✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शार्दुल कदमची पेंटींग्ज.

र
रामदास यांनी
Sat, 07/26/2008 - 15:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24085 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

र
रामदास गुरुवार, 08/07/2008 - 00:28 नवीन

नेहेमीप्रमाणे

लेख मागे पडला आहे . दुसरा भाग तयार करतो आहे. पॉवर कट मुळे कामाचे तास कमी झाले आहेत.
  • Log in or register to post comments
न
नारायणी गुरुवार, 08/07/2008 - 00:50 नवीन

फारचं सुंदर!!

चित्रे आहेत. शार्दुलच्या सेल्फपोर्ट्रेट मध्ये डोळे कसले जिवंत आलेत. खरोखर अप्रतिम चित्रे!! रामदास्,तुम्हाला कशाकशात गती आहे हो? तुमच्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा असतो. प्रत्येक विषयावर ज्ञानही तेवढ्चं सखोल.बरं,कोणताही विषय हाताळताना तुम्हि कुठेही कमीही पडत नाही.कमाल आहे बा तुमची!! खरचं, तुम्ही नक्कि कोणत्या फिल्ड मध्ये काम करता?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/07/2008 - 00:54 नवीन

सुंदर..!

धन्यवाद रामदासराव, सर्व चित्रं सुंदर आहेत! टेबलाला टेकून उभ्या असलेल्या मुलीचं चित्र तर क्लासच! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/07/2008 - 02:29 नवीन

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/07/2008 - 00:55 नवीन

क्या बात है !!!!!!

अनार्कीचे चित्र खूपच सुंदर ! हे चित्र मला विकत घ्यायचे आहे. कृपया कदमांना कळवा. - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बबलु गुरुवार, 08/07/2008 - 00:56 नवीन

मानसी

आणि Rainy evening सॉलिड अपिल झाली. रामदासजी, लेखही मस्त जमलाय. पुढील भागाची वाट बघतोय. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 08/07/2008 - 01:04 नवीन

धन्य झालो रामदास!

हा चित्रकलेतला 'शार्दूल' आहे अगदी नावाप्रमाणेच! भन्नाट आहेत चित्रे! पोर्ट्रेट्स रंगवायला ज्याला जमतात त्याच्यासमोर मी नतमस्तक होतो तसा झालो. आणि आपला लेख व चित्रांवरची टिप्पणी काय वर्णावी, ती ही तोडीस तोड, एक सुंदर मैफल अनुभवली! अजून चित्रे येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/07/2008 - 01:12 नवीन

आपला लेख व

आपला लेख व चित्रांवरची टिप्पणी काय वर्णावी, ती ही तोडीस तोड, एक सुंदर मैफल अनुभवली! सहमत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केशवसुमार गुरुवार, 08/07/2008 - 01:37 नवीन

हेच म्हणतो..

आपला लेख व चित्रांवरची टिप्पणी काय वर्णावी, ती ही तोडीस तोड, एक सुंदर मैफल अनुभवली! अजून चित्रे येऊदेत. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 08/07/2008 - 01:41 नवीन

मगाचपासून विचार

करत होतो की शार्दूलचं सेल्फ पोर्ट्रेट जसं आहे जवळजवळ तसंच एक चित्र मागे एकदा माझ्या पहाण्यात आलेलं आहे आणि थोडी शोधाशोध केल्यावर सापडलं बघा. किती साम्य आहे ह्या दोन चित्रात - Image removed. हे चित्र महान चित्रकार व्हिन्सेंट वॅन गॉ याचे सेल्फ पोर्ट्रेट आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मुक्तसुनीत गुरुवार, 08/07/2008 - 01:47 नवीन

सेल्फ पोर्ट्रॅट्स्

सेल्फ पोर्ट्रॅट्स् हा एक स्वतंत्र कलाप्रकारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 08/07/2008 - 01:54 नवीन

विकीच्या

दुव्याबद्दल धन्यवाद सुनीत! सेल्फ पोर्ट्रेटप्रकारामधे साधारण सारखेपणा असला (कारण आरशात बघून काढल्यामुळे चित्राचे अवकाश आणि व्यक्तीचे प्रोफाईल ठराविक येते) तरीही ह्या दोन चित्रात मला त्याही पलीकडे जास्त साम्य जाणवले एकंदर चेहरेपट्टी, लाईट्-शेड, चेहेर्‍यावरचे भाव. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
कोलबेर गुरुवार, 08/07/2008 - 02:06 नवीन

