एजीओजी

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
8 Nov 2007 - 10:04 am

दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.

सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. यात भारतातील विविध प्रांतांची भौगोलिक, ऐतिहासिक, पर्यटनविषयक, सांस्कृतीक ( आहर , पोशाख, राहणीमान, सण, उत्सव इ.) , व्यावसायिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक इ. बाबींबद्दलच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश असेल. उपलब्ध होणारी माहिती त्या त्या भाषेत अनुवादित करण्याचे काम सदस्य करतील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे लेखांमधील त्रुटी दूर करणे, बदल करणे, माहितीचे नियोजन आणि मांडणी अशी स्र्व कामे ही सर्व सदस्यांना करता येतील. गमभनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व लिप्यांचा ( देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बांगला, मल्याळम, तेलुगु, कन्नड, उर्दू) वापर याकामी या संकेतस्थळावर करता येईल.

या संकेतस्थळाबद्दल आपली मते, सुचवण्या, समीक्षा, कल्पना आणि आपला सहभाग यातून संकेतस्थळाचा विकास आणि वृद्धी व्हाही याकरता हा लेखनप्रपंच.

दीपावलीच्या सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा.

Logo

- ॐकार जोशी

कलामांडणीसंस्कृतीवावरसमाजतंत्रराहणीभूगोलविज्ञानशिक्षणमौजमजाप्रकटनविचारमतसंदर्भप्रतिसादमाध्यमवेधअनुभवमदतमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

इस्कुट's picture

8 Nov 2007 - 12:26 pm | इस्कुट

एजी....ओजी, लोजी सुनो जी
करता हु मै वो तुम भी करो जी...

आता मरठित...

एजी....ओजी
घ्याजी ...ऐकाजी
करतो जे मी ते तुम्हीही कराजी
एक दोन चं चार्...चार दोन चं एक
माझं नाव आहे लखन...माझं नाव आहे लखन.

आपल्या कार्याला माझ्या हार्दीक्...हर्दीक शु...शु...शु...

थाम्बा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शु करुन आलो हो...घाईची लागली होती.

हा तर मी काय म्हनत होतो, आप्ल्या कर्याला हर्दीक शुभेच्छा...

स्वाती राजेश's picture

8 Nov 2007 - 3:05 pm | स्वाती राजेश

नविन उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा

विसोबा खेचर's picture

8 Nov 2007 - 5:10 pm | विसोबा खेचर

म्हणतो...

तात्या.

प्राजु's picture

9 Nov 2007 - 10:09 am | प्राजु

नव्या कार्याला हार्दिक शुभेच्छा..!
- प्राजु.

विकेड बनी's picture

9 Nov 2007 - 4:42 pm | विकेड बनी

नव्या कार्याला शुभेच्छाच आहेत ओंकारशेट पण हा काय प्रकार आहे?

एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.

ॐकार's picture

10 Nov 2007 - 10:01 am | ॐकार

एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.
मी वर प्रयोजन नमूद केलेलेच आहे. चॅट रूम्सचा वापर सर्वांना करता यावा यासाठी पाहुण्या सदस्यांना दार खुले ठेवले होते. त्यांच्या मतांशी मी सहमत असेनच असे नाही. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिणाम बरे नाहीत असे वाटल्याने आता यापुढे केवळ सदस्यांना गप्पा मारता येतील असे बदल केले आहेत.

विकेड बनी's picture

10 Nov 2007 - 5:59 pm | विकेड बनी

अब देखेंगे आगे क्या होता है|

नरेंद्र गोळे's picture

11 Nov 2007 - 10:44 pm | नरेंद्र गोळे

ह्या दीपावलीत मी अनुभवलेली सर्वात नेत्रदीपक संकल्पना एजीओजी ची आहे.

एजीओजी ला दैदिप्यमान यश मिळो हीच प्रार्थना!