सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 1:13 am

सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! :)

आपला नम्र,
तात्या.

मौजमजाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 1:25 am | चतुरंग

गटारीची तयारी जोरात दिसते! 'वट ६९' ची बाटली एकदम झकास!!

(स्वगत - रंग्या, लेका फक्त 'संबंधितां'साठीच आहे हा धागा! कोणकोण आहेत बरं हे संबंधित? :W :? )

चतुरंग

घाटावरचे भट's picture

1 Aug 2008 - 1:45 am | घाटावरचे भट

अनुष्कावैनी तर नव्हेत???
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

स्वप्निल..'s picture

1 Aug 2008 - 2:54 am | स्वप्निल..

तात्या,

पुर्ण तयारी झाली वाटते...मजा आहे..

स्वप्निल

शितल's picture

1 Aug 2008 - 7:27 am | शितल

त्या दिवशी लोक मद्य पिऊन गटारात पडतात म्हणुन गटारी अमवस्या म्हणतात का त्याला :)

फटू's picture

1 Aug 2008 - 8:11 am | फटू

गटारी एकदम जोरात आहे...

चालू द्या...

(अमेरिकेत रोजच गटारी साजरी करणारा ),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पिवळा डांबिस's picture

1 Aug 2008 - 8:23 am | पिवळा डांबिस

काय तात्या, मग मटण रटरटतंय की नाही चुलीवर!

सर्व गटारीभक्तांना आमच्या शुभेच्छा!
आम्ही तर्र होण्याइतकी मदिरा कधीच घेतलेली नसल्याने "गटारी" चा अनुभव आम्हाला नाही!
(पण शुभेच्छा द्यायला काय जातंय, डांबिसा!!)
:)

त्या दिवशी लोक मद्य पिऊन गटारात पडतात म्हणुन गटारी अमवस्या म्हणतात का त्याला
उत्तर एकाच शब्दात - "होय"!!

(स्वगत - रंग्या, लेका फक्त 'संबंधितां'साठीच आहे हा धागा! कोणकोण आहेत बरं हे संबंधित?)
आयला, "संबंधितांसाठी" आहे होय! रंग्या आम्ही तर "संभावितांसाठी" आसं वाचलं!! आम्हाला वाटलं 'संपादकमंडळाचा' रेफेरन्स असेल म्हणून!!:))
(ह. घ्या हो मंडळी!! लक्षात ठेवा, गटारीला सगळं बरळणं माफ असतं!!)

खा, प्या, मजा करा महाराष्ट्रातील मिपाकरांनो!
कुठल्या लफड्यात मात्र अडकू नका...

जाणकारांसाठी एक प्रश्नः
गटारीच्या संध्याकाळी/ रात्री तुमच्या आबा पाटलांचं पोलिसखातं काय ऍक्टिव्हिटी करत असतं हो?:)

आपला,
डांबिसकाका

विसोबा खेचर's picture

1 Aug 2008 - 8:31 am | विसोबा खेचर

गटारीच्या संध्याकाळी/ रात्री तुमच्या आबा पाटलांचं पोलिसखातं काय ऍक्टिव्हिटी करत असतं हो?

अरे हो डांबिसा, मोटार वाहन कायदा, कलम १८५ आजकाल जोरात लागू आहे! :)

आपण तर बॉ हल्ली साधं ताक जरी प्यायलो तरी स्कूटरला हात लावत नाही! आणि नव्या सुधारणेनुसार हल्ली कलम १८५ चा जामीन देखील रद्द केला आहे त्यामुळे जजसाहेबांच्या मनात आलं तर ते नुसता दंड न ठोठावता चार-आठ दिवसांची साधी कैदही सुनावू शकतात! :)

तेव्हा नकोच ती लफडी! रिक्षा किंवा टॅक्सी बरी! :)

आपला,
(कलम १८५ अंतर्गत शिक्षा झाल्यामुळे आयुष्यभराकरता धडा मिळून कायमस्वरुपी सुधारलेला एक आरोपी!) तात्या.

रंग्या आम्ही तर "संभावितांसाठी" आसं वाचलं!! आम्हाला वाटलं 'संपादकमंडळाचा' रेफेरन्स असेल म्हणून!!)

