==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...कंबोज कला आणि कंबोज-आंतरराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेत संध्याकाळ कशी संपली ते कललेच नाही. उद्याच्या दिवसात अजून काय सुखद आश्चर्याचे धक्के बसणार आहेत असा विचार करत बिछान्याला पाठ टेकवली.
ता प्रोम
ता प्रोम हे आधुनिक नाव असलेल्या या महायान बौद्धमंदिर आणि विश्वविद्यालयाचे मूळ नाव "राजविहार" असे आहे. ह्याची बांधणी बाराव्या शतकच्या शेवटात आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला सम्राट सातवा जयवर्मनने त्याच्या आईच्या स्मरणार्थ केली.
इथल्या भग्नावशेषांना शेकडो वर्षे वयाच्या प्रचंड आकाराच्या वृक्षराजांनी विळख्यात बंदिस्त केलेले आहे. त्यांची तोड अथवा सफाई न करता ती निसर्गाची करणी तशीच कायम ठेवल्यामुळे या जागेचे दर्शन अधिकच विस्मयचकित करून जाते. याच कारणामुळे हे स्थान जास्त प्रसिद्ध झाले आहे ! या जगावेगळ्या भग्नावशेषांना भेट दिल्याशिवाय अंगकोरची भेट पूर्ण होऊच शकत नाही.
अँजेलिना जोलीने काम केलेल्या लोकप्रिय Lara Croft: Tomb Raider ह्या चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केले गेले. त्या चित्रपटाने आणि त्याच नावाच्या व्हिडिओ गेमने या मंदिराची प्रसिद्धी जगात घरोघरी पसरवली. १९९२ पासून ही जागा युनेस्को मान्य जागतिक वारसा स्थान आहे.
या जागेचे संरक्षण आणि पुनस्थापन करण्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) अप्सराला (APSARA, Authority for the Protection and Management of Angkor) मदत करत आहे, हे पाहून आनंद झाला...
ता प्रोम च्या पुनस्थापनात भारताचा सहभाग
तर चला या जगावेगळ्या आकर्षणाचा फेरफटका मारूया...
ता प्रोम : गोपुर
.
ता प्रोमच्या आवारात या वृक्षसम्राटाने स्वागत केले
.
ता प्रोमच्या मुख्य इमारतीकडे नेणार्या वाटेवरचा प्रचंड नागराज
.
ता प्रोम : एका गोपुरावरचे युद्ध करणारे सैनिक
.
......
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०१
.
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०२
.
......
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०३ आणि ०४
.
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०५
.
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०६
.
ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०७
.
......
ता प्रोम : कोरीवकाम ०१ व ०२
.
......
ता प्रोम : कोरीवकाम ०३ व ०४
.
ता प्रोम : कोरीवकाम ०५
.
ता प्रोम : कोरीवकाम ०६
.
ता प्रोम : कोरीवकाम ०७
.
ता प्रोम : आपल्या मूळ जागेवर पुनस्थापना होण्याची वाट पाहणार्या शिला
बाहेर पडलो आणि कंबोडियाच्या भूतकाळाच्या वर्तमानातील परिणामांनी परत दर्शन दिले...
ता प्रोम जवळचा भूसुरूंगांच्या स्फोटांनी अपंग बनलेल्या वादकांचा संघ
पण तो भूतकाळ मागे टाकून आपला वर्तमानकाळ बनवण्याच्या धडपडीत असलेल्या कंबोज नागरिकांना पाहून जरा बरे वाटले...
जरा पुढे गेलो आणि नयनरम्य कंबोज निसर्गाने मन मोहायला सुरुवात केली...
(क्रमशः )
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
===========================================================
प्रतिक्रिया
27 Mar 2014 - 10:16 pm | विलासराव
सगळे भाग वाचलेत.
कंबोडीयाही आवडले.
धन्यवाद.
27 Mar 2014 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
सल्ला.............म! काय ते एकेक वृक्ष! जमिनीसह सगळ्या प्रदेशावर कब्जाच केलाय जणू.अफाट..महाकाय..म्हणण्यापेक्षा या वृक्षांना सम्राटवृक्षच म्हणावसं वाटतय.
27 Mar 2014 - 11:59 pm | सुहास झेले
मस्तच... हाही भाग आवडला. आता पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)
28 Mar 2014 - 4:34 am | स्पंदना
खर सांगु का एक्का साहेब? अस पहात रहावस वाटत नुसत. इतक खुज वाटत या सगळ्या फोटोंपुढे की शेवटी प्रतिसाद लिहायला काही उमटतच नाही मनातुन. तुम्ही फिरत रहा. लिहीत रहा. पण येथे प्रतिसाद नसला तरी अपर्णाने धागा वाचलाय हे नक्की.
28 Mar 2014 - 10:47 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
28 Mar 2014 - 10:06 pm | खटपट्या
छान छान फोटो
29 Mar 2014 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे
विलासराव, अत्रुप्त आत्मा, सुहास झेले, aparna akshay, जेपी आणि खटपट्या : अनेक धन्यवाद ! तुम्हा सर्वांच्या सहभागाने सफर अधिक आनंददाई होत आहे.
29 Mar 2014 - 11:30 am | यशोधरा
सुरेख.
29 Mar 2014 - 5:45 pm | सौंदाळा
मस्तच
29 Mar 2014 - 7:28 pm | विवेकपटाईत
मस्त, आवडले.असाच सुंदर प्रवास अनुभवु द्या.
29 Mar 2014 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
यशोधरा, सौंदाळा आणि विवेकपटाईत : धन्यवाद !
29 Mar 2014 - 9:22 pm | प्रचेतस
वृक्षराजींनी कवेत घेतलेलं मंदिर अतिशय आवडलं. निसर्गाची किमया अद्भूत आहे.
जरी हे मंदिर वृक्षविळख्यांमुळे अतिशय अद्भूत दिसत असलं तरी तरी यापासून मंदिराला हानी निर्माण होऊ नये म्हणून नेमकी कशा प्रकारची उपाययोजना केली आहे? कृत्रिम उपायांनी पारंब्यांची वाढ आता थांबवली आहे का?
30 Mar 2014 - 8:53 am | डॉ सुहास म्हात्रे
हे वृक्ष आता इतक्या प्रचंड आकाराचे झालेले आहेत की तेच जास्त प्रवासी खेचतात... सुंदर मंदिरे काय अंगकोर मध्ये पेशाला पासरी आहेत. त्यामुळे ता प्रोममध्ये पुरातत्व खाते प्रथम झाडांची काळजी घेते आणि मग त्याअनुषंगाने मंदिर कसे जास्तित जास्त सुरक्षीत राहील असे बघते !
29 Mar 2014 - 9:43 pm | पैसा
वल्लीने लिहिलंय तेच मनात आलं. एवढी मोठमोठी झाडे वाढून इमारतींना आणखी हानी होऊ नये म्हणून काहीतरी केलंच असणार!
तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच!
30 Mar 2014 - 8:55 am | डॉ सुहास म्हात्रे
तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच!
नक्कीच ! मुख्य म्हणजे इतके प्रकार की सहसा चोप्य पस्ते दिसून येत नाही !