हिरवी जिद्द

.

सिमेंटच्या शेवाळल्या थरात....
मातीचा बोटभर तुकडा शोधून,
उंच उंच जाणार्‍या इमारती मधल्या
फुटभराच्या रोपट्या....
किती रे सुंदर दिसतोस!

तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं...
आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच..
ते टोकाचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!

आहा... !
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.

बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...
असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य,
तुझ कोवळे पण..
तुझी हिरवी जिद्द!
न जराठता , कोमेजता!

=====================
स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८

आवडली

बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...

चांगली कलाटणी...

कविता आवडली.

असेच

स्वातीताई,
सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली.
सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले.
(आस्वादक)बेसनलाडू

हेच म्हणतो..

स्वातीताई,
चांगली कलाटणी...
कविता आवडली.
(वाचक)केशवसुमार
स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा.. Timeout जग फारच फास्ट झालयं नाही.. Waiting

हेच म्हणते..

कलाटणी चांगली आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनापासून आभार

Smile

छान

वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली Smile
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

+१

मांडणी आणि कलाटणी आवडली.

चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.