(स्वगत - 'संबंधितांना' त्यांच्या 'तशाही' अवस्थेत संदेश कसे बरोब्बर कळतात नै रंगा? :P :T )

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2008 - 2:14 am | पिवळा डांबिस

(स्वगत - 'संबंधितांना' त्यांच्या 'तशाही' अवस्थेत संदेश कसे बरोब्बर कळतात नै रंगा?)
स्वगत-संदेश तर सगळ्यांनाच कळतात पण फक्त 'संबंधित' हे 'संभावित' नसल्याने ते संदेश कळल्याचे प्रामाणिकपणे लगेच मान्य करतात!!:)

चतुरंग's picture

2 Aug 2008 - 3:00 am | चतुरंग

(स्वगत - आता कळलं रंगा, गटारीत पाय टाकलास खरा आणि अंगावर चिखल उडवून घेतलास! पुन्हा अशी चूक करु नकोस! जा लिंबू सरबत घेत बैस! ;) )

चतुरंग

विजुभाऊ's picture

1 Aug 2008 - 9:35 am | विजुभाऊ

हल्ली साधं ताक जरी प्यायलो तरी स्कूटरला हात लावत नाही =))
आणि उसाची कांडकी शिल्लक नसल्याने उसाचा रस ही प्यायला मिळत नाही :)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2008 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

GaTari

व्हॅट ६९ आणि इतर माल आपल्या गावाजवळच तयार होतो , आपला एक दोस्त टेस्टींग विभागात आहे कधी-मधी पै-पाहुण्यांची परस्पर सोय होते. :)

गटारी आवस साजरी करणार्‍यालाच आमच्या शुभेच्छा !!! :)

धमाल मुलगा's picture

1 Aug 2008 - 10:19 am | धमाल मुलगा

आहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा...............

सर...सर, काय जब्बराट फोटु टाकलाय...
भुक लागली ना सक्काळी सक्काळी!!!!

गटारीच्या सर्वांना शुभेच्छा!!!
(एकदा, च्यामारी तर्र होणे म्हणजे काय ह्याचा अणुभव घ्यायला पाहिजे बॉ! )

-(आजच्यादिवस डुक्कर) ध मा ल.

सूर्य's picture

1 Aug 2008 - 2:53 pm | सूर्य

अहाहा... काय फोटो टाकलाय. चला सर बसुयात आज ;)

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

चला सर बसुयात आज

हेच म्हणतो! :)

चला बिरुटेसर, मस्तपैकी मैफल जमवू, साला मस्तपैकी गौडमल्हार जमवून त्यातली 'लाडी लाडीसी...' ही बंदिश गाऊ. मूड असेल तर थोडा मियामल्हारही गाऊ! :)

बरं का बिरुटेशेठ, आमच्या गौडमल्हारातली 'लाडी लाडीसी...' ही बंदिश एकदम झकास आहे बरं का! मौज येते गायला. तुम्हाला आवडली तर तुम्हालाही या बंदिशीची तालीम देईन! :)

साला, होऊन जाऊ द्या मस्तपैकी गटारीची एक मैफल! :)

आपला,
(दोन घोट घेतली की गाणं अधिक चांगल्यापैकी मांडता येणारा!) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2008 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बंदिशीची तालीम देईन!

तात्या,
कधीतरी योग येतील, आम्हाला आपली काही गाणी ऐकाचीच आहेत.
तुम्हावर केली मी मरजी बहाल, :) असे कितीतरी ऐकायचे आहे.

च्यायला तुमची लाडी लाडी ऐकले, तुमची अशीच आवड असेल तर आपलं कसं जमायचं बॊ.... अस्स गाणं आमच्या डोक्यावरुन जातं :( पण तबला आणि सूर कानाला बरे वाटतात हे आमच ज्ञान !!!

आम्हीही बोलू आम्हाला आवडणा-या पुस्तकांबद्दल, एसीत बसून ग्रामीण जीवणावर लेखन करणा-या लेखकांबद्दल, साहित्याबद्दल :)!!!

