व्हर्जिन पिना कोलाडा

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
29 May 2013 - 2:15 am

Pina-Colada

साहित्यः

नारळ - २ नग.
पिठी साखर - ३ मोठे चमचे (टेबल स्पून).
अननसाचा रस - ८५० ग्रॅम्स.
अननस सिरप - ५ मोठे चमचे.
व्हॅनिला आईस्क्रिम - १/२ लिटर.
पाणी - ६ कप (चहाचे कप)

नारळ खवून घ्यावा. आता नारळात ६ कप पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवायचे. नंतर मिक्सर मध्ये भरपूर फिरवून एखाद्या पातळ कपड्याने (जसे: धोतराचा तुकडा) गाळून घ्यायचे. ह्या दुधात पिठी साखर मिसळून फ्रिजमध्ये थंड करावयास ठेवायचे. साधारण २ तास ठेवल्यास चांगले थंड होईल.

आता, थंड केलेले नारळाचे दूध, अननसाचा रस, अननस सिरप, व्हॅनिला आईस्क्रिम हे सर्व मिक्सर/ब्लेन्डर मध्ये घालून नीट मिसळून घ्यावे.

व्हर्जिन पिना कोलाडा तयार आहे. एखाद्या काचेच्या उंच ग्लासात पिना कोलाडा भरून ग्लासच्या कडेला अननसाचा तुकडा लावून त्यावर, टूथपिकच्या साहाय्याने, एक लालबुंद चेरी लावून ग्लास सजवावा.

टिव्ही समोर बसून सावकाश एक एक घुटका घेत स्वर्गिय आनंद घ्यावा.

सुचवणी:

१) अननसाचा ताजा रस घेता आला तर उत्तम पण नाहीतर तयार अननस रसही चालेल.
२) अननस सिरप तयार मिळाल्यास ते वापरावे अन्यथा, साखरेचा एकतारी पाक करून त्यात अननसाचा अर्क (पायनॅपल एसेन्स) आणि किंचीत पिवळा रंग मिसळावा. अननस सिरप तयार.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

मोदक's picture

29 May 2013 - 2:35 am | मोदक

मस्त मस्त!!

अर्धवटराव's picture

29 May 2013 - 3:48 am | अर्धवटराव

आणि स्वर्गीय आनंद शतगुणीत करावा :)
जय हो काका.

अर्धवटराव

रेवती's picture

29 May 2013 - 5:11 am | रेवती

छानच.

स्पंदना's picture

29 May 2013 - 6:33 am | स्पंदना

हाय! काय तो उंच उंच जाणारा डोलारा, काय त्या चेरीची ऐट.
दिल घायल हो गया!

दिपक.कुवेत's picture

29 May 2013 - 10:44 am | दिपक.कुवेत

मागचा गडद पॄष्ठभाग आणि हलक्या फिक्या रंगाच पिनाकोलाडा.....रंगसंगती उत्तम साधलीये!

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 11:58 am | प्रभाकर पेठकर

दिपक,

पिनाकोलाडा मी बनविले आहे पण पार्श्वरंग माझ्या मित्राने, फोटोशॉप मध्ये, भरून दिले. अर्थात, त्याला माझ्या सुचना होत्याच (ऐकतो तो). पण त्याच्या कलेलाही दाद दिली पाहिजे.

अक्षया's picture

29 May 2013 - 10:56 am | अक्षया

छान दिसतोय पिनाकोलाडा. नक्की करुन बघणार. :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2013 - 11:44 am | अत्रुप्त आत्मा

या..............हू........... काय अफलातून मिक्सिंग आहे. आजचं करणार...

उन्हाळा झिंदाबाद!!! पेठकर काका झिंदाबाद!!! http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/69.gif http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/69.gif http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/69.gif

दिपक.कुवेत's picture

29 May 2013 - 11:52 am | दिपक.कुवेत

ह्या वर्षीचा उन्हाळा सुसह्य होणार.....हेच बोल्तो पेठकर काका झिंदाबाद!!!

अवांतरः आगामी आकर्षणाची घोषणा आत्ताच करावी काय?

मी याच पाकृच्या शोधार्थ होते..
ठ्यांक्श पेठकर काका..

माझे फेवरेट मॉकटेल... प्रचंड आवडते मला हे... धन्स पेठकर काका.

चित्रगुप्त's picture

29 May 2013 - 12:54 pm | चित्रगुप्त

जबरदस्त दिसते आहे हे प्रकरण.
दोन प्रश्नः
१. अननस (मिळत/आवडत) नसल्यास त्या ऐवजी काय घालू शकतो?
२. याचे नाव 'व्हर्जिन पिना कोलाडा' आहे, त्याचा अर्थ काय?

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

पिना कोलाडा हे स्पॅनिश पेय आहे. स्पॅनिश भाषेत पिना म्हणजे 'पायनॅपल' (अननस) आणि कोलाडा म्हणजे 'गाळून घेणे' म्हणजेच रस. म्हणजेच पिना कोलाडा हे अननसाच्या रसा पासून बनते.
मुळात ह्यात, मुख्य साहित्यात, 'रम' ह्या मद्याचा समावेश असतो आणि जे 'रम' शिवाय बनविले जाते ते 'व्हर्जिन' असा अर्थ आहे.

झकास पेय आहे.. धन्यवाद.. करुन पहायला हवेच..

अवांतरः

मुळात ह्यात, मुख्य साहित्यात, 'रम' ह्या मद्याचा समावेश असतो आणि जे 'रम' शिवाय बनविले जाते ते 'व्हर्जिन' असा अर्थ आहे.

समजा रम मिसळली तर "मिसेस पिनाकोलाडा" म्हणावे का? ;)

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2013 - 2:43 am | प्रभाकर पेठकर

'रम' मिसळल्यावर त्या पेयाची 'व्हर्जिनिटी' उरणार नाही त्यामुळे ते 'व्हर्जिन पिनाकोलाडा' न राहता नुसतेच 'पिनाकोलाडा' होईल.

मस्त! फक्त फोटो का दिसत नाही?

मिपाकरोंपे 'लिक्विड वेपनसे' कातिलाना हमला.... २०० घायल.
हमले की जिम्मेवारी पेठकर साब ने ले ली.

झकासराव's picture

29 May 2013 - 1:35 pm | झकासराव

वाह!!!!!!!!!! :)

धनुअमिता's picture

29 May 2013 - 1:58 pm | धनुअमिता

मस्त दिसते आहे. नक्की करुन बघणार.

सानिकास्वप्निल's picture

29 May 2013 - 3:20 pm | सानिकास्वप्निल

फोटो क्लास व कृती ही सोपी
सूपर्ब!!

कृती आणि फोटो दोन्ही मस्त.

nishant's picture

31 May 2013 - 2:36 pm | nishant

फोटो एकदम क्लास. पिना कोलाडा माझे एकदम आवडते.

सुहास झेले's picture

31 May 2013 - 2:51 pm | सुहास झेले

भारीच !!!

सूड's picture

31 May 2013 - 3:55 pm | सूड

क्लास !!

व्हर्जिन पिना कोलाडा से ग्लास और डेकोरेशन गरम है!
तोंडाला पाणी सुटले. बघूनच थंडगार.