हे पाहा

हे पाहा पिकासोचे सेल्फ पोर्टेट Image removed. पिकासोचे हे सेल्फ पोर्ट्रेट पाहून मला तरी असे वाटले: पिकासो महाशयांना कसल्या तरी अंमली पदार्थाचा (कोकेन, हेरॉइन वगैरे) ओव्हरडोस झाला असावा, आणि त्या अवस्थेत त्यांच्या मनात त्यांचे स्वतःचे जे चित्र उभे राहिले ते त्यांनी कागदावर चितारले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 08/07/2008 - 02:20 नवीन

मला वाटतं

की माझं मत 'नॉर्मल' लोकांच्या सेल्फ पोर्ट्रेट्बद्द्ल होतं! ;) पिकासोसारखे अपवाद असतातच! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
संदीप चित्रे गुरुवार, 08/07/2008 - 01:11 नवीन

योद्धा ...?

रामदासकाका. .. लेख आवडला ... चित्रकला कधीच जमली नाही पण त्यावरचं वाचायला आवडलं. तुम्ही लेखात 'योद्धा' ह्या चित्राबद्दल लिहिले आहे तो फोटो आहे का? -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 08/07/2008 - 01:21 नवीन

सुंदर कंपोझिशन

वा!!!! रामदास, इतक्या सुंदर चित्रांचा आस्वाद सांगताना लेख (शब्दसंख्येमुळे) कमीच पडणार - ती काही त्रुटी नव्हे. मला खास दिसले या चित्रांतील कंपोझिशन (घटकांची चित्रातली मांडणी). वाट बघणार्‍या मुलीसाठी साधलेला चौकटीचा सफाईदार कर्ण! उजवीकडील निगेटिव्ह स्पेसच्या त्रिकोणाला छेदून आकार देणारे तिचे वाकलेले डोके, आणि माळेशी चाळे करणारा हात... असेच काहीकाही बाकी चित्रांबद्दलही. (पण गौरीगणपतीच्या भित्तिचित्रात छोट्या ताईच्या चेहर्‍यावरील भाव तितके आवडले नाहीत. भित्तिचित्रे मात्र थोडी बटबटीत असतातच, माध्यमच तसे, त्यामुळे फार तक्रार नाही.)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 08/07/2008 - 01:28 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर आहेत चित्रं.. प्रत्येक माध्यमामधले शार्दूलचे प्राविण्य दिसत आहे. मला ती वाट पाहणारी मुलगी.. आणि पारव्यांचं चित्र खूपच आवडलं!! असे फटकारे मारून पारवे दाखवणं अवघड आहे! श्या असं काही पाहीलं की फार काहीतरी चित्रं-बित्रं काढावीत, काहीतरी क्रिएटीव्ह करावं असं वाटतं.. पण देवाने तितकी प्रतिभा नाही दिली! :( एनिवे, अजुन असतील तर चित्रं आणि लेख येऊद्या.. तुम्ही दिलेल्या कविता देखील चित्राला साजेश्या आहेत!
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव गुरुवार, 08/07/2008 - 01:36 नवीन

फार सुंदर चित्र आहेत

सेल्फपोर्ट्रेट काय अप्रतिम आहे, व्वा! रामदास, या कलाकाराला मिपावर आणल्याबद्दल धन्यवाद. आणि 'अनार्कि' आधि नाहि ठेवलत ते बरं झालं. नाहितर कोणीतरी एम् एफ् हुसेन सारखा अगम्य चित्रकार वाटला असता!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 08/07/2008 - 01:40 नवीन

मस्त चित्रे!

उत्कृष्ट चित्रकाराची सुंदर ओळख! मला त्यांचे 'सेल्फ पोर्ट्रेट' आणि 'रेनी इव्हिनींग' सगळ्यात जास्त आवडले. चतुरंग म्हणतात तशी सुंदर मैफिल अनुभवली.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/07/2008 - 01:48 नवीन

सु-रेख

चित्रे, त्यांचे रसग्रहण आणि सोबत दिलेल्या कविता/गाणी सारेच अप्रतिम. या चित्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल, त्याला मिपावर येण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 08/08/2008 - 01:08 नवीन

+१

असेच म्हणतो ... चित्र, त्यांचे काव्ययुक्त रसग्रहण ह्यावर अजुन काय प्रतिक्रीया लिहणार ? केवळ अप्रतिम ! रामदाससाहेबांनी हा योग आणल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 08/07/2008 - 06:29 नवीन

धन्यवाद

या चित्रांची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आता शार्दूल कदम आणि ज्योत्स्ना कदम मिपासाठी लिहिणारही आहेत, ही अजून आनंदाची बातमी. त्याबद्दल आभार मानावेत तितके कमीच आहेत.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 08/07/2008 - 06:53 नवीन

+१

हेच म्हणतो. सेल्फपोर्ट्रेट आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
च
चित्रा गुरुवार, 08/07/2008 - 06:46 नवीन

फारच

सुंदर. सर्वच चित्रे आवडली - विशेषतः मुलीचे चित्र. शार्दुल आणि ज्योत्स्ना कदम लेखन कधी करतील त्याची वाट पाहते आहे. आणि ओळखही छान करून दिली आहे. कविता चपखल.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 08/07/2008 - 08:03 नवीन

व्वा!