अवांतर : तात्या, हा आपला 'सुर्य' दोस्त इतका बीझी असतो की, त्यांना त्याच्या घरी गेलो तरी बोलायला वेळ मिळणार नाही, आणि आपल्याला बसायचं म्हणतो.... हे खोट्टं खोट्टं आमंत्रण :)

-दिलीप बिरुटे
( दोन घोटावर साहित्य, आयुष्य,मित्रांवर तब्येतीने बोलणारा )

सुचेल तसं's picture

1 Aug 2008 - 10:00 am | सुचेल तसं

प्राणिमात्रसुद्धा गटारी साजरी करतात :-)

http://sucheltas.blogspot.com

ऍडीजोशी's picture

1 Aug 2008 - 11:48 am | ऍडीजोशी (not verified)

आमच्या तर्फे ही सगळ्यांना शुभेच्छा. आणि बँगलोर मधल्या सगळ्यांना हर्दीक आमंत्रण

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

1 Aug 2008 - 11:54 am | धमाल मुलगा

ऍड्या...
जॅक डॅनिअल्स ऑन-द-रॉक्स?

जियो मेरे शेर!!!!

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 12:05 am | विसोबा खेचर

जॅक डेनियल्स का? वा वा! :)

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 12:25 pm | मनस्वी

बिरुटेसरांनी टाकलेला कोंबडी रश्शाचा फोटो १ नंबर.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

पक्या's picture

1 Aug 2008 - 1:04 pm | पक्या

कोंबडी रश्शाचा फोटो जबरा !
सर्वांना (अर्थात संबंधिताना) गटारीच्या शुभेच्छा !!!
>>खा, प्या, मजा करा
कुठल्या लफड्यात मात्र अडकू नका... -------- डांबिसकाकांशी सहमत . (थोडक्यात 'अति तेथे माती' नको.)

टारझन's picture

1 Aug 2008 - 2:45 pm | टारझन

चिकनवर जबरा प्रेम असल्याने (आणि पुढचे ३ महिने तो विरह) आम्ही गटारीला एक किलो चिकन फस्त करत असू ... मजा यायची घरी... बाकी आईच्या हातच्या तांबड्या रश्श्याची चव कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधे नाही भेटत .... .... बाकी सोनेरी द्रव्याला हात लावायची डेरिंग आपल्यात नाही.
असो ... एका डोळ्यातुन हळूच एक अतिछोटा अश्रु निघाला .. गटारीच्या निमीत्ताने आठवणी ताज्या केल्याबद्दल तात्यांचे आणि बिरुटे सरांचे आभार ..

जियो लेकहो ..
खाओ-पियो ऐश करो ....
क्या पता कल हो ना हो

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 Aug 2008 - 2:21 pm | डॉ.प्रसाद दाढे

बिरूटेसर व जोशीबुवा॑चे आभार..सॉल्लीड फोटो आहेत.. जिवाच॑ (का जिभेच॑) पाणी पाणी झाल॑..

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2008 - 2:44 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त एन्जॉय करा लेको...

बिपिन.

चष्मेवाला's picture

1 Aug 2008 - 3:01 pm | चष्मेवाला

एन्जॉय करताना काही कमी पडायला नको...

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Aug 2008 - 3:50 pm | ब्रिटिश टिंग्या

आमची लाडकी स्मिरनॉफ दिसतेय का हो त्यात? :?

असो, सर्वांना गटारीच्या "झणझणीत" आणि "ऑन दी रॉक्स" शुभेच्छा!

मजा करा अन् ४ पेग आमच्या नावाने जास्त प्या!

(ब्रिटिश असुनही रशियन व्होडकाप्रेमी) टिंग्या :)

केशवसुमार's picture

1 Aug 2008 - 3:34 pm | केशवसुमार

गटारात लोळणार्‍यांना,
गटारीच्या शुभेच्छा..

मागच्या गटारीला मानस यांची एक वेडी वेदनेची जात आहे.
वाचून पाडलेले विडंबन आठवल....

गटारी रात....

रोज का मद्यालयी मी जात आहे?
आज साली पण गटारी रात आहे

रंग डोळ्यांचा कसा हा लाल माझ्या,
यात देशीचा जरासा हात आहे

घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
वाटते मज वेगळी ही बात आहे!

काय मी आता करू या बायकोचे
झोपताना लाटणे हातात आहे!

