बीटाच्या दशम्या

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
11 Mar 2013 - 4:34 pm

साहित्य:

ताजे बीट: ३-४, मध्यम आकाराचे
साखर: एक वाटी
कणिक: दोन-तीन वाट्या (मिश्रणाच्या प्रमाणात)
तूप: ५० ग्रॅम
दूध: पाव लिटर
मीठ: चवीपुरते
तीळ: अर्धा चमचा (ऐच्छिक)

साहित्य

साहित्य

पाकृ:

बीट साल काढून बारीक किसून घ्या. मंद आचेवर १२-१५ मिनिटे शिजवून घ्या.
 शिजवून घ्या

मऊसर झाले की दूध आणि साखर घालून, चांगले हलवून अजून दोन मिनिटे शिजवून घ्या.
Alt

थंड झाल्यावर यात कणिक, तूप आणि चिमुटभर मीठ (हवे असल्यास तीळ) मिसळून साधारण घट्टसर पीठ भिजवून घ्या.
Alt

नेहमी पोळी जशी लाटतो तश्या दशम्या लाटून घ्या. भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावा. लालेलाल, गरमागरम दशमीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा घालून खायला द्या.
Alt

Alt

टीपा:

१. यात दूध आणि साखरेऐवजी तिखट, हळद, आले-लसणाची पेस्ट इ. घालून तिखटमिठाची आवृत्ती (धपाटे) करता येते.
२. फोटोत दाखवलेली दशमी ही तिखट आवृत्ती आहे. (म्हणून हळदीचा पिवळा रंग दिसतोय.) गोड दशम्या फोटो काढण्याआधीच संपून गेल्या.
३. ही पाकृ माझी नसून माझ्या पत्नीची आहे.

प्रतिक्रिया

सुप्रिया's picture

11 Mar 2013 - 6:02 pm | सुप्रिया

मस्त दिसताहेत. करून बघायला हव्या.

पैसा's picture

11 Mar 2013 - 10:07 pm | पैसा

बीटाचं कोशिंबीरीशिवाय काय करता येतं याचं हे उत्तर!

इन्दुसुता's picture

12 Mar 2013 - 6:31 am | इन्दुसुता

पाकृ आवडली

स्पंदना's picture

12 Mar 2013 - 6:36 am | स्पंदना

बिट इट! बिट इट!

कच्ची कैरी's picture

12 Mar 2013 - 7:52 am | कच्ची कैरी

अरे व्वा लालेलाल दशम्या !!

सानिकास्वप्निल's picture

12 Mar 2013 - 8:23 pm | सानिकास्वप्निल

बीटाच्या दशम्या खूप आवडल्या :)

दादा कोंडके's picture

13 Mar 2013 - 2:41 am | दादा कोंडके

पण दशम्या सोडून ताटातले बाकीचे पदार्थ बघुनच तोंपासु. :)

साऊ's picture

13 Mar 2013 - 7:04 am | साऊ

छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2013 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त मांडणी आणि पाककृती. आवडली.

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

14 Mar 2013 - 1:33 pm | दिपक.कुवेत

फोटो छान आणि सोपी पाकॄ. बीट अनायेसे घरात आहेत तर करुन बघायला पाहिजे

सस्नेह's picture

15 Mar 2013 - 12:14 pm | सस्नेह

पत्नी सुगरण आहे हो तुमची !

वामन देशमुख's picture

15 Mar 2013 - 12:28 pm | वामन देशमुख

विशेषतः स्नेहांकिता यांना आणि सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद!

मुले गोड प्रकार खायला नाखुश असतात. बाकी ताटातल्या पदार्थांची पण रेसीपी द्या. तेही छान दिसतायत.

मस्त पाकृ!! कोशिंबीर सोडून हा असा "ऑफबीट" वापर पहिल्यांदाच पाहिला :)

अवांतरः वामनपंडितांचे सोवळे इतके कडक होते की ते आपल्या बायकोच्या हातचेही न खाता स्वतःच रांधून खात असत असे वाचलेय. क्षणभर वाटले की तुमचीच पाकृ तर नव्हे? स्क्रोलल्यावर कळ्ळं काय ते ;)