शार्दूलची पेंटिंग्ज अतिशय आवडली..... विशेषतः पारवे आणि सेल्फ पोर्ट्रेट!!!! मला एक सांगा रामदासजी, तुम्ही शार्दुलला प्रत्यक्ष पाहिलंय..... हा सेल्फ पोर्ट्रेटमधला थोडासा तिरळेपणा! तो प्रत्यक्षात आहे काय?..... असेल तर शार्दूल हा एक महान कलाकार आहे हे निश्चित!!!!! कारण, त्याने ते लपवायचा प्रयत्न केलेला नाहीये........
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 08/07/2008 - 09:52 नवीन

अनार्की

अनार्की पेन्टिग आणि त्याखालची कविता ...दोन्ही उत्तम... :).. ते योद्धा पेंटिंग सुद्धा पहायचं आहे... .. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 08/07/2008 - 19:17 नवीन

धन्यवाद रामदास काका!

कॅनव्हासच्या बाहेर नजर जाणार नाही.
अगदी खरं! पहिल्या गणपतीच्या चित्रातील मागे टांगलेली चिमणावळ खूप मस्त आलीये. शार्दुलच्या सेल्फ-पोट्रेट मधले डोळे भन्नाट आलेत.
शार्दुलनी सदस्यत्व घेतलंच आहे.या लेखानंतरच लिखाण तोच करणार आहे.खास मिपासाठी.
सहीच. त्याच्याकडून चित्रकलेबद्दलची तांत्रिक माहिती आणि त्याने काढलेली चित्रे बघायला खूप आवडेल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 08/07/2008 - 10:45 नवीन

अप्रतीम...

हा एकच शब्द आहे माझ्याकडे या चित्रांचं वर्णन करायला... आणि चित्रांचं रसग्रहण तितकंच छान... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/07/2008 - 11:14 नवीन

स्पेलबाऊंड.....

भन्नाट आहेत पेंटींग्ज. जबरदस्त आवडली. खास करुन, वाट पाहणारी तरुणी आणि सेल्फपोर्ट्रेट जास्तच. टेक्निकल गोष्टी काही कळत नाहीत म्हणा, पण एकुणातच असलेलं चित्र आणि त्याचा इफेक्ट प्रचंड भावला. हां, ते अनार्की इतकंसं नाही कळलं,उकल करुन सांगितल्यामुळं समजलं. त्याविषयीची माहिती न वाचता आधीच चित्र पाहिल्यावर मला सगळ्यात प्रथम ते तरस दिसलं आणि मग दृष्टीहीन चेहरे. ह्यामध्येही काही सायकॉलॉजिकल थिअरीज आहेत काय? बाकी, गौरीगणपतीच्या चित्रातले बारकावे नेहमीप्रमाणेच छान.
  • Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे गुरुवार, 08/07/2008 - 11:57 नवीन

चित्र छान आहे

चित्रे छान आहेत
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/07/2008 - 12:17 नवीन

व्वा!

शार्दुलनी सदस्यत्व घेतलंच आहे.या लेखानंतरच लिखाण तोच करणार आहे.खास मिपासाठी. ही तर फारच उत्तम बातमी! चित्र आणि चित्रकाराची ओळख आवडली. सगळीच चित्रे झकास आहेत,त्यात आणि सेल्फ पोर्टेट फारच छान! स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/07/2008 - 12:34 नवीन

सर्वच

सर्वच चित्रे ए क्लास आहेत !!! (कला प्रेमी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 08/07/2008 - 13:07 नवीन

रामदासजी, उ

रामदासजी, उत्तम लेख....शार्दूलरावांची चित्रं तर फारच भारी...पण ते योद्धा नावाचं चित्र कुठे आहे? तुम्ही एवढं वर्णन केलय, उत्सुकता लागलीये ते चित्र पहायची! (अवांतरः हे तुमचं नाव लिवताना आम्हाला अभिषेकीबुवांच्या दरबारी कानड्यातल्या अंतर्‍याची सम आठवते, हेच शब्द....रा म दा स जी, जी वर सम....अफलातून) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 08/07/2008 - 14:03 नवीन