"केशवा"ला काल इतके चोपलेकी
एक ना तोंडात त्याच्या दात आहे!

-केशवसुमार

आम्हाला एकदम स्फूर्ती आली ना!

अरे आज पुन्हा आली रे गटारी
जमू सर्व घेऊ बघा 'स्कॉच' प्यारी

असे स्टॉकमध्ये 'स्मिर्नॉफ' थोडी
कुणाला रुचे हातभट्टी विखारी

कुठे पाणी, सोडा कुठे घेति 'नीट'
बर्फासवे कोणी करतेच यारी

कुणाचा कुठे होय टांगाच पल्टी
शोधी कुणी वा घोडे फरारी

नसे ह्यात 'रंगा' कुठेही जरासा
'संबंधितांना'च प्यारी गटारी

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

2 Aug 2008 - 11:57 am | संजय अभ्यंकर

वा! रंगाशेठ!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अनिल हटेला's picture

1 Aug 2008 - 5:01 pm | अनिल हटेला

आजची गटारी ,

सर्वासाठी ठरो न्यारी !!!

चीयर्स !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2008 - 6:38 pm | प्रकाश घाटपांडे

गटारीच्या दिवशी ज्योतिषाला सव्वा बाटली बिअर, सव्वा प्लेट चिकन, सव्वा पेग विस्की अस सगळ द्याव लागतय. नाही त मंग पुढचा श्रावन बरा जात नाही.
गटारीच्या दिवशी सगळ माफ असतंय!
(माफीचा साक्षीदार)
प्रकाश घाटपांडे

राधा's picture

1 Aug 2008 - 7:03 pm | राधा

जम के होउ द्यात मग..............;)

II राजे II's picture

1 Aug 2008 - 7:04 pm | II राजे II (not verified)

चीयर्स !!!!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

एव्हढ्या बाटल्या आणि पिणारे रसीक पाहिल्यानंतर.
फिर कभी फुरसतसे सोचे क्या भला था क्या बुरा.(चूभूद्याघ्या)
राजकपूरच्या जागते रहो चं गाण आहे बहुतेक.

मुक्तसुनीत's picture

1 Aug 2008 - 7:30 pm | मुक्तसुनीत

"जिंदगी ख्वाब है ...." हे गाणे "जागते रहो"या पिक्चरमधले ना हो ?

रामदास's picture

1 Aug 2008 - 7:36 pm | रामदास

त्या गाण्याच्या कडव्यातली ओळ आहे.

रामदास's picture

1 Aug 2008 - 7:39 pm | रामदास

त्या गाण्याच्या कडव्यातली ओळ आहे.

घाटावरचे भट's picture

2 Aug 2008 - 12:14 am | घाटावरचे भट

सर्व मिपाकरांना गटारीच्या ऍब्सोल्युट शुभेच्छा!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

१) अनन्त चतुरदशि ( गनपति पुढे हे हे हालवुन साजरि होते )

२) गटारि आमवस्या ( मित्र परिवार बोलावुन साग्र सन्गित )

३) ३१ डिसेम्बर (दिन दर्शिका बदलल्यावर इतका आनन्द होतो कि विचारता सोय नाहि )

हे तिन पुर्न मुहुर्त

दहि हन्डि हा अर्धा मुहुर्त कारन मुख्य (?)का र्यक्रम सन्ध्याकाळि सुरु होतो !

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Aug 2008 - 12:32 am | ब्रिटिश टिंग्या

ह ह पु वा!

नाटक्या's picture

2 Aug 2008 - 3:15 am | नाटक्या

होळी / रंगपंचमी विसरलात कि...

तसे आपल्याला प्यायला मुहुर्त पण लागत नाही आणि कारण देखील. आमचे हात / पाय लटलट कापत असतील तर समजावे कि उतरली आहे...

(आद्य बेवडा) नाटक्या..

गुंडोपंत's picture

2 Aug 2008 - 6:47 am | गुंडोपंत

संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा!

याची संबंधितांनी नोंद घेतली होती! गटारी आवसेच्या शुभेच्छा तगड्या होत्या.
त्यामुळे आजच धन्यवाद द्यायला जमले! ;)

आपला
गुंडोपंत