मनःशांती

मनःशांतीचा शोध घेत होतो
खूप दिवसांपासून
याहूवर शोधले,
रेडीफवर आलो जाऊन
विकिपिडिया पाहिले
नेट काढले गूगलून

भाषा पाहिली बदलून
चित्रेही शोधत राहिलो
शब्द झाले फिरवून
ब्लॉग्जही वाचत फिरलो

निवांत क्षणी एका
उघडले डोळे, उजळली कांती
लॅपटॉप बंद झाला
सापडली मनःशांती

भारनियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच महागाई, तेच राजकारण
आणि तोच कायदा

-ॐकार

मस्त!

भारनियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच महागाई, तेच राजकारण
आणि तोच कायदा

एकदम आवडली!

हरी ॐ Smile

मस्त

'आधुनिक' कविता आवडली Smile

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

याही प्रकारात ॐकार यांच्या लेखणीतली सफाई जाणवते.

(पण त्यांच्या नेहमीच्या आशयगर्भ रहस्यपूर्ण कवितांपेक्षा ही थोडी उघड-उघड आहे.)

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू

+१

सहमत आहे.

++१

पुर्ण सहमत.

ॐकार कविता आवडली.

जरा मनःशांती मिळवायचा प्रयत्न केला तर "काय शेठ, आज नाराज दिसताय!" अश्या खरडी येतात. : - (

छान..

वा! अचानक एक छान वळण घेणारी परंतु भारनियमासारख्या डोकेदुखीवाल्या विषयावर भाष्य करणारी कविता..!

तात्या.

मस्त कविता

कविता आवडली

अमोल
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मस्त

कविता आवडली!

मस्त

कविता आवडली...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदाशी

वरदाशी सहमत.

छान कविता!!!

http://sucheltas.blogspot.com

एकदम मस्त..

भारनियमन सारख्या बोरिंग विषयावर चांगला दृष्टी कोन देणारी कविता...
अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/