जीवन मी जगून गेलो

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
14 Jul 2008 - 12:29 pm

जीवन मी जगून गेलो
.

एकसे सुख दु:खा लेखून गेलो
जीवनी असा मी जगून गेलो

पाहिली मी दिवास्वप्ने कधी जी
साकारण्या तया गढून गेलो

आनंद दिला-घेतला असा की
सुगंध बागेस देऊन गेलो

ऊन-पावसात हसलो सदा मी
मैफलीत गीत गाऊन गेलो

म्हणती कुणी सटकला कधी हा
साथ अशी तुला देऊन गेलो

करशिल मजवर आरोप कसे तू
जगणे तुला मी शिकवून गेलो

=========================
स्वाती फडणीस ....................... २२-०५-२००८

कविता

प्रतिक्रिया

रामदास's picture

14 Jul 2008 - 12:41 pm | रामदास

सुगंध बागेस देऊन गेलो. या ओळी मला खूप आवडल्या.

स्वाती फडणीस's picture

14 Jul 2008 - 1:38 pm | स्वाती फडणीस

:)

मदनबाण's picture

14 Jul 2008 - 1:42 pm | मदनबाण

आनंद दिला-घेतला असा की
सुगंध बागेस देऊन गेलो

हे फार आवडल..

मदनबाण.....

अनंतसागर's picture

14 Jul 2008 - 5:12 pm | अनंतसागर

करशिल मजवर आरोप कसे तू
जगणे तुला मी शिकवून गेलो

हे फारच आवडलं
अप्रतिम.

विसोबा खेचर's picture

14 Jul 2008 - 5:55 pm | विसोबा खेचर

कविता ठीक वाटली...

पुलेशु....

तात्या.

सहज's picture

14 Jul 2008 - 6:34 pm | सहज

म्हणती लोक पिशाच्च हो झालो
करतो कविता आहे जरी मेलो

हसु नको ऋषीकेशा हा मी आलो
टाकाया प्रतिसाद
मी कधी नाही म्हणालो

कृ. ह. घ्या. ;-)

स्वाती फडणीस's picture

14 Jul 2008 - 7:00 pm | स्वाती फडणीस

हे एक कै. वडीलांनी धरतीवासी मुलाला उद्देशुन केलेले स्वगत आहे.
किंवा मला जाणवलेल त्या व्यक्तीच जगण..:)