जिनियस

वा! वा! शार्दुलची चित्रे आणि रामदासांचे रसग्रहण - दोन्ही लाजवाब. मला रेनी ईव्हनिंगमधला सूर आवडला. पिजन्सही कमाल आहे. (पिजन्सला उभ्या घड्या पडल्या आहेत काय? असे चुकचुकत वाटले.) पुढच्या लेखांकांच्या प्रतिक्षेत आणि शार्दुलचेही मिपावर स्वागत... शार्दुल कदम हातात ब्रश घेऊन जन्मलेला जिनियस चित्रकार दिसतो. त्यात जे.जे. च्या मास्टर्सची भर!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/07/2008 - 14:44 नवीन

पेंटिंग्ज

आमाला यातल काही कळत नाही. जी चित्रे फोटोच्या जवळ पोहोचतात त्याला आम्ही भारी म्हणतो. आमच्या एका मित्राचा मुलगा ( कुलभुषण खिलारे) हे असले उद्योग करतो. खरं तर त्याला पेंटिंग्ज ची कुठली ही कौटुंबिक पार्श्वभुमी नाही. वडिल एआरडिई मध्ये सायंटिस्ट व आई शिक्षिका ;पण हा फाईन आर्टस का काय ते करतो आहे. आम्हाला त्यान पेंटिग्ज दाखवल्यावर आम्ही याची मानच उंच का? हे रंगाचे फरकाटे असे का? हिच्या पाठीवर काय चमकतेय? इथ रंग ओघळला कि काय? असे प्रश्न विचारुन आमचे अज्ञान प्रकट करीत असतो. त्याच्या चित्राला प्रदर्शनात पुण्यात म्हणे २५ हजार रु मिळाले. आम्च्या दृष्टिने अरे बापरे? येवढी किंमत भेटतीय? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 08/07/2008 - 21:21 नवीन

योद्ध्याचे चित्रं.

Image removed. युद्ध संपत आले आहेया योद्ध्यासाठी. ते जिव्हारी लागलेले बाण आणि कपाळावरचा भळभळता लाल रंग.सरणार कधी रण...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 08/07/2008 - 22:02 नवीन

कमालीची जिवंत रंगसंगती!

हेच शार्दुलच्या सर्व चित्रांचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे असे मला वाटतेय. १)गणपती पूजनाच्या चित्रात तर कमालीची रंगसंगती जमलेय. चित्रातले तपशीलही मस्तच आहेत. मात्र स्त्रियांचे चेहरे जवळपास सारखेच वाटताहेत. गौरी आणि मुलगी ह्यांच्या चेहर्‍यात कमालीचे साम्य दिसतेय. इथे त्याला प्रगतीला अजून वाव आहे. २)मानसी आणि टेबलाच्या आधाराने उभी असलेली मुलगी ह्यामध्ये रंगांच्या छटांमधून उत्तम व्यक्तिरेखा उभ्या राहिलेत. ३) स्वत:चे व्यक्तिचित्र उत्तमच आलंय. इथेही त्याने रंगांचा वापर अतिशय खुबीने करून प्रकाश आणि अंधाराचा खेळ उत्तमपैकी उभा केलाय. त्यातूनच चेहर्‍यावरचे भाव अप्रतिमपणे व्यक्त होतांना दिसताहेत. ४) ह्या चित्रात तर नुसत्या कुंचल्याच्या फटकार्‍यातून एक अफलातून कलाकृती जन्माला घातलेय. मला हेच चित्र सर्वात आवडले. बसलेली,उडणारी कबुतरं,दूरवर दिसणारे पांढरे शुभ्र मिनार आणि मधलं पाणी....आणि आसमंत..सगळंच लाजवाब आहे. ५) पावसाळी संध्याकाळही उत्तम! ६) अराजकाचं चित्र मात्र मला नाही आवडलं. ७) योद्धा देखिल नाही आवडला. एकूण काय तर...शार्दुलच्या हातात जी जादू आहे त्यात प्रामुख्याने तो योजतो ती परिपूर्ण अशी रंगसंगती. ह्यातूनच तो अतिशय सुरेख वातावरण निर्मिती करतो. मात्र त्याला व्यक्तिचित्रणात बरीच मेहनत घ्यावी लागेल असे वाटतेय. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/07/2008 - 22:40 नवीन

सुंदर

सुंदर चित्रे.. फार म्हणजे फारच आवडली इथे इतक्या सुंदर रसास्वादासकट दिल्याबद्दल आभार -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा