क्रंचीझी मॅगी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in पाककृती
16 Mar 2014 - 4:09 pm

‘मला स्वयंपाक येत नाही, पण हां! मॅगी येतं !’ असं एखाद्याला म्हणताना तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न.

साहित्य:
२ मो. चमचे साजुक तूप
१ चमचा जिरं
१ चिरलेला बटाटा
२ चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम
२ मो. चमचे किसलेलं चीज (मी गाउडा चीज वापरलं, पण आवडीच्या फ्लेवरनुसार कुठलंही वापरता येईल)
१ कप पाणी
आणि अर्थातच, मॅगी.

कृती:

कढईत तूप गरम करून त्यात जिरं घालावं
त्यात दाणे/बदाम व चिरलेला बटाटा घालावा
त्यात मॅगी मसाल्याच्या पाकिटातील १/४ मसाला घालावा
मग एक कप पाणी घालून हलकी उकळी येऊ द्यावी.
त्यात मॅगी घालून २ मिनिटं शिजवावं
मग किसलेलं चीज घालून गॅस बंद करावा

सुसाट चव लागते... जबरदस्त! करून बघा आवडतं का.

क्रंचीझी मॅगी
aaa

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

16 Mar 2014 - 4:19 pm | नावातकायआहे

मी पैला... होळीला मॅगी?

वामन देशमुख's picture

16 Mar 2014 - 4:34 pm | वामन देशमुख

मी पयला...
.
.
.
क्रंचीझी मॅगी करून अणि आणि खाऊन बघणारा!

वेल्लाभट's picture

16 Mar 2014 - 4:35 pm | वेल्लाभट

व्वा ! मग आवडलं?

स्रुजा's picture

16 Mar 2014 - 5:16 pm | स्रुजा

छन च दिसतंय की . पास्ता चा छोटा भाउ शोभतोय . उरलेला मसाला कधी टाकायचा ? की चीज आहे म्हणून थोडं कमी मसालेदार ठेवायचं ? गार्लिक ब्रेंड बहार आणेल याच्या बरोबर .

वेल्लाभट's picture

16 Mar 2014 - 6:09 pm | वेल्लाभट

राहिलंच लिहायचं....मॅगीबरोबर....

कंजूस's picture

16 Mar 2014 - 5:54 pm | कंजूस

भन्नाटच प्रकार दिसतोय .
मला एक शंका आहे .यात क्रंची काय आहे ?तुमचे दाणे /बदाम शिजवून मऊ करून टाकलेत !

तुपात तळल्यावर त्यांना तात्पुरते बाजूला काढून मीठ लावून ठेवा .मैगी खाण्यासाठी वाडग्यात(=बोल ?)घेतल्यावर वरून ते खारे बदाम टाकलेत तर कुरकुरीत लागतील .
पटलं तर घ्या .

वेल्लाभट's picture

16 Mar 2014 - 6:10 pm | वेल्लाभट

नाही होत ते मऊ. दोन चार मिनिटाचा खेळ. मस्त कुडुम कुडुम लागतात.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 6:25 pm | मुक्त विहारि

नक्कीच आहे.

सुहास झेले's picture

16 Mar 2014 - 6:40 pm | सुहास झेले

मॅगी कुठल्याही फॉर्ममध्ये आवडते :)

१) ती आधी वेगळ्या पाण्यात गरम करून घ्यावी आणि ते पाणी फेकून द्यावे म्हणजे त्या कच्च्या मॅगीनूडल्सवर चोपडलेला कसलासा थर जातो.
२) मॅगी मसाला ती शिजताना त्यात टाकू नये तर गॅस काढायच्या जरा आधी त्यावर भुरभुरून मिक्स होईस्तोवरच ढवळावे, अर्थात जे लगेचच होतेच.

मी स्वता घरी मॅगी अशीच बनवतो, मात्र स्वयंपाककौशल्यात शून्य असल्याने विविध प्रयोग करायचे टाळतो.
पण हे वरचे छान वाटतेय तरी, कोणी करून घालेल का बघायला हवे.

वेल्लाभट's picture

17 Mar 2014 - 9:24 am | वेल्लाभट

थँक्स अभिषेक. तू दिलेल्या टिप्स पुढपासून आजमावतो.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2014 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा

@मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy019.gif वेल्...ल्ला...भट! http://www.freesmileys.org/smileys/smiley-gen014.gif

वेल्लाभट's picture

17 Mar 2014 - 9:27 am | वेल्लाभट

:)

इन्दुसुता's picture

18 Mar 2014 - 5:42 am | इन्दुसुता

ओ भाऊ, ते फोडणीत जीरे नाही हो मोहरी दिसतेय. पाकृत जीरे लिहिलय, फोटोमध्ये मोहरी.. :)
चवीबद्दल जरा साशंक आहे पण एखादेवेळी करून बघायला हरकत नाही.

वेल्लाभट's picture

18 Mar 2014 - 7:12 am | वेल्लाभट

बरोब्बर. पण त्यात गप्फलत काही नाही. फोटोत मोहोरी आहे हे खरं. पण रेसिपीत जिरंच आहे. ती सुधारणा (मोहोरी ऐवजी जिरं हवं) खाऊन फोटो काढून, मॅगी खाऊन झाल्यावर मग करण्यात आली :)

पियुशा's picture

23 Mar 2014 - 10:18 am | पियुशा

मस्त !

इशा१२३'s picture

25 Mar 2014 - 4:31 pm | इशा१२३

मॅगीचा नविन प्रकार करून बघेन...

अनन्या वर्तक's picture

11 Apr 2014 - 11:57 pm | अनन्या वर्तक

मॅगीचा नविन प्रकार.....मला मॅगी डॉर्म वर राहायला लागल्यापासून आवडावयास लागली होती. काहीतरी झटपट खावयास हवे असल्यास मॅगी एकदम मस्त. तुम्ही बनविलेली मॅगी सुद्धा चविष्ट वाटते आहे.