टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिसळ
प्रेषक गणा मास्तर ( मंगळ, 07/15/2008 - 09:51) .
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


अरे चित्र कुठे आहे
जमले
मिसळ - शिवाजी आश्रम
मंचर जवळच जुन्नर या गावी 'शिवाजी आश्रम' नावाचे एक उपाहार गृह आहे. तेथील मिसळ खाऊन पहा. केवळ अप्रतिम. शिवाय तेथेच मिळणारा बदामी पेढाही तितकाच अप्रतिम आहे. या पेढ्याला सुमारे सत्तर वर्षांची परंपरा आहे असे म्हणतात.
माहीत आहे..
मला हे ठिकाण माहीत आहे, फारच सुंदर मिसळ व पेढा!
शिवनेरीच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे...
तात्या.
मिसळ
वरच्या चित्रातली मिसळपण मी शिवनेरीला मित्राबरोबर जातानाच खाल्ली होती. पुढच्यावेळी शिवाजी आश्रमची खाइन.पेढे म्हणाल तर याच भागात आळेफाटयाजवळ घारगाव नावाचे गांव आहे, तिथले बदामी पेढे अप्रतिम. या गावात पुणे नाशिक जाणार्या सगळ्या गाडया पेढ्यांसठी थांबतात.