्यांच्या प्रसिद्ध चित्रांवरून चित्रे काढतो आणि अजून काय सुधारणा करता येईल याचा आढावा घेतो.

त्यांच्या एका चित्रावरून केलेले माझे व्हर्जन.

Konkan_WaterColors

तसा मीही जलरंग माध्यमाचा नवशिकाच असल्याने तुम्हांला काय सांगणार म्हणा! पण या माध्यमात कॅनव्हास ला (कागदाला) फार महत्त्व असते. कागद चांगल्या दर्जाचा, किमान ३०० जीएसएम आणि चांगला पांढरास्वच्छ वापरा. आयात केलेले कागद चांगले असतात, पण ते आपल्याला परवडत नाहीत. अप्पा बळवंत चौकात त्रिमूर्ती म्हणून एक दुकान आहे. तिथे त्यांच्याच ब्रॅण्डचे कागद मिळतात. ते अ‍ॅग्रीकल्चरल कॉलेजच्या रस्त्यावर असणार्‍या शासकीय कागद कारखान्यापेक्षा चांगले असतात.

वेट-इन-वेट चा चांगला सराव करा. ब्रशच्या फटकार्‍यांमधील नजाकत सांभाळा. दोन 'वॉशेस' मध्ये कागद चांगला वाळू द्या. अजून काही सांगत बसत नाही! :-D

बबन ताम्बे's picture

15 May 2015 - 11:16 am | बबन ताम्बे

नारळाच्या झावळ्यांचे स्ट्रोक्स अप्रतिम.

चौथा कोनाडा's picture

16 May 2015 - 10:49 am | चौथा कोनाडा

एकदम झक्कास !
नारळ-माडांचा परिणाम सहीच !
बैलगाडीच्या मागील प्रकाशमिश्रीत धुक्याच्या परिणामामुळे डेप्थचा होणारा भास सुरेखच !
तुमची आणखी चित्रे येवु द्यात, स्वॅप्स,

आदूबाळ's picture

16 May 2015 - 6:15 pm | आदूबाळ

या चित्राचा आकार काय आहे?

एस's picture

18 May 2015 - 1:16 pm | एस

मला नेमकी फुटपट्टी सापडली नाही. हे चित्र मी फ्रेम करून भिंतीवर लावले आहे. अंदाजे आकार कालनिर्णयच्या कॅलेंडरएवढा आहे. उंचीला दोन बोटे कमी धरा. :-D

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा

भन्नाट!

..छान जमलीयेत.

रुपी's picture

15 May 2015 - 2:56 am | रुपी

छान!

झकासराव's picture

15 May 2015 - 11:45 am | झकासराव

वाह!!! :)

किसन शिंदे's picture

16 May 2015 - 10:28 am | किसन शिंदे

तिसरे चित्र फार आवडले. स्वॅप्स यांच्या चित्रातल्या नारळाच्या झावळ्या मस्त दिसताहेत.

चौथा कोनाडा's picture

16 May 2015 - 10:44 am | चौथा कोनाडा

सुरेख पेंटींग्ज ! दुसरे चित्र विशेष आवडले. बगीच्याने वेढलेले दुमजली घर छान !

उन्हाच्या कडाक्यात डोळ्यांना सुखावा देणारी जलरंग चित्रे मस्तच !

जलरंगांची पारदर्शकता आणी टवटवी यांची मजा काही औरच आहे.

आदिमाया's picture

16 May 2015 - 2:14 pm | आदिमाया

सर्व चित्रे खुप सुन्दर आहेत

ग्रेटथिंकर's picture

16 May 2015 - 2:47 pm | ग्रेटथिंकर

छान

छानच आहेत चित्र.@स्वॅप्स, तुमचीही जलरंगातली चित्र पहायला आवडतील.

सदस्यनाम's picture

16 May 2015 - 5:44 pm | सदस्यनाम

चित्रे छान.
बबनराव लगे रहो.
स्व्याप्स्साहेबांची चित्रकला मात्र सफाईदार. आवडली.

उमा @ मिपा's picture

17 May 2015 - 11:17 pm | उमा @ मिपा

खूप छान कला आहे तुमच्या हातात. शुभेच्छा!

स्वॅप्स, अप्रतिम! तुम्ही काढलेली आणखी चित्रं पाहण्याची उत्सुकता आहे.