कैरीची कढी (raw mango curry )

आरोही's picture
आरोही in पाककृती
8 Mar 2014 - 11:04 pm

काल मला बाजारात मस्त कैऱ्या मिळाल्या अजिबात विचार न करता घेतल्या ..कारण हि तसेच आहे मला कैरीपासून बनविलेली एक केरला पद्धतीची कढी खूप आवडते ,अर्थात बनविण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक आहेच ,पण माझ्या पद्धतीने बनविली आहे ...तीच रेसिपी येथे देत आहे ...

साहित्य :कैरी १ साधारण तिचे अर्धी वाटी काप व्हायला हवेत अशी ,दही अर्धी वाटी ,ओलं खोबर अर्धी वाटी,हिरव्या मिरच्या ४,कढीपत्ता ६-७ पाने,लाल सुक्या मिरच्या २,पाव चमचा हळद ,पाव चमचा मेथी पावडर ,अर्धा चमचा मोहरी,मीठ चवीनुसार,तेल ३ चमचे,पाणी आवश्यते नुसार

कृती : सर्व प्रथम कैरीला सोलून तिचे काप करून घ्या .

1

एका कढाई मध्ये २ चमचे तेल घालून त्यात चिरलेली कैरी घालून शिजू द्या .

2

एका बाजूला मिक्सर च्या भांड्यामध्ये मध्ये ओलं खोबर्याचे काप टाका (माझ्याकडे खोबऱ्याचे तुकडे केलेले असल्याने मी त्याचा काळा भाग काढून टाकला पण तुम्ही खवुन घेऊ शकता)

3

आता त्यात ४ मिरच्या आणि दही टाकून ते बारीक वाटून घ्या.

4

आता कैरी थोडी मऊ झाली असल्यास ती काढून त्याच कढाई मध्ये उरलेल्या तेलात कढीपत्ता .आणि मोहरी ची फोडणी करून त्यात बारीक केलेले मिश्रण टाका

5

आणि कैरी टाकून त्यात मीठ ,मेथी पावडर ,हळद ,आणि अर्धी वाटी पाणी घालून एक २ -३ उकळ्या येऊ द्या ..(येथे उकळी मंद आचे वर येऊ द्याव्यात नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.) .

6

आता एका छोट्या भांड्यात १ चमचा तेल घेऊन लाल मिरच्या यांची फोडणी करून ते तयार कढीत टाका ..
हि कढी चवीला थोडी आंबट आणि थोडी घट्टसर असते ..पण गरम भाता बरोबर खूप चविष्ट लागते ..

7

प्रतिक्रिया

साळसकर's picture

8 Mar 2014 - 11:28 pm | साळसकर

योंव, मस्त दिस्तेय. काय योगायोग, आताच मी दह्याची कढी हादडून आलोय. सोलकढी म्हणाल तर बीअरसारखी पितो. थोडक्यात कढी हा आपला वीक पॉईंट. आईला दाखवायला पाहिजे हा प्रकार, तिला काही माहितेय का वा जमेल का म्हणून..

रेसिपीबद्दल धन्यवाद, कैर्‍या भरल्या पोटीही तोंडाला पाणी सुटावे अश्या दिसताहेत :)

पैसा's picture

8 Mar 2014 - 11:30 pm | पैसा

आत्ता ११.३० वाजता मला कैर्‍या कुठे मिळणार? बंदी घालायच्या लोकांत आणखी एकीची भर!

भावना कल्लोळ's picture

11 Mar 2014 - 4:40 pm | भावना कल्लोळ

काय उच्छाद मांडला आहे या मुलींनी, पहिली ती सानु आणि आता हि स्वार्थी आपले अर्चु, स्वतः बनवते आणि स्वतः खाते आणि फोटो दाखवुन आमचा छळ करते. भ्या …

आयुर्हित's picture

8 Mar 2014 - 11:32 pm | आयुर्हित

आजपासून दह्याचे सारे पदार्थ आवडून खाईल.
एक नवीन चांगली पाकृ कळवल्याबद्दल धन्यवाद!

आनन्दिता's picture

9 Mar 2014 - 6:47 am | आनन्दिता

देवा! आवर या सगळ्यांना ..उच्छाद मांडलाय नुसता.

या लोकांना बंदिस्त विभाग काढुन द्या . ह घ्या .
पाक्रु आवडली

मुक्त विहारि's picture

9 Mar 2014 - 7:40 am | मुक्त विहारि

ही रेशिपी बायकोला दाखवतो.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2014 - 8:15 am | प्रीत-मोहर

माझी आज्जी करते कैरीची कढी पण थोडीशी वेगळी. ही रेसिपी पण मस्त आहे.

रेवती's picture

9 Mar 2014 - 8:49 am | रेवती

अरेच्च्या! हा तर वेगळाच प्रकार दिसतोय!

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2014 - 12:35 pm | सानिकास्वप्निल

कैरीच्या कढीत नारळाचे दूध घालतात हे माहित आहे पण दही घालून केलेल्या कढीचा हा प्रकार वेगळा वाटला.

हि केरळी पद्धतीची कढी आहे ,मी त्यात थोडाफार बदल करून बनविली आहे ,,आणि हो यामध्ये कोलंबी घालून सुद्धा बनविता येते ,, एका ठिकाणी बघितले आहे ...+)

सखी's picture

12 Mar 2014 - 12:32 am | सखी

माझ्या सासुबाई करतात अशी कढी, फार अप्रतिम लागते - गार किंवा गरम. आणि खूप दिवस टिकतेसुद्दा फक्त वर म्हटल्याप्रमाणे जास्त गरम करायची नाही.

कवितानागेश's picture

9 Mar 2014 - 10:11 pm | कवितानागेश

मस्तय कढी. :)

भाते's picture

9 Mar 2014 - 10:53 pm | भाते

पाकृ वाचुन तरी बनवायला जमेल असे वाटते आहे. फोटो तर अप्रतिम.

जाताजाता, पाकृ विभागातले सर्वच धागे मी फक्त विकांताला घरी असतानाच ऊघडतो. आठवडाभर हापिसात बसुन हे असे काही पाहिले कि जळजळ होते आणि कामाचा बट्टयाबोळ होतो. :)

डँबिस००७'s picture

10 Mar 2014 - 12:36 am | डँबिस००७

ह्या करीला केरळ मध्ये पच्चा मांगा पुळ्ळीशेरी म्हणतात.

पच्चा :(कच्चा/हीरवा)
मांगा : आंबा
पुळ्ळीशेरी : आंबट कढी

कैरीची डाळ माहीत आहे, कैरीची+नारळाची कढी प्रकार नवाच माझ्यासाठी.
पाकॄसाठी धन्यवाद.

स्पंदना's picture

11 Mar 2014 - 3:01 am | स्पंदना

नविनच!
मी पिकल्या आंब्याची कढी करते. पण कच्ची कैरी पहिल्यांदाच ऐकली.

केदार-मिसळपाव's picture

11 Mar 2014 - 7:34 pm | केदार-मिसळपाव

एक नंबर...

वेल्लाभट's picture

12 Mar 2014 - 2:19 pm | वेल्लाभट

आहाहाहाहा! क्या कलर है ! क्लास!!!!!
तोंडाला पाणी सुटलं ! मस्त रेसिपी!

अनन्न्या's picture

30 Mar 2014 - 7:56 pm | अनन्न्या

पध्दत थोडी वेगळी आहे. मस्त!

कढी आपल्याला लयं म्हणजी लयं आवडते बघा...मग ती कंची बी असो. :)