ठीणगीच्या शोधात - माफीनामा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
2 Aug 2008 - 10:31 am
गाभा: 

ठिणगी च्या शोधात जरा जास्तच जड झाला. माफ कर दो. It was more of a BRAIN MAPPING HONEST TO LAST IMPULSE.लेखन चातुर्य जे माझ्याकडे नाही वापरुन त्याला सोपा करणे मला जमले नाही. मि.पा वर नवीन असल्यमुळे किति स्वातंत्र्य घ्यावे ह्या बाब्तीत साशंक होतो. आणि म्हणुनच अंडरलाइनचा वापर करुन सुटका करुन घेतली. भाग १
११वी १२वी मध्ये ९०% + मुलांचे जे पानिपत होते त्यावरचे नेहमीप्रमाणे भाश्य ठीण्गीच्या उदाहरणाला धरुन. भाग २.
कभि कभी अदिति हे फक्त एक समांतर उदाहरण.Representing Distractions. one of the thousands.आद्ल्या दिवशी च्या पालकाच्या भेटी चा परिणाम. २००७ मध्ये पहिल्या ५० त आलेल्या मुलाला ११वी त ४५%. पालकाचे दु:ख त्याच्याच शब्दात्."दहावी नंतर FREEDOM दिले मुलाने त्याचे FREE - DOOM केले. आता गवर्मेंट कोलेज नाही. आठ लाख कुठुन आणु?पेट्त्या पलित्याचि मेणबत्ति झाली
येत्या वर्शि गावकडचि जमिन, बायकोचे दागिने , प्रो. फंडावर कर्ज नावाचा बैल ह्या मेल ओपन घरात घुसणार ह्याचि नांदी झाली.
घरांतुन बाहेर पड्ल्यावर १००० हाताचा DISTRACTIONS चा हा राक्शस थोपवणे कठीण आहे . विद्यार्थी व पालक दोघांनाही.
जाता जाता : ९०% + २००८ - १३००० . मेल ओपन बद्द्ल सविस्तर नंतर.

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

2 Aug 2008 - 11:46 am | संजय अभ्यंकर

प्रभूसाहेब,

माफीनामा बाजूला ठेवा!
आपण लिहिता, ते वाचून डोके गच्च धरावेसे वाटते.

१०वीच्या मार्कांमुळे मुले बिथरतात. त्यांना पालकांनी ताळ्यावर आणणे मोठे जिकीरिचे असते.

१९७९साली V.J.T.I. डिप्लोमाला माझ्या वर्गात १०वीला बोर्डात आलेली मुले होती. १२वीला ९०%+ मार्क न मिळाल्याने नाईलाजास्तव डिप्लोमाला प्रवेश घेतलेली.
मुले हुशार होती परंतु १२वीच्या निकालांनी खचलेली होती. कालौघात बहुसंख्य सावरले.

त्यांना त्याकाळी मिळालेले मार्क, आजच्या काळात बी.ई. ला नक्की प्रवेश देवून गेले असते.
परंतु त्याकाळि मुंबईत Open Merit ला केवळ २४० जाग असत.

आपला लेख वाचुन ते दिवस आठवले. परंतु दु:खाची गोष्ट अशी कि मुलांचे हे बिथरणे (आणी क्वचीत प्रसंगी पालकांचे) आजही हे चालूच आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

2 Aug 2008 - 12:49 pm | विनायक प्रभू

प्रिय संजय,
बिथरला चंद्र पुनवेचा .
वि.प्र.

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:41 pm | विसोबा खेचर

हाही लेख समजायला अंमळ कठीणच गेला! जाऊ द्यात, प्रभूसाहेब, आपलं चालू द्या. एकंदरीत शिक्षण क्षेत्रात हल्ली बरीचशी साठमारी चालली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे एवढंच समजलं! :)

सुचेल तसं's picture

2 Aug 2008 - 1:45 pm | सुचेल तसं

तात्यांशी सहमत. लेख समजायला कठिण........

http://sucheltas.blogspot.com

तात्या आणि सुचेलतसं,

प्रभू साहेबांचे लिखाण पचायला अमंळ जड आहेत.
परंतु, ज्यांची मुले १०वी ते १२वी च्या टप्प्यात आहेत, त्यांना संदर्भ लागतात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सर्किट's picture

4 Aug 2008 - 6:16 am | सर्किट (not verified)

पुन्हा एकदा माफी असावी,

लहान मुलांच्या पालकांना समजावण्यासाठी आपण जर अशी क्रिप्टिक भाषा वापरत असाल, तर ह्या धंद्यात आपण कितपत टिकणार, ह्याविषयी जरा शंकाच वाटते.

त्यांना ज्या भाषेत समजावता, त्या भाषेत इथे लिहा ना !

नाही, म्हणजे तुमचे अनुभव, तुमच्या सूचना असतील कितीही थोर, पण जर ज्यांना त्या सूचना देताहात त्यांनाच जर कळल्या नाहित, तर त्यांचा काय उपयोग ?

अर्थात, तुम्ही हा सूचकधंदा सुरू केला, आणि तो लोकप्रियही आहे, असे कळते, तेव्हा त्या धंद्यातील जी समजवण्याची भाषा आहे, तीच इथे वापरा ना !

- सर्किट

चतुरंग's picture

4 Aug 2008 - 6:25 am | चतुरंग

विनायकराव, कृपया सांकेतिक लिहू नका बोजड/नीरस वाटत हळूहळू दुर्लक्ष होते.
तुम्ही लिहिता तेव्हा कोणाला काय वाटेल अशी भीड वाटते का? तसे असेल तर कृपया तसे मानू नका.
जितके मोकळेपणाने आणि स्पष्ट लिहाल तेवढा विषय रंजक होतो. समजतो आणखीन जाणून घ्यावासा वाटतो.

चतुरंग

नोहिद सागलीकर's picture

4 Aug 2008 - 2:55 pm | नोहिद सागलीकर

नमस्कार प्रभू सर,
मला वाटतंय आपली गत पन त्या १० च्या वी पास पोरां सारखी झालीय, भरकटुनका

शौक्षणिक यश कशा बरोबर खायच असतं हे
फारच कमी पोरांना कळत ,त्यात पालक स्वातंत्र्याच्या नावावर सरळ सरळ दुर्लक्ष करतात, आणि मग १२वी नंतर
येते वेळ आणी बाणी ची , पर्याय शोधुन ऊपयोग होत नाही.